1 जानेवारीपासून जिल्हयात ‘स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेला’ सुरूवात

1 जानेवारीपासून जिल्हयात ‘स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेला’ सुरूवात

(शौचालयाची सुंदर रंगरंगोटी केल्यास राष्ट्रीय स्तरावर पुरस्काराने सन्मानित)

 

कोल्हापूर : दि.31/12/2018

केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाकडून दि.1 ते 31 जानेवारी 2019 या कालावधीमध्ये ‘स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धा’ आयोजित केली आहे. या स्पर्धेचा हेतू ग्रामीण भागतील प्रत्येक कुटुंबाने आपले शौचालय स्वच्छ, सुंदर दिसावे व शौचालय प्रती अभिमानास्पद स्वामित्व भावना वाटावी आणि स्वच्छता सुविधा स्पष्टपणे नजरेत याव्यात हा आहे. या उपक्रमासाठी कुटुंब प्रमुखाने स्वनिधीतून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रंगरंगोटी करावयाची आहे.

या स्पर्धेअंतर्गत सहभागी प्रत्येक कुटुंबाने त्यांचे वैयक्तिक शौचालय नव्याने रंग देवून स्थानिक कलांच्या व्दारे त्यावर स्वच्छतेच्या संदेशांची निर्मिती करावी.स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) चा लोगो सुध्दा यावर रंगवू शकतील.

स्पर्धेची औपचारिक सुरूवात ü दि. 1 जानेवारी,2019 रोजी करणेत येणार आहे. अभियान कालावधीत एकूण शौचालय संख्येच्या प्रमाणात  रंगवलेल्या संख्येच्या टक्केवारिप्रमाणे राज्यातील तीन उत्कृष्ट जिल्हे निवडले जातील. या प्रमाणे जिल्हयातील 5 ग्राम पंचायती  अशा निवडल्या जाणार आहेत ज्यांनी कल्पकतेने शौचालय रंगविलेले असेल. त्या पाच ग्राम पंचायतीमधील छायाचित्र राज्यस्तरावर पाठविले जाणार आहे.

राज्यस्तरावर प्राप्त झालेल्या फोटो व माहितीच्या आधारे राष्ट्रीय स्तरासाठी राज्यस्तरावरून नामनिर्देशन करण्यात येईल. जिल्हयाकडून रंगविलेल्या शौचालयांची गावनिहाय तालुकानिहाय छायाचित्रांसह माहिती 25 जानेवारी 2019 पर्यंतच पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेकडे पाठविली जाणार आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदे मार्फत, सदर स्पर्धेत जास्तीत जास्त कुटुंबांनी व ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविणेसाठी प्रत्येक तालुका स्तरावर “स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धात” प्रथम,व्दितीय व तृतीय क्रमांक उत्कृष्ट शौचालयासाठी निवडले जाणार आहेत, व शौचालय संख्येच्या प्रमाणात एक उत्कृष्ट ग्राम पंचायत निवडली जाणार आहे. तसेच जिल्हा स्तरावर या स्पर्ध अंतर्गत उत्कृष्ठ शौचालयासाठी प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक निवडले जाणार असुन, शौचालय संख्येच्या प्रमाणात शौचालय रंगविलेल्या पाच ग्रामपंचायती व उत्कृष्ठ तालुक्याची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या उत्कृष्ठ शौचालय कुटुंबांना, ग्रामपंचायतींना व तालुक्यांना प्रमाणपत्र देवुन सन्मानित करणेत येणार आहे.  या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील सर्व ग्राम पंचायतींनी सहभागी होणेबाबत मा.सौ. शौमिका महाडीक, अध्यक्ष, जि. प. कोल्हापूर व मा. अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. कोल्हापूर यांनी आवाहन केले आहे.

 

(प्रियदर्शिनी चं.मोरे)

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (पा. व स्व.)

जिल्हा परिषद, कोल्हापूर

गोवर रुबेला लसीकरण मोहिमेत जिल्हा अग्रेसर

गोवर रुबेला लसीकरण मोहिम कोल्हापूर जिल्हयामध्ये 27 नोव्हेंबर 18 पासून मोठया उत्साहत सुरुवात झाली आहे. या मोहिमेमध्ये सर्व लोकप्रतिनिधिनी  सहभागी झाले असून जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय आशा विविध ठिकाणी शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित होते.  या मोहिमेमध्ये 9 महिने ते 15 वयोगटातील एकुण  767340  इतके लाभार्थी निश्चित झाले असून मोहिम सुरु झालेपासून केवळ 09 दिवसामध्ये  378437 इतक्या मुला-मुलीना लसीकरण करण्यात आले असून हे काम एकुण उदिदष्टाच्या 49 टक्के  झाले आहे. लस दिलेल्या  378437 लाभार्थ्या पैकी केवळ 03 मुलांना लसीकरणा नंतर किरकोळ स्वरुपाच्या गुंतागुंत आढळली आहे. गुंतागुंतीचे प्रमाण हे 0.0007 टक्के इतके अत्यल्प आहे.

गुंतागुंतीचे प्रमाण अत्यल्प असले तरी गुंतागुंत झालेल्या लाभार्थीला तत्काळ उपचार, संदर्भ सेवा तज्ञ मार्फत उपलब्ध करुन देण्यात आल्या असून नागरिकांनी  न घाबरता आपल्या मुला-मुलीनां  लसीकरण करुन घ्यावे व आपल्या  पाल्यांना गोवर, रुबेला सारख्या जीव घेण्या आजारापासून संरक्षीत करावे. गोवर रुबेलाची लस अत्यंत सुरक्षीत व  परिणामकारक आहे. ही लस महाराष्ट्रमध्ये  पुणे येथे उत्पादित होत असून जगभरातील 70 देश हया लसीचा वापर करीत आहेत.  राज्यात पहिल्यांदाच मोठया प्रमाणात इंनजेक्टेबल मोहिम होत आहे. लसीकरण प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हयातील सर्व प्रकारच्या शाळा, अंगणवाडी व आरोग्य संस्था आशा विविध ठिकाणी  8500 सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सत्राच्या ठिकाणी सर्व साधन सामुग्रीनी सुसज्ज, प्रशिक्षीत लसीकरण पथक, अत्यावश्यक औषधसाठासह  तज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपलब्ध ठेवण्यात आला आहे. प्रत्येक बालकांच्या सुरक्षतेसाठी  नवीन सुई (auto disposable synringe) चा वापर करण्यात येत आहे. लसीकरणानंतर मुलांना अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवण्यात येत असून कोणत्याही प्रकारची गुंतागुंत होणार नाही यांची दक्षता घेण्यात येत आहे. गोवर रुबेला आजाराचे उच्चाटन होणेसाठी  सर्व पालकांनी 100 टक्के सहभाग घेवून मोहिम यशस्वी करावी व एक सशक्त भारत देश घडवण्याचे योगदान दयावे.

या मोहिमेध्ये सर्व लोकप्रतिनिधी, रोटरी क्लब, लायन्स क्लब, स्वयंसेवी संस्था, वैद्यकीय संघटना आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, आशा, शिक्षण विभाग, महिला बाल कल्याण विभाग, ग्रामपंचायत विभाग , जिल्हा माहिती कार्यालय, प्रिन्ट मेडिया, इलेक्टॉनीक मेडिया  यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.   यापुढे मोहिम पूर्ण होई पर्यत असेच सहकार्य मिळावे असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने अहवान करण्यात येत आहे.

 

मुख्य कार्यकारी अधिकारी

 जिल्हा परिषद कोल्हापूर

दिनांक  06/12/2018 इ. रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन  साजरा केलेबाबत.

दिनांक  06 डिसेंबर 2018 रोजी  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना जिल्हा परिषद, कोल्हापूर च्या वतीने सकाळी ठिक 11-00 वाजता  आदरांजली वाहणेत आली.  त्या प्रसंगी  मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व  मा. शिक्षण व अर्थ समिती सभापती श्री. अंबरिषसिंह घाटगे यांच्या हस्ते फोटो पूजन करणेत आले.

यावेळी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी देश,समाज, विद्यार्थी यांच्या हितासाठी आंबेडकरांचे योगदान,या विषयी माहिती दिली.  मा. उपाध्यक्ष श्री. सर्जेराव पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.)  रविकांत आडसुळ, उप मुख्य  कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) राजेंद्र भालेराव,  उप मुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.क.) सोमनाथ रसाळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. संजय राजमाने, शिक्षणाधिकारी (प्राथ.) आशा उबाळे, शिक्षणाधिकारी (माध्य.) किरण लोहार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व प्रभारी समाज कल्याण अधिकारी डॉ संजय शिंदे, कृषी विकास अधिकारी  चंद्रकांत सुर्यवंशी यांच्यासह  सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.

श्री. बी.पी.माळवे  सहाय्यक शिक्षक यांनी सुत्रसंचलन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती दिली. यावेळी मोठया संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कृपया वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिध्द करणेकामी कार्यवाही करणेत यावी, ही विनंती.

सही/-

(रविकांत आडसुळ)

उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)

                                                                          जिल्हा परिषद, कोल्हापूर

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि शाश्वत स्वच्छतेसाठी डिजीटल व्हॅन द्वारे जिल्ह्यात जनजागृती

कोल्हापूर दि ३ – संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व शाश्वत स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी  जिल्हयात डीजीटल व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात  येणार आहे.
आज सोमवार दिनांक ३ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या परिसरात  डिजिटल व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून  मा. अध्यक्ष, सौ. शौमिका महाडीक यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा. श्री. सर्जेराव पाटील, बांधकाम व आरोग्य समिती सभापती मा. श्री. सर्जेराव पाटील,  समाज कल्याण सभापती मा. श्री. विषांत महापुरे, जेष्ठ जि.प. सदस्य मा. श्री. अरूण इंगवले, श्री.विजय भोजे, श्री. हेंमंत कोलेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा. व स्व. ) प्रियदर्शिनी मोरे, सर्व विभागाचे खातेप्रमुख तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षचे तज्ञ व सल्लागार  आदींची उपस्थिती होती. राज्य शासनाच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या वतीने ही व्हॅन कोल्हापूर जिल्ह्यात पाठवण्यात आली आहे.
ही व्हॅन जिल्ह्यातील १५० गावात जाणार आहे,  डिजिटल व्हॅनद्वारे ग्राम पंचायत, शाळा, अंगणवाडी आणि महिला बचत गट यांना स्वच्छतेविषयक फिल्म दाखवण्यात येणार आहे.
राज्याच्या माहिती व जनसंपर्क  विभागाचे वतीने मुंबई येथील आर.डब्ल्यु प्रमोशन संस्थेच्यावतीने आज पासून जिल्ह्यातील १५० ग्रामपंचायती मध्ये ही व्हँन फिरणार आहे.
राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे वतीने ही मोहिम आखण्यात आली आहे. शाश्वत स्वच्छता, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, मेला गाळ व्यवस्थापन, मासिक पाळी व्यवस्थापन,  संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, गटार मुक्त व शौषखड्डेयुक्त गाव अभियानाची माहिती या डिजीटल व्हॅनद्वारे ग्रामस्थांना दाखवण्यात येणार आहे.

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद कोल्हापूर

दि.१ डिसेंबर 2018 रोजी जिल्हा परिषदेच्या स्थायी व जलव्यवस्थापन समितीमार्फत घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत वेंगुर्ला, जि. सिंधुदूर्ग येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला अभ्यास दौऱ्यांतर्गत भेट दिली.
कोल्हापूर जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे घनकचऱ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी हा अभ्यास दौरा मार्गदर्शक ठरणार आहे
नगरपरिषद वेंगुर्ला, जि. सिंधूदुर्ग येथील आदर्श घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा अभ्यासदौरा करणेसाठी जिल्हा परिषद कोल्हापूर कडील स्थायी समिती व जिल्हा जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती सदस्य यांनी दिनांक ०१. १२ . २०१८ रोजी भेट देऊन पाहणी केली. सदर अभ्यासदौऱ्यावेळी  ओल्या कचऱ्या पासून बायोगॅस युनिट, प्लास्टिक क्रशर मशीन , पाल्यापाचोळ्यापासून ब्रिकेटस निर्मिती मशीन इत्यादींची पाहणी करून जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये सदरचा प्रकल्प उभारणे करिता अभ्यासदौरा करणेत आला.
या अभ्यासदौऱ्यातील समिती सदस्यांना नगरपरिषद वेंगुर्ल्याचे  मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वैभव साबळे यांनी माहिती दिली. सदर अभ्यासदौरा समितीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष मा. शौमिका महाडिक,उपाध्यक्ष मा. श्री. सर्जेराव पाटील, बांधकाम सभापती मा. श्री. सर्जेराव पाटील पेरीडकर शिक्षण सभापती मा. अंबरीशसिहं  घाटगे, समाजकल्याण सभापती मा. विशांत महापुरे, जेष्ठ सदस्य मा. श्री. अरुण इंगवले, मा. शिवाजीराव मोरे, श्री. राजेश पाटील, व उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. प्रियदर्शिनी मोरे, व लेखाधिकारी श्री. संजय कुंभार इ. उपस्थित होते.

किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमास सुरूवात

 

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत तालुकास्तरीय प्रशिक्षणास दि. 26.11.2018 रोजी पासून सुरूवात झाली आहे. वैयक्तिक स्वच्छतेमधील अतिशय महत्वाचा मानला जाणार विषय हा शालेय मुलींपर्यंत पोहचविणे तसेच या विषयाबाबत शास्त्रशुध्द माहिती मुलींना मिळावी. त्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी मासिक पाळी व्यवस्थापन हा कार्यक्रम राबविला जात आहे.

दि. 26.11.2018 रोजी पंचायत समिती भुदरगड, चंदगड, करवीर, राधानगरी, हातकणंगले, आजरा, गगनबावडा, गडहिंग्लज या तालुक्यांमध्ये या प्रशिक्षणास सुरवात झाली आहे. तालुकास्तरीय पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे.  जिल्हा स्तरावरून तालुकानिहाय प्रशिक्षण वेळापत्रक देण्यात आले आहे. यानुसार तालुकास्तरावर एकूण 2534 सहाय्यक प्रविण प्रशिक्षक हे प्रशिक्षण घेणार आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत यापूर्वी जिल्हास्तरावर  प्रविण प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये प्रशिक्षण घेतलेल्या प्रविण प्रशिक्षकांमार्फत तालुकास्तरीय सहाय्यक प्रविण प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले जात  आहे. तालुकास्तरीय  प्रशिक्षक हे प्रत्यक्ष शाळांमध्ये  6 सत्रांमध्ये मुलींना प्रशिक्षण देतील असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.

प्रशिक्षणादरम्यान मासिक पाळीबाबत माहिती पुस्तिका, हॅन्डबुक आणि लॅमिनेटेड चार्ट असे प्रशिक्षण साहित्य वाटप करण्यात आले. या प्रशिक्षणाचे आयोजन पाणी व स्वच्छता विभागामार्फत करण्यात आले आहे.

(प्रियदर्शिनी चं.मोरे)

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (पा. व स्व.)

जिल्हा परिषद, कोल्हापूर

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत कंत्राटी भरती जाहिरात -मानोसोपचार तज्ञ्,मनोविकृती परिचारिका, सामाजिक परिचारीका 

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत कंत्राटी भरती जाहिरात -मानोसोपचार तज्ञ्,मनोविकृती परिचारिका, सामाजिक परिचारीका 

किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमास सुरूवात

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत तालुकास्तरीय प्रशिक्षणास दि. 26.11.2018 रोजी पासून सुरूवात झाली आहे. वैयक्तिक स्वच्छतेमधील अतिशय महत्वाचा मानला जाणार विषय हा शालेय मुलींपर्यंत पोहचविणे तसेच या विषयाबाबत शास्त्रशुध्द माहिती मुलींना मिळावी. त्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी मासिक पाळी व्यवस्थापन हा कार्यक्रम राबविला जात आहे.

दि. 26.11.2018 रोजी पंचायत समिती भुदरगड, चंदगड, करवीर, राधानगरी, हातकणंगले, आजरा, गगनबावडा, गडहिंग्लज या तालुक्यांमध्ये या प्रशिक्षणास सुरवात झाली आहे. तालुकास्तरीय पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे.  जिल्हा स्तरावरून तालुकानिहाय प्रशिक्षण वेळापत्रक देण्यात आले आहे. यानुसार तालुकास्तरावर एकूण 2534 सहाय्यक प्रविण प्रशिक्षक हे प्रशिक्षण घेणार आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत यापूर्वी जिल्हास्तरावर  प्रविण प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये प्रशिक्षण घेतलेल्या प्रविण प्रशिक्षकांमार्फत तालुकास्तरीय सहाय्यक प्रविण प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले जात  आहे. तालुकास्तरीय  प्रशिक्षक हे प्रत्यक्ष शाळांमध्ये  6 सत्रांमध्ये मुलींना प्रशिक्षण देतील असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.

प्रशिक्षणादरम्यान मासिक पाळीबाबत माहिती पुस्तिका, हॅन्डबुक आणि लॅमिनेटेड चार्ट असे प्रशिक्षण साहित्य वाटप करण्यात आले. या प्रशिक्षणाचे आयोजन पाणी व स्वच्छता विभागामार्फत करण्यात आले आहे.

(प्रियदर्शिनी चं.मोरे)

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (पा. व स्व.)

जिल्हा परिषद, कोल्हापूर