दिव्यांग उन्नती अभियान अंतर्गत दिव्यांग व्यक्तीना साहित्य वाटप तपासणी

आज दि.12/05/2019 रोजी मा.दत्ताजीराव मोहिते पाटील माध्यमिक विदयलाय व कनिष्ठ महाविद्यालय, तिसंगी ता. गगनबावडा येथे जि. प.कोल्हापूर मार्फत राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग उन्नती अभियान अंतर्गत टप्पा क्र.3 साहित्य वाटप तपासणी शिबिरास मा. सभापती व उपसभापती पं. स. गगनबावडा, मा.श्री भगवान पाटील, जि. प.सदस्य, समाजकल्याण अधिकारी, जि. प. कोल्हापूर, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि. प.कोल्हापूर, गटविकास अधिकारी पं. स. गगनबावडा व अधिकारी/कर्मचारी वर्ग उपस्थित होते. आजची नोंदणी 290 झाली आहे.

दिव्यांग उन्नती अभियान अंतर्गत दिव्यांग व्यक्तीना साहित्य वाटप तपासणी शिबिराचा शुभारंभ

जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत आज दि.11/7/2019 रोजी स.8.30 वा.दिव्यांग उन्नती अभियान टप्पा क्र.3 अंतर्गत दिव्यांग व्यक्तीना साहित्य वाटप तपासणी शिबिराचा शुभारंभ श्री शाहू कुमार भवन गारगोटी येथून सुरू करण्यात आलासदर कार्यक्रमच्या प्रसंगी मा.श्री. अमान मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, मा.सभापती स्नेहल परीट, पं. स. भुदरगड, श्री. संजय शिंदे, समाजकल्याण अधिकारी, सौ.माधुरी परीट, गटविकास अधिकारी, सौ.रेश्मा राहुल देसाई, जि. प.सदस्य, श्री.जीवन पाटील, जि. प.सदस्य, श्री. अर्जुन अबीटकर, श्री. निंबाळकर, पं. स.सदस्य, सौ. नलवडे, पं. स.सदस्या व अधिकारी/कर्मचारी वर्ग उपस्थित होता.सदर शिबीरमध्ये भुदरगड तालुक्यातील अंध, अस्तिव्यंग, कुष्ठरोगी, कर्णबधिर, मतिमंद मुले, इ. एकूण अंदाजे 1776 दिव्यांग व्यक्ती यांची नोंदणी करण्यात आली.सदर अभियानामध्ये मा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अवयव  दानाचा फॉर्म भरण्यात आला

मतदार जागृतीसाठीसाकारली भव्य मानवी रांगोळी मतदार असल्याचा अभिमान बाळगा व मतदानाचा पवित्र हक्क बजावा- जिल्हाधिकारी

 

कोल्हापूर,दि.9: कोल्हापूरातील महापालिकेच्या साडेसहा हजारावर विद्यार्थी – विद्यार्थींनीनी गांधी मैदानावर साकारली मतदान जागृतीची भव्य मानवी रांगोळी ! ‘देश का महा त्यौहार – 2019’ अशी प्रतिकृती असलेली मानवी रांगोळी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षपणे साकारली. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने येथील महात्मा गांधी मैदानावर आयोजीत केलेल्या ‘देश का महा त्यौहार – 2019’ या मतदार जागृतीपर मानवी रांगोळीच्या उपक्रमास शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त्‍ा डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अतिरिक्त महापालिका आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगेश शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, रविकांत अडसूळ, महापालिकेचे मुख्य लेखा परिक्षक धनंजय आंधळे, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मतदार जागृती मोहिमेंतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन होत असून येत्या 23 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानामध्ये सर्वच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा या उद्देशाने आज शहरातील सर्व विद्यार्थी -विद्यार्थींनीनी मानवी रांगोळीने कोल्हापूरकरांना मतदान करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या मानवी रांगोळीने संपूर्ण गांधी मैदान निवडणूकमय झाले होते. विद्यार्थ्यांनी एका सुरात मतदार जागृतीचा नारा दिला. आजची मानवी रांगोळी हा मतदार जागृतीचा अनोखा उपक्रम शहरवासियांना अनुभवता आला. या मानवी रांगोळीच्या कार्यक्रमास निवडणूक यंत्रणेतील अधिकारी, महापालिकेतील अधिकारी/कर्मचारी आणि शिक्षकांनी सक्रिय योगदान दिल्याने आजच्या मानवी रांगोळीतून उपस्थितांनी मतदान करण्याचाच संकल्प केला.
मतदार असल्याचा अभिमान बाळगा व मतदानाचा पवित्र हक्क बजावा- जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या देश का महा त्यौहार – 2019 या मतदार जागृतीपर मानवी रांगोळीचा हा अनोखा उपक्रम असून या उपक्रमातून मतदारांमध्ये मतदाना विषयी निश्चित जागृती निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करुन जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, आजच्या मानवी रांगोळीचा उपक्रम देशातील एक उल्लेखनिय उपक्रम असून प्रत्येक मतदाराने मतदानाचा पवित्र हक्क बजावलाच पाहिजे हा संदेश खऱ्या अर्थाने मतदारापर्यंत पोहोचेल. गेल्या निवडणूक 72 टक्क्याहून अधिक मतदान झाले होते. येत्या 23 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानात ही टक्केवारी निश्चितपणे वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.देशाच्या महाउत्सवात सर्वांनी सहभागी होवून निवडणूका पारदर्शक आणि मुक्त वातावरणात पार पडतील यासाठी वचनबध्द होवूया असे आवाहन करुन जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, मी मतदार आहे याचा सार्थ अभिमान बाळगून येत्या लोकसभा निवडणूकी लोकशाही बळकटीकरणासाठी सर्वांनीच मतदान करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर द्यावा. मतदानासाठी मिळालेली सुट्टी मतदान करुनच साजरी करा प्रत्येकाने मतदानादिवशी घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन शेवटी त्यांनी केले.
महापालिका आयुक्त्‍ा डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी या प्रसंगी बोलताना म्हणाले, आजच्या मानवी रांगोळीच्या आयोजना जिल्हा प्रशासनाचे विशेषत: निवडणूक यंत्रणेचे महत्त्वपूर्ण योगदान मिळाले आहे. महापालिकेच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांनी आजच्या मानवी रांगोळीत सहभागी होवून मतदान जागृतीचा संदेश शहरवासियापर्यंत यशस्वीपणे पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. मानवी रांगोळीच्या सादरीकरणातून मी मतदान करणार हा संदेश विद्यार्थ्यांनी दिला येत्या लोकसभा निवडणूकीत शहरातील सर्वच मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावून लोकशाही बळकटीकरणास सहाय्यभूत व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

                                 प्रारंभी शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी एस.के. यादव यांनी स्वागत करुन मानवी रांगोळीच्या आयोजनासाठी राबविलेल्या उपक्रमाची माहिती दिली. आजच्या मानवी रांगोळीमध्ये शहरातील 6 हजार 500 हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थींनी सहभागी झाल्याचे सांगितले. शेवटी नायब तहसिलदार प्रकाश दगडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास महापालिकेती सर्व अधिकारी/कर्मचारी, शिक्षक/शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थींनी, नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी मानवी रांगोळीसाठी उल्लेखनिय काम करणाऱ्या संस्था, शाळा, शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आयोजीत केलेल्या मी मतदान करणार तुम्ही पण करा या सेल्फी पॉईंटमध्ये जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वच मान्यवरांनी सेल्फी काढली. त्यानंतर या सेल्फी पॉईंटवर सेल्फी काढण्यासाठी अक्षश: रीघ लागली. त्यानंतर मानवी रांगोळीच्या निमित्ताने राबविलेल्या मी मतदान करणार या सह्यांच्या मोहिम उपक्रमास भेट देवून सह्या केल्या. शेवटी उपस्थितांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली.
मानवी रांगोळी साकारण्यासाठी या उपक्रमामध्ये प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, एम.एल.जी. हायस्कूल, प्रि.इंदूमती देवी हायस्कूल, मनपा पी.बी. साळुंखे विद्या., एस.एम.लोहीया हायस्कूल, प्रायव्हेट हायस्कूल, विद्यापीठ हायस्कूल, विमला गोयंका इं. मि. स्कूल, इंदिरा गांधी हायस्कूल, कोल्हापूर हायस्कूल, नूतन आदर्श विद्यालय, मनपा नेहरुनगर विद्यामंदिर, मनपा वीर कक्कय विद्या., कोल्हापूर इंग्लिश स्कूल, विकास विद्यामंदिर, मनपा राजमाता जिजाबाई गर्ल्स हायस्कूलसह शहरातील सर्व शाळा व हायस्कुलचे विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभागी झाले. 

जिल्ह्यातील ३ ग्राम पंचायतीना जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत  ई- कार्ट घंटागाडी

जिल्ह्यातील ३ ग्राम पंचायतीना जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत  ई- कार्ट घंटागाडी

(सामाजिक उत्तरदायित्व धोरणअंतर्गत रत्नाकर बँक लिमिटेड यांचेमार्फत स्वच्छता कार्यात योगदान  )

कोल्हापूर : दि. ५. ०२.२०१९

 

             सामाजिक उत्तरदायित्व धोरण अंतर्गत रत्नाकर बँक लिमिटेड  यांचेकडून प्राप्त निधीतून जिल्हा परिषद कोल्हापूर पाणी व स्वच्छता विभागा मार्फत जिल्ह्यातील ग्राम पंचायत दिंडनेर्ली, ग्राम पंचायत चिंचवाड ता. करवीर तसेच  ग्राम पंचायत जैन्याळ, ता. कागल या तीन ग्राम पंचायतींना कचरा संकलनासाठी प्रत्येकी एक ई कार्ट घंटागाडी उपलब्ध करून देण्यात आली .

     या ई कार्ट वाहनाचे आज ग्राम पंचायतीना वितरण  करण्यात आले . या कार्यक्रमासाठी मा. सौ . शौमिका महाडिक , अध्यक्ष जि  प. कोल्हापूर, मा. आमदार श्री. अमल महाडिक, मा. श्री सर्जेराव पाटील, उपाध्यक्ष, जि .प. कोल्हापूर, मा सौ संध्याराणी बेडगे, जि .प. सदस्य, मा. श्री. हेमंत कोलेकर,जि.प.सदस्य, मा श्री. शिवाजी मोरे,जि.प.सदस्य, मा. श्री बंडा  माने, जि.प.सदस्य, मा. सौ स्वरुपाराणी जाधव,जि .प. सदस्य, मा. सौ. राणी खमलेट्टी जि .प. सदस्य मा. श्री. आर पी. शिवदास, अतिरिक्त मुख्य कार्यकारी, मा. श्री. संजय राजमाने, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, प्रियदर्शिनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा . व स्व .), श्री . निशांत कांबळे, समाजशास्त्र तज्ञ्   तसेच सर्व खातेप्रमुख, रत्नाकर बँक लिमिटेड चे प्रतिनिधी व संबंधित ग्राम पंचायतींचे सरपंच, ग्राम पंचायत सदस्य तसेच ग्राम सेवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

          मा. सौ . शौमिका महाडिक , अध्यक्ष जि  प. कोल्हापूर यांच्या प्रयत्नातून कचरा संकलनासाठी घंटागाडी  रत्नाकर बँक लिमिटेड यांचेकडून मिळाली आहे . यासाठी प्रति घंटागाडी   रु. २ लक्ष,४५ हजार असा एकूण ७ लक्ष, ३५ हजार इतका खर्च आला असून सदर  घंटागाडी हि चार्जेबल बॅटरीवर चालणारी असल्याने पर्यावरणपूरक आहे. तसेच या घंटागाडीला ओला कचरा व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्याची व्यवस्था आहे . सदर घंटागाड्यांचे ग्राम पंचायतींना वितरण करून संबंधित ग्राम पंचायत कर्मचा  घंटागाडी चालविण्याचे तसेच देखभाल दुरुस्तीचे तज्ञाकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे .

आरटीई २५ % अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये (वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देणेसाठी जागा राखून ठेवण्याची रीत) नियम 2012 प्रमाणे अल्पसंख्यांक शाळा वगळता राज्यातील सर्व विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावरील प्राथमिक शाळांना सन 2012-13 या शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 % पर्यंतच्या जागा नजीकच्या परिसरातील शासनाने निर्धारित केलेल्या वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. या अंतर्गत सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामधील पूर्व प्राथमिक व इयत्ता पहिलीसाठी 25 % आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या https://student.maharashtra.gov.in या वेबसाईटवरील RTE Portal या लिंकवर ऑनलाईन राबविणेत येणार आहे.

सदर प्रवेश प्रक्रिया खालील वेळापत्रकाप्रमाणे राबविणेत येणार आहे.

अ.क्र. कालावधी करावयाची कार्यवाही
1 13/02/2019 ते 22/02/2019 आर.टी.ई. प्रवेशपात्र सन 2018-19 च्या Auto Forward केलेल्या शाळांचे आणि नवीन नोंदणी केलेल्या शाळांचे BEO कडून Verification करणे.
2 25/02/2019 ते 11/03/2019 सामाजिक वंचित घटक / आर्थिक दुर्बल घटक / घटस्फोटीत तसेच विधवा महिला / अनाथ बालके / दिव्यांग बालके इ. घटकांतील पालकांकडून ऑनलाईन प्रवेश अर्जभरणे.
3 14/03/2019 ते 15/03/2019 पहिली सोडत (लॉटरी) काढणे.

 

वरील वेळापत्रकानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांनी (अल्पसंख्यांक शाळा वगळता) ऑनलाईन नोंदणी करावी व पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज करावा असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी केलेले आहे.

 

 

                                                                शिक्षणाधिकारी(प्राथमिक)

                                                                        जिल्हापरिषद,कोल्हापूर

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, गगनबावडा, प्रकार -4 , (मुलींचे वसतीगृह) ता.गगनबावडा जिल्हा परिषद,कोल्हापूर कडील कंत्राटी पदांची भरती – सन 2018-19

समग्र  शिक्षा अभियान अंतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, गगनबावडा, प्रकार -4 , (मुलींचे वसतीगृह) ता.गगनबावडा जिल्हा परिषद,कोल्हापूर कडील कंत्राटी पदांची  भरती –  सन 2018-19