ZP Kolhapur
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ऑनलाइन विक्री प्रारंभ उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान
महिला स्वयंसहाय्यता बचत गटांची उत्पादने अमेझॉन डिजीटल बाजारपेठेत
कोल्हापूर, दि. १२:
देशभर लौकिक असलेले कोल्हापुरी चप्पल आता ॲमेझॉन या डिजिटल बाजारपेठ विक्री संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहे. त्यामुळे कोल्हापुरी चप्पलने जागतिक बाजारपेठेत प्रवेश केला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वेबसाईट उघडून हा ऑनलाईन विक्री प्रारंभ झाला.
कोल्हापूर जिल्हयामधील महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी उत्पादीत केलेल्या उत्कृष्ठ उत्पादनांना कायमस्वरूपी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देवून महिलांचा आर्थिक स्तर उंचावून त्यांचे सक्षमीकरण होण्यासाठी ऑनलाईन प्रॉडक्ट विक्री या मोहिमेचा प्रारंभ श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते कोल्हापुरात झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत उमेद -महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यात येत आहे. ग्रामीण
भागातील महिलांचे सक्षमीकरण करून त्यांचे जीवनमान उंचावणे, हा या अभियानाचा मुख्य उददेश आहे. कोल्हापूर जिल्हयामध्ये १२,१०० इतक्या स्वयंसहाय्यता गटांची स्थापना करणेत आलेली आहे. तसेच २६० ग्रामसंघ व दोन प्रभाग संघाची स्थापना करणेत आलेली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल म्हणाले, अमेझॉन या डिजीटल विक्री बाजारपेठ संकेतस्थळावर महिला स्वयंसहाय्यता गटांची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध होवून ग्रामीण भागामध्ये आर्थिक विकासाला चालना देण्याची संकल्पना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विचारातून साकारण्यात येत आहे. आज कोल्हापूर जिल्हयातील प्रसिध्द असलेले कोल्हापूरी चप्पल ऑनलाईन लिंकवरून उत्पादन विक्रीसाठी खुले करण्यात आले. कोल्हापूरी गुळ, काकवी, व्हाईट मेटल ज्वलरी, कोल्हापूरी दागिने, मध, विविध प्रकारचे
मसाले, कोल्हापूरी कांदा व लसुन चटणी, मिरची पावडर, गारमेंट प्रोडक्ट,मास्क, इत्यादी अनेक वस्तू अमेझॉन या संकेतस्थळावर ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध होणार आहेत.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल, प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास व जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन पानारी आदी उपस्थित होते.
चौकट…….
जगात भारी….. कोल्हापुरी……… ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, जगात भारी…. कोल्हापुरी …… असा कोल्हापूर जिल्ह्याचा लौकिक सर्वदूर आहे. कोल्हापूर जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या शेतीमालासह औद्योगिक व महिला बचत गटांच्या उत्पादनांनाही दर्जा व गुणवत्तेमुळे बाजारपेठेत मोठी मागणी आहे. अमेझॉनसारख्या डिजिटल बाजारपेठ विक्री संकेतस्थळामुळे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळून त्यांचे सक्षमीकरण होईल.
फोटोओळी….
कोल्हापूर- अमेझॉन या डिजिटल विक्री संकेत स्थळावरील कोल्हापुरी चप्पलचा विक्री प्रारंभ करताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल, प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास व जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन पानारी.
जिल्हा परिषदेकडून राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान 2020-21 अंतर्गत विविध प्रशिक्षणÛúÖµÖÔÛÎú´ÖÖÓ“Öê आयोजन केलेबाबत कोल्हापूर-03/11/2020.
पंचायत राज संस्थामधील लोकप्रतिनिधी व अधिकारी / कर्मचारी यांची कार्यक्षमता वाढावी आणि या संस्थांचे कामकाज अधिक परिणामकारकरित्या होण्याच्या दृष्टिने तसेच ग्रामपंचायतींना उपलब्ध असणारा निधीचा स्त्रोत व केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या योजनांचे अभिसरण करुन ग्रामपंचायत विकास आराखडा परिपूर्ण होण्याच्या दृष्टिने राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत सन 2020-21 च्या मंजूर वार्षिक आराखड्यामधील विविध प्रशिक्षण व क्षमता बांधणी कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा परिषद कोल्हापूर यांचेमार्फत करणेत येणार आहे.
यामध्ये मा. जिल्हा परिषद सदस्य यांचे एक दिवसीय प्रशिक्षण (67), जिल्हा परिषद खातेप्रमुख व जिल्हा स्तरावरील राज्य शासनाचे विविध विभागाचे विभागप्रमुख यांचे एक दिवसीय प्रशिक्षण (20), तालुकास्तरीय छाननी समिती सदस्य यांचे एक दिवसीय प्रशिक्षण (120), प्रभारी अधिकारी (विस्तार अधिकारी) यांचे 2 दिवसीय प्रशिक्षण (134), पर्यवेक्षिका (एबाविसेयो) यांचे 2 दिवसीय प्रशिक्षण (134) सरपंच व ग्राम सेवक यांचे 2 दिवसीय प्रशिक्षण (1888), पंचायत समितीचे अधिकारी व पदाधिकारी यांचे एक दिवसीय प्रशिक्षण (600), गणातील सर्व ग्रा पं सदस्य, ग्रामस्तरीय संसाधन गटाचे सर्व सदस्य व सर्व विभगांचे (जिप व राज्य शासन) ग्राम स्तरावरील सर्व कर्मचारी यांची एक दिवसीय कार्यशाळा (16500), गणातील सर्व ग्रामपंचायतमधील स्वयंसहाय्यता गटांच्या ग्रामसंघाचे अध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष, अंगणवाडी सेविका, ग्राम बाल संरक्षण समिती सदस्य आणि समुह संसाधान व्यक्ती (CRPs) यांची एक दिवसीय कार्यशाळा (15450) इ. प्रशिक्षण कार्यक्रमांचा समावेश आहे.
सदर प्रशिक्षण कार्यक्रम ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था, कसबा बावडा आणि ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांचेमार्फत पूर्ण केले जाणार आहेत.
उपरोक्त नमुद प्रशिक्षण कार्यक्रमापैकी प्रभारी अधिकारी (विस्तार अधिकारी) यांचे प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 04/11/2020 ते दिनांक-07/11/2020 या कालावधीत तसेच पर्यवेक्षिका (एकाविसेयो) यांचे प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक-09/11/2020 ते 12/11/2020 ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था कसबा बावडा कोल्हापूर येथे आयोजित करणेत आलेले आहेत.