ग्रामपंचायात विभाग
ग्रामपंचायात विभाग
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
ग्रामीण भागाचा सुयोग्य विकास करणेचे दृष्टीने उपलब्ध मानवी संपत्तीव्दारे ग्रामीण भागात टिकाऊ सामुहिक मालमत्ता निर्माण करीत असतानाच ग्रामीण भागात राहणाऱ्या व अंग मेहनतीची अकुशल कामे करणाऱ्या, मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम 2005 पारीत केला असुन सदर कायद्यान्वये ग्रामीण भागातील कुटुंबाला 100 दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देण्याची हमी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाने राज्याची रोजगार हमी योजना, व केंद्राची राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यांची सांगड घालुन महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंमलात आणलेली आहे. या योजनेला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र असे संबोधले जाते.
यशवंत सरपंच पुरस्कार
जिल्हा परिषद, स्वनिधीतून सन 2004-05 या आर्थिक वर्षापासून यशवंत सरपंच पुरस्कार योजना सुरू केलेली आहे. सदर योजनेमध्ये उत्कृष्ठ ग्रामपंचायत व सरपंच यांना पुरस्काराने सन्मानित केले जाते. जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातून प्रस्ताव मागणी केले जातात. प्रत्येक तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या ग्रामपंचायतीस रक्कम रूपये 25,000/- व व्दितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या ग्रामपंचायतीस 15,000/- व प्रथम क्रमांकाच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच यांना वैयक्तिक बक्षीस रक्कम रूपये 1,000/- व चांदीचे पदक या स्वरूपात पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. तसेच जिल्हयातील सर्व तालुक्यातून आलेल्या प्रस्तावापैकी अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या दोन ग्रामपंचायतींची निवड जिल्हा पुरस्कारासाठी निवड करणेत येते. अतिउत्कृष्ट निवड केलेल्या ग्रामपंचायतीपैकी प्रथम क्रमांकाच्या ग्रामपंचायतीस रक्कम रूपये 50,000/- व व्दितीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतीस रक्कम रूपये 30,000/- रोख स्वरूपात पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.
घर गृहस्वामीनीचे योजना राबविणे
घर म्हणजे मानवी संस्कृतीला पूरक ठरलेली प्रेरक संस्था आहे. स्त्रियांचा मानसन्मान वाढविण्यासाठी त्यांच्या असलेल्या घरांची नोंद पती पत्नी दोघांच्या नांवे असणे आवश्यक आहे. राजर्षि शाहू महाराजांचा समतेचा विचार समोर ठेवून कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव उपक्रम यशस्वी करण्यास ग्रामस्थांना प्रवृत्त करणे गरजेचे आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेने घर दोघांचे संकल्पना राबवित असताना घर गृहस्वामिनीचे नवीन कल्पना राबविणेत यावी. असा निर्ण घेताला. घरांच्या सर्व नोंदी पत्नीच्या नांवे करणार्याव ग्रामपंचायतीस घर गृहस्वामिनीचे पुरस्कार योजनेंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत मानपत्र व बक्षीस रक्कम रु.१०,०००/- देण्याचा निर्ण घेतला आहे. सन २००३-०४ या आर्थिक वर्षामध्ये कागल तालुक्यातील जैन्याळ ग्रामपंचायतीने घर गृहस्वामिनीचे योजना राबवून पारितोषीक घेण्याचा प्रथम मान प्राप्त केला आहे. सन २०१०-११ पर्यंत या योजनेमधून बक्षीस रक्कम व सन्मानपत्र देवून जिल्हा परिषदेमार्फत पंच्याहत्तर ग्रामपंचायतींना गौरविण्यात आले आहे.