जिल्हा परिषद स्वनिधी योजना गावठी कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे या योजनेअंतर्गत कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणेसाठीचे दरपत्रक मिळणेबाबत.

जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात  जिल्हा परिषद स्वनिधी योजना गावठी कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे या योजनेअंतर्गत या योजनेअंतर्गत असलेल्या निधीमधून गावाची निवड करुन निवडलेल्या गावांतील कुत्र्यांचे निर्बिजीकरण करुन  Antirebis vaccine  व जंतनाशक औषधे देण्यात येणार आहे.

आपले कमीत कमी दराचे जिल्हयामध्ये निवडलेल्या गावात जावून कुत्र्यांचे निर्बिजीकरण करुन  Antirebis vaccine व जंतनाशक औषधे देण्यासाठीचे दरपत्रक प्रतिनग सर्व करांसहित पोहोच दराने  दि.6/1/2018 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत पोहोचेल अशा बेताने लिफाफा सिलबंद करुन या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा. तसेच निर्बिजीकरण केलेल्या कुत्र्यांचे शस्त्रक्रियेनंतरचा उपचार व पाठपुरावा संबंधीत संस्थेने करणेचा आहे.

कोणतेही दरपत्रक स्विकारणे अथवा कोणतेही कारण न देता नाकारणेचा अधिकार राखुन ठेवणेत आलेला आहे.

 

 

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,

जिल्हा परिषद, कोल्हापूर.

 

 

लाळखुरकत रोगमुक्त प्रभाग निर्माण करणे या योजनेअंतर्गत 190 लि. क्षमतेचे रेफ्रिजरेटरचे दरपत्रकाबाबत.

 

जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात  लाळखुरकत रोगमुक्त प्रभाग निर्माण करणे या योजनेअंतर्गत असलेल्या निधीमधून  190 लि. क्षमतेचे रेफ्रिजरेटर खरेदी  करण्यात येणार आहेत.

आपले कमीत कमी दराचे 190 लि. क्षमतेचे नामांकित कंपनी उदा. गोदरेज, सॅमसंग, व्हर्लफुल, एलजी, हायर इ. रेफ्रिजरेटर खरेदीचे दरपत्रक प्रतिनग सर्व करांसहित पशुवैद्यकिय दवाखान्याच्या ठिकाणी पोहोच दराने  दि.16/1/2018 रोजी दुपारी 12.00 पर्यंत पोहोचेल अशा बेताने लिफाफा सिलबंद करुन या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा. तसेच पुरवठा केलेल्या शितपेटयांची 1 वर्षासाठी देखभाल दुरुस्ती संबंधीत पुरवठादाराने करणेचा आहे.

कोणतेही दरपत्रक स्विकारणे अथवा कोणतेही कारण न देता नाकारणेचा अधिकार राखुन ठेवणेत आलेला आहे.

 

 

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,

जिल्हा परिषद, कोल्हापूर.

 

लाळखुरकत रोगमुक्त प्रभाग निर्माण करणे या योजनेअंतर्गत डिस्पोजिबल निडल्स 18G ( Plastic mounted 18 x 1.5 inch) खरेदीसाठी दरपत्रकाबाबत.

 

जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात  लाळखुरकत रोगमुक्त प्रभाग निर्माण करणे या योजनेअंतर्गत असलेल्या निधीमधून  डिस्पोजिबल निडल्स 18G ( Plastic mounted 18 x 1.5 inch) खरेदी  करण्यात येणार आहेत.

आपले कमीत कमी दराचे डिस्पोजिबल निडल्स 18G ( Plastic mounted 18 x 1.5 inch) खरेदीचे दरपत्रक प्रतिनग सर्व करांसहित पशुवैद्यकिय दवाखान्याच्या ठिकाणी पोहोच दराने  दि.    16/1/2018 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत पोहोचेल अशा बेताने लिफाफा सिलबंद करुन या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा. कोणतेही दरपत्रक स्विकारणे अथवा कोणतेही कारण न देता नाकारणेचा अधिकार राखुन ठेवणेत आलेला आहे.

 

 

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,

जिल्हा परिषद, कोल्हापूर.

 

लाळखुरकत रोगमुक्त प्रभाग निर्माण करणे या योजनेअंतर्गत युपीएस खरेदीसाठी दरपत्रक मिळणेबाबत.

 

जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात  लाळखुरकत रोगमुक्त प्रभाग निर्माण करणे या योजनेअंतर्गत असलेल्या निधीमधून   युपीएस वुईथ एव्हीआर 20 मिनिट बॅकअप खरेदी  करण्यात येणार आहेत.

आपले कमीत कमी दराचे युपीएस वुईथ एव्हीआर 20 मिनिट बॅकअप खरेदीचे दरपत्रक प्रतिनग सर्व करांसहित पोहोच दराने  दि.16/1/2018 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत पोहोचेल अशा बेताने लिफाफा सिलबंद करुन या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा. तसेच पुरवठा केलेल्या युपीएसचे  1 वर्षासाठी देखभाल दुरुस्ती संबंधीत पुरवठादाराने करणेचा आहे.

कोणतेही दरपत्रक स्विकारणे अथवा कोणतेही कारण न देता नाकारणेचा अधिकार राखुन ठेवणेत आलेला आहे.

 

 

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,

जिल्हा परिषद, कोल्हापूर.

 

 जिल्हा परिषद स्वनिधी अंतर्गत  विधवा परितक्त्या व दारीद्रय रेषेखालील महिलांना 20 तलंगा गट वाटप करणे या योजनेअंतर्गत तलंगा खरेदीसाठी दरपत्रके मिळणेबाबत.

जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात  जिल्हा परिषद स्वनिधी विधवा परितक्त्या व दारीद्रय रेषेखालील महिलांना 20 तलंगा गट वाटप करणे  या योजनेअंतर्गत 12 आठवडयाच्या तलंगा खरेदी  करण्यात येणार आहेत.

आपले कमीत कमी दराचे  12 आठवडयाच्या देशी / देशी सुधारीत जातीच्या तलंगांचे दरपत्रक प्रतिनग सर्व करांसहित  दि. 16/01/2018 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत पोहोचेल अशा बेताने लिफाफा सिलबंद करुन या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा.

कोणतेही दरपत्रक स्विकारणे अथवा कोणतेही कारण न देता नाकारणेचा अधिकार राखुन ठेवणेत आलेला आहे.

 

 

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,

जिल्हा परिषद, कोल्हापूर.

 

 

 

 

जिल्हा परिषद स्वनिधी मधील योजनेतून Pow.Vita AD3, E, B12 खरेदीस दरपत्रके मिळणेबाबत.

जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात  जिल्हा परिषद स्वनिधी मधील योजनेअंतर्गत खालील स्पेसिफिकेशनचे Pow.Vita AD3, E, B12 (Feed supplement)  खरेदी करण्यात येणार आहेत.

 

Each 5 gms contain

Vita A- 50000 IU

Vita D3- 5000IU

Vita E -5 mg

Vita B12- 50mcg

 

आपले कमीत कमी दराचे Pow.Vita AD3, E, B12 (Feed supplement)   चे दरपत्रक प्रतिनग सर्व करांसहित  पोहोच दराने  दि.16/1/2018 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत पोहोचेल अशा बेताने लिफाफा सिलबंद करुन या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा.              कोणतेही दरपत्रक स्विकारणे अथवा कोणतेही कारण न देता नाकारणेचा अधिकार राखुन ठेवणेत आलेला आहे.

 

 

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,

जिल्हा परिषद, कोल्हापूर.

 

 

 

जिल्हा परिषद स्वनिधी मधील योजनेतून Liq. Calcium & Vitamin Suppliment 1 lit packing खरेदीस दरपत्रके मिळणेबाबत.

जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात  जिल्हा परिषद स्वनिधी मधील योजनेअंतर्गत खालील स्पेसिफिकेशनचे Liq. Calcium & Vitamin Suppliment 1 lit packing खरेदी करण्यात येणार आहेत.

Calcium & Vitamin Suppliment 1 lit

Each 100 ml containt

Calcium- 3500 mg

Phosphorus 1750 mg

Magnesium 200 mg

Vit D3 60,000 IU

Vit B 12- 200mcg

आपले कमीत कमी दराचे वरील स्पेसिफिकेशनचे Liq. Calcium & Vitamin Suppliment 1 lit चे दरपत्रक प्रतिनग सर्व करांसहित  पोहोच दराने  दि. 16/1/2018 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत पोहोचेल अशा बेताने लिफाफा सिलबंद करुन या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा. कोणतेही दरपत्रक स्विकारणे अथवा कोणतेही कारण न देता नाकारणेचा अधिकार राखुन ठेवणेत आलेला आहे.

 

 

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,

जिल्हा परिषद, कोल्हापूर.

जिल्हा परिषद स्वनिधी मधील योजनेतून Bol. Estrona pack of 10 bolus खरेदीस दरपत्रके मिळणेबाबत.

जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात  जिल्हा परिषद स्वनिधी मधील योजनेअंतर्गत Bol. Estrona pack of 10 bolus खरेदी करण्यात येणार आहेत.आपले कमीत कमी दराचे Bol. Estrona pack of 10 bolus चे दरपत्रक प्रतिनग सर्व करांसहित  पोहोच दराने  दि. 16/1/2018 रोजी दुपारी 2.00 वाजेपर्यंत पोहोचेल अशा बेताने लिफाफा सिलबंद करुन या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा. कोणतेही दरपत्रक स्विकारणे अथवा कोणतेही कारण न देता नाकारणेचा अधिकार राखुन ठेवणेत आलेला आहे.

 

 

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,

जिल्हा परिषद, कोल्हापूर.

 

 

 

जिल्हा परिषद स्वनिधी मधील योजनेतून Pow Inorganic phosphorus feed suppliment pack of 50 gms खरेदीस दरपत्रके मिळणेबाबत.

जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात  जिल्हा परिषद स्वनिधी मधील योजनेअंतर्गत Pow Inorganic phosphorus feed  suppliment pack of 50 gms खरेदी करण्यात येणार आहेत.आपले कमीत कमी दराचे Pow Inorganic phosphorus feed supplement pack of 50 gms (each gm containing 250 mgs of Inorgainc Phosphorus  Powder) चे दरपत्रक प्रतिनग सर्व करांसहित  पोहोच दराने  दि.16/1/2018 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत पोहोचेल अशा बेताने लिफाफा सिलबंद करुन या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा. कोणतेही दरपत्रक स्विकारणे अथवा कोणतेही कारण न देता नाकारणेचा अधिकार राखुन ठेवणेत आलेला आहे.

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,

जिल्हा परिषद, कोल्हापूर.

 

 

कॅन्सर पूर्व लक्षणे व कॅन्सर रुग्ण शोध मोहिमेचा शुभारंभ

जिल्हा नियोजन समिती  मार्फत 2016-17  नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत कोल्हापूर जिल्हयामध्ये कॅन्सर पूर्व लक्षणे व कॅन्सर रुग्ण शोध मोहिमेचा शुभारंभ कार्यक्रम  जिल्हा परिषद अध्यक्षा मा. सौ. शौमिका महाडिक यांचे हस्ते राजर्षि शाहू छत्रपती सभागृह येथे दिपप्रज्वलाने संपन्न झाला. या प्रसंगी  आरोग्य बांधकाम सभापती मा. श्री. सर्जेराव बंडू पाटील (पेरीडकर) ,  पंचायत समिती करवीरचे सभापती श्री. प्रदीप झांबरे, आरोग्य समिती सदस्या सौ. पुप्पा वसंत आळतेकर, सौ. सुनिता रमेश रेडेकर , डॉ एल एस पाटील , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुरज पवार, कॅन्सर तज्ञा, ॲपल सरस्वती कॅन्सर हॉस्पीटल च्या अवटी मॅडम  तसेच पंचायत समिती करवीर चे सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रसंगी बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश पाटील यांनी  नाविन्यपूर्ण योजना असून यामध्ये आशाचे कॅन्सर तज्ञा मार्फत प्रशिक्षण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. तसेच घरोघरी जावून आशा मार्फत सव्हेक्षण, आरोग्य शिक्षणसाठी माहिती देण्यात येणार आहे. संशयित रुग्णांचे  कॅन्सर तज्ञांचे शिबीर आयोजन करुन, आवश्यक तपासणी , उपचार बाबत माहिती दिली. 

योजनेचा करवीर तालुक्याचा कृती आराखडा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मा. डॉ. कुणाल खेमनार यांचे मागदर्शनाखाली तयार करणेत आला आहे असे  तालुका आरोग्य अधिकारी  डॉ नलावडे यांनी सांगितले. तालुक्याच्या सहा प्रा.आ.केंद्राच्या ठिकाणी कॅन्सरचे शिबीर घेण्यात येणार आहे.  या प्रसंगी जेष्ठ कॅन्सर तज्ञ डॉ सरज पवार उपस्थित होते त्यांनी  कॅन्सरचे रुग्ण वाढले असून तंबाखु  हे कॅन्सरचे प्रमुख कारण आहे.  कॅन्सर तज्ञांमार्फत आशा प्रशिक्षण घेण्यात येणार असून गर्भाशय मुख कॅन्सर,  स्तन कॅन्सर, मुख कॅन्सर ची माहिती दिली.

       आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना सौ. शौमिका महाडिक म्हणाल्या, संतुलित आहार, नियमित व्यायाम,  सुदृड जीवनशैली  आणि व्यसनापासून दूर राहणे हा कॅन्सर प्रतिबंधाचे महत्व नमुद केले. तसेच आशा हया सर्व सामान्याच्या आशा असून त्यांनी या नाविन्यपूर्ण योजनेत हिरहिरीने सहभाग नोंदवावा.  पंचायत समिती करवीरचे सभापती यांनी सदरची योजना तालुक्यातमध्ये चांगल्या प्रकारे राबविण्यात येईल असे सांगितले.

       उपस्थितांचे आभार डॉ.फारुख देसाई, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी यांनी केले. डॉ उषादेवी कुंभार, अति. जि.अ.अ व पंचायत समिती करवीरचे अधिकारी कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले