कोल्हापूर जिल्हा परिषद मध्ये छत्रपती राजर्षी शाहू सभागृहामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात १२६ वी जयंती दि १४/०४/२०१७ इ. रोजी सकाळी संपन्न करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मा जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शोमिका महाडिक जिल्हा परिषद यांचे हस्ते करण्यात आली .
त्याप्रसंगी मा . समाज कल्याण सभापती श्री . विशांत महापुरे , मा महिला व बालकल्याण समिती सभापती सौ . शुभांगी शिंदे, मा मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, अति . मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . इंद्रजित देशमुख, प्रमुख वक्ते प्रा . विजय काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम . एस घुले, श्री सुशील संसारे, समाज कल्याण अधिकारी श्री प्रदीप भोगले व सर्व खाते प्रमुख तसेच कास्ट्राईव्ह संघटना संघटनेचे अध्यक्ष श्री नामदेव कांबळे, श्री सुधाकर कांबळे व इतर पदाधिकारी व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी संघटनेच्या वतीने व कै. आरती पाटील (सावकार) हिच्या स्मरणार्थ श्री धनंजय जाधव यांच्या वतीने डॉ ए पी जे अब्दुल कलाम वाचनालयास रक्कम रुपये १०००० किमतीचे पुस्तके प्रदान करण्यात आली
या प्रसंगी प्रा विजय काळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार प्रणाली तसेच आरक्षनाव्यतिरिक्त न समजलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आजच्या काळातील जगताना कसे महत्वाचे आहे हे सांगितले. तसेच प्रत्येक गावातील समाज मंदिराचे सार्वजनिक वाचनालय रूपांतर होणे गरजेचे आहे. यावेळी सौ शमिका महाडिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जयंती कार्यक्रम प्रास्ताविक यांनी समाज कल्याण अधिकारी श्री प्रदीप भोगले केले तर अति . मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . इंद्रजित देशमुख मनोगत व्यक्त केले.