महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

ग्रामीण भागाचा सुयोग्य विकास करणेचे दृष्टीने उपलब्ध मानवी संपत्तीव्दारे ग्रामीण भागात टिकाऊ सामुहिक मालमत्ता निर्माण करीत असतानाच ग्रामीण भागात राहणाऱ्या व अंग मेहनतीची अकुशल कामे करणाऱ्या, मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम 2005 पारीत केला असुन सदर कायद्यान्वये ग्रामीण भागातील कुटुंबाला 100 दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देण्याची हमी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाने राज्याची रोजगार हमी योजना, व केंद्राची राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यांची सांगड घालुन महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंमलात आणलेली आहे. या योजनेला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र असे संबोधले जाते.

Read more

जिल्हा वार्षिक योजना

                             जिल्हा वार्षिक योजनेचे फोटो

Read more

यशवंत सरपंच पुरस्कार

जिल्हा परिषद, स्वनिधीतून सन 2004-05 या आर्थिक वर्षापासून यशवंत सरपंच पुरस्कार योजना सुरू केलेली आहे. सदर योजनेमध्ये उत्कृष्ठ ग्रामपंचायत व सरपंच यांना पुरस्काराने सन्मानित केले जाते. जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातून प्रस्ताव मागणी केले जातात. प्रत्येक तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या ग्रामपंचायतीस रक्कम रूपये 25,000/- व व्दितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या ग्रामपंचायतीस 15,000/- व प्रथम क्रमांकाच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच यांना वैयक्तिक बक्षीस रक्कम रूपये 1,000/- व चांदीचे पदक या स्वरूपात पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. तसेच जिल्हयातील सर्व तालुक्यातून आलेल्या प्रस्तावापैकी अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या दोन ग्रामपंचायतींची निवड जिल्हा पुरस्कारासाठी निवड करणेत येते. अतिउत्कृष्ट निवड केलेल्या ग्रामपंचायतीपैकी प्रथम क्रमांकाच्या ग्रामपंचायतीस रक्कम रूपये 50,000/- व व्दितीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतीस रक्कम रूपये 30,000/- रोख स्वरूपात पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.