बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये (वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देणेसाठी जागा राखून ठेवण्याची रीत) नियम 2012 प्रमाणे अल्पसंख्यांक शाळा वगळता, राज्यातील सर्व विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यता तत्त्वावरील प्राथमिक शाळांना सन 2012-13 या शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 % पर्यंतच्या जागा नजीकच्या परिसरातील वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. त्यानुसार सन 2018-19 या शैक्षणिक वर्षामधील 25% आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या student.maharashtra.gov.in या लिंकवरील RTE Portal वर ऑनलाईन चालू झालेली आहे व विद्यार्थी प्रवेशाच्या दोन फे-या पूर्ण झालेल्या आहेत.
शासनाने दि. 17/05/2018 इ. रोजीसुधारित शासन निर्णय जारी करून आरटीई अंतर्गत २५ % आरक्षित जागांसाठीच्या प्रवेशपात्र सामाजिक वंचित घटकांमध्ये अनु.जाती, अनु.जमाती व दिव्यांग बालकांव्यतिरिक्त वि.आ.(अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड), इतर मागास वर्ग (OBC), विशेष मागास प्रवर्ग (SBC), तसेच एच.आय.व्ही. बाधित / एच.आय.व्ही. प्रभावित बालकांचाही समावेश केलेला आहे. सदर शासन निर्णयास अनुसरून दि. 29/05/2018 ते दि. 07/06/2018 या कालावधीत इच्छुक पालकांकडून विद्यार्थी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारणेत आले. या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 179 ऑनलाईन अर्ज प्राप्तझाले आहेत.
पालकांकडून ऑनलाईन अर्ज स्विकारणेची अंतिम मुदत दि. 07/06/2018 होती. मात्र पालकांच्या आग्रहास्तव ऑनलाईन अर्ज करणेची अंतिम मुदत दि. 12/06/2018 इ. रोजीपर्यंत वाढविणेत येत आहे. तरी दिलेल्या मुदतीत इच्छुक पालकांनी वर नमूद केलेल्या लिंकवर ऑनलाईन अर्ज करावेत असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.
(श्री.सुभाषरा.चौगुले)
शिक्षणाधिकारी(प्राथमिक)
जिल्हापरिषदकोल्हापूर