पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी श्रमदान मोहिम हातकणंगले मधील ग्रा.प. शिरोली येथे अध्यक्ष, जि. प. कोल्हापूर  यांचे श्रमदान

स्वच्छता ही सेवा’ व  नमामि पंचगंगे  उपक्रमांतर्गत पंचगंगा नदी प्रदूषण मुक्ती करीता करवीर, शिरोळ आणि हातकणंगले या तालुक्यातील  गावांमध्ये जनजागृती उपक्रम आणि श्रमदानाचे उपक्रम हाती घेतले आहेत. यापैकी आज रोजी हातकणंगले तालुक्यातील ग्राम पंचायत शिरोली पु. व तिळवणी ü या गावांमध्ये आज प्रत्यक्ष श्रमदानास सुरूवात करण्यात आली आहे. यामध्ये विविध श्रमदान आधारित उपक्रम काम हाती घेण्यात आले असून मा. सौ. शौमिका महाडीक अध्यक्ष, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी ग्राम पंचायत शिरोली पु. येथे स्वत: उपस्थित राहून  श्रमदान केले.

या उपक्रमांतर्गत सर्वप्रथम ग्राम पंचायत शिरोली पु. येथे मा.अध्यक्ष, जि. प. कोल्हापूर व उपस्थितांकडून नदीकाठचा परिसर स्वच्छ करण्यात आला. यानंतर सांडपाणी वाहून नेणा-या ओढयावर बंधारा घालण्यात आला.

या श्रमदानासाठी मा. सौ. शौमिका महाडीक अध्यक्ष, जिल्हा परिषद, कोल्हापूर, मा.श्रीम. प्रियदर्शिनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (पा.व स्व.), जि.प.कोल्हापूर, मा.डॉ. सोनाली पाटील, पं.स. सदस्य, मा.श्री.उत्तम सावंत, पं.स. सदस्य, हातकणंगले, मा.श्री. अरविंद धरणगुत्तीकर, गट विकास अधिकारी, पं. स. हातकणंगले, मा.श्री. शशिकांत खवरे, सरपंच, ग्रा. पं. शिरोली पु. यांनी उपस्थित राहून श्रमदान केले.

यानंतर ग्राम पंचायत तिळवणी येथे देखील श्रमदान मोहिम राबविण्यात आली. यावेळी नदी काठच्या परिसराची स्वच्छता करून तेथे वृक्षारोपणाचे काम करण्यात आले.या दोन ही गावांमध्ये ग्राम पंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, आशा स्वयंसेविका, बचतगट प्रतिनिधी, ग्राम पंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

सोबत – उपक्रमाचे निवडक छायाचित्र.

(प्रियदर्शिनी चं.मोरे)

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (पा. व स्व.)

जिल्हा परिषद, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या मालमत्तांचे ‘ऑडिट’

जिल्हा परिषदेच्या जिल्हाभर मालमत्ता आहेत. शाळेच्या इमारती, आरोग्य केंद्रे, पशुसंवर्धन दवाखाने, पाणी पुरवठा योजनांच्या इमारती व जागांचा समावेश आहे. पण नेमक्या किती मिळकती आहेत, एकूण जागा यासंबंधीची अधिकृत माहिती प्रशासनाकडे नाही. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने, जिल्हा परिषदेच्या मिळकती, मालमत्तांच्या माहिती संकलनास सुरूवात केली आहे. १७ ऑक्टोबरपर्यंत माहिती संकलनाचे काम पूर्ण करण्याचे आदेश आहेत.

जिल्हा परिषदेने या कामासाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समितीची स्थापना केली आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारीपासून गटविकास अधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांपर्यंत जबाबदारी निश्चित केली आहे. तालुक्याचे नाव, मिळकतीचे ठिकाण, गट नंबर, जागेचे क्षेत्र, बांधकाम, मोकळया जागा, मालमत्तेची किंमत, जागा भाडेतत्वावर दिली आहे का, जागेच्या मालकीविषयीची नोंद अशा एकूण २२ प्रकारची माहिती संकलित करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारती व जागांची एकत्रित माहिती संकलित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने माहिती संकलनाच्या कामाला सुरुवात केली आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या अखत्यारित प्राथमिक शाळांच्या इमारती, पशुसंवर्धन दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राच्या इमारती, लघुपाटबंधारे विभागांतर्गत बंधारे, कृषी विभागाच्या जमिनी व इमारती, अंगणवाडी इमारती, पाणी पुरवठा योजना आदींचा समावेश आहे. मात्र काही ठिकाणी अतिक्रमण झाल्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी जागेच्या मालकी हक्काबाबतचे वाद निर्माण होत आहेत.

माहिती मिळणार ऑनलाइन

जिल्हा परिषदेच्या सर्व मिळकती, जागा, कार्यालये या संदर्भातील गावनिहाय माहिती संकलित होणार आहे. जिल्हा परिषदेशी संबंधित माहिती ऑनलाइनवर उपलब्ध करण्यात येणार आहे. प्रत्येक विभागासाठी कार्यरत इमारती, वस्तुस्थिती समजणार आहे. महत्वाचे म्हणजे, प्रशासन मिळकतींची माहिती गोळा करताना कुठे कुठे अतिक्रमण झाले हे तपासणार आहे. आणि ते अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. उत्पन्नाचे नवे स्रोत तपासले जात आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक जागा, इमारती यापूर्वी भाडेतत्वावर दिल्या आहेत. भाडेकराराचे नूतनीकरण झालेले नाही. या मिळकती, भाडेतत्वावरील इमारतींची नेमकी माहिती उपलब्ध होताच नियमावली तपासून भाडेकरारात सुधारणा करता येईल. विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी योग्य जागांची माहिती उपलब्ध होईल.

– शौमिका महाडिक, अध्यक्षा, जिल्हा परिषद

स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेत ‘श्रमदानातून परिसर स्वच्छता मोहीम

स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेत ‘श्रमदानातून परिसर स्वच्छता मोहीम

कोल्हापूर: 24.09.2018

 

महात्मा गांधीजींच्या 150 वी जयंती निमित्त  दि. 15 सप्टेंबर, ते 2 ऑक्टोबर, 2018 या कालावधीमध्ये स्वच्छता हि सेवा अभियान राबविले जात आहे. या अभियान अंतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये कार्यालय परिसर स्वच्छता मोहिम राबविणेत आली. यामध्ये जिल्हा परिषदेच्या संपूर्ण परिसराची अधिकारी आणि कर्मचा-यांनी स्वच्छता केली. मा.अध्यक्ष, जिल्हा परिषद कोल्हापूर आणि मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली ही परिसर स्वच्छतेची मोहिम राबविणेत आली.

पाणी व स्वच्छता विभागामार्फत आयोजित या मोहिमेमध्ये श्रमदानासाठी सर्व खातेप्रमुख आपल्या विभागातील कर्मचा-यांसह उपस्थित होते. स्वच्छता श्रमदानासाठी  सर्व विभागांना जिल्हा परिषद, परिसराचे वाटप करण्यात आले होते. त्याप्रमाणे आज सकाळी ठिक 9.00 वाजता या स्वच्छता श्रमदानास सुरूवात

झाली.

स्वच्छता श्रमदानासाठी बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी स्वच्छता साहित्याचा पुरवठा केला. या स्वच्छता श्रमदानातून 4 डंपर कचरा संकलित करण्यात आलेला आहे. तर या स्वच्छता श्रमदानासाठी सर्व विभागांचे 123 कर्मचारी उपस्थित होते.

या स्वच्छता श्रमदानासाठी उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे मा. श्री.अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. कोल्हापूर यांनी अभिनंदन केले. तसेच यापुढे परिसर स्वच्छतेमध्ये सातत्य रहावे यासाठी दर मंगळवारी सकाळी 9.00 वा. याचं पध्दतीने परिसर स्वच्छतेसाठी श्रमदानासाठी उपस्थित राहणेबाबत सर्वांना सूचना दिल्या आहेत.

(प्रियदर्शिनी चं.मोरे)

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (पा. व स्व.)

जिल्हा परिषद, कोल्हापूर

*श्रमदानाने साकारली कचऱ्याच्या ठिकाणी फुलबाग*

*श्रमदानाने साकारली कचऱ्याच्या ठिकाणी फुलबाग*

*स्वच्छता ही सेवा* आणि *नमामी पंचगंगे उपक्रमा अंतर्गत पंचगंगा प्रदूषण मुक्ती* या कार्यक्रमा अंतर्गत मौजे शिरढोण ता.शिरोळ, जि. कोल्हापूर येथे दि 22/9/2018 रोजी श्रमदानाच्या माध्यमातून
गावातील सार्वजनिक शौचालय जवळील जागा स्वच्छता करून तेथे फुलाच्या रोपांची लागवड करण्यात आली व त्यामाध्यमातून अस्वच्छ जागांचे उच्चाटन करण्यात आले तसेच या रोपांना तात्काळ कुंपण करून घेण्यात आले व सांगोपनाची जबाबदारी स्थानिक तरुण मंडळांनी स्वीकारली.

सांडपाणी व्यवस्थापनासाठी गटारीच्या पाण्यावर कर्दळी लागवड करण्यात आली.

याचवेळी एस टी स्टँड परिसराची स्वछताही करण्यात आली.

सदर श्रमदानामध्ये *मा श्री अमन मित्तल मुख्य कार्यकारी अधिकारी, जि प कोल्हापूर प्रियदर्शिनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी स्वच्छता, सौ.अर्चना चौगुले, सभापती , प स शिरोळ, सौ.बिलकश मुजावर सरपंच शिरढोण ,श्री विजय जाधव, गट विकास अधिकारी, प स शिरोळ, श्री. विजय परीट, सहा. गविअ प स शिरोळ, गुंडाप्पा खोत उपसरपंच,श्री विकास कांबळे (माजी जि.प.सदस्य ) श्री चद्रकांत मोरे (सर), सर्व ग्राप सदस्य, श्री रेळेकर, ग्रामसेवक शिरढोण , तरुण मंडळ पदाधिकारी, व ग्रामस्थ तसेच पस शिरोळ कडील sbm कक्षाकडील सर्व कर्मचारी* यांनी आपले बहुमूल्य योगदान दिले .
🙏🙏🙏🙏🙏🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

 

 

 

माझी शाळा समृद्ध शाळा आभियान

जिल्हा परिषद कोल्हापूर,शिक्षण विभाग अंतर्गत
डॉ जे पी नाईक “माझी शाळा समृद्ध शाळा आभियान” अंतर्गत

दिनांक 21 सप्टेंबर रोजी गगनबावडा तालूक्यामध्ये राजर्षि शाहू जन्मस्थळापासून ज्ञानज्योत घेऊन व शाहूना अभिवादन करून शाळा शाळात अभियान सूरू केले.
त्या प्रसंगी मा आमदार सतेज पाटील साहेब , मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल सो , उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा शिक्षणाधिकारी रविकांत आडसूळ सो
श्री भगवान पाटील जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते…

 

 

क्षयरोग मुक्त तालुका मोहिम ही  क्षयरोग मुक्त भारत च्या दिशेने आश्वसक पाऊल आहे – सौ. शौमिका महाडिक

क्षयरोग मुक्त तालुका मोहिमे चा पन्हाळा येथे शुभारंभ

नॅशनल स्ट्रॅटेजिक प्लॅन २०१७-२०२५ नुसार आपण क्षयरोग मुक्त भारत च्या दिशेने वाटचाल करत आहोत. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने  २०३५ पर्यंत भारत क्षयमुक्त करण्याचे धोरण आखले आहे. परंतुमा.पंतप्रधानसाहेबानी सन २०२५  मध्ये भारत सरकारने भारत क्षयमुक्त (TB FREE INDIA ) करण्याचा नारा दिला आहे. या धोरणाचा एक भाग म्हणून क्षयरोग मुक्त तालुका ही  मोहीम  राबविली जात आहे . या मोहीमे अंतर्गत पहिल्या टप्यामध्ये कोल्हापूर जिल्हयातील पन्हाळा व गगनबावडा हे दोन तालुके निवडले आहेत.राज्यक्षयरोग विभागाच्या मोहिमेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे दोन तालुके क्षयरोग मुक्त तालुका मोहिमे साठी निवडले  गेले आहेत .त्यानुसार एकूण टी.बी. केस शोधण्याचा दर स्थिर,.थुंकी दूषित पेशंट शोधण्याचे  गुणोत्तर कमी ,टीबी एचआयव्ही सह-संक्रमण दर कमी,बाल रोग टीबी केस शोधण्याचे प्रमाण कमी,भौगोलिक  वातावरण  निरोगी व चांगले , पुरेसे मनुष्यबळ, चांगल्या निदानाची सुविधा हे निकषहे तालुके पूर्ण करतात.पोलीओरोगजसाहद्दपारकेलात्यापद्धतीनेक्षयरोगालाहद्दपारकरूया. पूर्णसमर्पितवृत्तीनेआपल्या कामाच्यामाध्यमातूनदुसर्यालाप्रेरीतकरणेव आदर्श व्यक्ती बनून कामाबद्दल दुसर्यांना आदर्श घालून देणे हि काळाची गरज आहे. क्षयरोग विषयी  संपूर्ण शास्त्रीय माहिती आत्मसात करणे हे आपले आद्य कर्तव्य राहिल असे प्रतिपादन मा. सौ. शौमिका महाडिक  अध्यक्ष्य,  जि. प. कोल्हापूर यांनी यांनी मत मांडले . त्या पन्हाळा येथे पंचायत समिती सभागृहामध्ये क्षयरोग मुक्त तालुका मोहिमेच्या अध्यक्षीय भाषणात  बोलत होत्यात्यांच्या हस्ते  क्षयमुक्त तालुका  मोहिमेचे उदघाटन करण्यातआले. या मोहिमेस जिल्हापरिषद पूर्ण सहकार्य करील अशी ग्वाही त्यांनी दिली.

                          या मोहिमेमध्ये सर्व सामाजिक संस्था ,महिला मंडळेस्थानिक तरुण मंडळेबचत गट यांचा सहभाग आवश्यक आहेत सेच मोहीमे अंतर्गत  सर्व लोकांना प्रतिबंधक उपायांची माहिती द्यावी व व्यापक जनजाग्रुती करावी,असे मत  मा. सर्जेराव पाटील (पेरीडकर) सभापतीआरोग्य व बांधकाम समिती.,  जि. प. कोल्हापूर यांनी मांडलेया धोरणाचा एक भाग म्हणून क्षयरोग मुक्त तालुका (TB FREE BLOCK CAMPAIGN) ही  मोहीम  राबविली जात आहे . या मोहीमे अंतर्गत पहिल्या टप्यामध्ये कोल्हापूर जिल्हयातील पन्हाळा व गगनबावडा हे दोन तालुके निवडले आहेत.यामोहिमेमध्ये  नवीन क्षय रुग्णांची संख्या कमी करणे, लागण झालेल्या जुने  नवीन क्षयरुग्न औषधउपचार देऊन बरेकरणे,क्षयरुगणांचा मृत्यदर कमी करणे  क्षयरोगामुळे  होणारी विकृती कमी करणे, थुंकी दूषित रुगांकडून इतर लोकांना होणारा संसर्गजनजगृती द्वारे कमी करणेखाजगी डॉक्टरकेमिस्टांचा सहभाग वाढिवणे,  हा मुख्य उद्देश आहे या मोहिमेचा मुख्य उद्देश हा  सर्व क्षयरुग्ण शोधणे, त्यांच्यावर त्वरित उपचार करणे व नवीन केसेस तयार होऊ नये याची पुरेपुर काळजी.घेणे  हा राहील असे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा जी. कुंभार  यांनी प्रास्तविक भाषणात सांगितले. नवीन शासन धोरणानुसार क्षयरुग्णांसाठी पोषण आहारासाठी दरमहा ५००/- रुपये तर खाजगी वैद्यकीय व्यवसायकांसाठी निदानासाठी ५००/- रुपये व औषधपचार पूर्ण केल्यावर ५००/- रुपये अनुदान थेट लाभार्थी हस्तांतरण (डी.बी.टी.) च्या माध्यमातून एप्रिल २०१८ पासून देण्यात येत आहेत आशी माहिती त्यांनी दिली.

                       नियमितचाकोरीतुननजाताप्रत्येकखोकल्याचारूगणया हासंशयित क्षयरुग्ण समजूनत्वरितयोग्यउपाययोजनाकरावीतसेचकोल्हापूरजिल्हा हा नेहमीच नावीन्यपूर्ण यॊजना राबवण्यात अग्रेसर जिल्हा आहेहि मोहीम निशिचीतपणे यशस्वी करू अशी ग्वाही मा. डॉ. योगेश साळे जिल्हा आरोग्य अधिकारीजिल्हा परिषदयांनी दिली .हि मोहीम दोन टप्प्यामध्ये वर्षभर राबवण्यात येणार आहे, तालुक्यातील सर्व गावातील प्रत्येक घरामध्ये  जाऊन  सर्वेक्षणकरण्यात येणारआहेयासाठी ए.ए.एम. एम.पी.डब्ल्यूआशा कार्यकर्ती व  सर्व आरोग्य कर्मचारी च्या मदतीने घरातील प्रत्येक व्यक्तींना  क्षयरोग विषयी शास्त्रीय माहिती देणे व  क्षयरोग लक्षणाबाबत विचरणा  करून लक्षण आढळल्यास त्वरित पुढील तपासणीकरिता प्रा. आ. केंद्रग्रामीण रुग्णालयजिल्हा क्षयरोग केंद येथे आवश्यकतेनुसार  संदर्भित करण्यात येणारआहेतसेच क्षयमुक्त तालुका मोहिमेसाठी पन्हाळा व गगनबावडा तालुका निवडण्यामागचे निकष तसेच  तालुक्याची भोगोलिक परिस्थिती ,रुग्णस्थिती इ . माहिती  डॉ. अनिल कवठेकरतालुका आरोग्य अधिकारीपन्हाळा, यांनी विषद केली.     

                        यावेळी  डॉ. मानसी कदमवैद्यकीय अधिकारी,. जिल्हा क्षयरोग केंद्रकोल्हापूर यांनी आभार मांडले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन   श्री एम एस पाटील यांनी केले .यावेळी मा. सौ. उज्वला उत्तम पाटीलसभापती पंचायत समितीपन्हाळा मा. श्रीम. मंगल संजय कांबळे सभापतीपंचायत समिती गगनबावडामा. श्री.पांडुरंग दत्तू भोसले उपसभापतीपंचायत समिती,गगनबावडा माश्री.पृथ्वीराज भगवानराव सरनोबतमाजी सभापती सभापती पंचायत समिती पन्हाळा मा.श्री.अनिल नामदेव कंदुरकसदस्य पंचायत समिती पन्हाळा, मा.श्री.रणजितशिंदेसरकार – जाखले मा. श्री तुलसीदास  शिंदे गटविकास अधिकारी वर्ग -१ पंचायत समिती पन्हाळाडॉ. विशाल चोकाककर,तालुका आरोग्य अधिकारी,गगनबावडा,  डॉएस.सी.अभिवंत वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालयकोडोलीडॉ.एस.बी.गायकवाडवैद्यकीय अधीक्षकग्रा.रु.पन्हाळा, डॉ. विनायक भोई  वैद्यकीय अधिकारीजिल्हा क्षयरोग केंद्रकोल्हापूर जिल्हा प्रसिद्धीअधिकारी.मा. एकनाथजोशी उपस्थित होते.

या प्रसंगी पन्हाळा व गगनबावडा तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी,  सर्व आरोग्य कर्मचारी, अशा गटप्रवतक एसटी .एस /एसटीएलएस तसेच जिल्हा क्षयरोग केंद्राचे अधिकारी व कर्मचारी,   छायचित्रकार , पत्रकार  नागरिक मोठ्या  संख्येने उपस्थित होते.

तंबाखू मुक्ती साठी मा मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचे समोर भाषण करताना जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी

तंबाखू मुक्ती साठी मा मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचे समोर भाषण करताना जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी

विद्यामंदीर बालिंगे येथे शाळा भेटी दरम्यान शालेय पोषण आहाराचा आस्वाद घेताना मा.मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल साहेब सोबत मा.राजू सुर्यवंशी साहेब सभापती पं.स.करवीर

आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी विद्यामंदीर बालिंगे येथे शाळा भेटी दरम्यान शालेय पोषण आहाराचा आस्वाद घेताना मा.मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल साहेब सोबत मा.राजू सुर्यवंशी साहेब सभापती पं.स.करवीर यावेळी मा मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी शाळा डिजिटल केलेबद्दल व सॉफ्टवेअर चा वापर सुरू असलेबाबत समाधान व्यक्त केले.

 

 

 

स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण)-2018 अंतर्गत कोल्हापूर जिल्हयाचे सर्वेक्षण सुरू

केंद्र शासनाच्या वतीने दिनांक  13 जुलै, 2018 रोजी “स्वच्छता सर्व्हेक्षण ग्रामीण 2018” ची घोषणा करण्यात आली. हे सर्व्हेक्षण दिनांक 1 ते 31 ऑगस्ट 2018 पर्यंत होणार आहे. या सर्वेक्षणामध्ये उत्कृष्ठ ठरणा-या राज्यांना तसेच जिल्हयांना राष्ट्रीय स्तरावरुन दि. 2 ऑक्टोंबर 2018 रोजी ,महात्मा गांधी जयंतीच्या दिनी सन्मानित करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाअंतर्गत कोल्हापूर जिल्हयाच्या सर्वेक्षणास सुरूवात झाली आहे.

सर्वेक्षणासाठी केंद्र शासनामार्फत निवडण्यात आलेल्या के. आर. सी मार्फत गावांची तपासणी सुरू आहे. या सर्वेक्षणांतर्गत कोल्हापूर जिल्हयातील पन्हाळा तालुक्यातील ग्राम पंचायत बाजारभोगावं व इंजोळे या गावांची व राधानगरी तालुक्यातील ग्रा. पं. कोते या गावाची के. आर.सी मार्फत  तपासणी पूर्ण झाली आहे. तर उर्वरित गावांची देखील क्रमाने तपासणी होणार आहे.

            केंद्र शासनाने निवडलेल्या या संस्थेकडुन सार्वजनिक ठिकाणांचे थेट निरीक्षण  होणार आहे. यामध्ये शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक ठिकाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रें, सर्व प्रार्थना स्थळे / मंदिर ठिकाण, यात्रास्थळे, बाजाराची ठिकाणे, तसेच ग्रामपंचायत अंतर्गत येणारी विविध सार्वजनिक ठिकाणे इत्यादि स्थळांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.

“स्वच्छ सर्वेक्षण- ग्रामीण 2018” अंतर्गत गावस्तरावर गावचे लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक, निगराणी समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, स्वच्छागृही, आशा आणि शिक्षकांच्या माध्यमातुन पाहणी केली जाणार आहे. यासोबतच प्रत्येकी 10 सामान्य नागरीक तसेच सामुहिक बैठकांच्या माध्यमातुन सर्वेक्षण केले जाणार आहे. उत्तम गुणवत्तापूर्ण कामगिरी केलेल्या जिल्हयांची क्रमवारी ठरविण्यासाठी मंत्रालयाने एकात्मक व्यवस्थापन माहिती प्रणाली (IMIS) विकसित केली आहे.

या सर्वेक्षणांतर्गत लोकांना प्रत्यक्ष भेटून त्या आधारे माहिती गोळा केली जाणार आहे. यातंर्गत स्वच्छतागृहींची खुली बैठक ,व्यक्तीगत मुलाखती, सामुहिक चर्चा करुन प्रतिक्रिया घेण्यात येईल. गावाची पाहणी केली जाईल यामध्ये गावाची स्वच्छता, घन तसेच द्रव्य कचरा व्यवस्थापन , कचरा व्यवस्थापनासाठी गावपातळीवर राबविण्यात आलेले उपक्रम याची पाहणी केली जाणार आहे. स्थानिक नागरीकांकडुन प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन प्रतिक्रीया नोंदविली जाईल, अभियानाबाबत लोकांमध्ये असणारी जागृती, स्वच्छ भारत मिशन बद्दलची प्रतिक्रिया, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे गाव पातळीवर स्थानिक पुढाकाराने उभारण्यात आलेले सुरक्षित उपाययोजनेची नोंद घेतली जाईल. तसेच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाबाबतची काही नवीन माहिती असल्यास गोळा केली जाणार आहे.

या सर्वेक्षणाचा महत्वाचा भाग म्हणजे या सर्वेक्षणासाठी ऑनलाईन प्रतिक्रिया नोंदविल्या जाणार आहेत. यासाठी प्ले स्टोअरवरून ssg 18 हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्यामध्ये महाराष्ट्र राज्य निवडून व कोल्हापर जिल्हयासाठी स्वच्छतेबाबत विचारलेल्या 4 प्रश्नांना सकारात्मक  उत्तरे द्यावयाची आहेत. कोल्हापूर  जिल्हयाला जास्तीत जास्त मते मिळतील व कोल्हापूर जिल्हा या सर्वेक्षणामध्ये अव्वल येईल. यासाठी जिल्हयातील सर्व नागरिकांनी या ॲपव्दारे स्वच्छता मतदान करावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मा. सौ. शौमिका महाडीक व  प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. डॉ. आर.पी. शिवदास यांनी केले आहे.

 

(प्रियदर्शिनी चं.मोरे)

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (पा. व स्व.)

जिल्हा परिषद, कोल्हापूर