LATEST NEWS
NEWS
“गुरुवार डास सहांरक दिन ” जिल्हा परिषद मुख्य इमारती मध्ये साजरा करणेत आला.
डंख छोटा धोका मोठा (Small Bite Big Threat)
“गुरुवार डास सहांरक दिन ” जिल्हा परिषद मुख्य इमारती मध्ये साजरा करणेत आला.
आज दिनांक 28/06/2018 रोजी जिल्हा परिषद कोल्हापूर मुख्य इमारती मध्ये “गुरुवार डास सहांरक दिन ” साजरा करणेत आला त्याकरिता मा.डॉ.कुणाल खेमनार मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.योगेश साळे जिल्हा आरोग्य अधिकारी, इजि.बुरुड कार्यकारी अभियंता बांधकाम, डॉ.सुहास कोरे अति.जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.फारुख देसाई जिल्हा आर.सी.एच. अधिकारी, श्री.एम.एम.पाटील विस्तार अधिकारी आरोग्य तसेच आरोग्य विभागा कडील सर्व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषद कोल्हापूर मुख्य इमारतीचा परिसर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली सर्व पाणी साठयाचे सर्व्हेक्षण करण्यात आले, पाणी साठयामध्ये गप्पी फिश टाकणेची कार्यवाही करणेत आली, खडडे असणा-या जागी खडडे मुझवणे कार्यवाही करणेत आली, साचलेल्या पाण्यामध्ये व उघडया टाक्यामध्ये टेमिफॉस टाकणेत आले, मुख्य इमारतीच्या सर्व खोल्यामध्ये धुरफवारणी करणेत आली, उघडयावरील टायरी नष्ट करण्यात आली, अडगळीचा कचरा साफ करण्याची कार्यवाही करणेत आली. जिल्हा परिषद मध्ये सर्व परिसरा मध्ये डास सहांरक मोहिम राबविण्यात आली असुन जिल्हयातील सर्व गांवामध्ये गुरुवार हा डास सहांरक दिन” साजरा करणे बाबत सुचना देणेत आलेल्या आहेत तसेच जिल्हयामध्ये तालुकास्तरीय कार्यशाळाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याचे वेळापत्रक खालील प्रमाणे.
उद्यापासुन तालुकास्तरावरील कार्यशाळा
अ.क्रं. | तालुका | कार्यशाळा दिनांक | वेळ | अ.क्रं. | तालुका | कार्यशाळा दिनांक | वेळ |
4 | 2 | ||||||
1 | करवीर | 05/07/2018 | सकाळी 10 | 7 | राधानगरी | 02/07/2018 | सकाळी 10 |
2 | पन्हाळा | 05/07/2018 | दुपारी 1.30 | 8 | भुदरगड | 02/07/2018 | दुपारी 1.30 |
3 | शाहुवाडी | 05/07/2018 | सांय 4.00 | 9 | गगन बावडा | 02/07/2018 | सांय 4.00 |
1 | 3 | ||||||
4 | शिरोळ | 29/06/2018 | सकाळी 10 | 10 | गडहिग्लज | 03/07/2018 | सकाळी 10 |
5 | हातकणंगले | 29/06/2018 | दुपारी 1.30 | 11 | आजरा | 03/07/2018 | दुपारी 1.30 |
6 | कागल | 29/06/2018 | सांय 4.00 | 12 | चंदगड | 03/07/2018 | सांय 4.00 |
दिनांक 26/06/2018 इ.रोजी लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांची 144 वी जयंती साजरी.
धर्मभेद,जातीभेद, अस्पृश्यता आणि निरक्षरता यांच्या विरोधात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेला लढा ऐतिहासिक असून कोल्हापूर नगरीला या राजाच्या कार्यकतृत्वाचा वसा आणि वारसा लाभला हे कोल्हापूर जिल्हयांचे भाग्य आहे. असे उद्गगार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शौमिका महाडिक यांनी लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती यांच्या 144 व्या जयंती निमित्त्य कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये आयोजित कार्यक्रमांत काढले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी राजर्षी शाहूनी स्त्री शिक्षण,बहुजन समाजाचे शिक्षण,कृषी, व्यापार जलसंधारण या क्षेत्रात दुरदृष्टीने घेतलेल्या निर्णयाची माहिती सभागृहाला विषद केली . या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. इंद्रजित देशमुख यांनी राजर्षी शाहूचे कार्य आणि त्याच्या जीवनातील विविध प्रसंग सांगून सभागृहाला मंत्रमुग्ध् केले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस जिल्हा परिषेदेचे अध्यक्ष मा.सौ.शौमिका महाडिक यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करणेत आला. या प्रसंगी समाजकल्याण सभापती मा.श्री. विशांत महापूरे, , उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) श्री.रविकांत आडसुळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं) श्री.राजेंद्र भालेराव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. संजय राजमाने, प्रकल्प संचालक,जिग्रावियं श्रीम.सुषमा देसाई, कार्यकारी अभियंता (बांधकाम) श्री.तुषार बुरुड, जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री.चंद्रकांत सूर्यवंशी, पशुसंवर्धन अधिकारी श्री.एस.एच.शिंदे, यांच्यासह व सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.
यावेळी प्रा.संजय लोंढे यांनी मान्यवरांचे स्वागत व आभार व्यक्त केले. तसेच कुमारी अपेक्षा सकटे या इ.2 री च्या बालिकेने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विषयी अप्रतिम मनोगत व्यक्त केले. याप्रंसगी अधिकारी, कर्मचारी संघटना प्रतिनिधी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी सर्व जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने रक्तदान,रांगोळी व विद्युत रोषणाई केल्यामुळे कार्यक्रमांला महोत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले होते.
(रविकांत आडसुळ)
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)
जिल्हा परिषद, कोल्हापूर
प्लॅस्टिक बंदी जिल्हास्तरीय कार्यशाळा
प्लॅस्टिक बंदी अंमलबजावणीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी कटीबध्द रहावे : नंदकिशोर गांधी
(जिल्हा स्तरीय प्लॅस्टिक बंदी अधिसूचना अंमलबजावणी कार्यशाळा संपन्न)
कोल्हापूर : दि. 21.06.2018
प्लॅस्टिक बंदीबाबत ग्रामीण भागात जनजागृतीसोबतच अधिसूचनेतील नियमांची काटेकोर अंमजबजावणी करणे आवश्यक असल्याचे मत पर्यावरण तज्ञ नंदकिशोर गांधी यानी जिल्हा परिषद कार्यशाळेत व्यक्त केले. लोककला केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे झालेल्या प्लॅस्टिक व थर्माकोल बंदी कार्यशाळेत ते बोलत होते.
या कार्यशाळेसाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा. सौ. शौमिका महाडीक, अर्थ व शिक्षण समिती सभापती मा. श्री. अंबरिश घाटगे, पुणे विभागाचे उपायुक्त (विकास) मा. श्री. चंद्रकांत गुडेवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. डॉ. कुणाल खेमनार, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. इंद्रजित देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. रविकांत अडसूळ, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य मा. श्रीम. सुषमा देसाई आदी उपस्थित होते.
मागील 15 वर्षापासून महाराष्ट्रात विविध योजनांव्दारे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या विषयावर काम सुरू आहे. शहरी व ग्रामीण भागातही प्लॅस्टिक वापर मोठया प्रमाणात वाढल्याने 23 मार्च, 2018 रोजी महाराष्ट्र शासनाने अधिसूचना काढून महाराष्ट्रात प्लॅस्टिक व थर्माकोलवर बंदी घातली. या अधिसूचनेबाबत लोकांना माहिती व्हावी तसेच अंमलबजावणी यंत्रणेला अधिसूचनेच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शन करणेसाठी जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत सर्व तालुकयांचे गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि ग्राम पंचायतींचे ग्रामसेवक अशा एक हजार प्रशिक्षणार्थींची कार्यशाळा घेणेत आली.
या वेळी गांधी यांनी प्लॅस्टिक वापराबाबत कायदे-नियम, त्याचे तोटे, पर्यावरणावरील दुष्परिणाम, प्लॅस्टिकला पर्याय या विषयांवर मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले आज वस्तूंच्या वेष्टनापासून ते अगदी हृदयाच्या कृत्रिम झडपांपर्यंत प्लॅस्टिकचा वापर होत आहे. पण तरीही मुळ वैज्ञानिक दृष्टीकोन जपून पर्यावरणाला धक्का पोहोचणार नाही या पध्दतीने प्लॅस्टिकचा वापर केला पाहीजे. त्यामुळे प्लॅस्टिकपासून पर्यावरणाला, आरोग्याला निर्माण झालेला धोका याबाबतची माहिती सर्वांना द्यावी लागेल आणि यासाठी शासनाच्या प्लॅस्टिकबंदी अधिसूचनेची अंमलबजावणी शंभर टक्के करावी. यानंतर मा. श्री. मिलिंद पैजार यांनी प्लॅस्टिक आणि त्याचा मानवी शरीरावर होणार घातक परिणाम याबाबत उपस्थितांना माहिती दिली. या सादरीकरणा दरम्यान विविध लघुचित्रफिती दाखविण्यात आल्या. तसेच या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले कोल्हापूरचे श्री. सचिन पाटील हे मागील 8 वर्षे ते आपल्या ग्राहकांना प्लॅस्टीक पिशवी न देता व्यवसाय करीत असल्याचे सांगितले व त्यांचे अनुकरण करणेसाठी आवाहन केले.
यावेळी उपायुक्त मा. श्री. चंद्रकांत गुडेवार यांनी प्लॅस्टिक व थर्माकोल बंदी अधिसूचना अंमलबजावणीबाबत माहिती दिली. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी या अधिसूचनेची अंमलबजावणी कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत यशस्वीरित्या केली जाईल याबाबत आश्वासन दिले.
कार्यशाळेसाठी उपस्थित सर्वांना महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेच्या प्रती तसेच नंदकिशोर गांधी यांच्या प्लॅस्टिक या विषयावर आधारित माहिती पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. कार्यशाळेला उपस्थित मान्यवरांचे आभार मा. श्री. राजेंद्र भालेराव, उपमुख्य कार्यकारी आधिकारी (ग्रा.पं.) यांनी व्यक्त केले तर कार्यशाळेचे नियोजन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत करण्यात आले.
जि.प. अधिकारी कर्मचारी यांची तज्ञांमार्फत आरोग्य तपासणी
नाविन्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत जि.प. कोल्हापूर च्या अध्यक्षा मा. सौ. शौमिका अमल महाडिक यांच्या संकपल्पनेतून आणि मा. डॉ कुणाल खेमनार, यांच्या मागदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांची तज्ञांमार्फत तपासणी करण्यात आली. सदरचे तपासणी शिबीरांचे आयोजन जिल्हा परिषद कोल्हापूर व अथायु मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते. या शिबीरांचे उद्घाटन स्व. वसंतराव नाईक समिती सभागृह जि.प. कोल्हापूर येथे धनवंतरी मूर्तीच्या पूजेने करण्यात आले. या प्रसंगी मा. इंद्रजित देशमुख. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., प्रसिध्द हदयरोग तज्ञ डॉ श्रीकांत कोले, डॉ. हरिष जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.ग्रा.वि. यं, श्री. भालेराव , उपमुख्य कार्यकारी अधिकारी , ग्रामपंचायत , डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ सुहास कोरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच अथायु मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटलेचे तज्ञ डॉक्टर डॉ अंगराज सावंत, अस्थिरोग तज्ञ, डॉ. अमित पोरवाल, एम.डी. मेडिसीन, श्री. अकिल शेटटी, मुख्य प्रशासन अधिकारी व स्टाफ उपस्थित होता.
प्रस्ताविकांत बोलतांना डॉ उषादेवी कुंभार म्हणाल्या की, आरोग्य विभागाच्या अथक प्रयत्नातून शिबीर आयोजन झाले आहे. संसर्गजन्य रोगाचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु असांसर्गीक रोगाचे प्रमाण वाढत आहे. जसे हदय रोग, मधुमेह, कॅन्सर , मानसिक आजार इ. असे म्हणाल्या. सर्व अधिकारी कर्मचारी यांनी व्यसनांपासून दूर रहावे असे या प्रसंगी बोलतांना डॉ. हरिष जगताप यांनी भावना व्यक्त केली.
आपल्या मागदर्शनपर व्याख्यानात बोलतांना प्रसिध्द हदयरोग तज्ञ डॉ. श्रीकांत कोले म्हणाले की, हदयरोग , उच्च रक्त दाब, मधुमेह का होतो याचे अदयाप निदान झाले नाही. हदयरोग, अस्थिरोग, इतर असंसर्गजन्य आजारावर अधुनिक तंत्रज्ञानाने उपचार माफक दरामध्ये अथायु मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल मध्ये उपलब्ध आहेत. हे रोग होवू नये या साठी प्रत्येकांनी व्यसनापासून दूर राहणे, तणांवमुक्त जीवनशैली अंगीकरणे तसेच नियमित व्यायाम आवश्यक असे अध्यक्षीय भाषणांत बोलतांना मा. इंद्रजित देशमुख नमुद केले.
शिबीरामध्ये एकुण 300 अधिकारी, कर्मचारी यांनी तपासणी करण्यात आली. यामध्ये हिमोग्लोबीन तपासणी -300 रक्तातील साखरेचे प्रमाण – 300 इसीजी- 170 यापैकी संदर्भ सेवा एकुण 90 रुग्णांना देण्यात आली असून मध्ये 2 डी इको, मधुमेह 46, टीएमटी-02, एक्स रे 05, प्रयोगशाळा तपासणी 37, सोनोग्राफी03 रुग्ण आहेत. शिबीर यशस्वी करणे साठी डॉ सुहास कोरे, डॉ स्मिता खंदारे, श्री. पाटील, श्री भंडारी यांनी परिश्रम घेतले तर अथायु हॉस्पीटलच्या वतीने श्री. अनिरुध्द सुतार, श्री प्रकाश पाटील, सुरेखा जाधव, दिपाली जगताप यांनी परिश्रम घेतले
जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा परिषद, कोल्हापूर
बोगस डॉक्टरवर धडक कारवाई
आज दिनांक 7 जून 2018 हालोंडी ता. हांतकणगले येथे बोगस डॉक्टर श्री. भरत जिनगोंडा पाटील वय 45 वर्षे यांचे वर महाराष्ट्र वैदयकिय व्यवसाय अधिनियम 1961 च्या कलम 32 (2) व 33-अ या कलमाखाली पुलाची शिरोली येथील पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्ह यात बोगस डॉक्टरांनी तात्काळ अवैद्यरित्या खाजगी वैद्यकिय व्यवसाय बंद करावा अन्यथा गंभीर दखल घेवून गुन्हे दाखल करण्यात येईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कुणाल खेमणार यांनी नमुद केले.
तालुकास्तरीय बोगस डॉक्टर शोध समिती हांतकणगले कडे बोगस डॉक्टर श्री भरत जिनगोंडा पाटील ही व्यक्त्ति हालोंडी या ठिकाणी अवैद्यरित्या कोणतीही वैद्यकीय पदवी नसतांना जनतेमध्ये हमखास मुलगा होण्याची खात्री देवून औषधे देत होता. तसेच अपत्यहीन जोडप्यांना अपत्य होण्यासाठी औषध उपचार करीत असल्याची तक्रार महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती ने केली होती . सदर तक्रारीचे गंभीर दखल घेवून बोगस डॉक्टर वर त्वरीत कारवाई करणेच्या सूचना मा. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कुणाल खेमणार यांनी सूचना दिल्या. त्यानुसार डॉ उषादेवी कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली तालुकास्तरी बोगस डॉक्टर शोध समिती हांतकणंगले व पोलीस स्टेशन पु. शिरोली मार्फत डमी रुण्ग पाठवून सापळा रचून रंगेहांत पकडण्यात आले. पकडण्यात आलेल्या बोगस डॉक्टर कडे बोगस नॅचरोपॅथीचे प्रमाणपत्र तसेच कामोउत्तेजक, शक्तीवर्धक आयुवेर्दिक औषधांचा अवैद्यरित्या मोठा साठा सापडला, त्याचप्रमाणे कामोउत्तेजक पोस्टर्सही सापडले, मुलागाच होणार अन्यथा पैसे परत अशा अशयाचा डिजीटल बोर्ड जोगोजागी लावण्यात आले होते.
सदर कारवाई मध्ये डॉ सुहास कोरे, तालुका आरोग्य अधिकारी, पं.स. हांतकणगंले, श्री परशुराम कांबळे, सहाय्यक पोलिस निरीक्षण, डॉ सोनवणे डी.एस. जिल्हा आयुष अधिकारी, डॉ जेसिका ॲन्ड्रयुज वै.अ. पु. शिरोली, संगीता जगताप, महिला पोलिस , तसेच अंधश्रध्दा निर्मुलन समिती, डॉ उषादेवी कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. देसाई एफ.ए. जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी सहभागी होते.