प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत संकलित मूल्यमापन 1 चाचणी सन 2017-18

शिक्षण हक्क कायदयातील कलम 29(2)(ह) नुसार मूल्यमापन पध्दतीद्वारे विदयार्थ्यांच्या ज्ञान, आकलन आणि उपयोजन क्षमतांची पडताळणी करणे आवश्यक आहे. कायद्यातील या अपेक्षा आणि तरतुदी विचारात घेऊन दिनांक 20 ऑगस्ट 2010 च्या शासन निर्णयानुसार राज्यात इयत्ता 1 ली ते 8 वी साठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पध्दती लागू केली आहे.

वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया या मुलभूत क्षमतांची परिपूर्ण तयारी झाल्यास          ज्ञानग्रहन आणि आकलनाचा मार्ग सुलभ होतो. यामध्ये एकही मुल अप्रगत राहू नये यासाठी संपूर्ण राज्यात प्रत्येक विदयार्थ्याच्या पायाभूत संपादणूकीची नियमित पडताळणी करुन शैक्षणिक दर्जा ंउंचावण्यासाठी गरजाधिष्ठित कृती कार्यक्रमाची आखणी करणे तसेच ज्या इयत्तेत बालक शिकत आहे त्या इयत्तेच्या क्षमतांचीही संपादणूक वेळच्या वेळी तपासून व मदत करून अप्रगत विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्याच्या अनुषंगाने दि. 22 जून 2015 च्या शासन निर्णयानुसार प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राज्यामध्ये सन 2015-16 या शैक्षणिक वर्षापासून सुरू करणेत आला आहे. दि. 14 जुलै 2017 च्या शासन निर्णयानुसार सन 2017-18 मध्ये राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या व सर्व बोर्डाच्या मान्यताप्राप्त शाळांमधील इयत्ता 1 ली ते 8 वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा, गणित, इंग्रजी (तृतीय भाषा) व विज्ञान या विषयाच्या शैक्षणिक प्रगती चाचण्यांचे आयोजन करणेत आले आहे. यामध्ये पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी 1 व संकलित मूल्यमापन चाचणी 2 या तीन चाचण्यांचा समावेश आहे. सर्व नियमित विद्यार्थ्यांच्या किमान अपेक्षित क्षमता संपादणूकीची खात्री करणे व गुणवत्ता तपासणे आणि सुधारणे हा या चाचण्यांचा हेतू आहे.

सन 2017-18 मध्ये इयत्ता 1 ते 8 साठीची संकलित मूल्यमापन 1 चाचणी सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या केवळ राज्यमंडळाशी सलग्न असलेल्या सर्व शाळांमधील इयत्ता 1 ते 8 च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी घेणेत येत आहे. सदर चाचणीचे आयोजन राज्यस्तरावरुन प्रश्नपत्रिका पुरवून दि.8 नोव्हेंबर 2017 ते 11 नोव्हेंबर 2017 या कालावधीत खालीलप्रमाणे करण्यात आले आहे.

 

इयत्ता विषय दिनांक वेळ
इ. 1 ली ते इ. 8 वी प्रथम भाषा 8 नोव्हेंबर 2017 सकाळी 11.00 ते 1.00
इ. 1 ली ते इ. 8 वी गणित 9 नोव्हेंबर 2017 सकाळी 11.00 ते 1.00
इ. 3 री ते 8 वी इंग्रजी (तृतीय भाषा) 10 नोव्हेंबर 2017 सकाळी 11.00 ते 1.00
इ. 6 वी ते 8 वी विज्ञान 11 नोव्हेंबर 2017 सकाळी 11.00 ते 1.00

 

जिल्ह्यातील इयत्ता 1 ते 8 च्या 3580 शाळांतील सुमारे 5 लाख विद्यार्थी संकलित मूल्यमापन 1 चाचणी  साठी प्रविष्ठ होत आहेत.

सदर चाचणी आयोजनाबाबत जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या केवळ राज्यमंडळाशी सलग्न असलेल्या सर्व शाळांना कळविणेत आले आहे. चाचणीमधील लेखी प्रश्नाबरोबरच तोंडी, प्रात्यक्षिक इतर दिवशी घेण्याबाबतचे नियोजन शाळास्तरावर करणेत येणार आहे. सदर पायाभूत चाचणीचे शाळास्तर संनियंत्रण करणेसाठी जिल्हास्तरावरून 19 अधिका-यांची नेमणूक केलेली आहे.

 

                                                                                              

                                                                                                                              (सुभाष चौगुले )

                                                                                                                    शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

                                                                                                                     जिल्हा परिषद, कोल्हापूर

 

खाजगी प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या सन 2016-17 या आर्थिक वर्षातील भविष्य निर्वाह निधी पावती वितरण

गतीमान प्रशासन योजनेंतर्गत कामकाजामध्ये पारदर्शकता व गतीमानता आणून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाने भविष्य निर्वाह निधीसाठी पात्र असणाऱ्या 158 खाजगी प्राथमिक  शाळांपैकी 139 शाळांमधील 1000 शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधी पावतीचे वितरण जिल्हा परिषद कोल्हापूरच्या अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक या विभागामार्फत सन 2016-17 या आर्थिक वर्षातील भविष्य निर्वाह निधी पावती वितरण समारंभ दि. 06/11/2017 इ. रोजी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, कोल्हापूरच्या सभागृहामध्ये सकाळी 11.00 वा. करणेत आले. हा कार्यक्रम मा.डॉ.विलास पाटील, प्राचार्य, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली व मा.श्री. राहूल कदम, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर, मा.श्री.सुभाष चौगुले, शिक्षणाधिकारी (प्राथ.), जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे उपस्थितीत घेणेत आला.

या कार्यक्रमाचे प्रास्तावित कार्यालयाचे अधिक्षक तथा लेखाधिकारी मा.श्रीम.वर्षा परीट  यांनी केले. आपल्या मार्गदर्शनामध्ये श्री. राहूल कदम यांनी शिक्षकांमध्ये आर्थिक साक्षरता होणे आवश्यक असलेबाबत नमूद करुन आर्थिक साक्षरतेचे महत्व विषद केले. शिक्षणाधिकारी (प्राथ.) मा.सुभाष चौगुले यांनी आर्थिक सुबत्तेबरोबर शाळेची गुणवत्ता कशी टिकविता येईल याबाबत मार्गदर्शन केले. मा.डॉ.विलास पाटील यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणात गरजा कमी करुन बचतीचा मार्ग अवलंबता येतो. याबाबत विविध उदाहरणे देवून मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ.जयश्री जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी, जि.प.कोल्हापूर यांनी केले व आभार कार्यालयाच्या सहा. लेखाधिकारी श्रीम. शैला ढाके यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करणेसाठी खाजगी प्राथमिक शिक्षकांची पतसंस्था मर्या. कोल्हापूर व सर्व शिक्षक संघटनांचे सहकार्य लाभले.

 

 

(सुभाष चौगुले)

                                                                                                            शिक्षणाधिकारी(प्राथ.)

                                                                                                            जिल्हापरिषदकोल्हापूर

सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व स्वर्गीय इंदिराजी गांधी यांची पुण्यतिथी जिल्हा परिषद येथे साजरी

सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व स्वर्गीय इंदिराजी गांधी यांची पुण्यतिथी जिल्हा परिषद येथे साजरी

 

रोटरी मुव्हमेंट,कोल्हापूर सन 2016-17 टिच टिम अंतर्गत पुस्तके वितरण कार्यक्रम

   रोटरी मुव्हमेंट कोल्हापूर,टिच टिम अंतर्गत जिल्हयातील 178 शाळांना पुस्तक वितरण सोहळा शाहू सभागृह, दसरा चौक ,कोल्हापूर या ठिकाणी पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डॉ.कुणाल खेमणार साहेब,प्रमूख पाहूण मा.अंबरिषसिंह घाटगे -सभापती ,अर्थ व शिक्षण समिती, जि.प.कोल्हापूर हे होते ता प्रमूख उपस्थित मा. सुभाष चौगुले,शिक्षणाधिकारी (प्राथ.) मा .रविकिरण कुलकर्णी , मा.सचिन झ्ंवर, मा.शोभा तावडे या होत्या.  

           या कार्यक्रमाच्या प्रसंगी मा.सुभाष चौगुले, शिक्षणाधिकारी (प्राथ.), जि.प.कोल्हापूर  यांनी रोटरीच्या माध्यमातून अनेक विधायक उपक्रम राबविणेत येत असून जिल्हा परिषद,कोल्हापूर कडील प्राथमिक शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी व विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी प्राधान्याने विचार केला जात आहे. मा.अंबरिषसिंह घाटगे यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की , रु. 19.00 (लाख.) इतक्या मोठया प्रमाणात रोटरी मुव्हमेंट च्या माध्यमातून जि.प. शाळांना पुस्तके वितरण होत आहेत  हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग असेल. अशा पध्दत्तीचे सहकार्य रोटरी कडून या पुढे ही मिळाले तर कोल्हापूर हा देशातील शिक्षणाच्या बाबतीतील अग्रणी जिल्हा असेल  

  मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.कोल्हापूर

             रोटरीच्या माध्यमातून शाळा समृदृध करणेसाठी उचलेले हे विधायक काम असून जि.प.शाळांना ई.लर्निग ची सुविधा ,8000 शिक्षकांना तंत्रास्नेही प्रशिक्षण,MHM अंतर्गत डिस्पोजल मशीन ,वॉटर प्य्ुरीफाय इ.सुविधा पुरविणेत येत आहेत.पुढच्या काळात ही असेच रोटरीचे सहकार्य मिळत राहो ही अपेक्षा व्यक्त केली. मा.शोभा तावडे यांनी प्रास्ताविक केले.व रविकिरण कुलकर्णी यांनी रोटरी बदृल माहिती दिली.

                

 

 

 

 

 

 

 

 

 

ई-लर्निंगकंटेन्टनिर्मितीजिल्हास्तरशिक्षणपरिषद (टेक्नोसेव्हीशिक्षक)

जिल्हापरिषदकोल्हापूर, जिल्हाशैक्षणिकसातत्यपूर्णव्यावसायिकविकाससंस्था, कोल्हापूर वरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज यांचेमध्ये जिल्ह्यातील १०००० शिक्षकांना टेक्नो सेव्ही शिक्षक प्रशिक्षण देणेबाबतचा १५ सप्टेंबर २०१७ रोजी श्री.अंबरिषसिंह घाटगे, सभापती, शिक्षण व अर्थ समिती, जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे प्रेरणेतून व मा. डॉ.कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाने सामंजस्य करार करणेत आला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात प्रत्येक केंद्रातून १ शिक्षक याप्रमाणे जिल्ह्यातील २१० शिक्षकांना प्रशिक्षण देवून त्यांचेमार्फत जिल्ह्यातील उर्वरित शिक्षकांना प्रशिक्षण देणेत येणार आहे.

जिल्हापरिषदकोल्हापूर, जिल्हाशैक्षणिकसातत्यपूर्णव्यावसायिकविकाससंस्था, कोल्हापूर, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १० ते १२ ऑक्टोंबर २०१७ रोजी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिकविणाऱ्या २१०शिक्षकांचेदररोज ७० शिक्षक याप्रमाणे ३ दिवस शिक्षण परिषद व्हर्च्युयल लॅब शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे घेणेत आली. सदर शिक्षण परिषदेचे उद् घाटन दि.१०/१०/२०१७ इ. रोजी सकाळी १०.०० वा. मा.डॉ.विलास पाटील, प्राचार्य, जिल्हाशैक्षणिकसातत्यपूर्णव्यावसायिकविकाससंस्था, कोल्हापूर, मा.श्री.सुभाषचौगुले, शिक्षणाधिकारी (प्राथ.), जिल्हापरिषदकोल्हापूर, श्री.गौरवशहा, अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज, श्री.प्रसन्न देशिंगकर, चेअरपर्सन, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज, मा.सौ.डॉ.पाटणकर, विभागप्रमुख शिक्षणशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, मा.डॉ.पल्लवी झेरे, आय.टी., विभागप्रमुख, जिल्हाशैक्षणिकसातत्यपूर्णव्यावसायिकविकाससंस्था, कोल्हापूरयांच्याउपस्थितीतझाले.

सदरतीनदिवसामध्येशिक्षकांनापॉवरपॉईंटप्रेझेंटेशनतयारकरणे.व्हिडीओतयारकरुनस्वत:चाआवाजदेणे, विविध ॲपच्याव्दारेपॉवरपॉईंटप्रेझेंटेशनतयारकरणे इ. बाबतचेमार्गदर्शनराज्यस्तरीयमार्गदर्शकश्री.बी.बी.पाटील, मुख्याध्यापक, वाकरेहायस्कूल, ता.करवीर, श्री.व्ही.के.पोतदार, माध्यमिकविद्यालय, चाफोडी, ता.करवीर, श्री.सातार्डेकर, ग.गो.जाधवविद्यालय, केर्ली, ता.करवीर, यांनीकेले.

शिक्षणपरिषदेच्यादुसऱ्यादिवशीमा. डॉ.कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी प्रशिक्षण वर्गास भेट देवून प्रशिक्षणाबाबत शिक्षक व तज्ञ मार्गदर्शक यांचेशी हितगुज करुन मार्गदर्शन केले. सदर ३ दिवसाचे नियोजन सौ.जयश्री जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी, जि.प.कोल्हापूर, श्री.आप्पाराव पाटील व श्री.व्दारकानाथ भोसले, विषय सहाय्यक यांनी केले.

सदर शिक्षण परिषदेचा समारोप श्री.अंबरिषसिंह घाटगे, सभापती, शिक्षण व अर्थ समिती, कोल्हापूर, श्री.नांदवडेकर, कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, श्री.संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी, कोल्हापूर, श्री.चौगुले, मुख्य वित्त लेखाधिकारी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचे उपस्थितीत करणेत आला.

 

 

                                                                                                            शिक्षणाधिकारी(प्राथ.)

                                                                                                            जिल्हापरिषदकोल्हापूर

आपत्ती व्यवस्थापन दिन व  वाचन प्रेरणा दिन जिल्हा परिषदेत साजरा

दि. १३/१०/२०१७ रोजी  आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून जिल्हा परिषद, कोल्हापूर मध्ये साजरा करणेत आला.  आपत्ती व्यवस्थापन दिनाचे औचित्त्य साधून आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व,  जनजागृत्ती विषयी माहिती देणेत आली. तसेच भारताचे माजी राष्ट्रपती  डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करणेत आला.  डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विषयी माहिती श्री. बी.पी. माळवे यांनी सां‍गितली.

याप्रसंगी  उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेंद्र भालेराव, गट विकास अधिकारी   श्री. सचिन घाटगे यांचे हस्ते फोटो पूजन करणेत आले. मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. संजय राजमाने, उप मुख्य लेखा वित्त्त्त अधिकारी श्री. राहुल कदम, कनिष्ठ लेखाधिकारी श्री. राजेंद्र नागणे व श्री. संजय अवघडे (कक्ष अधिकारी), श्री. दत्तात्रय केळकर (अधिक्षक), श्री. नारायण चांदेकर (अधिक्षक) व  कर्मचारी वृंद उपस्थित होते.

 

सही/-

उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र)

जिल्हा परिषद, कोल्हापूर

महर्षि वाल्मिकी यांची जयंती जिल्हा परिषदेमध्ये साजरी                        

म‍हर्षि वाल्मिकी यांची जयंती दिनांक ५-१०-२०१७ इ. रोजी जिल्हा परिषदमध्ये सकाळी ११.०० वाजता साजरी करणेत आली. त्याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. इंद्रजित देशमुख व मुख्य लेखा व वित्त्‍ अधिकारी श्री. संजय राजमाने यांचे हस्ते महर्षि वाल्मिकी यांचे फोटोस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. इंद्रजित देशमुख यांनी महर्षि वाल्मिकी यांनी लिहिलेल्या रामायणाची माहिती सांगितली. श्री. बी.पी. माळवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी मुख्य लेखा व वित्त्‍ अधिकारी श्री. संजय राजमाने, प्राथमिक शिक्षण अधिकारी श्री. सुभाष चौगुले, कृषि अधिकारी श्री. चंद्रकांत सुर्यवंशी व सर्व विभागाचे कक्ष अधिकारी, अधिक्षक, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

 

 

सही/-

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र)

जिल्हा परिषद कोल्हापूर करीता.

कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्या साधनाकरिता मोजमाप शिबीर संपन्न

सर्व शिक्षा अभियान, समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत अस्थिव्यंग, बहुविकलांग, सीपी, मतिमंद, अंध, कर्णबधिर इ. विशेष गरजा असणाऱ्या  विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य साधने व उपकरणे देण्याच्या अनुषंगाने मोजमाप शिबीर  दिनांक  28/09/2017 ते 03/10/2017 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना दैनंदिन क्रिया व अध्ययन प्रक्रिया  सुलभ व्हावी तसेच त्यांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण होण्याच्या दृष्टीने सदर साहित्य साधनांचा उपयोग विद्यार्थ्यांना होणार आहे. मोजमाप शिबिराचे आयोजन शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्यामार्फत करणेत आले होते.

आबासाहेब सासने विद्यालय, कोल्हापूर येथे दि. 28/09/2017 व दि.29/09/2017 रोजी  कोल्हापूर महानगरपालिका, पन्हाळा, करवीर, गगनबावडा, हातकणंगले, शिरोळ व शाहूवाडी या गटाकडील दिव्यांग विद्यार्थ्याकरिता आयोजन करण्यात आले होते. दि. 01/10/2017 रोजी प.बा. पाटील, हाय. व ज्युनि. कॉलेज मुदाळ, ता.भुदरगड येथे कागल, भुदरगड व राधानगरी या गटाकडीलकरिता व चंदगड, आजरा व गडहिंग्लज  गटाकडील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी  दिनांक 03/10/2017 शिवशक्ती  हायस्कूल, अडकूर ता. चंदगड येथे आयोजित करण्यात आले होते.

सदर शिबीरास मा. हसीना फरास महापौर कोल्हापूर महानगरपालिका, मा. सौ. वनिता देठे, मा. श्री. डी. एस. पोवार, शिक्षण उपनिरीक्षक, शिक्षण उपसंचालक, कोल्हापूरए मा. श्री. सुभाष चौगुले, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि. प. कोल्हापूर, डॉ.जी.बी. कमळकर, गटशिक्षणाधिकारी, पं.स. कागल यांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या.

जिल्हा परिषदेकडील 403 दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य साधने निश्चित करण्यात आलेली आहेत ती पुढीलप्रमाणे-  एम आर किट-403, सी पी चेअर-73, व्हिलचेअर-59, रोलेटर-29, ब्रेल किट-3, श्रवणयंत्र-67, क्रचेस-7, कॅलिपर-60, डायसी  प्लेअर-18, स्मार्ट केन-3,  एल्बो क्रचेस-3, ट्रायसिकल-4, , जयपूर फुट-1  अशी एकूण 475 साहित्य साधने निश्चित करणेत आली.

मोजमाप शिबिरकरिता अलिम्को, जबलपूरचे श्री. विक्रम महाराणा, श्री.अंशुमन परिडा, श्री. ओमप्रकाश व श्री. किशनकुमार, डॉ. चेतन जगताप फिजिओथेरपिस्ट व श्री. सचिन पाटील सायकॉलाजीस्ट तसेच RBSK पथकातील डॉक्टर व त्यांचे सहकारी उपस्थित होते. सर्व तज्ञानी मिळून दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य साधने निश्चित करणेत आली आहेत. पालकांना व दिव्यांग विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यात आले.

 

 

शिक्षणाधिकारी (प्राथ.)

                                                                              जिल्हा परिषद कोल्हापूर