आर.टी.ई. 25 टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया 2020-21 अंतर्गत प्रवेश फेरी सुरू

आर.टी.ई. 25 टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया 2020-21 अंतर्गत प्रवेश फेरी सुरू

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारअधिनियम 2009 मधील कलम (12)(1)(सी) अन्वये खाजगी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25 % जागा वंचित व दुर्बल घटकांतील मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. या अंतर्गत सन 2020-21 या शैक्षणिक वर्षामधील 25 % आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या https:// student.maharashtra.gov.in या वेबसाईटवरील RTE Portal या लिंकवर ऑनलाईन पध्दतीने राबविणेत येत आहे.

सदर प्रवेश प्रक्रियेअंतर्गत कोल्हापूर जिल्हयातील 345 शाळांमधील 3486 जागांसाठी एकूण 2996 पालकांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत. तसेच राज्य स्तरावर दि. 17/03/2020 रोजी ऑनलाईन लॉटरी काढण्यात आलेली आहे. लॉटरीद्वारे 2388 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. तसेच 608 विद्यार्थ्यांची प्रतिक्षा यादी जाहीर झालेली आहे. सर्व विद्यार्थ्यांना मेसेज पाठविण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे पुढील प्रवेश प्रक्रियेचे कामकाज झालेले नाही. सद्यस्थितीत पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणे अडचणीचे आहे. त्यामुळे फक्त या शैक्षणिक वर्षासाठी शाळा स्तरावर कागदपत्रांची पडताळणी करून व संकलन करून पडताळणी समितीच्या मान्यतेने प्रवेश देण्यात यावेत. याबाबत पुढीलप्रमाणे कार्यवाही करणेत यावी.-

शाळेने करावयाची कार्यवाही –

  • शाळेला RTE पोर्टलवर त्यांच्या लॉगीनला विद्यार्थ्यांची नावे व मोबाईल क्रमांक दिलेले आहेत. या नावापुढे ज्या दिनांकास विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बोलावयाचे आहे, ती तारीख शाळेने टाकावी. त्याप्रमाणे पालकांना SMS जातील.
  • प्रवेशाचे वेळापत्रक शाळेच्या गेटवर अथवा योग्य त्या ठिकाणी लावण्यात यावे.
  • शाळेत आल्यानंतर पालकांकडून मूळ कागदपत्रे व एक छायांकीत प्रत प्राप्त करून घ्यावी. कागदपत्रांची तपासणी करून योग्य असल्यास विद्यार्थ्याच्या नावापुढे ऑनलाईन नोंद करावी. तसेच पालकांकडील अलॉटमेंट लेटरवर तात्पुरता प्रवेश दिला असे नोंद करावे व अलॉटमेंट लेटर पालकांना परत करावे. तसेच पालकांकडून हमीपत्र भरून घ्यावे. हमीपत्राचा नमुना म.न.पा. शिक्षण विभागात अथवा तालुका पंचायत समिती शिक्षण विभागात उपलब्ध केलेला आहे. सदर नमुना शाळांनी प्राप्त करून घ्यावा व पालकांकडून हमीपत्र भरून घ्यावे.
  • दिलेल्या तारखेस पालक आले नाहीत तर त्यांना पुन्हा पुढील तारीख देण्यात यावी. तसा SMS त्यांना जाईल. दुस-यांदा दिलेल्या तारखेस उपस्थित न राहील्यास तिस-यांदा तारीख देण्यात यावी. अशा प्रकारे पालकांना तीन वेळा संधी द्यावी.
  • शाळेने ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केल्यानंतर अशा तात्पुरत्या प्रवेशित बालकांना लाभ देण्यात यावा. शाळा जेव्हा प्रत्यक्षात सुरू होईल तेव्हा या बालकांना प्रवेशित झाले असे समजून वर्गात बसण्याची मुभा द्यावी.
  • शाळेने पडताळणी समितीची दिनांक व वेळ घेऊन पालकांकडून संकलित केलेली सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे घेऊन जावीत व पडताळणी समितीकडून प्रवेश निश्चित करावेत.
  • शाळेने प्रतिक्षा यादीतील पालकांना सध्या बोलावू नये. त्याबाबत स्वतंत्र सुचना देण्यात येतील.
  • कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातील पालकांना निर्बंध शिथिल झाल्यांनतर बोलाविण्यात यावे.
  • शाळा कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात असल्यास अथवा अन्य कामासाठी प्रशासनाने ताब्यात घेतली असल्यास अशा शाळांनी प्रतिबंधित क्षेत्रातील अटी शिथिल झाल्यानंतर प्रवेशाबाबत कार्यवाही करावी.

पालकांनी करावयाची कार्यवाही –

  • शाळेचा प्रवेशाबाबत मेसेज आल्यानंतर त्या दिनांकास सर्व मूळ आवश्यक कागदपत्रे व एक छायांकीत प्रत घेऊन शाळेत उपस्थित रहावे व कागदपत्रांच्या पडताळणीस अधिन राहून तात्पुरता प्रवेश घ्यावा. तसेच हमीपत्र शाळेला द्यावे.
  • शाळेने दिलेल्या दिनांकास उपस्थित राहता येणे शक्य नसल्यास शाळेला तसे कळविण्यात यावे व पुढील दिनांकाची मागणी करावी.
  • शाळेच्या मेसेजवर अवलंबून न राहता RTE पोर्टलवर बालकाचा अर्ज क्रमांक टाकून प्रवेशाच्या दिनांकाची खात्री करावी.
  • RTE पोर्टलवर पालकांसाठी दिलेल्या सुचनांचे पालन करावे.
  • पडताळणी समितीस कागदपत्रे चुकीची आढळून आल्यास व RTE पोर्टलवर चुकीची माहिती भरल्याचे निदर्शनास आल्यास हमीपत्रातील अटींप्रमाणे कारवाई करण्यात येईल.

पडताळणी समितीने करावयाची कार्यवाही –

  • आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांवर प्रवेशाबाबत देखरेख करावी. शाळा या पत्रातील सुचनेप्रमाणे कार्यवाही करीत आहेत याची खात्री करावी. शाळांना व पालकांना मार्गदर्शन करावे. तसेच प्रसिध्दीही द्यावी.
  • प्रत्येक शाळेला कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिनांक व वेळ देण्यात यावी.
  • कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करावेत. तशी नोंद ऑनलाईन पोर्टलवर करावी.
  • पडताळणी मध्ये कागदपत्रे चुकीची आढळून आल्यास किंवा पालकांनी पोर्टलवर चुकीची माहिती भरल्याचे निदर्शनास आल्यास प्रवेश रद्द करणे / फौजदारी कार्यवाही करणे / शासकीय प्रतिपूर्तीस बालकास अपात्र करणे व त्यामुळे पालकाने शाळेची पूर्ण फी भरणे यापैकी एक किंवा एकापेक्षा जास्त शिक्षा प्रकरणांचे गांभीर्य लक्षात घेऊन करण्यात यावे.

वरीलप्रमाणे पालकांनी शाळा प्रवेशाच्या बाबतीत दक्ष राहून दिलेल्या दिनांकास शाळेकडून कागदपत्रे तपासून शाळेमध्ये प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केलेले आहे.

 

 

 

(श्रीम. आशा उबाळे)

                                                                                शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

                                                                                 जिल्हा परिषद, कोल्हापूर

 

राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन निवासी क्रीडा प्रशाला शिंगणापूर जिल्हा परिषद कोल्हापूर २०२०-२१ साठी क्रीडा नेपुण्य चाचणी घेणेसाठी लिंक

 राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन निवासी क्रीडा प्रशाला शिंगणापूर जिल्हा परिषद कोल्हापूर २०२०-२१ साठी क्रीडा नेपुण्य चाचणी घेणेसाठी लिंक 

राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन निवासी क्रीडा प्रशाला शिंगणापूर जिल्हा परिषद कोल्हापूर कंत्राटी मानधन पदावर महिला पदासाठी मागविणेत आलेली एम एस डब्लू पात्र अपात्र यादी

राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन निवासी क्रीडा प्रशाला शिंगणापूर जिल्हा परिषद कोल्हापूर कंत्राटी मानधन पदावर  महिला पदासाठी मागविणेत आलेली  एम एस डब्लू पात्र अपात्र यादी

राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन निवासी क्रीडा प्रशाला शिंगणापूर जिल्हा परिषद कोल्हापूर कंत्राटी मानधन पदावर  पुरुष वसतिगृह प्रमुख रेक्टर पात्र अपात्र यादी 

राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन निवासी क्रीडा प्रशाला शिंगणापूर जिल्हा परिषद कोल्हापूर कंत्राटी मानधन पदावर  पुरुष वसतिगृह प्रमुख रेक्टर पात्र अपात्र  यादी

आर.टी.ई. 25 टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया 2020-21 अंतर्गत पहिली प्रवेश फेरी सुरू

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये राज्यातील सर्व विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यता तत्त्वावरील प्राथमिक शाळांमध्ये पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 % पर्यंतच्या जागा नजीकच्या परिसरातील वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. या अंतर्गत सन 2020-21 या शैक्षणिक वर्षामधील 25 % आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या https:// student.maharashtra.gov.in या वेबसाईटवरील RTE Portal या लिंकवर ऑनलाईन पध्दतीने राबविणेत येत आहे.

सदर प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दि. 12/02/2020 ते दि. 04/03/2020 या कालावधीत पालकांकडून ऑनलाईन प्रवेश अर्ज स्विकारणेत आले. यामध्ये कोल्हापूर जिल्हयातील 345 शाळांमधील 3486 जागांसाठी एकूण 2998 पालकांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत. ज्या शाळांना 25 % आरक्षित क्षमतेपेक्षा जादा अर्ज आलेले आहेत. अशा राज्यातील सर्वच शाळांसाठी शिक्षण संचालनालय, पुणे कार्यालयाकडून राज्य स्तरावर दि. 17/03/2020 रोजी ऑनलाईन लॉटरी प्रक्रिया घेणेत येणार आहे. त्याद्वारे NIC सेंटर, पुणे यांचेकडून पहिल्या प्रवेश फेरीसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी, तसेच पुढील प्रवेश फे-यांसाठी प्रतिक्षा यादी निश्चित करून RTE पोर्टलवरील होमपेजवर अपलोड करणेत येणार आहे. प्रथम प्रवेश फेरीसाठी निवडलेल्या पालकांच्या मोबाईलवर शाळेच्या नावासह मेसेज दि. 19/03/2020 रोजी दुपारनंतर पाठविणेत येणार आहेत. मात्र पालकांनी मेसेजवर अवलंबून न राहता RTE पोर्टलवरील Application Wise Details अथवा SELECTED व WAITING LIST या टॅबवर जाऊन आपल्या फॉर्म नंबरद्वारे खात्री करावी. ज्यांचे नाव WAITING LIST मध्ये असेल अशा अर्जांसाठी प्रवेशाची पुढील फेरी काढण्यात येईल. ज्यांची निवड झालेली आहे, त्यांनी पोर्टलवर जाऊन आपला भरलेला फॉर्म USER ID व पासवर्ड टाकून ओपन करावा. त्यामध्ये ADMID CARD या TAB वर क्लिक करून त्याची प्रिंट काढावी. पालकांनी सदरची प्रिंट व प्रवेशासंबंधीची सर्व कागदपत्रे घेऊन शहरी भागासाठी महानगरपालिका व ग्रामीण भागासाठी संबंधित तालुक्याच्या पंचायत समितीतील शिक्षण विभागात जावयाचे आहे. तेथील शाळा पडताळणी समितीकडे आपले ADMIT CARD व प्रवेशासंबंधीची सर्व मूळ कागदपत्रे सादर करून तपासून प्रमाणित करून घ्यावयाची आहेत. पडताळणी समितीकडून प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना RTE पोर्टलवर ऑनलाईन ADMIT करणेत येईल. विद्यार्थी प्रवेशपात्र असलेबाबत गटशिक्षणाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे पत्रासह पालकांनी संबंधित शाळेत जाऊन पाल्याचा प्रवेश निश्चित करावयाचा आहे. पालकांनी शाळा पडताळणी समितीकडून कागदपत्रे न तपासता परस्पर शाळेत गेलेस पाल्यास प्रवेश दिला जाणार नाही. शाळांनीही पडताळणी समितीने शिफारस केलेखेरीज कोणत्याही विद्यार्थ्यास RTE च्या 25 % कोटयातून प्रवेश द्यावयाचा नाही. पडताळणी समितीने अपात्र ठरविलेल्या बालकांची निवड रद्द करणेत येईल.

सध्या नॉव्हेल कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता पालकांनी एकाच वेळेस पडताळणी समितीकडे गर्दी करू नये. तसेच पडताळणी समित्यांनी देखील गर्दी होणार नाही या पध्दतीने RTE प्रवेशाच्या कामकाजाचे नियोजन करावे.

पहिल्या फेरीतील विद्यार्थी प्रवेशाचा कालावधी दि. 19/03/2020 रोजी निश्चित करणेत येईल व त्याची माहिती पडताळणी समितीकडून प्राप्त करून घेता येईल. सदर कालावधीत संबंधित पालकांनी शाळांमध्ये प्रवेश निश्चित न केल्यास त्यांना पुढील फे-यांमध्ये पुन्हा संधी दिली जाणार नाही. त्यामुळे पालकांनी शाळा प्रवेशाच्या बाबतीत दक्ष राहून विहीत मुदतीत शाळा पडताळणी समितीकडून कागदपत्रे तपासून शाळेमध्ये प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केलेले आहे.

 

 

 

(श्रीम. आशा उबाळे)

                                                                                शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

                                                                                 जिल्हा परिषद, कोल्हापूर

 

 

यशवंत पंचायत राज अभियान 2018-19 पुरस्कार वितरण कार्यक्रम,मुंबई *राज्यात जिल्हा परिषद कोल्हापूरचा व्दितीय क्रमांक *

यशवंत पंचायत राज अभियान सन 2018-19 अंतर्गत पंचायत राज संस्थाचे व्यवस्थापन व विकास कार्यात अत्युत्कृष्ठ काम करणा-या कोल्हापूर जिल्हा परिषदेस राज्यामध्ये व्दितीय क्रमांकाचे रुपये 20 लक्षचा पुरस्कार आज दिनांक 12-03-2020 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालय समोर, मुंबई येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमामध्ये वितरीत करणेत आला.महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांच्या शुभहस्ते, मा. ग्रामविकास मंत्री नाम. श्री हसनसो मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली, मा. ग्रामविकास राज्यमंत्री नाम. श्री अब्दुल सत्तार, मा.पर्यावरण राज्य मंत्री श्री.संजय बनसोडे, मा.ग्राम विकास विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव श्री.अरविंदकुमार यांचे विशेष उपस्थितीत सदर पुरस्कार वितरण करणेत आले जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष श्री बजरंग पाटील, जि.प.उपाध्यक्ष मा. श्री सतिश पाटील, जि.प. बांधकाम व आरोग्य सभापती मा. श्री हंबीरराव पाटील, जि.प. शिक्षण व अर्थ सभापती मा. श्री प्रविण यादव, जि.प.समाजकल्याण सभापती मा. सौ स्वाती सासणे, जि.प. महिला व बालकल्याण सभापती मा.डॉ. पदमाराणी पाटील , माजी जि.प. अध्यक्ष मा. सौ शौमिका महाडिक, माजी जि.प. उपाध्यक्ष मा. श्री सर्जेराव पाटील, मा.श्री.युवराज पाटील गटनेते, मा.श्री.सुभाष सातपुते जिल्हा परिषद सदस्य तसेच सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री रविकांत आडसुळ, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेंद्र भालेराव यांनी जिल्हा परिषदेच्या वतीने पुरस्कार स्विकारला.

मा. नाम. श्री हसनसो मुश्रीफ, मंत्री ग्रामविकास यांनी पारितोषिक वितरण प्रसंगी “सर्व पदाधिकारी व अधिकारी यांनी ग्रामिण जनतेशी निगडीत सर्व विकासाची कामे तळागळापर्यंत पोहचवावीत” असे उद् गार काढले.सामान्य प्रशासन विभागाकडील प्रशासकिय कामकाज,सभा कामकाज,कर्मचारी सेवा, निलंबन, निवृत्ती वेतन प्रकरणे, लोकायुक्त प्रकरणे इ. महिला व बालकल्याण विभाग,आरोग्य विभाग,जिल्हा पाणी व स्वच्छता,जिग्रावियं,कृषि,बांधकाम,ग्रामीण पाणी पुरवठा, समाजकल्याण, वित्त,ग्रामपंचायत,पशुसंवर्धन व शिक्षण या सर्व विभागाकडील कामकाजाचे तपासणी व पडताळणी मध्ये कोल्हापूर जिल्हयाचे उत्कृष्ठ कामकाजाबाबत राज्यस्तरीय व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार कोल्हापूर जिल्हा परिषदेस मिळाला आहे.तसेच जिल्हयातील गडहिंग्लज पंचायत समितीने विभागामध्ये व्दितीय क्रमांकाचे रु. 8 लक्षचा पुरस्कार पंचायत समितीचे मा. सभापती सौ रुपाली काबंळे, मा. उपसभापती श्रीम.श्रिया कोणकेरी, माजी सभापती श्री. विजयराव पाटील,माजी उपसभापती श्री. विद्याधर गुरबे, गट विकास अधिकारी मा. श्री शरद मगर व सहाय्यक गट विकास अधिकारी मा. आनंद गजगेश्वर यांनी पुरस्कार स्विकारला.
या कामी राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. नाम. श्री हसनसो मुश्रीफ, गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा मा. नाम. श्री. सतेज उर्फ बंटी पाटील व आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री मा. नाम. श्री. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे सहकार्य लाभले असून त्यांनी सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करुन भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष मा. श्री बजरंग पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री अमन मित्तल यांचे मार्गदर्शनाखाली सर्व विषय समिती मा. सभापती, तत्कालीन पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, सर्व जिल्हा परिषद खातेप्रमुख व अधिकारी- कर्मचारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेस हे यश प्राप्त झाले आहे असे मा. श्री.बजरंग पाटील अध्यक्ष,जिल्हा परिषद,कोल्हापूर यांनी सांगून याबददल सर्वांचे अभिनंदन केले आहे.
सही/-
(रविकांत आडसुळ)
उपमुख्य कार्यकारी अधिकारी(साप्र)
जिल्हा परिषद कोल्हापूर

 

शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, कोल्हापूर पूर्व उच्च प्राथमिक (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) रविवार दि.16 फेब्रुवारी, 2020 अंतरिम (तात्पुरती) उत्तरसुची प्रसिध्दीपत्रक

रविवार दि. 16 फेब्रुवारी, 2020 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. 5 वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसुची परिषदेच्या www.mscepune.in व http://puppss.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर या परीक्षेचे परीक्षार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रीय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे.

अंतरिम उत्तरसुचीवरील आक्षेप नोंदविण्याची कार्यपध्दती :-

  • सदर अंतरिम उत्तरसुचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन स्वरूपात करता येईल.
  • सदर ऑनलाईन निवदेन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये Objections omInterium Answer Key या हेडींगखाली उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
  • त्रुटी / आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरीता दि. 04/03/2020 ते दि. 13/03/2020 रोजीपर्यंत मुदत देण्यात येत आहे.
  • दि. 13/03/2020 नंतर त्रुटी / आक्षेपाबाबतचे निवेदन स्विकारले जाणार नाही.
  • उपरोक्त ऑनलाईन निवेदनांशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलदवारे) प्राप्त त्रुटी / आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही.
  • उपरोक्तनुसार विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही.
  • विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसुची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.

ऑनलाईन आवेदनपत्र व शाळा माहिती प्रपत्रातील माहितीत दुरूस्ती करणेकरीताची कार्यपध्दती :-

  • विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रातील माहितीत व शाळा माहिती प्रपत्रात (विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडीलांचे नाव, आईचे नाव, लिंग, शहरी / ग्रामीण, अभ्यासक्रम इ.) दुरूस्ती करण्यासाठी दि. 04/03/2020 ते 13/03/2020 रोजीपर्यंत शाळांच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
  • सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्विकारले जाणार नाहीत. विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

 

 

(श्रीम.आशाउबाळे)

                                                                शिक्षणाधिकारी(प्राथमिक)

                                                                                जिल्हापरिषद,कोल्हापूर