जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर कडील सनदी लेखापरीक्षक नियुक्ती बाबत
LATEST NEWS
NEWS
छत्रपती राजश्री शाहू विद्यानिकेतन निवासी क्रीडा प्रशाला शिंगणापूर चंबुखडी तालुका करवीर येथे निवासी क्रीडा प्रशाला सन 2022-23 करिता खेळाडूंची नैपुण्य चाचणी करणे बाबत
छत्रपती राजश्री शाहू विद्यानिकेतन निवासी क्रीडा प्रशाला शिंगणापूर चंबुखडी तालुका करवीर येथे निवासी क्रीडा प्रशाला सन 2022-23 करिता खेळाडूंची नैपुण्य चाचणी करणे बाबत Last last date 22-06-2022
छत्रपती राजश्री शाहू विद्यानिकेतन निवासी क्रीडा प्रशाला शिंगणापूर चंबुखडी तालुका करवीर येथे निवासी क्रीडा प्रशाला सन 2022-23 करिता खेळाडूंची नैपुण्य चाचणी करणे बाबतLast last date 22-06-2022
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी केलेबाबत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती जिल्हा परिषद , कोल्हापूर येथे शुक्रवार दिनांक 30/4/2021 रोजी सकाळी 11.00 वाजता साजरी करणेत आली . या वेळी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजयकुमार माने यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण् करणेत आला. यावेळी कक्ष अधिकारी श्री. संजय अवघडे , प्रकाश देसाई , हे उपस्थित होते. तसेच सोशल डिस्टनसिंग पाळुन मर्यादीत संख्येने इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
तरी सदरची बातमी आपले लोकप्रिय दैनिकातुन प्रसिध्द करणेत यावी हि विनंती .
सही/-
मनीषा देसाई
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.)
जिल्हा परिषद, कोल्हापूर
गांधीनगर येथील कच-याचे होणार अंतिम व्यवस्थापन
आम. ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत बायो-मायनिंग कामाचा शुभारंभ
गांधीनगर, ता. करवीर येथील डंपींग ग्राऊं ड वरील जमा झालेल्या सुमारे 6000 टन कच-याचे बायो मायनिंगव्दारे व्यवस्थापन केले जाणार आहे. सदर कामाचा शुभारंभ आज मा.आम. ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. तसेच यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. संजयसिंह चव्हाण उपस्थित होते.उद्योजकांची सामाजिक जबाबदारी (सी.एस. आर.) अंतर्गत रिकार्ट इंडीया, दिल्ली व हिंद ॲग्रो अँड केमिकल्स, कोल्हापूर या कंपनीव्दारे कचरा बायो-मायनिंगचे काम केले जाणार आहे. यामधे ओला व सुका कचयाचे वर्गीकरण केले जाणार आहे. यातील सुका कचरा हा सिमेंट फॅक्टरीला दिला जाणार आहे तर ओला कचरा हा स्थानिक शेतकयांना खत निर्मितीसाठी अथवा जमिन भरावाच्या कामासाठी वापरला जाणार आहे. कचरा वर्गीकरण आणि वहन करण्याचे काम कंपनीव्दारेच केले जाणार असून या संपूर्ण कामासाठी अंदाजे रू. 15 लाख इतका खर्च येणार आहे. ग्राम पंचायतीकडून या प्रकल्पासाठी लागणारी वीज पुरवली जाणार आहे. या प्रकल्पामुळे गांधीनगर ग्राम पंचायतीचा वर्षानुवर्षे साठलेल्या कच-याचा प्रश्न सुटणार आहे.
या शुभारंभ कार्यक्रमासाठी प्रकल्प संचालक,(जल जीवन मिशन) प्रियदर्शनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) अरूण जाधव, गट विकास अधिकारी, करवीर जयवंत उगले, विस्तार अधिकारी संदेश भोईटे, सरपंच रितू लालवाणी, ग्रामविकास अधिकारी चंदन चव्हाण, ग्राम पंचायत सदस्य, कंपनीचे प्रतिनिधी श्री. सुरज शिंदे, निरंजन ठमके, कौस्तुभ पाटील तसेच ग्राम पंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रियदर्शिनी चं मोरे
प्रकल्प व्यवस्थापक(ज.जी.मि.)
जिल्हा परिषद, कोल्हापूर