मा.श्री. अजित भोसले, एअर मार्शल (निवृत्त), सदस्य युपीएसी न्यू दिल्ली यांची राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशालेस भेट.

जिल्हा परिषद, कोल्हापूर अंतर्गत एक नाविन्यपूर्ण योजना म्हणून जून 2014 पासून  चालविल्या जाणा-या  राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला, शिंगणापूर या प्रशालेस मा. श्री. अजित भोसले, एअर मार्शल (निवृत्त), तथा सदस्य युपीएसी, न्यू दिल्ली यांनी आज दिनांक 20/04/2018  रोजी सदिच्छा भेट देऊन क्रीडा प्रशालेच्या कामकाजाचा आढावा घेतला. प्रथम क्रीडाप्रशालेचे प्रशासन अधिकारी व मुख्याध्यापक यांनी  मा. श्री. अजित भोसले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  त्यांनतर क्रीडा प्रशालेचा हेतू, प्रशालेचे स्वरुप, प्रशालेमार्फत राबविले जाणारे विविध उपक्रम, विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणा-या सोई सुविधा तसेच खेळाडूंनी  राज्य व राष्ट्रीय स्थरावर केलेल्या कामगिरीचा आढावा याची सविस्तर माहिती  पीपीटी  व डॉक्यूमेंट्री व्दारे  सादर करणेत आली.

त्यानंतर मा. श्री. अजित भोसले यांनी क्रीडाप्रशालेतील आवारातील क्रिडांगण, वस्तीगृह, व्यायामशाळा, भोजनगृह, आभ्यासिका या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. जि.प. मार्फत सुरू केलेल्या हा अभिनव उपक्राम पाहून ते प्रभावित झाले. त्यानंतर क्रीडा प्रशालेकडील प्रशासन अधिकारी, मुख्याध्यापक, क्रीडा प्रशिक्षक  यांना मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेने राबविलेल्या या उपक्रमाबाबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, पदाधिकारी, मु.ले.व वि.अ., शिक्षणाधिकारी  यांचे  कौतूक करुन शाळेची प्रगती अतिशय चांगली असून राबविलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

कोल्हापूर जिल्हयात मातामृत्यू व बालमृत्यू प्रमाणात घट

जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत जिल्हयातील माता व बाल मृत्यू प्रमाणे कमी करणेसाठी डॉ.कुणाल खेमनार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयामध्ये विविध उपाययोजना द्वारे माता व बाल मृत्यू प्रमाणा कमी करणेत यशस्वी वाटचाल.

दिनांक 17/04/2018 रोजी समिती सभागृह जि.प. कोल्हापूर येथे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.एल.एस.पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.यु.जी.कुभांर, बालरोग तज्ञ शासकिय वैद्यकिय महाविद्यालय डॉ.एस.एस.सरवदे, वैद्यकिय अधिक्षक क.बावडा सेवा रुग्णालय डॉ.बी.एस.थोरात, जिल्हा माता व बालसंगोपण अधिकारी डॉ.फारुख देसाई व डॉ.विलास देशमुख बाहयसंपर्क वैद्यकिय अधिकारी व जिल्हयातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी याच्या उपस्थित पुढील उपाययोजना व कारवाई बाबत सविस्तर चर्चा झाली.

महाराष्ट्र राज्यात एक लाख जिवंत जन्मामागे 68 मातांचा मृत्यू होतो. सन 2020 पर्यंत माता मृत्यू दर 60 पर्यंत खाली आणणेचे उदिष्ट आहे.  कोल्हापूर जिल्हयात सन 2017-18 मध्ये एकुण 29 गरोदर मातांचा मृत्यू झालेला आहे.  त्यापैकी 08 गरोदर माता हया जिल्हया बाहेरच्या आहेत.   कोल्हापुर जिल्हयाचा मातामृत्यूदर 48 आहे.  सन 2020 पर्यंत गाठायच्या अपेक्षित पातळीपेक्षा कोल्हापूर जिल्हयाचा मातामृत्यूदर खुपच कमी आहे.

महाराष्ट्र राज्याचा अर्भक मृत्यू दर हजार जिवंत जन्मामागे 19 इतका असताना कोल्हापूर जिल्हाचा बाल मृत्यू दर 15 इतका आहे. सन 2017-18 मध्ये कोल्हापूर मधील ग्रामीण भागात एकुण 124 बाल मृत्यू झाले आहेत. सन 2016-17 मध्ये एकुण 158 बालमृत्यू झाले होते.

माता व बाल मृत्यू प्रमाण कमी करणेसाठी कोल्हापूर जिल्हयामध्ये नियमित प्रत्येक माता व बाल मृत्यूचा आढावा मा.मुख्य कार्यकारी अधिकारी व मा.जिल्हाशल्यचिकित्सक यांच्या अध्यक्षतेखालील समिती मध्ये घेतला जातो व भविष्यात माता व बाल मृत्यू टाळणेसाठी सुधारणा सुचित केल्या जातात.  यामध्ये माता व बालमृत्यूचे वयानुसार जन्म व मृत्यू ठिकाण नुसार व माता व बालमृत्यूच्या कारणानुसार आढावा घेऊन सविस्तर चर्चा केली जाते.  या अनुषंगाने सन 2017-18 ची वार्षीक माता व बालमृत्यू बैठक मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेणेत आली.  सन 2018-19 मध्ये माता व बालमृत्यू प्रमाण कमी होणेसाठी पुढील प्रमाणे निर्देश देणेत आले.

  • प्रत्येक गरोदर मातेच्या सोनोग्राफी सहित आवश्यक सर्व तपासण्या शासकिय आरोग्य संस्थेमार्फत करणे व त्यामधुन निदान झालेल्या अतिजोखमीच्या गरोदर मातांना नियमित पाठपुरावा करुन योग्य आरोग्य संस्थेमध्येच प्रसुती होईल याचे नियोजन.
  • गरोदर मातांची तपासणी व पाठपुरावा वेळेवर होणेसाठी गरोदर मातांना मोबाईल फोन द्वारे दरमहा व्हॉईस संदेश हि जि.प. स्वनिधी योजना या वर्षी कार्यान्वित ठेवणे.
  • आशा स्वंयसेविका व आरोग्य सविका यांच्या आरोग्य सेवाना प्रतिसाद न देणा-या गरोदर मातां व आजारी बालकांच्या पालकांचे वरिष्ठ अधिका-याकडुन मतपरिर्तन करुन योग्य उपचार सुरु ठेवणे.
  • घरी अथवा वाटेत होणा-या प्रसुती / जन्म टाळणेसाठी लवकरात लवकर गरोदर मातेची तपासणी करुन नजीकच्या आरोग्य संस्थेत संदर्भसेवा देणे व यासाठी आरोग्य संस्थेच्या रुग्णवाहिका सुस्थितीत ठेवणे.
  • गरोदर मातेस व बालकास शासकीय वाहण व्यवस्था उपलब्ध होणेसाठी 102 व 108 या टोलफ्री नंबरची जास्तत जास्त प्रसिध्दी करणे.
  • दुर्गम भागातील व अतिजोखमीच्या गरोदर मातांना प्रसुती पुर्वी योग्य ठिकाणी स्थंलातरीत करणे यासाठी पाहुणी रुग्ण्यालयाची ही योजना कार्यान्वित करणे.
  • आरोग्य संस्था स्तरावरील दरमहा 9 तारखेला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान अंतर्गत सर्व माताची स्त्रीरोग तज्ञामार्फत तपासणी करुन घेणे व प्रा.आ.केंद्र व उपकेंद्र स्तरावर सर्व गरोदर मातांची नियमित तपासणी करणे.
  • नवजात अर्भकाची काळजी घ्ज्ञेसाठी सर्व आरोग्य संस्थेच्या ठिकाणी उपकंेद्र प्रा.आ.केंद्र New Born Care Corner ची स्थापना करणेत यावी.
  • जन्मजात व्यंग मुळे होणारे बाल मृत्यू टाळणेसाठी गरोदरपणाच्या 16 ते 20 आठवडयादरम्यान अतिजोखमीच्या गरोदर मातांच्या गर्भाची व्यंग तपासणी करुन घ्यावी यासाठी जिल्हयातील रिडेओलॉजीस्ट संघटनेशी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुधारित पध्दतीने समजुतीचा करारनामा MOU करणेत येऊन त्यासाठी सर्व आरोग्य संस्थानां मार्गदर्शनपर परिपत्रक देणेत येणार आहे.
  • स्त्री जातीचा आचानक बाल मृत्यू घरी झालेस त्याची एमएलसी पोलिस केस करुन शवविच्छेदन करुन घेणे.

 

अ.न. माता मृत्युची प्रमुख कारणे उपाययोजना
1 गरोदरपणातील उच्चरक्तदाब, हदयरोग व गभजन्य विषबाधा (Eclampsia) गरोदरपणाची 12 आठवडयाच्या आत नोंदणी व स्त्रीरोग तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली नियमित उपचार
2 जंतुदोष  (Septicemia) संस्थेत प्रसुती, आरोग्य शिक्षण व वैयक्तीक स्वच्छता
3 प्रसुतीपश्चात अति रक्तश्राव (PPH) गरोदर पणातील योग्य व समतोल आहार
गरोदरपणामध्ये रक्तवाढीच्या गोळयाचे नियमित सेवण
4 असुरक्षित गर्भपात तज्ञ डॉक्टरांच्या सल्याने गर्भपात

 

अ.न. बाल मृत्युची प्रमुख कारणे उपाययोजना
1 कमी वजनाचे कमी दिवसाचे जन्म गरोदरपणात वैद्यकिय सल्यांनुसार योग्य काळजी
2 जन्मत बाळ गुदरमणे आरोग्य संस्थेत प्रशिक्षीत व्यक्ती कडुन प्रसुती, मातेचे आरोग्य शिक्षण
3 बाळाचे जन्माजात व्यंग गरोदरपणाच्या 16 ते 20 आठवडया दरम्यान गर्भाचे Anamoly Scan Sonogrphy करुन घेणे.

कोल्हापूर जिल्हयात माता मृत्युव बाल मृत्यु प्रमाणा सातत्याने घट होणेसाठी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी आपल्या अध्यक्षतेखाली समिती च्या सभेमध्ये नियमितपणे आढावा घेऊन मृत्यूच्या कारणानुसार उपाययोजना सुचित करुन आरोग्य यंत्रणेला मागदर्शन करुन सुचनांचा पाठपुरावा करुन घेतला आहे.

 

जिल्हा आरोग्य अधिकारी,

जिल्हा परिषद कोल्हापूर

महात्मा बसवेश्वर यांची  जयंती जिल्हा परिषदेमध्ये साजरी केले बाबत.

महात्मा बसवेश्वर यांची जयंती दिनांक 18 एप्रिल  2018 इ.रोजी   जिल्हा परिषदमध्ये  सकाळी 11.00 वाजता साजरी करणेत आली. याप्रसंगी सौ.  वर्षा परिट,लेखा व वित्त अधिकारी     (शिक्षण विभाग ) व श्री.सुधाकर कांबळे, कनिष्ठ सहा लेखा वित्त विभाग  यंाचे हस्ते महात्मा बसवेश्वर यंाच्या प्रतिमेचे पुजन  करणेत आले . त्याप्रसंगी मा. इंद्रजित देशमुख अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी , श्री. हरिशचंद्र जगताप प्रकल्प संचालक, श्री.संजय राजमाने, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, श्री. तुषार बुरूड  कार्यकारी अभियंता बांधकाम , श्री. चंद्रकांत सुर्यंवंशी  कृषि अधिकारी, एच.एस.शिंदे पशुसवंर्धन अधिकारी इ.  उपस्थित होते. सदर कार्यक्रमामध्ये महात्मा बसवेश्वर  यांची माहिती श्री. बी.पी. माळवे  यंानी सांगितलीे. त्याप्रस्ंागी  जिल्हा परिषदेतील संघटना पदाधिकारी व अधिक्षक, कक्षअधिकारी , कर्मचारी  मोठया संख्येने उपस्थित होते.

 

 उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र. )

                जिल्हा परिषद कोल्हापूर

शिक्षण विभाग (प्राथ.), जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्हा परिषद प्रज्ञाशोध निकाल परीक्षा जाहिर सन 2017-18

 

जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत जि.प.स्वनिधीमधून प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन केले होते. या परीक्षेमध्ये राधानगरी तालुक्याने वर्चस्व संपादन करुन जिल्हा यादीमध्ये प्रथम स्थान मिळविलेले आहे. मराठी माध्यमामध्ये राधानगरीची विद्यार्थिनी कु.प्रतिक्षा यादव इ.7 वी मध्ये प्रथम तर भुदरगडचा विद्यार्थी कु.शिवतेज खोपडे इ.4 थी मध्ये प्रथम आला आहे. तसेच उर्दू माध्यममध्ये इ.7 वी मध्ये कागल तालुक्यातील मान्नोली अश्फाक तर इ.4 थी मध्ये हातकणंगले तालुक्यातील गडकरी जेबा हे विद्यार्थी प्रथम आले आहेत. जिल्हास्तरीय अनु. प्रथम तीन विद्यार्थ्यांना रक्कम रु.5,000/-, 3000/-, 2,000/- बक्षीस, चषक व प्रमाणपत्र देणेत येवून त्यांचा गौरव करणेत येणार आहे. मार्गदर्शक शिक्षकांना पदक व प्रमाणपत्र प्रदान करणेत येणार आहे.

जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत जि.प.स्वनिधीमार्फत दरवर्षी मुलांच्या अंगी स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होण्यासाठी तसेच इ. 5 वी इ. 8  वी च्या परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी म्हणून प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन केले जाते. इ.4 थी व इ.7 वी मध्ये शिकणाऱ्या मराठी व उर्दू माध्यमातील मुलांच्यासाठी ही परीक्षा आयोजित केली होती. चाळणी परीक्षा व निवड परीक्षा अशा दोन टप्प्यांमध्ये परीक्षेचे आयोजन करणेत आलेले होते. परीक्षा परिषदेच्या निकषांनुसार भाग 2 मधील गुण (इंग्रजी व बुद्धिमत्ता) व जन्मतारीख हे निकष वापरुन जिल्ह्यातील प्रथम तीन व तालुक्यातील प्रथम दहा विद्यार्थ्यांची निवड करणेत आलेली आहे. ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडणेकामी मा.जि.प.अध्यक्षा सौ.शोमिका महाडिक, उपाध्यक्ष मा.सर्जेराव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मा.डॉ.कुणाल खेमनार, शिक्षण सभापती मा.अंबरिषसिंह घाटगे व इतर जि.प.सदस्य यांचे योगदान लाभले आहे.

 

(श्री.सुभाष चौगुले)

शिक्षणाधिकारी (प्राथ.),

जिल्हा परिषद कोल्हापूर

RTE अंतर्गत २५ % विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2018-19 – दुसरी फेरी

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये (वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देणेसाठी जागा राखून ठेवण्याची रीत) नियम 2012 प्रमाणे अल्पसंख्यांक शाळा वगळता, राज्यातील सर्व विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यता तत्त्वावरील प्राथमिक शाळांना सन 2012-13 या शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 % पर्यंतच्या जागा नजीकच्या परिसरातील वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. त्यानुसार सन 2018-19 या शैक्षणिक वर्षामधील 25 % आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या student.maharashtra.gov.in या लिंकवरील RTE Portal वर ऑनलाईन पध्दतीने राबविणेत येत आहे.

सदर प्रक्रियेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 2880 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी विद्यार्थी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी एकूण 599 पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेणेसाठी SMS ऑनलाईन प्रणालीद्वारे पाठविणेत आले होते. दि. 13/04/2018 इ. रोजी पहिली फेरी समाप्त झालेली असून पहिल्या फेरीअंती एकूण 448 विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतलेला आहे. 118 विद्यार्थी अपात्र ठरले असून 33 विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतलेला नाही.

दि. 18/04/2018 इ. रोजी विद्यार्थी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू होणार असून ऑनलाईन प्रणालीद्वारे पात्र विद्यार्थ्यांची यादी निश्चित होऊन RTE च्या लिंकवर अपलोड करणेत येणार आहे. सदर यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेणेसाठी शाळेच्या नावासह SMS ऑनलाईन प्रणालीद्वारे परस्पर पाठविले जातील. SMS प्राप्त झालेल्या पालकांनी दि. 20/04/2018 ते दि. 10/05/2018 या कालावधीत संबंधित शाळेत मूळ कागदपत्रांसह जाऊन पाल्याचा प्रवेश निश्चित करावयाचा आहे. दुस-या फेरीतील विद्यार्थी प्रवेशासाठी अंतिम तारीख 10/05/2018 आहे. तरी दिलेल्या मुदतीत पालकांनी संबंधित शाळेत मूळ कागदपत्रांसह जाऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. सुभाष चौगुले यांनी केले आहे.

 

(श्री. सुभाष रा. चौगुले)

                                                                                      शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

                                                                                      जिल्हा परिषद कोल्हापूर

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांची 127 वी जयंती साजरी.

कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांची 127 वी जयंती दिनांक 14/04/2018 इ.रोजी सकाळी 11.00 वाजता संपन्न झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन श्री.महावीर सोळांकुरे, सहा.लेखा अधिकारी (वित्त विभाग) व सौ. प्रतिमा पाटील,कनिष्ठ सहाय्यक (ग्रापापु विभाग)  यांच्या हस्ते करणेत आले. या प्रसंगी  जिल्हा परिषद  अध्यक्ष मा. सौ. शौमिका महाडीक यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांच्या विचारांचे आचारण प्रत्येकांने करणे गरजेचे आहे हे पटवुन दिले.  मा. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विद्यार्थी जीवनाविषयी माहिती व त्यांनी मिळवलेल्या पदव्याबाबत माहिती दिली.  मा.श्री.नामदेव कांबळे, महासचिव कास्ट्राईब संघटना यांनी जयंतीचे औचित्य साधुन संविधानाचे महत्व सांगितले.

या प्रसंगी मा.श्री. विशांत महापूरे,सभापती समाजकल्याण समिती, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र भालेराव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. संजय राजमाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व) श्रीम.सुषमा देसाई, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बाक), श्री.सोमनाथ रसाळ, कार्यकारी अभियंता (बांधकाम) श्री.तुषार बुरुड, जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री.चंद्रकांत सूर्यवंशी, पशुसंवर्धन अधिकारी श्री.एस.एच.शिंदे, शिक्षणाधिकारी(माध्यमिक) श्री.किरण लोहार मा.श्री.प्रकाश टोणपे यांच्यासह व सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.

यावेळी श्री.बी.पी.माळवे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती व सुत्र संचलन केले. यावेळी मोठया संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कृपया वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिध्द करणेकामी कार्यवाही करणेत यावी, ही विनंती.

 

उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)

                                                                          जिल्हा परिषद, कोल्हापूर

आयुष्यमान भारत योजने अंतर्गत नागरिकांना सुरक्षा कवच

केद्र सरकारच्या महात्वकांक्षी योजना आयुष्यमान भारत  या योजने अंतर्गत  राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. त्या अंतर्गत आयुष्यमान भारत दिवस ग्रामीण लाभार्थी पडताळणी , अतिरिक्त माहिती संकलन  मोहिम  15 एप्रिल 2018 ते 21 मे 2018  रोजी राबविण्यात येणार आहे असे मा. डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी . जि.प. कोल्हापूर यांनी  गटविकास अधिकारी,  तालुका आरोग्य अधिकारी,  यांच्या आढावा सभेमध्ये मार्गदर्शन करतांना सांगितले. या अभियानसाठी 30 एप्रिल 2018 रोजी ग्राम सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक, आरोग्य सेवक/ आशा यांच्या  सहकार्याने अतिरिक्त माहिती छापील नमुन्यात गोळा करण्यात येणार आहे. ग्रामसभेमध्ये, 1)  कुटुंब प्रमुखाची माहिती फार्म मध्ये लिहली जाईल 2) कुटुंब प्रमुखाची माहिती उपलब्ध नसल्यास इतर सदस्यांची माहिती नोंदवावी. 3) तसेच  कुटुंबात अतिरिक्त व्यक्तिची माहिती भरणे, नांवे वगळणे इ. माहिती संकलित करण्यात येणार आहे. आढावा सभेसाठी मा. राजेंद्र भालेराव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत उपस्थित होते सर्व लाभार्थ्यांची नोंदणी करावी असे सांगितले. तसेच जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी/जिल्हा आरोग्य अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परीषद तसेच तालुका स्तरावर गट विकास अधिकारी,पंचायत समिती तालुका आरोग्य अधिकारी यांच्य मार्गदर्शनाखाली हि मोहिम राबविण्यात येणार आहे.

डॉ. सुहास कोरे, प्र. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, बोलतांना सांगितले की,  या योजने अंतर्गत दारिद्र रेषेखालील कुटुंबांना प्रति कुटंुब प्रति वर्ष 5 लाख पर्यत मान्यता प्राप्त रुग्णालयातून शस्त्रक्रिया उपचाराच्या माध्यतून विमा सरक्षंण मिळणार आहे.  देशात 10 कोटीहुन अधिक गरीब दुर्बल घटक, राज्यात 83.63 लक्ष लाभार्थी कुटंुबे, वंचित घटक लाभार्थी आहेत. लाभार्थी देशभरात कोणत्यांही मान्यता प्राप्त रुग्णालयात लाभ घेवू शकतात. या योजनेसाठी  माहिती, शिक्षण संवाद ही महत्वपूर्ण बाब आहे असे नमुद केले.

जैवविविधता व्यवस्थापन समिती जि. प. स्तरावरील सभा 12/04/2018

महाराष्ट्र शासनाकडील मार्गदर्शक सुचनेप्रमाणे व महाराष्ट्र जैविक विविधता नियम 2008मध्ये सुचित केलेप्रमाणे पंचायतराज व्यवस्थेतील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने जैविक विविधता व्यवस्थापन समितीची स्थापना करणेअनिवार्य असलेमुळे आज दिनांक 12 एप्रिल 2018 रोजी जिल्हा परिषद स्तरावरील जैव विविधता व्यवस्थापन समितीची सभा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली.

मा. श्री. ए. डी. जाधव,सदस्य, महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडळ व फॅकल्टी डिपार्टमेंट ऑफ झूलॉजी  शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी जैवविविधता मंडळ व अनुषंगिक बाबींबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. जैवविविधतेच्या अनुषंगाने स्थानिक पातळीवरुन निसर्गातील सर्व घटकांच्या नोंदी व त्यंाचे संवर्धन करणे आवश्यक असलेने सदरचा कायदा केंद्र शासनाकडून करणेत आला असून त्याची कार्यवाही ग्राम पंचायत स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य व जबाबदारी आहे.त्यानुसार निसर्गातील प्रत्येकघटक अत्यंत महत्वाचा असून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त असलेने त्या सर्व घटकांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. ज्या दुर्मिळ जाती-प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्या संवर्धन केल्या तरच निसर्गाचा समतोल राहणार आहे. याबाबतीत आपल्या सर्वांचा सहभाग अत्यंत आवश्यक असलेबाबत नमुद केले.

मा. श्री. शाम बजेकल, इमिरिटस बायो डाव्हरर्सिटी फेलो यांनी केंद्र शासनाने जैवविविधता कायदा, 2002 व महाराष्ट्र शासन जैविक विविधता नियम 2008 मधील नमुद केलेल्या बाबी व तरतुदी यांचे सविस्तर विवेचन केले.कोणत्याही बाबीचे जागतिकस्तरावरील पेटेंट मिळण्यासाठी त्या बाबीची लेखी स्वरुपातील स्थानिक माहिती व पुरावे कायद्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असून ग्राम पंचायत स्तरावरुन सदर माहितीचे योग्य प्रकारेसंकलन करुन नोंदवही ठेवणे आवश्यक आहे. सदरच्या नोंदवही मध्ये नोंदी करणेसाठी स्वयंसेवी संस्थाअथवा शैक्षणिकसंस्था तसेच सदर बाबतीत आवड असणाऱ्या व्यक्तींची निवड ग्राम स्तरावरुन करणे आवश्यक आहे. दिनांक 05 जून 1992 रोजी रिओ-दी-जानेरो येथे जैव विविधतेबददल जागतिक स्तरावरील परिषद झाली असून सदर संयुक्त राष्ट्र संघाच्या करारावर स्वाक्षरी झालेला भारतएक घटक देश आहे. सदर कायद्यांतर्गत भंग केल्यास त्यामध्ये शिक्षेची तरतुद करणेत आलेली आहे.

श्री. विवेक डावरे, वरिष्ठ संशोधक, समंत्रक तथा प्रभारी अधिकारी महाराष्ट्र  राज्य जैवविविधता मंडळ यांनी जैव विविधतेचा कायदा व त्या अंतर्गतस्थानिक स्वराज्य संस्थेमधील ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावरील समित्यांबाबत सविस्तर विवेचन केले. ग्राम स्तरावर जैव विविधतेच्या नोंदी करणेसाठी आवश्यक ती कार्यवाही करणेचे आवाहन केले. ग्राम स्तरावरील जैव विविधतेच्या नोंदी बाबत गोपनीयता ठेवणे आवश्यक असलेचे नमुद केले.

मा. डॉ. विनोद सिंपले, प्राध्यापक,वनस्पतीशास्त्र विभाग,न्यु कॉलेज कोल्हापूर यांनी बायो डायव्हरसीटी अंतर्गत जगामध्ये असणाऱ्या संवेदनशील भागाच्याअंतर्गत भारतामध्ये एकुण 4 संवेदनशील भागाचा/क्षेत्राचासमावेश आहे. बायो डायव्हरसिटी अंतर्गत निसर्गातील सर्व घटकांचा योग्य तो समतोल राहणे व तो टिकविणेसाठी आपणसर्वांनी प्रयत्न करणेआवश्यक असलेचे नमुद केले.

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी जैविक विविधताव्यवस्थापन समितीच्या आजच्या बैठकीमध्ये मान्यवरांनी अत्यंत मोजक्या व अचुक शब्दांमध्ये सदर विषयाची मांडणी करुन सर्वांना माहिती दिलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे व महाराष्ट्र जैविक विविधता नियम 2008 अंतर्गत पंचायतराज व्यवस्थेतील ग्राम पंचायत स्तरावर सदरच्या समित्यांची स्थापना झालेली आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरुन या बाबत शासन मार्गदर्शक सुचनेप्रमाणे पुढील आवश्यक ती कार्यवाही करणेत येत आहे.

सदर जैविक विविधता व्यवस्थापन समितीच्यासभेचे आयोजन ग्राम पंचायत विभागकडून करणेत आले. सदरच्या सभेचे प्रस्तावना व थोडक्यात माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत) यांनी दिली. सदर बैठकीस मान्यवर जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेडील विविध विभागांचे खातेप्रमुख, इतर संबंधित विभागाचे निमंत्रक, सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी आपले मनोगत व आभार प्रदर्शन मानून मान्यवरांच्या परवानगीने सभा संपलेचे सांगितले.

 

उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं)

जिल्हा परिषद कोल्हापूर

RTE २५ % विद्यार्थीप्रवेशप्रक्रिया 2018-19 अंतर्गतप्रवेशफेरीसमुदतवाढ

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये (वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देणेसाठी जागा राखून ठेवण्याची रीत) नियम 2012 प्रमाणे अल्पसंख्यांक शाळा वगळता, राज्यातील सर्व विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यता तत्त्वावरील प्राथमिक शाळांना सन 2012-13 या शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 % पर्यंतच्या जागा नजीकच्या परिसरातील वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. त्यानुसार सन 2018-19 या शैक्षणिक वर्षामधील 25% आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या student.maharashtra.gov.in या लिंकवरील RTE Portal वर ऑनलाईन चालू झालेली आहे.

सदर प्रक्रियेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 2880 ऑनलाईन अर्ज प्राप्तझाले आहेत. ऑनलाईन प्रणालीद्वारे पहिल्या फेरीतील RTE 25 % विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र 599 विद्यार्थ्यांची यादी निश्चित होऊन RTE च्या लिंकवर अपलोड करणेत आली आहे. तसेच सर्व पात्र 599 विद्यार्थ्यांना प्रवेश घेणेसाठी शाळेच्या नावासह SMS ऑनलाईन प्रणालीद्वारे परस्पर पाठविणेत आले आहेत. SMS प्राप्त झालेल्या पालकांनी संबंधित शाळेत मूळ कागदपत्रांसह जाऊन पाल्याचा प्रवेश निश्चित करावयाचा आहे. त्यानुसार आज दिनांक 10/04/2018 पर्यंत एकूण 425 विद्यार्थ्यांनी RTE च्या 25 % आरक्षितकोट्यामध्ये प्रवेश घेतलेला आहे. 106 विद्यार्थ्याचे अर्ज कागदपत्रांच्या त्रुटींमुळे अपात्र ठरविणेत आलेले असून अद्याप 68 अर्ज प्रलंबित आहेत. पहिल्या फेरीतील शाळा प्रवेशाची अंतिम तारीख पूर्वीच्या वेळापत्रकानुसार 10/04/2018 होती. मात्र शासनाच्या निर्देशांनुसार व पालकांच्या आग्रहास्तव प्रलंबित अर्जांचे प्रवेश निश्चित करणेसाठी दि. 13/04/2018 इ. रोजीपर्यंत शाळा प्रवेशाची मुदत वाढविणेत येत आहे. तरी दिलेल्या मुदतीत पालकांनी संबंधित शाळेत मूळ कागदपत्रांसह जाऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.

(श्री.सुभाष रा.चौगुले)

 शिक्षणाधिकारी(प्राथमिक)

 जिल्हा परिषद कोल्हापूर