पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन मान्यतेने घेण्यात आलेल्या पुणे जिल्हा अजिंक्यपद किशोर निवड चाचणी या स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या राजर्षी शाहू क्रीडा प्रशाला शिंगणापूरच्या कबड्डी विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक

नदी उत्सव उपक्रमांतर्गत प्रयाग चिखली येथे नदी घाट स्वच्छता मोहिम (आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत पंचगंगा काठच्या गावांमध्ये जिल्हा परिषदेमार्फत स्वच्छता)

कोल्हापूर : 17.12.2021

                          भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत रिव्हर्स ऑफ इंडीया या उपक्रमाचे देशभर आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाने दि. 15 ते 25 डिसेंबर, 2021 या कालावधीत  सेलीब्रिटींग रिव्हर्स ऑफ इंडीया या उपक्रमाचे आयोजन केले असून यामध्ये कोल्हापूर जिल्हयातील पंचगंगा नदीची निवड करण्यात आली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ मा. श्री. संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत प्रयाग चिखली ता. करवीर येथे जिल्हा परिषदमार्फत नदी घाट परिसर स्वच्छतेच्या उपक्रमातून करण्यात आला.

स्वच्छतेची शपथ घेवून या उपस्थित सर्वांनी स्वच्छतेसाठी श्रमदान केले. स्वच्छतेचे कामामध्ये सर्वांनी मनापासून सहभागी झाल्यास पंचगंगा प्रदूषणमुक्तीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल असे मत मा. श्री. संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व्यक्त केले.यावेळी मा. सौ. रसिका पाटील, सभापती, शिक्षण व अर्थ समिती, जि.प.कोल्हापूर, मा.श्री.व्ही.टी.पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जि.प.कोल्हापूर, मा.श्री.अरूण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.), जि.प.कोल्हापूर, मा.श्रीम. प्रियदर्शिनी मोरे, प्रकल्प संचालक, जलजीवन मिशन, जि.प.कोल्हापूर, मा.श्री. जयवंत उगले, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, करवीर उपस्थित होते. तसेच ग्राम पंचायत सदस्य, ग्रामसेवक, शिक्षक, तरूण मंडळे, ग्रामस्थ उपस्थित होते.

नदी उत्सव उपक्रमांतर्गत जिल्हयातील पन्हाळा, शाहूवाडी, करवीर, राधानगरी, हातकणंगले, शिरोळ या तालुक्यातील पंचगंगा नदीकाठच्या सर्व गावांमध्ये स्वच्छता करणेबाबत सूचना दिल्या असून, या गावांमध्ये स्वच्छता व जनजागृतीपर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.

सेवा निवृत्त शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांमधून करार पद्धतीने भरावयाच्या पदाकरिता जाहिरात

सेवा निवृत्त शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांमधून करार पद्धतीने भरावयाच्या पदाकरितजाहिरात