दिनांक  15/11/2018 इ. बिरसा मुंडा यांची जयंती  साजरी केलेबाबत

क्रांतीकारक  बिरसा मुंडा यांची जयंती जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे दि. 15/11/2018 रोजी सकाळी ठिक 11-00 वाजता साजरी करणेत आली. त्या प्रसंगी  मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व मा. अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रवि शिवदास यांचे हस्ते फोटो पूजन करणेत आले.  मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या बद्दल माहिती सांगुन संघटित सामर्थ्यातून समाज विकास साध्य करण्याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.)  रविकांत आडसुळ, उप मुख्य  कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) राजेंद्र भालेराव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पा.व.स्व.) प्रियादर्शनी मोरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.क.) सोमनाथ रसाळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. संजय राजमाने, कार्यकारी अभियंता (बांधकाम) तुषार बुरुड,  कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पू.) एम.एस. बसर्गेकर, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, यांच्यासह  सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.

यावेळी श्री. बी.पी.माळवे  सहाय्यक शिक्षक यांनी सुत्रसंचलन केले. यावेळी मोठया संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कृपया वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिध्द करणेकामी कार्यवाही करणेत यावी, ही विनंती.

सही/-

(रविकांत आडसुळ)

उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)

                                                                          जिल्हा परिषद, कोल्हापूर

रुई येथे नमामी पंचगंगे उपक्रम अंतर्गत पंचगंगा नदी घाट व परिसर स्वच्छता करताना

रुई येथे नमामी पंचगंगे उपक्रम अंतर्गत पंचगंगा नदी घाट व परिसर स्वच्छता करताना जि.प.अध्यक्ष मा.शौमिका महाडिक मॕडम पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मा.मोरे मॕडम , गट विकास अधिकारी मा. धरणगुत्तीकर साहेब ,सरपंच , ग्रा.प.सदस्य सर्व , सर्व ग्रामसेवक , ग्रामविकास अधिकारी , NSS चे विद्यार्थी , शालेय विद्यार्थी , शिक्षक , अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ इ.

‘ नमामि पंचगंगे’ उपक्रमाअंतर्गत नदी प्रदूषण मुक्ती कार्यक्रम शिरदवाड ता.शिरोळ येथे नदी काठी श्रमदान मोहीम व वृक्षारोपण करण्यात आले.

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शौमिका अमल महाडिक(वहिनी) यांनी हाती घेतलेल्या ‘ नमामि पंचगंगे’ उपक्रमाअंतर्गत नदी प्रदूषण मुक्ती कार्यक्रम शिरदवाड ता.शिरोळ येथे नदी काठी श्रमदान मोहीम व वृक्षारोपण करण्यात आले.या उपक्रमात मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अमन मित्तलसो,जि.प.पक्षप्रतोद मा.श्री विजय भोजे, मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पाणी व स्वच्छता) सौ.प्रियदर्शिनी मोरे ,गटविकास अधिकारी श्री.जाधव ,सरपंच,सर्व ग्रा. पं.सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दि 15 ऑक्टोबर 2018 जागतिक हात धुवा दिवस कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळा अंगणवाडीत उत्साहात साजरा करण्यात आला.

आज दि 15 ऑक्टोबर 2018 जागतिक हात धुवा दिवस कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळा अंगणवाडीत उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा मध्ये परिपाठाच्या वेळी सर्व विध्यार्थ्यांना हात धुण्याच्या सवयीचे महत्त्व, योग्य पद्धत, त्याचे फायदे बाबत मार्गदर्शन करण्यात आले.तसेच हात धुण्याच्या योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.हात धुण्याच्या या उपक्रमाच्या पुढील टप्प्यात दुपारी माद्यान्न भोजना वेळी कृती करून घेण्यात आली यामुळे विध्यार्थ्यांना शालेय जीवनात स्वच्छतेचे संस्कार होण्यास मदत झाली.

ग्रामपंचायत आंबेवाडी येथे नमामि पंचगंगा अंतर्गत श्रमदानातून स्वच्छता मोहीम

ग्रामपंचायत आंबेवाडी येथे नमामि पंचगंगा अंतर्गत श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.यावेळी मा.मु.का.अ.अमन मित्तल साहेब,मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी मोरे मडम ,मा.जि.प.सदस्या कोमल मिसाळ मडम,मा.सभापती राजेंद्र सुर्यवंशी साहेब,गट विकास अधिकारी घाडगे साहेब, प.स.सदस्य इंद्रजित पाटील विस्तार अधिकारी, सरपंच, सदस्य, ग्रामसेवक,ग्रामस्थ,Brc,wqc उपस्थित होते

 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान मध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात प्रथम

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान मध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात प्रथम 

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शौमिका अमल महाडिक(वहिनी) यांनी हाती घेतलेल्या ‘ नमामि पंचगंगे’ उपक्रमाअंतर्गत नदी प्रदूषण मुक्ती कार्यक्रम शिरदवाड ता.शिरोळ येथे

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शौमिका अमल महाडिक(वहिनी) यांनी हाती घेतलेल्या ‘ नमामि पंचगंगे’ उपक्रमाअंतर्गत नदी प्रदूषण मुक्ती कार्यक्रम शिरदवाड ता.शिरोळ येथे नदी काठी श्रमदान मोहीम व वृक्षारोपण करण्यात आले.या उपक्रमात मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अमन मित्तलसो,जि.प.पक्षप्रतोद मा.श्री विजय भोजे, मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पाणी व स्वच्छता) सौ.प्रियदर्शिनी मोरे ,गटविकास अधिकारी श्री.जाधव ,सरपंच,सर्व ग्रा. पं.सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनअंतर्गत जिल्हा परिषद कोल्हापूर येथे नियोजन सभा

 

घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनअंतर्गत जिल्हा परिषद कोल्हापूर येथे नियोजन सभा

(या क्षेत्रामध्ये काम केलेल्या संस्था/व्यक्ती यांनी उपस्थित राहावे : अमन मित्तल, मु.का.अ, जिल्हा परिषद, कोल्हापूर)

कोल्हापूर :  दि. 08.10.2018.

 

कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत पाणी व स्वच्छता विभागामार्फत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले आहेत. या कामांना गती मिळावी तसेच या कामांमध्ये अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करता येईल या हेतूने  मा. श्री. अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीसाठी या घकचरा व सांडपाणी व्यवस्थापनांतर्गत काम केलेल्या व्यक्ती अथवा संस्था यांनी या बैठकीसाठी आपल्याकडील तंत्रज्ञानाच्या सादरीकरणासह उपस्थित राहून मार्गदर्शन करणेबाबत आवाहन करण्यात आले आहे. तसेच या संदर्भात काही नवीन कल्पना व इतर सूचना असल्यास त्या ही मांडण्याची सर्वांना सदर बैठकीत मुभा आहे. जेणेकरून या कामाचा लाभ ग्रामीण भागातील घनकच-याचे व सांडपाण्याचे व्यवस्थापन  करणेस होईल. दि. 12.10.2018 रोजी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालनात सायंकाळी 4.30 मिनिटांनी बैठक संपन्न होणार असून या बैठकीस मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. मुख्य लेखा व वित्त अधिकारी तसेच मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा. व स्व.) , जि. प. कोल्हापूर उपस्थित राहणार आहेत.

 

(प्रियदर्शिनी चं.मोरे)

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (पा. व स्व.)

जिल्हा परिषद, कोल्हापूर