शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता ही त्रिसुत्री समाज विकासासाठी अत्यंत मुलभुत असुन त्याची पुर्तता करणेसाठी जि.प. च्या प्रयत्नांना आपल्या मदतीचे पाठबळ द्यावे आणि समाजऋणातून मुक्त होणेची संधी साधावी असे भावनिक आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शौमिका महाडीक यांनी CSR च्या बैठकीच्या वेळेस केली. निमित्त होते – जिल्हा परिषदेच्या राजर्षि शाहु सभागृहामध्ये ‘‘ CSR- उद्योजक सामाजिक उत्तरदायित्व ’’ च्या अनुष्ंगाने जि.प. मार्फत करणेत आलेली ‘‘ पसायदान उपक्रमाची ’’ सुरवात.
जिल्हा श्रेत्रात विविध विकासकामे, उपक्रम राबविताना शासन तथा जि.प. स्तरावरून निधी मिळणेकरिता अनेक मर्यादा असतात. तेव्हा ही तफावत दुर करणेसाठी विविध उद्योग, बँक तथा औद्योगिक निगम यांचेकडून CSR अंतर्गत निधी मिळवून त्यातून सामाजिक बांधिलकिची जपणूक करण्यासाठी एकूण 34 उद्यागसमुह तथा बँकांचे प्रतिनिधी या कार्यक्रमास उपस्थित होते.
समाजातील शेवटच्या घटकांना विकासाचा लाभ मिळवून देण्यासाठी CSR-उद्योजक सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून प्रत्याक्षात आर्थिक पाठबळ देण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी या प्रसंगी केले. पशुसंवर्धन, आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा व स्वच्छाता विभाग तथा ग्राम पंचायत विभागामार्फत अपेक्षित उपक्रमांचे प्रेजेंटेशन करणेत आले. त्यावेळी इंडोकाउंट फाऊंडेशनचे श्री. देशपांडे यांनी 20 शाळांची जबाबदारी स्विकारली. आर. बी. एल. व आय. सी. आय. सी. आय. बँकेने डिजिटल ग्राम निर्मिती करीता योगदान देणेबाबत सुतोवाच केले. तर गोकुळ दुध संघामार्फत पश्ुसंवर्धन विभागाला व्हॅन देणेबाबत अभिवचन देणेत आले. या प्रसंगी घाटगे पाटील इंडस्ट्रिजचे श्री गिरीष श्रीखंडे, तसेच कॅनरा बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते. जि.प. कडील मक्तेदार श्री विजय भिके यांनी विद्यानिकेतन क्रिडा प्रशालेस पोषण आहार पुरविणार असलेचे सांगितले. एकूण सामाजिक भान व बांधिलकी जपणारा हा उपक्रम ‘‘ו֣Öê कमी तिथे †Ö´Æüß’’ ही भुमिका पार पाडणारा असलेने त्यास ‘‘¯ÖÃÖÖµÖ¤üÖÖ उपक्रम ’’†ÃÖê आभार प्रदर्शन करताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबोधले.
या कार्यक्रमास जि.प.च्या अध्यक्षा सौ. शौमिका अमल महाडिक मॅडम, उपाध्यक्ष श्री सर्जेराव ज्ञानदेव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री इंद्रजीत देशमुख, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. संजय राजमाने, अर्थ व शिक्षण समिती सभापती श्री अंबरिषसिंह संजय घाटगे, समाजकल्याण समिती सभापती श्री विशांत सुरेश महापुरे तसेच पक्षप्रतोद श्री विजय जयसिंग भोजे, भाजप गटनेते श्री अरूणराव जयसिंगराव इंगवले तसेच खातेप्रमुख उपस्थित होते.