जि.प. चा स्तुत्य असा ‘‘ पसायदान उपक्रम ’’

शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता ही त्रिसुत्री समाज विकासासाठी अत्यंत मुलभुत असुन त्याची पुर्तता करणेसाठी जि.प. च्या प्रयत्नांना आपल्या मदतीचे पाठबळ द्यावे आणि समाजऋणातून मुक्त होणेची संधी साधावी असे भावनिक आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शौमिका महाडीक यांनी CSR च्या बैठकीच्या वेळेस केली. निमित्त होते – जिल्हा परिषदेच्या राजर्षि शाहु सभागृहामध्ये ‘‘ CSR- उद्योजक सामाजिक उत्तरदायित्व ’’ च्या अनुष्‌ंगाने जि.प. मार्फत करणेत आलेली  ‘‘ पसायदान उपक्रमाची  ’’  सुरवात.

जिल्हा श्रेत्रात विविध विकासकामे, उपक्रम राबविताना शासन तथा जि.प. स्तरावरून निधी मिळणेकरिता अनेक मर्यादा असतात. तेव्हा ही तफावत दुर करणेसाठी विविध उद्योग, बँक तथा औद्योगिक निगम यांचेकडून CSR अंतर्गत निधी मिळवून त्यातून सामाजिक बांधिलकिची जपणूक करण्यासाठी एकूण 34 उद्यागसमुह तथा बँकांचे प्रतिनिधी या कार्यक्रमास उपस्थित होते.

समाजातील शेवटच्या घटकांना विकासाचा लाभ मिळवून देण्यासाठी CSR-उद्योजक सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून प्रत्याक्षात आर्थिक पाठबळ देण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी या प्रसंगी केले. पशुसंवर्धन, आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा व स्वच्छाता विभाग तथा ग्राम पंचायत विभागामार्फत अपेक्षित उपक्रमांचे प्रेजेंटेशन करणेत आले. त्यावेळी इंडोकाउंट फाऊंडेशनचे श्री. देशपांडे यांनी 20 शाळांची जबाबदारी स्विकारली. आर. बी. एल. व आय. सी. आय. सी. आय. बँकेने डिजिटल ग्राम निर्मिती करीता योगदान देणेबाबत सुतोवाच केले. तर गोकुळ दुध संघामार्फत पश्‌ुसंवर्धन विभागाला व्हॅन देणेबाबत अभिवचन देणेत आले. या प्रसंगी घाटगे पाटील इंडस्ट्रिजचे श्री गिरीष श्रीखंडे, तसेच कॅनरा बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते. जि.प. कडील मक्तेदार श्री विजय भिके यांनी विद्यानिकेतन क्रिडा प्रशालेस पोषण आहार पुरविणार असलेचे सांगितले. एकूण सामाजिक भान व बांधिलकी जपणारा हा उपक्रम ‘‘ו֣Öê कमी तिथे †Ö´Æüß’’ ही भुमिका पार पाडणारा असलेने त्यास ‘‘¯ÖÃÖÖµÖ¤üÖ­Ö उपक्रम ’’†ÃÖê आभार प्रदर्शन करताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबोधले.

या कार्यक्रमास जि.प.च्या अध्यक्षा सौ. शौमिका अमल महाडिक मॅडम, उपाध्यक्ष              श्री सर्जेराव ज्ञानदेव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त            मुख्य कार्यकारी अधिकारी श्री इंद्रजीत देशमुख, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. संजय राजमाने, अर्थ व शिक्षण समिती सभापती श्री अंबरिषसिंह संजय घाटगे, समाजकल्याण समिती सभापती  श्री विशांत सुरेश महापुरे तसेच पक्षप्रतोद श्री विजय जयसिंग भोजे, भाजप गटनेते श्री अरूणराव जयसिंगराव इंगवले तसेच खातेप्रमुख उपस्थित होते.

पंचगंगा प्रदूषण व सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन संबधी जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे मा. अध्यक्ष जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली बैठक.

दि.10/8/2017 रोजी पंचगंगा प्रदूषण व सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन संबधी जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे मा. अध्यक्ष जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदरच्या सभेस मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी,(पा.व स्व.) जिल्हा परिषद, कोल्हापूर सर्व तालुक्याचे गटविकास अधिकारी व सर्व उपविभागाचे उप अभियंता, सर्व तालुक्याचे गट संसाधन केंद्र प्रतिनिधी उपस्थित होते. सदरच्या बैठकीचे प्रास्ताविक व बैठकीचे उद्देश मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पा. व स्व.) यांनी विशद केला. सदरच्या बैठकीचे कार्यवृत्तांत पूढील प्रमाणे.

  1. प्रपत्र अ ब क व ड प्रमाणे सर्व्हेक्षण कामकाजाचा आढावा घेतला असता यापैकी करवीर व भूदरगड यांचेकडील सर्वाधिक ग्रामपंचायतींचा सर्व्हेक्षण अहवाल अप्राप्त आहे. याबाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदरचा सर्व्हेक्षण तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
  2. सर्व्हेक्षण पूर्ण झालेल्या ग्रामपंचायतींचे अंदाजपत्रक तातडीने पूर्ण करावे यासाठी शासन निर्णयास अनूसरून अंदाजपत्रक तयार करावीत यासाठी शासन निर्णयाचे वाचन करण्यात आले. तसेच वैयक्तिक स्तरावरील शोषखड्डे व खतखडे्‌डे कामे नरेगा योजनेतून प्रस्तावित करावीत.
  3. गटविकास अधिकारी पन्हाळा व कागल यांनी नरेगा योजनेतून वैयक्तिक शोषखडा कामे घेण्यासाठी सूधारित आराखड्यास मंजूरी मिळणेबाबत मागणी केली.
  4. शाहूवाडी गटविकास अधिकारी यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील वैयक्तिक पातळीवरील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठीच्या उपाययोजना नरेगा योजनेतून प्रस्तावित असल्याबाबतचा आढावा दिला.
  5. हातकंणगले गटविकास अधिकारी यांना नाबार्ड प्रकल्पासाठी जागा मागणीचे प्रस्ताव जिल्हा परिषद मार्फत मा. जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याबाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचना दिल्या.
  6. घनकचरा व्यवस्थापन बाबत विविध पर्यांयाची पडताळणी व माहिती घेणेबाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचित केले. तसेच SLRM साठी पोश्टर व लोगो तयार करण्याबाबत सूचित करून त्याबाबतच्या नवीन कल्पना असल्यास जिल्हास्तरावर सादर करण्याबाबत सूचित केले.
  7. गडहिंग्लज गटविकास अधिकारी यांनी सांडपाणी व्यवस्थापनासाठी पाणी वहनासाठी गटर आवश्यक असल्याचे सूचित केले त्यावर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बंदिस्त गटारांचा बृहत आराखडा तयार करण्याबाबत सूचित केले.
  8. उपअभियंता आजरा यांना उत्तुर ग्रा.पं. साठी बक्षिस रक्कमेतून वैयक्तिक शौषखड्डे करणेबाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचित केले.
  9. सर्व उपअभियंता व गटविकास अधिकारी यांना जिल्ह्यातील क वर्ग पर्यटन स्थळ असणाऱ्या ग्रा.पं. च्या सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाबाबत विशेष लक्ष देण्याबाबत सूचित केले.
  10. राधानगरी उपअभियंता यांनी 8765 शोषखड्डे नरेगा योजनेतून प्रस्तावित केलेची माहिती दिली. तसेच घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा उपलब्ध होत नसल्याचे नमूद केले यावर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जास्तीत जास्त वैयक्तिक स्तरावरील उपाययोजना करणे व जागा उपलब्धतेचे सूक्ष्म नियोजन करण्याचे सुचित केले.
  11. तसेच पंचगंगा प्रदूषित न होण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत त्याचा सविस्तर अहवाल उप अभियंता यांनी सादर करण्याबाबत सूचित केले.
  12. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व गटांनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन बाबत आराखडे तयार करीत असताना निधीच्या मर्यादेत न राहता बृहत आराखडा तयार करावा व त्यानंतर सर्व योजनांचा convergence करून कामे पूर्ण होतील असे नियोजन करावे.
  13. मा. अध्यक्षा यांनी सर्व तालुक्यांनी भौगोलिक परिस्थितीनूसार नाविण्यपूर्ण काम करण्याबाबत सूचना केल्या तसेच SLRM बाबत गाव पातळीवर सर्व घटकांचा सहभाग घेण्यासाठी प्रबोधन करण्यासाठी विशेष उपक्रम राबविणेबाबत सूचित केले. तसेच याबाबत काम करीत असताना शासन सुचनांच्या पलीकडे जावून आदर्श काम करून लोकांची मानसिकता बदलण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात यावे.

वरील प्रमाणे मुद्दयांची सविस्तर चर्चा करण्यात आली. यानंतर मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पा.व स्व.) यांनी आभार व्यक्त करून सभा संपलेचे जाहिर केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद, कोल्हापूर.

महिलांसाठी आरोग्य शिबीर

कोल्हापूर जिल्हा परिषद, महादेवराव महाडिक फौंडेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र कणेरी, ग्रामपंचायत मोरेवाडी, रंगनाथ हॉस्पीटल, तसेच देवराई संस्था यांचे संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आरोग्य शिबीर ग्राम पंचायत मोरेवाडी येथे आयोजित करणेत आले होते. महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबीराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सौ.शौमिका अमल महाडिक यांचे शुभ हस्ते करणेत आले. महिला ही सतत घरातील इतरांसाठी राबत असते. जोपर्यंत मोठा  आजार होत नाही तोपर्यंत प्रत्येक गोष्टीकडे कानाडोळा करीत असते. ही मानसिकता महिलांनी आता बदलली पाहिजे व महिलांनी सर्वप्रथम स्वत:च्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. हे आरोग्य शिबीर आयोजित करण्यामागचा मूळ हेतू असा होता की, काही प्राथमिक आजार हे पहिल्या टप्प्यातच निदर्शणास यावेत यासाठी विविध ठिकाणी या पुढेही महिलांचे आरोग्य शिबीरांचे आयोजन करणेत येणार आहे याचा सर्व महिलांनी  लाभ घेणेत यावा असे आवाहन मा.अध्यक्ष सौ. शौमिका महाडिक यांनी या प्रसंगी केले.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नलवडे, डॉ. प्रविण हेंद्रे, डॉ. सौ. अनुराधा सामंत, करवीरचे प्र.गट विकास अधिकारी श्री. भोसले, श्री. दत्तात्रय भिलुगडे, सौ.स्मिता हुदले, श्री. मनोज बागे, श्री. आशिष पाटील, आरोग्य सहाय्यक कर्मचारी व मोरेवाडी भागातील मोठया प्रमाणात महिला उपस्थित होत्या.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा व इतर कार्यक्रमासाठी चहा नाश्ता व जेवणाचे दर निश्चित करणेसाठी दरपत्रक प्रसिद्धी करणेबाबत

महाराष्ट्र राज्य  ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत प्रशिक्षण  कार्यशाळा व इतर कार्यक्रमासाठी चहा नाश्ता व जेवणाचे दर निश्चित करणेसाठी दरपत्रक प्रसिद्धी  करणेबाबत 

स्वच्छ व पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासन सज्ज (उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषदेसोबत महसूल विभाग ही सहभागी होणार )

स्वच्छ व पर्यावरणपुरक गणेशोत्सव -2017 साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय,कोल्हापूर येथे नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी मा.श्री.अविनाश सुभेदार,जिल्हाधिकारी,कोल्हापूर ,मा.डॉ.कुणाल खेमनार,मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.कोल्हापूर उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्हयामध्ये वर्ष 2015-16 पासून पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्याचा उपक्रम सुरू झाला.या उपक्रमाचे आता चळवळीमध्ये रूपांतर झाले असून कोल्हापूर जिल्हयातील नागरिकांनी पर्यावरण रक्षण आणि पंचगंगा प्रदूषणाचे गांर्भीय लक्षात घेवून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला आहे. या उपक्रमाच्या माध्यामातून वर्ष 2015-16 मध्ये 182442 इतक्या मूर्तींचे संकलन करण्यात आले तर 916 ट्रॉली निर्माल्य दान करण्यात आले.तसेच वर्ष 2016-17 मध्ये देखील 235889 इतक्या मूर्तींचे संकलन करण्यात आले आणि 1322 ट्रॉली निर्माल्य दान करण्यात आले.

या वर्षी ही दि.25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर,2017(घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव) मध्ये होणा-या गणेशोत्सवासाठी देखील याचं पध्दतीने  स्वच्छ व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा,यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यापूर्वी जिल्हा परिषदेमार्फत हा उपक्रम राबविला जात होता यावर्षी महसूल विभागाने ही सक्रिय घेवून अभियान यशस्वी करावे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले तर  ü कोणताही जलस्त्रोत प्रदुषित होणार नाही यासाठी  पंचगंगा प्रदुषणांतर्गत येणा-या गावांसोबत इतर सर्व गावांमध्ये ही एक गावं,एक गणपती(सार्वजनिक गणेशोत्सव) संकल्पना राबविणे,ग्रामस्थांना शाडूच्या गणेशमुर्तीं घेण्याबाबत आवाहन करणे,निर्माल्य नदीत विसर्जन न करणे आणि गणेश मूर्ती संकलन  याबाबत ग्रामस्तरावर प्रबोधनासाठी गृहभेटींचे आयोजन करणे, संकलित मूर्ती कुंभारांनी परत घेण्याबाबत आवाहन करणे,गणेशमूर्ती विसर्जनासाठी व निर्माल्य विसर्जनासाठी ग्रामस्तरावर पर्यायी  ü व्यवस्था उपलब्ध करणे याबाबत गावनिहाय नियोजन करणेबाबत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थितांना सूचना दिल्या.

या नियोजन बैठकीसाठी उपविभागीय अधिकारी,उपविभाग,गट विकास अधिकारी,गटशिक्षणाधिकारी,तहसिलदार,उपअभियंता,(ग्रा.पा.पु.) गट समन्वयक जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील तज्ञ,सल्लागार उपस्थित होते.

———————————————————————————————

उपमुख्य कार्यकारी अधिकारी,(पा.व स्व.)

जिल्हा परिषद,कोल्हापूर