RTE २५ % विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया 2018-19 अंतर्गत प्रवेश फेरीस मुदतवाढ

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये (वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देणेसाठी जागा राखून ठेवण्याची रीत) नियम 2012 प्रमाणे अल्पसंख्यांक शाळा वगळता, राज्यातील सर्व विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यता तत्त्वावरील प्राथमिक शाळांना सन 2012-13 या शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 % पर्यंतच्या जागा नजीकच्या परिसरातील वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. त्यानुसार सन 2018-19 या शैक्षणिक वर्षामधील 25% आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या student.maharashtra.gov.in या लिंकवरील RTE Portal वर ऑनलाईन चालू झालेली आहे.

सदर प्रक्रियेअंतर्गत दि. 07/03/2018 अखेर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 2880 ऑनलाईन अर्ज प्राप्त      झाले आहेत. ऑनलाईन प्रणालीद्वारे पहिल्या फेरीतील RTE 25 % विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र 599 विद्यार्थ्यांची यादी निश्चित होऊन RTE च्या लिंकवर अपलोड करणेत आली आहे. तसेच सर्व पात्र 599 विद्यार्थ्यांना प्रवेश घेणेसाठी शाळेच्या नावासह SMS ऑनलाईन प्रणालीद्वारे परस्पर पाठविणेत आले आहेत. SMS प्राप्त झालेल्या पालकांनी संबंधित शाळेत मूळ कागदपत्रांसह जाऊन पाल्याचा प्रवेश निश्चित करावयाचा आहे. त्यानुसार आज दिनांक 23/03/2018 पर्यंत एकूण 229 विद्यार्थ्यांनी RTE च्या 25 % आरक्षितकोट्यामध्ये प्रवेश घेतलेला आहे. एकाविद्यार्थ्याचा अर्ज कागदपत्रांच्या त्रुटींमुळे अपात्र ठरविणेत आलेला असून अद्याप 369 अर्ज प्रलंबित आहेत. पहिल्या फेरीतील शाळा प्रवेशाची अंतिम तारीख पूर्वीच्या वेळापत्रकानुसार 24/03/2018 होती. मात्र पालकांच्या आग्रहास्तव प्रलंबित अर्जांचे प्रवेश निश्चित करणेसाठी दि. 31/03/2018 इ. रोजीपर्यंत शाळा प्रवेशाची मुदत वाढविणेत येत आहे. तरी दिलेल्या मुदतीत पालकांनी संबंधित शाळेत मूळ कागदपत्रांसह जाऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.

 

 

                                                        शिक्षणाधिकारी(प्राथमिक)

                                                          जिल्हापरिषद,कोल्हापूर

 

  मुडशिंगी येथे कॅन्सर निदान शिबीर संपन्न   !

महाराष्ट्र राज्याचे महसुलमंत्री तथा कोल्हापूर जिल्हयाचे पालकमंत्री नाम.चंद्रकांत दादा पाटील आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सोै.शौमिका महाडिक यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येत असलेल्या आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमणार व जिल्हा आरोग्य अधिकारी सौ.उषादेवी कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत करवीर तालुक्यामध्ये कॅन्सर कॅन्सर पूर्व लक्षणे व कॅन्सर रुग्ण शोध मोहिम योजने अंतर्गत  जिल्हा परिषद कोल्हापूर व ॲपल सरस्वती हॉस्पीटल यांच्या विद्यमाने मुडशिंगी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कॅन्सर शिबीर नुकतेच संपन्न झाले.

या शिबीराचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्षा मा. सौ. शौमिका अमल महाडिक,  यांच्या शुभहस्ते व  मा. श्री. महेश चौगुले, जि. प. सदस्य, मा. सौ. वंदना पाटील, जि.प. सदस्या  यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.  या प्रसंगी बोलताना मा. सौ. शौमिका महाडिक म्हणाल्या की, ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करु नये, आपल्या मानसिक व शाररिक आरोग्य कडे लक्ष दयावे. शरीर , मन,  समाज सुस्थित असले तर सर्वांचे आरोग्य चांगले राहते.  प्रत्येकांनी खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी, स्वच्छता, चांगला सुसंवाद ठेवावा असे नमुद केले.

प्रास्ताविकात तालुकाआरोग्य अधिकारी डॉ.डॉ.जी.डी.नलवडे यांनी करवीर तालुक्यातील 425 आशा स्वयंसेविकांच्या मार्फत फेब्रुवारी मध्ये घरोघरी भेटी देवून कॅन्सर विषयक सर्व्हेक्षणात 2710 संशयित रुग्ण आढळले असून यासर्वच रुग्णांची वैद्यकीय अधिका-यामार्फत प्राथमिक तपासणीनंतर तालुक्यात आयोजित करण्यात येत असलेल्या कॅन्सर निदान चिकित्सासाठी आयोजित 6 शिबीरातून तपासणी करणेत आली असून. एकुण  621 रुग्णांची तपासणी  करण्यात आली असून त्यांपैकी  संशयीत कॅन्सर रुग्णांमध्ये तोडांचा -19 , गर्भाशय – 24 , स्तनांचा – 32 , इतर – 88 एकुण 160 रुग्ण संशयीत कॅन्सरचे आहेत. एकुण 73 संशयीत रुग्णांच्या पुढील तपासणीसाठी संदर्भित करण्यात आले आहे.  रुग्णांची तपासणी व चाचणी ॲपल सरस्वती हॉस्पीटल आणि कोल्हापूर कॅन्सर सेंटर यांच्याकडे करणेत येऊन कॅन्सर उपचार कराव्या लागणा-या रुग्णांना 15000 पर्यत अनुदान देण्यात येणार असलेचे विषद केले.

ॲपल सरस्वती हॉस्पीटलचे कॅन्सर तज्ञ डॉ.निखील गुळवणी यांनी सद्याच्या युगात खाण्या-पिण्याच्या बदल्या सवयी,युवक आणि तरुणांमधील तंबाखु,मावा,गुटखा यांसारख्या व्यसनांचे वाढते प्रमाण,महिलांमधील आरोग्याच्या समस्यांमधील संकोचितपणा व होणारे दुर्लक्ष,सोशिकता तसेच त्यांच्यामधील वाढते मिसरीचे व्यसन प्रमाण तसेच रासायनिक खते आणि किटक नाशकांचा अतिरिक्त वापर यामुळे 1995 सालाच्या प्रमाणात कॅन्सरचे प्रमाण 200 पटीने वाढले असून यासाठी सर्वानींच एकत्र लढा देणे गरजेचे असून यासाठी जिल्हा नियोजन मंडळ आणि कोल्हापूर जिल्हा परिषद यांनी उचललेले पाऊल निश्चितच उपक्रमशिल आणि नाविन्यपूर्ण असून कॅन्सर रुग्णांना दिलासादायक असल्याचे नमूद केले.

सदर शिबीरासाठी पं.स. सौ शौभा राजमाने, सौ. सरीता कटेजा,  ग्रा.प. मुडशिंगीचे सरपंच सौ. सुरेखा गवळी, उपसरपंच मा. तानाजी पाटील, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुभाष इंदूलकर यांनी केले व आभार डॉ एफ ए देसाई यांनी मानले. या शिबीर आयोजनसाठी  वै.अ. डॉ. मुल्ला मॅडम व सर्व कर्मचारी ,  आशा स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले.

——————————————————————————————

इस्पुर्ली येथे कॅन्सर निदान शिबीर संपन्न

महाराष्ट्र राज्याचे महसुलमंत्री तथा कोल्हापूर जिल्हयाचे पालकमंत्री नाम.चंद्रकांत दादा पाटील आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सोै.शौमिका महाडिक यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येत असलेल्या आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमणार व जिल्हा आरोग्य अधिकारी सौ.उषादेवी कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत करवीर तालुक्यामध्ये कॅन्सर निदान व चिकित्सा शिबीरांचे आयोजन करणेत आल्यानुसार जिल्हा परिषद कोल्हापूर व ॲपल सरस्वती हॉस्पीटल यांच्या विद्यमाने इस्पुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कॅन्सर शिबीर नुकतेच संपन्न झाले.

या शिबीराचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्या सौ.संध्याराणी बेडगे (दिंडनेर्ली) यांच्या शुभहस्ते व पं.स.सदस्य श्री.रमेश चौगले (नंदगाव) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षानी जि.प.सदस्या सौ.शिल्पा पाटील (हसुर दुाा.) होत्या. प्रास्ताविकात तालुकाआरोग्य अधिकारी डॉ.डॉ.जी.डी.नलवडे यांनी करवीर तालुक्यातील 425 आशा स्वयंसेविकांच्या मार्फत फेब्रुवारी मध्ये घरोघरी भेटी देवून कॅन्सर विषयक सर्व्हेक्षणात 2710 संशयित रुग्ण आढळले असून यासर्वच रुग्णांची वैद्यकीय अधिका-यामार्फत प्राथमिक तपासणीनंतर तालुक्यात आयोजित करण्यात येत असलेल्या कॅन्सर निदान चिकित्सासाठी आयोजित 6 शिबीरातून तपासणी करणेत येणार आहे. आजपर्यत झालेल्या एकूण 3 शिबीरातंर्गत कॅन्सर विषयक विविध चाचण्या व तपासण्या करण्यायोग्य 87 रुग्णांची यादी करणेत आली असून या व उर्वरीत शिबीरातून अशा प्रकारच्या आढळणा-या रुग्णांची तपासणी व चाचणी ॲपल सरस्वती हॉस्पीटल आणि कोल्हापूर कॅन्सर सेंटर यांच्याकडे करणेत येऊन कॅन्सर उपचार कराव्या लागणा-या रुग्णांना 15000 पर्यत अनुदान देण्यात येणार असलेचे विषद केले.

ॲपल सरस्वती हॉस्पीटलचे कॅन्सर तज्ञ डॉ.निखील गुळवणी यांनी सद्याच्या युगात खाण्या-पिण्याच्या बदल्या सवयी,युवक आणि तरुणांमधील तंबाखु,मावा,गुटखा यांसारख्या व्यसनांचे वाढते प्रमाण,महिलांमधील आरोग्याच्या समस्यांमधील संकोचितपणा व होणारे दुर्लक्ष,सोशिकता तसेच त्यांच्यामधील वाढते मिसरीचे व्यसन प्रमाण तसेच रासायनिक खते आणि किटक नाशकांचा अतिरिक्त वापर यामुळे 1995 सालाच्या प्रमाणात कॅन्सरचे प्रमाण 200 पटीने वाढले असून यासाठी सर्वानींच एकत्र लढा देणे गरजेचे असून यासाठी जिल्हा नियोजन मंडळ आणि कोल्हापूर जिल्हा परिषद यांनी उचललेले पाऊल निश्चितच उपक्रमशिल आणि नाविन्यपूर्ण असून कॅन्सर रुग्णांना दिलासादायक असल्याचे नमूद केले.

या आरोग्य शिबीरात 263 रुग्णांनी नोंदणीद्वारे तपासणी करुन घेतली. कार्यक्रमास ॲपल सरस्वती हॉस्पीटलच्या व्यवस्थापक श्रीम.गीता आवटी व डॉ.पुष्कर कुलकर्णी,ग्राम पंचायत नागाव सरपंच सौ.नाईक,परिते सरपंच श्रीम.कारंडे,इस्पुर्ली उपसरपंच श्री.प्रदिप शेटे व दिंडनेर्ली उपसरपंच सौ.सुप्रिया पाटील,रुग्ण कल्याण समिती सदस्य डॉ.अनिल पाटील,इस्पुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सौ.खराडे- पाटील,विस्तार अधिकारी श्री.प्रदिप अष्टेकर,श्री.सुनिल जाधव तसेच इस्पुर्ली प्रा.आ.केंद्राकडील सर्व कर्मचारी वर्ग,आशा स्वयंसेविका मोठया संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य सेवक श्री.राहुल शेळके यांनी केले व आभार वैद्यकीय अधिकारी डॉ.शोभा भोई यांनी मानले.

डॉ.जी.डी.नलवडे

तालुका आरोग्य अधिकारी

पंचायत समिती करवीर

कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत “गुढी पाडवा – शाळा प्रवेश वाढवा” या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी

कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत जि. प च्या शाळांमध्ये राबविणेत आलेल्या “गुढी पाडवा-शाळा प्रवेश वाढवा” या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. सर्वेक्षणानुसार आढळलेल्या दाखलपात्र (6+) वयोगटातील जवळपास 67 टक्के बालकांची पटनोंदणी गुढी पाडव्या दिवशीच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये झालेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा नजीकच्या कालावधीत विद्यार्थी संख्येने समृध्द होण्याची आशा आहे.

सन 2018-19 या शैक्षणिक वर्षाकरीता जिल्हा परिषदेच्या शाळांमार्फत पटनोंदणीचे सर्वेक्षण करणेत आले. या सर्वेक्षणामध्ये 6+ वयोगटातील दाखलपात्र मुले एकूण 28203 बालके आढळून आली. त्यापैकी गुढी पाडव्या दिवशीच एकूण 18843  बालके जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल झालेली आहेत.त्याची टक्केवारी 67 %    इतकी आहे.  तसेच दाखलपात्र वयोगटातील उर्वरित बालके शैक्षणिक सत्र सुरु होईपर्यंत जि. प च्या शाळांमध्येच दाखल होणे अपेक्षित आहे. “गुढी पाडवा-शाळा प्रवेश वाढवा” कार्यक्रम जिल्हा परिषद शाळांमध्ये यशस्वी होणेकामी पदाधिकारी, अधिकारी व शिक्षक यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत मागील चार वर्षांपासून “गुढी पाडवा – शाळा प्रवेश वाढवा” हा अभिनव उपक्रम राबविणेत येतो. गतवर्षीपेक्षाही या उपक्रमास यावर्षी चांगला प्रतिसाद लाभलेला दिसून येतो. यावर्षी जिल्हा परिषद शाळांमार्फत दाखलपात्र बालकांच्या गृहभेटी, शाळांची रंगीत जाहिरात पत्रके अशा पद्‌धतीने व्यापक जनजागृती करणेत आली. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दाखल होणाऱ्या बालकांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश,डिजीटल शाळा, शालेय पोषण आहार तसेच तज्ञ व अनुभवी शिक्षकांमार्फत गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात असून जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल करावे असे आवाहन करणेत येत आहे.

अ. क्र. गटाचे नाव 6+ वयोगटातील दाखलपात्र संख्या गुढीपाडव्यादिवशी  दाखल  विद्यार्थी संख्या दाखल टक्केवारी

 

1 आजरा 965 607 62.90
2 भुदरगड 1473 1200 81.47
3 चंदगड 1989 1492 75.01
4 गडहिंग्लज 1713 1044 60.95
5 गगनबावडा 520 477 91.73
6 हातकणंगले 4015 2024 50.41
7 कागल 2535 1657 65.36
8 करवीर 4978 2873 57.71
9 पन्हाळा 2783 2123 76.28
10 राधानगरी 2528 1706 67.48
11 शाहुवाडी 1954 1701 87.05
12 शिरोळ 2750 1939 70.51
  एकूण 28203 18843 67.00

                                                                                   

                                                                                                                               शिक्षणाधिकारी (प्राथ.)

                                                                                                      जिल्हा परिषद कोल्हापूर

गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा उपक्रम अंमलबजावणीचे‍ नियोजन

*कोल्हापूरजिल्हापरिषदेमार्फतगुढीपाडवा -शाळाप्रवेशवाढवाकार्यक्रमअंमलबजावणीचेनियोजन*

 

बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत प्राथमिक शिक्षणाचा हक्क प्रदान झालेला आहे. या अनुषंगाने ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांची पटनोंदणी नियमित शाळेत होणे आवश्यक असते. यास अनुसरून कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत मागील ४ वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा हा अभिनव उपक्रम राबविणेत येत आहे. गुढी पाडवा हा हिंदू नववर्षातील प्रथम दिन असून नवीन कार्य सुरू करणेसाठी शुभदिन समजला जातो. या दिवशीच पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळेत निश्चित करावा या उददेशाने गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा हा उपक्रम जिल्हा परिषदेमार्फत राबविणेत येत आहे. या उपक्रमांतर्गत ६ ते १४ वयोगटातील दाखलपात्र मुलांचे सर्वेक्षण करणे, दाखलपात्र मुलांची यादी तयार करून ती गाव / शाळेच्या दर्शनी भागात लावणे, शाळेची जाहिरातपत्रके तयार करून पालकांना वितरीत करणे, विविध माध्यमांदवारे शाळांची जाहिरात करणे असे उपक्रम राबविणेच्या सुचना सर्व शाळांना देणेत आलेल्या आहेत. या उपक्रमाची फलश्रुती म्हणून दरवर्षी गुढी पाडव्यादिवशीच जास्तीत जास्त मुलांची पटनोंदणी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये होत असलेचे दिसून येत आहे.

प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी राबविणेत येणाऱ्या सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमाची तसेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ज्ञानरचनावादी शाळा, कृतीयुक्त अध्ययन पद्धती (ABL), डिजीटल शाळा, ISO शाळा मानांकन अशा उपक्रमांची जिल्ह्यामध्ये प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. १००% पटनोंदणी, नियमित उपस्थिती तसेच गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, माध्यान्ह भोजन योजना, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची इस्त्रो केंद्र भेट अशा विद्यार्थी हिताच्या विविध योजना शाळांमध्ये राबविणेत येत आहेत. शासकीय तसेच जिल्हा परिषदेच्या स्वनिधीमधील विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळा लोकाभिमुख होणेस मदत झालेली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सर्वतोपरी योगदान देत आहेच, त्याला समाजाचीही साथ मिळण्याच अपेक्षा या आवाहनाव्दारे करणेत आलेली आहे.

गुढी पाडव्यादिवशी आपल्या दाखलपात्र (६ वर्षे पूर्ण असणा-या) बालकाचा प्रवेश कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळेत निश्चित करून आपल्या पाल्याचे भवितव्य उज्वल करणेची संधी जिल्हा परिषदेच्या शाळांना द्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमनार, शिक्षण समिती सभापती श्री.अंबरिषसिंह घाटगे व प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री.सुभाष चौगुले यांनी आवाहन केले आहे.

 

 

                                                                                                            शिक्षणाधिकारी(प्राथ.)

                                                                                                            जिल्हापरिषदकोल्हापूर

 

जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांच्या विमान प्रवासासह इस्रो भेटी साठी शुभेच्छ समारंभ

जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांच्या विमान प्रवासासह इस्रो भेटी साठी शुभेच्छ समारंभ