ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था कोल्हापूर या कार्यलयाकडील निरुपयोगी साहित्य जाहीर लिलाव  

ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था कोल्हापूर या कार्यलयाकडील निरुपयोगी साहित्य जाहीर लिलाव  

लोक जैवविविधता नोंदवही तयार करणे बाबत कार्यशाळा संपन्न-कोल्हापूर जिल्हा परिषद (ग्राम पंचायत विभाग)  

मा. राष्ट्रीय हरित लवाद, नवी दिल्ली यांनी ओरिजनल अप्लिकेशन 347/2016 मध्ये दिनांक 9/8/2019 रोजी दिलेल्या आदेशानुसार राज्यात 100% जिल्हा /तालुका / ग्रामपंचायत स्तरावर जैविक विविधता व्यवस्थापन समित्या(BMC)कोल्हापूर जिल्हयामध्ये स्थापन झालेल्या आहेत व लोक जैवविविधता नोंदवही (PBR) तयार करण्याच्या अनुषंगाने आज दिनांक 19 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10.00 वाजता स्व.वसंतराव नाईक समिती सभागृह जिल्हा परिषद मध्ये मा. श्री. अमन मित्तल मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. श्री. राजेंद्र भालेराव उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत)मा. डॉ. शाम बाजेकल, श्री. दौलत वाघमोेडे, जैवविविधता तज्ञ,  जैवविविधता मंडळ पुणे,मा. डॉ. ए.डी. जाधव, सदस्य महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ,नागपूर प्रा. डॉ. के.डी सोनवणे हेड ऑफ डिपार्टमेंट     मायक्रोबायोलॉजी,शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर डॉ. व्ही.एस. मौनी, हेड ऑफ डिपार्टमेंट झूलॉजी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर डॉ. एन. जे. बनसोडे, डेप्यूटी रजिस्टार व पशुवैद्यकीय तज्ञ (दूर शिक्षण केंद्र विभाग) शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर डॉ. ए.जी. भोईटे कृषी -वनस्पतीशास्त्र कृषि महाविद्यालय, कोल्हापूर,  या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये  आज रोजी संपन्न झाली.सदर  विषय तज्ञ व्यक्ती, विविध स्वयंसेवी संस्थाना  उपस्थित सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

मा. भालेराव उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) यांनी  जैविक विविधता व्यवस्थापन समिती Biodiversity Management Committee (BMC) व लोक जैविक विविधता नोंदवही  (PBR) तयार करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेला दिलेली आहे.  त्या अनुषंगाने स्वयंसेवी संस्था विषय तज्ञ व्यक्तीनी लोक जैविक विविधता नोंदवही  (PBR) तयार करणेबाबत काय कार्यवाही करावयाची आहे याबाबत प्रास्ताविक केले.मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर लोक जैवविविधता नोंदवहीचा उपयोग कायम स्वरूपी होणार असून ग्रामस्तरावर / स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तयार होणा-या लोक जैवविविधता नोंदवहया हया अचूक करणेबाबत सुचना दिल्या. लोक जैवविविधता नोंदवही तयार करताना जिल्हा परिषदेशी संपर्क साधावा तसेच कोणत्याही अडचणीमुळे काम थांबणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सुचना दिल्या.मा. ए.डी. जाधव सदस्य महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ,नागपूर यांनी लोक जैवविविधता नोंदवही तयार करताना गावपातळीवर सर्वांचे एकमत असणे गरजेचे आहे. तसेच विविध प्रकारच्या जाती- व प्रजातीची  नोंद नोंदवही मध्ये घेणे आवश्यक आहे. कारण भविष्यात त्यांचा व्यावसायिक दृष्टया वापर केल्यास स्वामित्व अधिकार असणा-या व्यक्ती अथवा संस्थेला 3 ते 5%   हिस्सा मिळणार आहे, असे सांगतले.

मा.डॉ. शाम बाजेकल जैवविविधता तज्ञ मंडळ, पुणे यांनी जैवविविधता संदर्भात अन्नसाखळीचे महत्त्व सांगून त्याचा शाश्वत वापर कसा करता येईल.याबाबत मार्गदर्शन केले.जैवविविधता कायदयाची अंमलबजावणी राज्यापासून ग्रामपंचायत स्तरापर्यत होते याची माहिती दिली.मा.श्री. दौलत  वाघमोडे जैवविविधता तज्ञ, मंडळ, पुणे यांनी लोक जैवविविधता नोंदवही कशी करावी याबाबत सविस्तर सादरीकरण केले.शाळा, महाविद्यालये शिक्षक विद्यार्थी, संशोधक, शेतकरी, उत्स्फूर्तपणे येणारे स्वयंसेवकांना सहभागी करून लोक जैवविविधता नोंदवही तयार करावी असे सांगितले.सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केलेनंतर उपस्थित संस्थांनी विचारलेल्या प्रश्नांचे  शंका- निरसन करणेत आले.लोक जैवविविधता नोंदवही तयार करताना कोणतीही अडचण आलेस जिल्हा स्तरावर तसेच पंचायत समिती स्तरावर सर्व प्रकारचे सहकार्य राहील. असे उपस्थित संस्थाना मा. भालेराव उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) यांनी सांगितले. व   उपस्थितांचे सर्वांचे आभार मानून बैठक संपल्याचे जाहीर केले.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.)

                                                                       जिल्हा परिषद कोल्हापूर

 

 

लोक जेैव विविधता नोंदवही तयार करणेसाठी पर्यावरणप्रेमींच्या बैठकीचे आयोजन (इच्छुकांनी ü उपस्थित राहणेबाबत जिल्हा परिषदे मार्फत आवाहन)

कोल्हापूर जिल्हयातील ग्रामपंचायत स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जैव विविधता व्यवस्थापन समिती अंतर्गत लोक जैव विविधता नोंदवही तया करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्या अनुषंगाने जिल्हा तांत्रिक सहाय्य गटाची स्थापना करण्यासाठी दि. 10 /12/2019 रोजी दुपार 4.00वाजता जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृह, जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे पर्यावरण प्रेमीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हामधून कृषीशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आर्युवेदाचार्य, पशुवैद्यशास्त्र, वन, वन्यजीव, पर्यावरण व जैव विविधता संबंधित तज्ञ व इच्छूक व्यक्तींनी आपल्या बायोडाटासह उपस्थित रहावे. ग्रामपंचायत स्तरावरील लोक जैव विविधता नोंदवही तयार करण्याकरीता जिल्हातील ज्या स्वयंसेवा संस्थाकडे तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध आहे, अशा इच्छुक स्वयंसेवी संस्थांनी आजवर केलेल्या कामाचे सादरीकरण करण्यासाठी उपस्थित रहावे. यासाठी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत),जिल्हा परिषद कोल्हापूर उपवनसंरक्षक (प्रा),कोल्हापूर वनविभाग कोल्हापूर यांचे कार्यालय, वनवर्धन प्रधान डाकघर कार्यालयासमोर, ताराबाई पार्क,कोल्हापूर, यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अमन मित्तल (भा.प्र.से.) यांनी केले आहे.

(प्रियदर्शिनी मोरे)

उपमुख्यकार्यकारीअधिकारी (ग्रा.पं.)

जिल्हा परिषद कोल्हापूर

दिनांक 26/11/2019 इ. संविधान दिन साजरा केलेबाबत.

26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे दि. 26/11/2019 रोजी सकाळी ठिक 11-00 वाजता साजरा करणेत आला. त्या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) रविकांत आडसुळ, जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन निंबाळकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. संजय राजमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दिपक घाटे, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, उपस्थित होते.
श्री. बी.पी.माळवे सहाय्यक शिक्षक यांनी सुत्रसंचलन व भारतीय संविधाना विषयी माहिती दिली. या प्रसंगी उद्रदेश पत्रिकेचे सामुहिक वाचन करणेत आले. तसेच 26/11 च्या मुंबईवरील अतिरेकी हल्यात शहिद झालेल्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहणेत आली. यावेळी मोठया संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कृपया वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिध्द करणेकामी कार्यवाही करणेत यावी, ही विनंती.

(रविकांत आडसुळ)
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)
जिल्हा परिषद, कोल्हापूर

 

 

केंद्र शासनाचा पंडित दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2019 जिल्हा परिषद कोल्हापूरचा प्रथम क्रमांक – नवी दिल्ली येथील पुरस्कार वितरण कार्यक्रम

पंडित दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2019 चा पुरस्कार कोल्हापूर जिल्हा परिषदेने ऑनलाईन सादर केलेल्या नामांकनाकेंद्र शासनाकडील पंचायती राज मंत्रालय, भारत सरकार, यांच्या मार्फत जाहिर झाला होता, सदरचा पुरस्कार वितरण कार्यक्रम सी. सुब्रमन्यम हॉल, नॅशनल अग्रीकल्चरल सायन्स कॉम्पलेक्स, पुसा, नवी दिल्ली येथे आज दिनांक 23/10/2019 रोजी दुपारी 2  वाजता पार पडला. केंद्रीय मंत्री महोदय मा. श्री नरेंद्रसिंग तोमर, पंचायती राज मंत्रालय, भारत सरकार यांचे हस्ते जिल्हा ‍परिषद कोल्हापूरच्या वतीने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मा.श्री सर्जेराव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री अमन मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(साप्र) श्री रविकांत आडसुळ यांनी प्रथम पारितोषिक पुरस्कार स्विकारला. या कार्यक्रमासाठी कर्नाटक, आसाम, छत्तीसगड या राज्यांचे ग्राम विकासमंत्री उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेस प्रथम पारितोषिकाचे प्रमाणपत्र व रक्कम रुपये 30 लाख बक्षीस स्वरुपात मिळाले आहे.  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. सौ शौमिका महाडिक आजारी कारणास्तव दिल्ली येथे कार्यक्रमास जाऊ शकल्या नाहीत.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. सौ शौमिका महाडिक व मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री अमन मित्तल यांचे मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा परिषदेने विविध योजना व नाविन्यपुर्ण योजना चांगल्याप्रकारे राबविलेल्या आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेचे प्रशासकीय बाबी, सर्वसाधारण सभा कामकाज, सभा कामकाजाचे रेकॉर्ड, सभेस जि.प. सदस्य यांची उपस्थिती इ. सह जिल्हा परिषदेकडील योजना व जिल्हा परिषदेने राबविलेल्या वैशिष्टपूर्ण उपक्रमांची माहिती याची पडताळणी करणेत आली होती. जि. प. च्या नाविन्यपुर्ण व्‍  वैशिष्टपूर्ण उपक्रमांमध्ये पर्यावरण पुरक गणेशोत्सव, पंचगंगा नदी प्रदुषण मुक्त करणे, स्वच्छ भारत मिशन, डिजीटल शाळा, स्वच्छ विद्यालय पुरस्कार,‍ ‍शिंगणापुर निवासी क्रिडा प्रशाला, रेकॉर्ड  वर्गीकरण अंतर्गत्‍  डिजीटल रेकॉर्ड रुम, दिव्यांग उन्नती अभियान, बायोगॅस,  आधारवड, कॅन्सर सर्व्हेक्षण, महिला बचत गटांचे काम, घरकुल योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ, वृक्ष लागवड, वॉटर एटीएम, आयएसओ पशुसंवर्धन दवाखाने या योजना चांगल्याप्रकारे राबविलेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या  प्रस्तावाचे सादरीकरण सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने करणेत आलेले होते.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.सौ. शौमिका अमल महाडिक, उपाध्यक्ष मा.श्री सर्जेराव पाटील, श्री अंबरिषसिंह घाटगे  सभापती अर्थ व शिक्षण समिती , श्री सर्जेराव पाटील-पेरीडकर सभापती आरोग्य व बांधकाम समिती, श्री विशांत महापुरे सभापती समाजकल्याण समिती, सौ वंदना मगदुम सभापती महिला व बालकल्याण समिती, गटनेते श्री अरुणराव इंगवले, पक्षप्रतोद श्री विजय भोजे व सर्व सन्मानीय जिल्हा परिषद सदस्य यांचे मार्गदर्शनाखाली व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अमन मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रवि शिवदास, प्रकल्प संचालक श्री अजयकुमार माने, उप मुख्य कार्यकारी अधिकारी(साप्र) श्री रविकांत आडसुळ, सर्व  खातेप्रमुख व अधिकारी कर्मचारी वर्ग या सर्वांनी यासाठी प्रयत्न केले आहे. या निमित्ताने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.सौ. शौमिका अमल महाडिक यांनी सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेस हे यश प्राप्त झाले आहे असे मनोगत व्यक्त करुन याबददल सर्वांचे अभिनंदन केले आहे.

 

डॉ. ए.पी.जे.अब्दुलकलाम यांची जयंती साजरी

माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुलकलाम यांची जयंती जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे दि. 15/10/2019 रोजी सकाळी ठिक 11-00 वाजता साजरी करणेत आली. या प्रसंगी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचे हस्ते फोटो पुजन करणेत आले मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुलकलाम यांची जयंती निमित् ‘वाचन प्रेरणा दिन ‘ साजरा करताना प्रत्येकाने पुस्तके वाचावीत हे सांगितले. यावेळी जागतीक हात धुणे दिनानिमित्य हात धुण्याचे प्रात्यक्ष्िााक दाखविणेत आले व स्वच्छतेचे महत्व सांगितले. या कार्यक्रमास मा. प्रकल्प संचालक अजय माने, मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) रविकांत आडसुळ, मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. पं.) राजेंद्र भालेराव, मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) प्रियदर्शिनी मोरे,यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी श्री. बी.पी.माळवे सहाय्यक शिक्षक यांनी सुत्रसंचलन केले. तसेच डॉ. ए.पी.जे. अब्दुलकलाम यांच्या कार्याची माहिती दिली.

 

सही/-
(रविकांत आडसुळ)
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)
जिल्हा परिषद, कोल्हापूर

 

 

 

 केंद्र शासनाचा पंडित दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2019 राज्यामध्ये गुणांकनानुसार जिल्हा परिषद कोल्हापूरचा प्रथम क्रमांक

ग्रामविकास विभागाकडील जाक्रं झेडपीए 2018/प्रक्रं 145/पंरा 1दिनांक 28 जानेवारी 2019 च्या प्राप्त पत्रानुसार केंद्र शासनाच्या पंडित दिनदयाळ उपाध्याय सशक्तीकरण पुरस्कार 2019 अंतर्गत (तपासणी वर्ष 2017-18) जिल्हा परिषदेने केंद्रस्तरावर ऑनलाईन्‍ प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने  जिल्हा परिषद कोल्हापूरची मा. श्री  श्रीनिवास बावा व श्री ‍ अनिल कुमार  या दोन सदस्यीय  केंद्रीय पथकाकडुन दि. 07-02-2019 ते 09-02-2019 अखेर जिल्हा परिषदेची कागदपत्रांची व क्षेत्र स्तरावरील प्रत्यक्ष पडताळणी करणेत आलेली होती.

पंचायती राज मंत्रालय, भारत सरकार, यांच्या मार्फत पंडित दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2019 चा निकाल केंद्र शासनाकडील दिनांक 16-09-2019 च्या पत्रान्वये नुकताच जाहिर झाला आहे.  यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेने सादर केलेल्या नामांकनास राज्यामध्ये प्रथम पारितोषिक (प्रमाणपत्र व रक्कम रुपये 30 लाख  या स्वरुपात) मिळाले  आहे.

सदर जाहीर झालेल्या पुरस्काराचा आनंदोत्सव आज दि. 19-09-2019 रोजी जिल्हा परिषदेत साजरा करणेत आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सौ शौमिका महाडिक अध्यक्ष जि.प. कोल्हापूर यांचे  हस्ते पेढे व साखर वाटुन साजरा करणेत आला. यावेळी मा. अमन मित्तल मुख्य कार्यकारी अधिकारी व मा. सर्जेराव पाटील उपाध्यक्ष उपस्थितीत होते. याप्रसंगी मा.अध्यक्ष सौ शौमिका महाडिक यांनी मार्गदर्शन करताना सर्वांचे अभिनंदन केले व सर्व जिल्हा परिषदासाठी कोल्हापूर जिल्हा परिषद पथदर्शी असलेचे नमुद करुन भविष्यात नाविन्यपुर्ण योजना राबवावेत व देशात प्रथम क्रमांक मिळवावेत यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. मा. अमन मित्तल  यांनी सर्वांचे अभिनंदन केले. तसेच सर्व पदाधिकारी , जिल्हा परिषद सदस्य व अधिकारी-कर्मचारी यांच्या एकत्रित कामाचे यश असलेचे नमुद केले. येथुन पुढील पुरस्कार मिळवणेसाठी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन केले. यावेळी मा. रविकांत आडसुळ उपमु.का.अ. (साप्र) यांनी पुरस्कारसंदर्भात प्रास्ताविक व स्वागत केले आणि मनोगत व्यक्त करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी श्रीमती प्रियदर्शनी मोरे उप.मु.का.अ.(पाणी व स्वच्छता) यांनी मनोगत व्यक्त केले. कर्मचारी संघटना प्रतिनिधी श्री महावीर सोळांकुरे यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच पत्रकार प्रतिनिधी श्री समीर देशपांडे यांनी मनोगत व्यक्त करुन कोल्हापूरचे नाव देशात मोठे करावे अशी अपेक्षा व्यक्त केल्या व शुभेच्छा दिल्या. यानंतर श्री राहुल कदम उप मु.ले. व वि.अ. यांनी सर्वांचे आभार मानले.

यावेळी जिल्हा परिषदेचे श्री सर्जेराव पाटील-पेरीडकर सभापती आरोग्य व बांधकाम समिती, गटनेते श्री अरुणराव इंगवले, जि.प. सदस्य श्री विजय बोरगे, व जि. प. सदस्य श्री महेश चौगुले, जि. प. सदस्य श्री सुभाष सातपुते तसेच खातेप्रमुख व कर्मचारी  वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री बी.पी माळवे यांनी केले.

जिल्ह्यामध्ये हागणदारीमुक्तीसाठी विशेष मोहीम  (अद्याप शौचालय सुविधा नसलेल्या कुटुंबांनी  पंचायत समितीशी संपर्क साधावा.) 

कोल्हापूर : दिनांक ११.०९.२०१९

                                                केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाकडून देशाच्या ग्रामीण भागामध्ये संपूर्ण स्वच्छता व हागणदारीमुक्तीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आह यामध्ये स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत योजनेसाठी जे निकष आहेत त्याप्रमाणे पात्र परंतु, त्या कुटुंबाचे यापूर्वी करण्यात आलेल्या कोणत्याही सर्व्हे / यादीमध्ये नाव समाविष्ट नाही, तसेच सद्यस्थितीत शौचालय सुविधा उपलब्ध नसलेल्या व अद्याप कोणत्याही योजनेतून शौचालय बांधकामासाठी अनुदान घेतलेले नाही अशा पात्र कुटुंबांचा या विशेष मोहिमेमध्ये समावेश होणार आहे.

        याप्रमाणे पात्र कुटुंबांनी स्वतःहुन वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्याबाबतची मागणी आपल्या संबंधित पंचायत समितीकडे सादर करावी असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.

(प्रियदर्शिनी च. मोरे )

उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पा. व स्व.)

जिल्हा परिषद कोल्हापूर

स्वच्छता हि सेवा अभियानातून प्लास्टिक मुक्तीचा नारा  (स्वच्छता हि सेवा – जिल्हा स्तरीय कार्यशाळा संपन्न)

     दि. ११ सप्टेंबर ते २ ऑक्टोम्बर  २०१९ या कालावधीत केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयामार्फत स्वच्छता हि सेवा अभियान राबविले जाणार आहे . प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन हि या अभियानाची प्रमुख संकल्पना आहे.   कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत ग्राम पंचायत स्तरावर हे अभियान यशस्वीरीत्या राबविण्यासाठी आज जिल्हास्तरा वर जिल्हा परिषद कर्मचारी व गट विकास अधिकारी यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन हि या अभियानाची प्रमुख संकल्पना असल्याने स्वच्छता हि सेवा अभियानातून प्लास्टिक मुक्त जिल्ह्यासाठी सर्वानी योगदान द्यावे असे प्रतिपादन मा. श्री. अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी , जी. प. कोल्हापूर यांनी केले . व अभियान यशस्वी करण्यासाठी उपस्थितांना मार्गदर्शन हि केले. या कार्याशाळेसाठी मा.  आर.पी. शिवदास, अति. मु.का.अ ., जी.प.कोल्हापूर उपस्थित होते. अभियानाबाबत मा. श्रीम. प्रियदर्शिनी मोरे उप.मु.का.अ . (पा .व स्व. ) यांनी प्रास्ताविक केले.
                                                   या अभियानांतर्गत विविध उपक्रम घेतले जाणार असून त्यामध्ये तालुकास्तरावर प्रशिक्षण/ कार्यशाळा, प्रभातफेऱ्यांचे आयोजन, तरुण मंडले, सामाजिक संस्था, उद्योजक, शिक्षण संस्था, दवाखाने, शेतकरी, ग्रामस्थ यांच्या बैठक आयोजित करून त्यांना बंदी असलेले प्लास्टिक व प्लास्टिक चे दुष्परिणाम इ. बाबत मार्ग दर्शन केले जाणार आहे. शालेय स्तरावर अभियानाबाबत निबंध, चित्रकला, वक्तृत्व इ. स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. २ ऑक्टोम्बर ,२०१९ रोजी सर्व गावांमध्ये प्लास्टिक वस्तू न वापरणेबाबत शपथ घेऊन महाश्रमदान मोहिमेच्या माध्यमातून प्लास्टिक संकलन उपक्रम राबविला जाणार आहे. व दि ३ ते २७ ऑक्टोम्बर ,२०१९ या कालावधीत संकलित प्लास्टिक पुनर्चक्रणासाठी देणे असे उपक्रम राबविणेत येणार आहेत.

                                                               या अभियानांतर्गत ग्राम पंचायत स्तरावर आवश्यक ते नियोजन करून सर्व स्तरावरील लोकांचा सहभाग घेऊन अभियान यशस्वी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

(प्रियदर्शिनी मोरे )

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा .व स्व . )

जि.प . कोल्हापूर