संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी केलेबाबत.

संत सेवालाल महाराज यांची जयंती जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे दि. १५/०२/२०१८ रोजी सकाळी ११ वाजता साजरी करणेत आली. त्या प्रसंगी मा. श्री. इंद्रजित देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हस्ते फोटो पूजन करणेत आले.यावेळी मा. श्री. सोमनाथ्‍ रसाळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. किरण लोहार माध्यमिक शिक्षणाधिकारी,  मा. श्री. चंद्रकांत सुर्यवंशी कृषि अधिकारी, श्रीमती. पी.सी मोरे गट विकास अधिकारी पन्हाळा उपस्थित होते.

संत सेवालाल महाराज यांची संपूर्ण माहिती श्री. बी.पी. माळवे यांनी सांगितली. या प्रसंगी अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

तरी सदरची बातमी आपलेमार्फत जिल्हयातील लोकप्रिय दैनिकांतून प्रसिध्द करणेत यावी.

सही/-

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)

जिल्हा परिषद, कोल्हापूर

जंतनाशन मोहिमेचा शुभारंभ उत्साहात

राष्ट्रीय जंत नाशन मोहिमेचा शुभारंभ दिनांक 10 फेब्रुवारी 2018 रोजी  कुमार विघा मंदिर व कन्या विद्या मंदिर उचागंाव  ता. करवीर येथे   मा. सौ. शौमिका अमल महाडिक, अध्यक्षा , जि.प. कोल्हापूर यंाच्या हस्ते शाळेतील विद्यर्थ्यांना जंतनाशक गोळी देवून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमासाठी  जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. महेश चौगले,  पंचायत समिती सदस्य मा. श्री. सुनिल पोवार,  जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. प्रकाश पाटील,  गटविकास अधिकारी  श्री सचिन घाटगे उपस्थित हेाते. तसेच उचगांव ग्रामपंचायत सदस्य सर्व  श्री. प्रतिम बनसोडे, रमेश वाईंगडे, विजय यादव  उपस्थित होते-

या प्रसंगी बोलताना मा. शौमिका माहाडिक म्हणाल्या की,  या मोहिमे अंतर्गत अंगणावाडी, प्राथमिक शाळा, शासन अनुदानित हायस्कुल मधील 1 ते 19 वयोगटातील  मुला-मुलीनां  जंतनाशन गोळी देण्यात येणार आहे. एकही लाभार्थी या मोहिमेत वंचित राहणार नाही यांची दक्षता घेण्यात यावी असे सूचित केले.

या मोहिमेचे उदिदष्ट  बालकांचे आरोग्य, त्यांची पोषण स्थिती सुधारणे, शिक्षणांची संधी व जीवनाचा दर्जा सुधारणे हा आहे असे डॉ. पाटील यांनी  नमुद केले.

कार्यक्रमाचे नियोजन तालुका आरोग्य अधिकारी  डॉ  नलवडे जी. डी.  श्री. इंदूलकर, श्री, आष्टेकर वि.अ.आ. श्री. पोवार विक्रम  यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. आर.आर. माळगांवकर यांनी मानले

 

जिल्हा आरोग्य अधिकारी

                                                            जिल्हा परिषद, कोल्हापूर

ताराराणी महोत्सव २०१८ च्या पत्रकार परिषदेबाबत – शुक्रवार – दिनांक ०२/०२/२०१८ दुपारी ४-३० वाजता

ताराराणी महोत्सव २०१८ च्या पत्रकार परिषदेबाबत – शुक्रवार – दिनांक ०२/०२/२०१८ दुपारी ४-३० वाजता

जिल्हा क्रिडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न – हारलो तरी जिंकल्याचा आनंद मिळवा – सौ. शौमिका अमल महाडिक (अध्यक्ष, जि.प. कोल्हापूर)

जिंकलो तर आनंद मिळतोच, पण अशी लढाई असावी की, चुकुन हारलोच तरी सुध्दा आनंदच मिळेल असे स्फुर्तीदायक उदगार जिल्हा परिषद कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी आयोजित क्रीडा स्पर्धेच्या पारितोषिक समारंभ प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा  शौमिका अमल महाडिक  यांनी पोलिस क्रीडांगण, कोल्हापूर या ठिकाणी काढले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी स्पर्धा अत्यंत उत्सहात पार पाडताना सर्व विभाग प्रमुख, गट विकास अधिकारी, कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य झालेचे विषद केले. सर्व पदाधिकारी आणि जि.प. सदस्य यांच्या सहकार्यामुळे अनेक उपक्रम हाती घेवून यशस्वी करणे शक्य होत असलेचे मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष मा. सर्जेराव पाटील, शिक्षण सभापती मा. अंबरिषदादा घाटगे, मुख्य लेखा व वित्त्‍ अधिकारी श्री. संजय राजमाने, गट विकास अधिकारी पन्हाळा श्रीमती पी.सी. मोरे यांची समयोचित भाषणे झाली. राजर्षि शाहू क्रिडा प्रशालेच्या सर्व प्रशिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे जल्लोषात आभार मानले गेले. कलामंचच्या कर्मचाऱ्यांने क्रिडा गीत गावून सर्वांचे मनोरंजन केले.

प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिकांचे वितरण केले गेले. राधानगरी तालुक्याने या स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. तर व्दितीय क्रमांक पं.स. पन्हाळा  व तृतीय क्रमांक पं.स. कागलने पटकाविला. क्रिडा ध्वज उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेंद्र भालेराव यांच्याकडे मान्यवरांच्या हस्ते सुपुर्त करण्यात आला. सुत्रसंचलन प्राध्यापक श्री. संजय लोंढे, सौ. कुंभार व श्री. माळवी यांनी केले. पारितोषिक वितरणांनंतर कर्मचारी खेळाडूंनी मैदानावर प्रचंड जल्लोष केला. कार्यक्रमाचे आभार माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. किरण लोहार यांनी मांडले.

 

यावेळी मा. भगवान पाटील, मा. महेश चौगुले जि.प. सदस्य व पं.स. पन्हाळा, भुदरगड सभापती, मा. श्री. राहुल कदम, उपमुख्य लेखा व वित्त्‍ अधिकारी, मा. श्री. राजेंद्र नागणे, मा. श्री. बर्गे, मा. श्री. सोमनाथ्‍ रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाक), मा. श्री. चंद्रकांत सुर्यवंशी, कृषि अधिकारी, डॉ. प्रकाश पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी, कार्यकारी अभियंता श्री. एस.एस. शिंदे, सर्व संघटनांचे अध्यक्ष उपस्थित होते. या प्रसंगी अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. सर्व क्रिडा स्पर्धेचे नियोजन सामान्य प्रशासन विभागाने उत्कृष्टरित्या केले.

 

 

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)

जिल्हा परिषद, कोल्हापूर

 

जिल्हा क्रीडा स्पर्धा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आदर्शवत उपक्रम – मा. नाम. चंद्रकांतदादा पाटील

कर्मचारी, अधिकारी व पदाधिकारी यांचे आरोग्य चांगले राहीले तर विकासाची गती वाढू शकते. समाज विकास अधिक वेगाने होवू शकतो असे उदगार जिल्हा परिषद कर्मचारी व अधिकारी व पदाधिकारी यांच्या क्रीडा स्पर्धा उदघाटनावेळी मा. नाम. चंद्रकांतदादा पाटील यांनी काझ्ले. या स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट् राज्याचे महसूल, मदत व पुर्नवसन, सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा मा. नाम. चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शौमिका महाडीक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार साहेब यांनी कोल्हापूर जिल्हयाची क्रीडा परंपरा, क्रीडास्पर्धा आयोजनाचा हेतू, कर्मचारी आणि अधिकारी यांचे आरोग्य याविषयी आपले मनोगत व्यक्त करुन अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आयोजन करणारी कोल्हापूर जिल्हा परिषद ही एकमेव जिल्हा परिषद असल्याचे विषद केले व याबद्रदल सर्व कर्मचारी अधिकारी व पदाधिकारी यांना धन्यवाद दिले.याप्रसंगी या स्पर्धाची माहिती असणारी क्रीडा माहिती पुस्तिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सर्व पंचायत समिती व मुख्यालयातील सर्व विभागांनी उत्कृष्ट पध्दतीचे संचलन सादर केले. सर्व खेळाडूंना डाएटचे प्राध्यापक श्री. संजय लोंढे यांनी क्रीडा शपथ्‍ दिली. राजर्षि शाहू क्रीडा प्रशालेच्या राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंचा सत्कार करणेत आला. क्रीडा प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी झांजपथ्क व मल्लखांबाचे चित्तथरारक प्रात्यक्षिक साजरे केले.

याप्रसंगी शिक्षण सभापती मा. अंबरिष घाटगे यांनी विनोदी शैलीत आपले मनोगत व्यक्त केले जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शौमिका महाडीक यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. कलामंचच्या कर्मचारी यांनी क्रीडागीत सादर केले.

या समारंभासाठी जिल्हाधिकारी श्री. अविनाश सुभेदार, अमल महाडीक, विशेष्‍ पोलिस महापरिक्षक श्री. विश्वास नांगरे पाटील, डी.वाय.एस.पी. श्री. तिरुपती काकडे, समाजकल्याण सभापती विशांत महापूरे, महिला व बालकल्याण सभापती मा. शुभांगी शिंदे, गटनेते अरुण इंगवले, पक्षप्रतोद विजय भोजे, श्री. महेश चौगुले, सौ. मनिषा टोणपे, करवीर पं.स. सभापती श्री. झांबरे, श्री. निंबाळकर, विजय बोरगे, श्री. फरकटे उपस्थित होते. सर्व तालुक्यांचे गट विकास अधिकारी व मुख्यालयातील सर्व विभाग प्रमुख आणि क्रीडा प्रशालेचे सर्व प्रशिक्षक यांनी अत्यंत नियोजनबध्द असे कार्यक्रमाचे नियोजन केले. क्रीडापंच व मार्गदर्शक श्री. सुभाष पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २९, ३० व ३१ जानेवारी २०१८ पर्यंत या स्पर्धा चालणार आहेत. सूत्रसंचालन श्री. संजय लोंढे व सौ. कुंभार यांनी केले. पदाधिकारी व अधिकारी यांच्या क्रिकेट सामन्याने या स्पर्धेला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे आभार उपमुख्य कार्यकारी (साप्रवि) श्री. राजेंद्र भालेराव यांनी मानले.

 

पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

 

राष्ट्रीय लसीकरण मोहिमे अंतर्गत कोल्हापूर जिल्हयात पहिल्या टप्यात 335489  इतक्या 0 ते 5 बालकांना पोलिअेा चा डोस देण्यातत येणार आहे.  या मोहिमेचा शुभारंभ कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र पु. शिरोली  ता. हांतकणगले  येथे  मा. सौ शौमिका अमल महाडिक, अध्यक्षा, जिल्हा परिषद  कोल्हापूर यांच्या हस्ते  बालकांला डोस पाजून पोलिअेा मोहिमेचा शुभारंभ संपन्न झाला. या प्रसंगी बोलताना मा. अध्यक्षा म्हणाल्या की,पोलिओपासून एकही बालक वंचीत राहणार नाही यांची दक्षाता घेण्यात यावी असे नमुद केले.  या निमित्त लोककलेतूनआरोग्य विषयक योजनांचे माहिती देणारे चित्ररथाचे सादरीकरण करण्यात आले. या  कार्यक्रमास  डॉ. प्रकाश पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी,  मा. सौ.  एस एस पाटील , पंचायत समिती सदस्या, मा. श्री. शशिकांत बापूसो खवरे, सरपंच   डॉ एफ ए देसाई, प्र. जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी,  तालुका आरोग्य अधिकारी, डॉ सुहास कोरे तसेच  ग्रामपंचायत सदस्य शुभारंभ  कार्यक्रमास उपस्थित होते. स्वागत व अभार  डॉ.  जेसिका ॲन्ड्रज्  वै्‌्‌्‌दयकीय अधिकारी  यांनी व्यक्त केले.

छत्रपती  प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर येथे मा. डॉ कुणार खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. कोल्हापूर यांचे हस्ते मोहिमेचे उदघाटन पोलीओ डोस देवून करण्यात आले.  उदघाटन प्रसंगी मा. डॉ कुणाल खेमनार म्हणाले की, सर्व बालकांचे योग्य वयात नियमित लसीकरण, नियमित ए.एफ.पी. सर्व्हेक्षण, 0 ते 5 वर्षातील सर्व बालकांचे पोलिओ लसीकरण करणे ही पोलिओ निर्मुलनाची त्रिसुत्री आहे असे सांगितले. या प्रसंगी  श्री. शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी, कोल्हापूर, डॉ एल एस पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक,  डॉ. प्रकाश पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता सीपीआर कोल्हापूर, डॉ व्ही .पी. देशमुख, निवासी वैदयकीय अधिकारी, बाहय संपर्क, डॉ. मिरगुंडे, डॉ खैरमोडे उपस्थित होते, डॉ . देसाई एफ.ए.  यांनी आभार व्यक्त केले.