Uncategorized
आर.टी.ई. अंतर्गत 25 टक्के विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2017-18 – दुसरी फेरी
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये (वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देणेसाठी जागा राखून ठेवण्याची रीत) नियम 2012 प्रमाणे अल्पसंख्यांक शाळा वगळता, राज्यातील सर्व विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यता तत्त्वावरील प्राथमिक शाळांना सन 2012-13 या शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 % पर्यंतच्या जागा नजीकच्या परिसरातील वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. या अंतर्गत सन 2017-18 या शैक्षणिक वर्षामधील 25 % आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या https://student.maharashtra.gov.in या लिंकवरील RTE Portal वरऑनलाईनचालू झालेली आहे.
सदर प्रक्रियेअंतर्गत दि. 30/04/2017 ते दि. 10/05/2017 या कालावधीत पालकांकडून ऑनलाईन अर्ज स्विकारणेची दुसरी फेरी पार पडलेली आहे.या फेरीमध्ये एकूण 341ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानंतर ऑनलाईन प्रणालीद्वारे RTE 25 % विद्यार्थी प्रवेशासाठी सदर 341 विद्यार्थ्यांची यादी RTE च्या लिंकवर अपलोड करणेत आलेली आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश घेणेसाठी शाळेच्या नावासह SMS ऑनलाईन प्रणालीद्वारे परस्पर पाठविणेत आले आहेत. SMS प्राप्त झालेनंतर पालकांनी संबंधित शाळेत मूळ कागदपत्रांसह जाऊन पाल्याचा प्रवेश निश्चित करावयाचा आहे. शाळेत जाऊन ऑनलाईन प्रवेश निश्चित करणेची अंतिम तारीख 21/05/2017 आहे.
दि. 21/05/2017 नंतर सदर प्रवेश फेरीसाठी मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे दिलेल्या मुदतीत पालकांनी संबंधित शाळेत जाऊन पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. सुभाष चौगुले यांनी केले आहे.
(श्री.सुभाष रा. चौगुले)
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जिल्हा परिषद, कोल्हापूर
Test PDF
http://zpkolhapur.gov.in/wp-content/uploads/2017/05/DDUGKY-Mahiti.pdf
Contact to Genaral Administration Dept
[vfb id=3]
Contact to Genaral Administration Dept
[vfb id=3]
Hello world!
Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!