महिलांसाठी आरोग्य शिबीर

कोल्हापूर जिल्हा परिषद, महादेवराव महाडिक फौंडेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र कणेरी, ग्रामपंचायत मोरेवाडी, रंगनाथ हॉस्पीटल, तसेच देवराई संस्था यांचे संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आरोग्य शिबीर ग्राम पंचायत मोरेवाडी येथे आयोजित करणेत आले होते. महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबीराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सौ.शौमिका अमल महाडिक यांचे शुभ हस्ते करणेत आले. महिला ही सतत घरातील इतरांसाठी राबत असते. जोपर्यंत मोठा  आजार होत नाही तोपर्यंत प्रत्येक गोष्टीकडे कानाडोळा करीत असते. ही मानसिकता महिलांनी आता बदलली पाहिजे व महिलांनी सर्वप्रथम स्वत:च्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. हे आरोग्य शिबीर आयोजित करण्यामागचा मूळ हेतू असा होता की, काही प्राथमिक आजार हे पहिल्या टप्प्यातच निदर्शणास यावेत यासाठी विविध ठिकाणी या पुढेही महिलांचे आरोग्य शिबीरांचे आयोजन करणेत येणार आहे याचा सर्व महिलांनी  लाभ घेणेत यावा असे आवाहन मा.अध्यक्ष सौ. शौमिका महाडिक यांनी या प्रसंगी केले.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नलवडे, डॉ. प्रविण हेंद्रे, डॉ. सौ. अनुराधा सामंत, करवीरचे प्र.गट विकास अधिकारी श्री. भोसले, श्री. दत्तात्रय भिलुगडे, सौ.स्मिता हुदले, श्री. मनोज बागे, श्री. आशिष पाटील, आरोग्य सहाय्यक कर्मचारी व मोरेवाडी भागातील मोठया प्रमाणात महिला उपस्थित होत्या.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा व इतर कार्यक्रमासाठी चहा नाश्ता व जेवणाचे दर निश्चित करणेसाठी दरपत्रक प्रसिद्धी करणेबाबत

महाराष्ट्र राज्य  ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत प्रशिक्षण  कार्यशाळा व इतर कार्यक्रमासाठी चहा नाश्ता व जेवणाचे दर निश्चित करणेसाठी दरपत्रक प्रसिद्धी  करणेबाबत 

स्वच्छ व पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासन सज्ज (उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषदेसोबत महसूल विभाग ही सहभागी होणार )

स्वच्छ व पर्यावरणपुरक गणेशोत्सव -2017 साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय,कोल्हापूर येथे नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी मा.श्री.अविनाश सुभेदार,जिल्हाधिकारी,कोल्हापूर ,मा.डॉ.कुणाल खेमनार,मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.कोल्हापूर उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्हयामध्ये वर्ष 2015-16 पासून पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्याचा उपक्रम सुरू झाला.या उपक्रमाचे आता चळवळीमध्ये रूपांतर झाले असून कोल्हापूर जिल्हयातील नागरिकांनी पर्यावरण रक्षण आणि पंचगंगा प्रदूषणाचे गांर्भीय लक्षात घेवून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला आहे. या उपक्रमाच्या माध्यामातून वर्ष 2015-16 मध्ये 182442 इतक्या मूर्तींचे संकलन करण्यात आले तर 916 ट्रॉली निर्माल्य दान करण्यात आले.तसेच वर्ष 2016-17 मध्ये देखील 235889 इतक्या मूर्तींचे संकलन करण्यात आले आणि 1322 ट्रॉली निर्माल्य दान करण्यात आले.

या वर्षी ही दि.25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर,2017(घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव) मध्ये होणा-या गणेशोत्सवासाठी देखील याचं पध्दतीने  स्वच्छ व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा,यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यापूर्वी जिल्हा परिषदेमार्फत हा उपक्रम राबविला जात होता यावर्षी महसूल विभागाने ही सक्रिय घेवून अभियान यशस्वी करावे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले तर  ü कोणताही जलस्त्रोत प्रदुषित होणार नाही यासाठी  पंचगंगा प्रदुषणांतर्गत येणा-या गावांसोबत इतर सर्व गावांमध्ये ही एक गावं,एक गणपती(सार्वजनिक गणेशोत्सव) संकल्पना राबविणे,ग्रामस्थांना शाडूच्या गणेशमुर्तीं घेण्याबाबत आवाहन करणे,निर्माल्य नदीत विसर्जन न करणे आणि गणेश मूर्ती संकलन  याबाबत ग्रामस्तरावर प्रबोधनासाठी गृहभेटींचे आयोजन करणे, संकलित मूर्ती कुंभारांनी परत घेण्याबाबत आवाहन करणे,गणेशमूर्ती विसर्जनासाठी व निर्माल्य विसर्जनासाठी ग्रामस्तरावर पर्यायी  ü व्यवस्था उपलब्ध करणे याबाबत गावनिहाय नियोजन करणेबाबत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थितांना सूचना दिल्या.

या नियोजन बैठकीसाठी उपविभागीय अधिकारी,उपविभाग,गट विकास अधिकारी,गटशिक्षणाधिकारी,तहसिलदार,उपअभियंता,(ग्रा.पा.पु.) गट समन्वयक जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील तज्ञ,सल्लागार उपस्थित होते.

———————————————————————————————

उपमुख्य कार्यकारी अधिकारी,(पा.व स्व.)

जिल्हा परिषद,कोल्हापूर