जिल्हा परिषद स्वनिधी योजना (मागासवर्गीयांसाठी)

सदर योजने अंतर्गत समाज कल्याण समितीने मान्य केलेल्या योजना घेवून योजनेचा लाभ दिला जातो. प्रामुख्याने खालील प्रमाणे योजना राबविल्या जातात.

राजर्षि शाहू घरकुल योजना
उद्देश – मागासवर्गीयाना घरबांधणे करितां आर्थिक मदत करणे.
अटी व शर्ती – लाभार्थी मागासवर्गीय असणे आवश्यक आहे.
दारिद्गय रेषेखाली असलेचा दाखला अथवा रु. ३६,०००/- चे आतील आवश्यक आहे.
.
मागासवर्गीय वस्तीमधील समाज मंदिर बांधणे व व दुरुस्तीस अर्थसहाय अटी व शर्ती –
१) अंदाजपत्रक २) नकाशा ३) यापुर्वी लाभ घेतले नसलेचा दाखला ४) ग्रामपंचायत ठराव
सदर योजने अंतर्गत नवीन बांधकामास रु. २.०० लाख व दुरुस्तीकरितां रु. ०.५० लाख इतके अनुदान दिले जाते

मागासवर्गीयाना व मागासवर्गीय महिलाना स्वयंरोजगारासाठी साधने व उपकरणे पुरवणे
उद्देश – मागासवर्गीयाना स्वयंरोजगार करुन स्वताच्या पायावर स्वावलंबी बनविणे. अटी व शर्ती –
लाभार्थी मागासवर्गीय असणे आवश्यक आहे.
दारिद्गय रेषेखाली असलेचा दाखला अथवा रु. ३६,०००/- चे आतील आवश्यक आहे.
सदर योजने अंतर्गत पिको फॉल मशिन घरघंटी, झेरॉक्स मशिन इ. साधने घेवून विनामुल्य साधने पुरवली जातात.