- आयसीडीएस कार्यक्रम केंद्गशासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाद्वारे चालविण्यात येणारा देशातील सर्वात मोठा आणि बहुउद्देशीय कार्यक्रम आहे.
- आयसीडीएस कार्यक्रम २ ऑक्टोबर १९७५ पासून राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या १०६ व्या जयंती दिनी सुरु करण्यात आला आहे.
Uncategorized
महिला व बालकल्याण विभाग
जिल्हा परिषद कोल्हापूर मध्ये एकूण १४ विभाग आहेत .त्यापैकी महिला व बालकल्याण विभाग हा महत्वाचा विभाग आहे.महिला व बाल कल्याण समितीची स्थापना १९९२-९३ मध्ये झाली सदर समिती मार्फत शासन व जिल्हापरिषदेकडील प्राप्त होणा-या अनुदानातून गरीब ,विधवा,परित्यक्ता, घटस्फोटीत,देवदासी व अर्थिकदृष्टया कमकुवत घटकातील तसेच मागासवर्गीय महिला यांना त्यांच्या शैक्षणिक व अर्थिक स्तर उंचावण्यासाठी व स्त्रीया ख-या अर्थाने सबल होण्याच्या दृष्टीने शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटी नुसार वैयक्तीक व सामुहिक योजना या विभागामार्फत राबविल्या जातात.
आस्थापना शाखा
नागरिकांची सनद
लेखा परिक्षण
लेखा परिक्षण शाखेमध्ये जिल्हा परिषदेतील खाते प्रमुखांकडुन प्राप्त होणा-या प्रस्तावांवर प्रशासकिय मान्यता / खर्चास मान्यतेबाबतचे अभिप्राय देण्यात येतात. तसेच प्राप्त होणा-या सर्व प्रकारच्या देयकांची प्राथमिक तपासणी करून अदाई बाबतचे शेरे नोंदविण्यात येऊन झालेल्या जमा व खर्चाच्या नोंदी करून मुख्यालयाचा मासिक लेखा तयार केला जातो. तसेच केंद्ग शासनाकडील १३ व्या वित्त आयोगाकडुन प्राप्त निधीचे नियोजन करून त्याच्या वितरणाची संपुर्ण कार्यवाही या विभागाकडून केली जाते.
निवृत्ती वेतन शाखा
महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) १९८२ च्या नियमाचे अधिन राहून जिल्हा परिषद कर्मचा-यांचे वर्ग-३ च्या बाबतीत वयास ५८ वर्ष व वर्ग-४ च्या बाबतीत ६० वर्ष पुर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्त, इतर प्रकारे सेवानिवृत्त होणा-या तसेच मयत झालेल्या कर्मचा-यांच्या प्रकरणांची छाननी करून सेवानिवृत्ती तसेच कुटूंब निवृत्ती वेतन मंजुर करण्यात येते.