जिल्हा परिषदेत तथागत बुद्ध व विपश्यना या विषयावर श्री इंद्रजित देशमुख यांचे व्याख्यान

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या  डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचनालयाच्या वतीने अधिकारी व कर्मचारी यांचेमध्ये वाचन संस्कृतीचा विकास व्हावा यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. या उपक्रमांतर्गत दरमहा अखेर व्याख्यानाचे आयोंजन करणेत येते. दि. 30-6-2017 इ. रोजी सायं. 4-30 वाजता राजर्षि शाहू सभागृह जिल्हा परिषद कोल्हापूर येथे या व्याख्यान मालेचे चौथे पुष्प सुप्रसिध्द वक्ते व जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. इंद्रजित देशमुख यांनी गंुफले. यावेळी जिल्हा प्रकल्प संचालक श्री. डॉ. हरिष जगताप, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. संजय राजमाने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील, जिल्हा कृषि अधिकारी श्री. चंद्रकांत सुर्यवंशी यांचेसह जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

श्री. इंद्रजित देशमुख यांनी तथागत बुध्द व विपश्यना या विषयांवर मार्गदर्शन करताना – माणसाच्या जिवनात विपश्यनेचे महत्व सांगून तथागत बुध्दांच्या आष्टांग मार्गाची महती आपल्या ओघवत्या वाणीने कथन करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले. विपश्यनेच्या मार्गाने माणसाला अंतिम सुखापर्यंत पाहोचता येते ही बुध्दांची शिकवण  विविध दृष्टांतामधूुन समजावून दिली. तसेच बुध्दत्वाची लक्षणे सांगताना अनंत मैत्री म्हणजे काय ? याविषयी ओघवत्या शैलित अर्थबोध केला.

शेवटी सदर कार्यक्रमांचे आभार सौ. जे. एस. जाधव, विस्तार अधिकारी (शिक्षण) यांनी मानले.

सही/-

शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

जिल्हा परिषद, कोल्हापूर

राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंती (सामाजिक न्याय दिन ) व आंतरराष्ट्रीय आमली पदार्थ सेवन विरोधी दिन जि प मध्ये साजरा

कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत राजर्षि शाहू महाराज यांची 143 वी जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करणेत आली. याच बरोबर आंतरराष्ट्रीय आमली  पदार्थ सेवन विरोधी दिन साजरा करणेत आला. या कार्यक्रमानिमित्त्य जिल्हा परिषदेच्या वतीने डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम व्याख्यानमाले अंतर्गत प्राध्यापक मधुकर पाटील  यांनी  लोककल्याणकारी राजा शाहू राजा या विषयांवर बोलताना  राजांचे खरे संदर्भ जगापुढे मांडून योजनेबरोबर कृतीला जोड देणारा राजा शाहू राजा समजावून घेवून त्याचा वारसा पुढे चालू ठेवावा याबाबत विविध दृष्टांतांतून शाहूंची  महती सर्वांसमोर मांडली.

तसेच, आंतरराष्ट्रीय आमली पदार्थ सेवन विरोधी दिना निमित्य जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री. प्रदिप भोगले यांनी सर्व कर्मचाऱ्यांना व्यसनाधिनते विषयी प्रबोधन करणारी ध्वनीफित दाखवून  व्यसनमुक्ती ची  शपथ  दिली.

      जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. इंद्रजित देशमुख यांनी  शाहूंचे विचार  व्यसनमुक्ती  या विषयी आपले मनोगत व्यक्त करुन  सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

सदरü कार्यक्रमांस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शौमिका महाडीक, उपाध्यक्ष श्री. सर्जेराव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, शिक्षण व अर्थ समिती सभापती  श्री. अमरिषसिंह घाटगे, समाजकल्याण सभापती  श्री. विशांत महापुरे, तसेच गटनेते श्री. अरुणराव इंगवले, जि.प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, उप मुख्य कार्यकारी (सा.प्र.) श्री. चंद्रकांत वाघमारे व सर्व विभागांचे खाते प्रमुख व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यÖ कार्यकारी अधिकारी (सा.प्र.)

जिल्हा परिषद, कोल्हापूर

महाराष्ट्र विकास सेवा गट ब मध्ये पदोन्नतीसाठी पात्र वर्ग ३ मधील विभागीय स्तरावरील दि ०१/०१/२०१६ व दि ०१/०१/२०१७ ची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी

महाराष्ट्र विकास सेवा गट ब मध्ये पदोन्नतीसाठी पात्र वर्ग ३ मधील विभागीय स्तरावरील दि ०१/०१/२०१६ व दि ०१/०१/२०१७ ची  तात्पुरती सेवा जेष्ठता यादी

महिलांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन

कोल्हापूर जिल्हा परिषद, महादेवराव महाडिक फौंडेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र कणेरी, ग्रामपंचायत मोरेवाडी, रंगनाथ हॉस्पीटल, तसेच देवराई संस्था यांचे संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आरोग्य शिबीर ग्राम पंचायत मोरेवाडी येथे आयोजित करणेत आले होते. महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबीराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सौ.शौमिका अमल महाडिक यांचे शुभ हस्ते करणेत आले. महिला ही सतत घरातील इतरांसाठी राबत असते. जोपर्यंत मोठा  आजार होत नाही तोपर्यंत प्रत्येक गोष्टीकडे कानाडोळा करीत असते. ही मानसिकता महिलांनी आता बदलली पाहिजे व महिलांनी सर्वप्रथम स्वत:च्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. हे आरोग्य शिबीर आयोजित करण्यामागचा मूळ हेतू असा होता की, काही प्राथमिक आजार हे पहिल्या टप्प्यातच निदर्शणास यावेत यासाठी विविध ठिकाणी या पुढेही महिलांचे आरोग्य शिबीरांचे आयोजन करणेत येणार आहे याचा सर्व महिलांनी  लाभ घेणेत यावा असे आवाहन मा.अध्यक्ष सौ. शौमिका महाडिक यांनी या प्रसंगी केले.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नलवडे, डॉ. प्रविण हेंद्रे, डॉ. सौ. अनुराधा सामंत, करवीरचे प्र.गट विकास अधिकारी श्री. भोसले, श्री. दत्तात्रय भिलुगडे, सौ.स्मिता हुदले, श्री. मनोज बागे, श्री. आशिष पाटील, आरोग्य सहाय्यक कर्मचारी व मोरेवाडी भागातील मोठया प्रमाणात महिला उपस्थित होत्या.

 

 

जिल्हा परिषदेत आंतरराष्ट्रीय योगदिवस साजरा

21 जून हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. तसेच, गेली 3 वर्षे हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणूनही साजरा केला जात आहे. त्याप्रमाणे तो जिल्हा परिषदेमध्ये साजरा करणेत आला. आंतरराष्ट्रीय योग दिनाप्रसंगी         दि. 21/06/2017 इ. रोजी सकाळी ठिक 10-00 वाजता श्री. शेखर खापणे, सूर्यकांत गणपतराव गायकवाड, पतंजली योगपीठ योग शिक्षक तसेच प्रमोद पाटील सहजसेवा ट्रस्ट यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. इंद्रजित देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चंद्रकांत वाघमारे व श्री. राजेंद्र भालेराव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. संजय राजमाने, श्री. नागणे, श्री. बरगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील इ. सर्व खातेप्रमुख अधिकारी, कर्मचाऱ्यांसह मोठ्या संख्येने जिल्हा परिषदेच्या टेरेसवर योग प्रात्यक्षिके केली.

तसेच यावेळी डॉ. पाटील यांनी हास्ययोगाचे धडेही उपस्थितांना दिले.

 

मुख्य कार्यकारी अधिकारी

साफसफाई निविदा

जिल्हा परिषद कोल्हापूर बांधकाम विभाग

 जाहिर ई-निवीदा  सुचना क्रं.22 सन 2017 18

 

कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील  मुख्य प्रशासकीय इमारत, कागलकर हाऊस , मा.अध्यक्ष निवासस्थान , मा. उपाध्यक्ष व विषय समिती सभापती निवासस्थान , येथिल साफ सफाई व स्वच्छता आणि आवारातील साफसफाई करणे करिता 1 वर्ष कालावधी करिता अधिकृत यंत्रणेकडुुन मा. कार्यकारी अभियंता (बांधकाम ) जि.प. कोल्हापूर हे पात्र निविदाधारकांकडून निविदा मागवित आहेत.

मुख्य प्रशासकीय इमारत, कागलकर हाऊस, मा.अध्यक्ष निवासस्थान, मा. उपाध्यक्ष व विषय समिती सभापती निवासस्थान,  साफ सफाई व स्वच्छता आणि आवारातील साफसफाई करणे कामासाठी  01 वर्ष मुदतीने करार तत्वावर ऑनलाईन ई-निविदा पध्दतीने निवीदा मागवित  आहेेत. कामाचा कालावधी 08 तास राहील.

Sr. No Name of work Amount put to tender Tender Form cost E.M.D. (1%)
1 Cleaning the Building  & Campus  @ Main Administrative  Office Building and Kagalkar House, Z.P. Kolhapur and President Residential Premises, Vice-President and Sabhapati Residential Premises, Z.P. Kolhapur

 

 

 

 

 

10,65,890/-

 

 

 

 

2000/- 10659/-

 

  • सदर कामांची जाहिर ई-निविदा सूचना खालील संकेत स्थळावर उपलब्ध आहे. http://mahatenders.gov.in / zpkolhapur.gov.in
  • सदर निविदा बाबतची सर्व कार्यवाही ऑनलाईन ई-निविदा पध्दतीने होणार आहे.
  • निविदा डाऊनलोड करणेची व ऑनलाईन भरणेची माहिती http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • निविदा डाऊनलोड करणेची मुदत दि.06.2017 रोजी सकाळी 11.00 वाजले पासून दि.04.06.2017 रोजी सकाळी 11.00 वाजे पर्यंत राहील.

5)           ऑनलाईन पध्दतीने ई-निविदा स्विकृती http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दि.19.06.2017 रोजी सकाळी 11.00 वाजले पासून

दि.04.06.2017 रोजी सकाळी 11.00 वाजे पर्यंत राहील.

  • निविदा फ़ॉर्म ची किंमत रक्कम रु.2000/- व इसारा रक्कम रु. 10659/- चे Tender Form Fee and Earnest  Money(EMD) both payments must be paid online. Bidder are requested to use SBI Internet Banking or Other Internet Banking in State Bank MOPS. Bidder should pay both  payments by using only concern site e.g.http://mahatenders.gov.in. Other payment mode shall not be accepted.
  • मक्तेदारांनी निविदा संच फी 1 % इसारा रक्कम ही मक्तेदारांनी स्वत:च्या बँक खाते मधून ऑनलाईन नेट बँकींग द्वारे भरणा करणे बंधनकारक आहे. ती भरणा केल्याचे बँक स्टेटमेंट (बँकेचा खाते उतारा पी.आर.एन यु.टी.आर नंबर ) स्कॅन करून  Enevelope No.1 (documents must be submitted in Packet 1) मध्ये अपलोड करणे बंधनकारक आहे.

9)         तांत्रीक लखोटा क्र.1 ऑनलाईन पध्दतीने दि.05.07.2017 रोजी सकाळी 11.00 वाजता http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावरून

कार्यकारी अभियंता (बांधकाम) नागाळा पार्क जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे कार्यालयात उघडणेत येईल.

10)       पात्र निविदा धारकांना वित्तीय निविदा उघडणेचा दिनांक व वेळ ई-मेल व्दारे कळविणेत येईल.

11)         एकूण निविदा रक्कमेच्या 5% रक्कम (इसारा रक्कम 1% वगळून) सुरक्षा अनामत रक्कम म्हणून चलनाने के.डी.सी.सी. बॅक शाखा जि.प. कोल्हापूर कडे

भरणा केले नंतरच करारपत्र करणेचे आहे.

12)        पात्र निविदा धारकाने विहित मुदतीत निविदा प्रक्रिया पूर्ण न केलेस त्याची इसार रक्कम खास जमा करणेत येईल.

13)        निविदा उघडलेल्या दिनांकापासून 90 दिवसा पर्यंत सदर निविदा वैध राहील.

14)        सदर निविदेबाबत वेळोवेळी प्रसिध्द करणेत येणारी शुध्दीपत्रके http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येतील

15)        कोणतीही किंवा सर्व निविदा स्विकारणे किंवा रद्द करणेचे अथवा विभागुन देणेचे अधिकार खाली सही करणार यांनी राखून ठेवले आहेत.

 

 

 

 

             कार्यकारी अभियंता ( बांधकाम )             मुख्य लेखा वित्त अधिकारी              अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी          

                जिल्हा परिषद कोल्हापूर                          जिल्हा परिषद कोल्हापूर                        जिल्हा परिषद कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये  शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत प्राथमिक शिक्षणाचा हक्क प्रदान झालेला आहे. या अनुषंगाने ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांची नियमित शाळेत १०० % पटनोंदणी होणेकरिता तसेच एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये शाळेच्या प्रथम दिवशी ‘शाळा प्रवेशेात्सव कार्यक्रम’ राबविणेबाबत सूचना देणेत आलेल्या होत्या. शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम यशस्वी होणेसाठी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये पदाधिकारी, अधिकारी यांच्या शाळाभेटींचे नियोजन करणेत आलेले होते. शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी सक्रिय सहभागी होणेसाठी जिल्हा परिषदेमार्फत आवाहन करणेत आले होते.

शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमांतर्गत आज जिल्ह्यातील शाळांमध्ये उत्साही वातावरणामध्ये शैक्षणिक सत्राची सुरुवात झाली. कोणतेही काम यशस्वी व्हावयाचे असेल तर त्याची सुरुवात चांगली असायला लागते. जिल्हा परिषद शाळांमधील आजचा प्रवेशाचा कार्यक्रम पाहता या शाळा नक्कीच गगनभरारी घेतील अशी आशा वाटते. जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांनी आज शाळेच्या प्रथम दिनानिमित्त शाळेत हजेरी लावून इयत्ता १ लीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे फुल देवून स्वागत केले. यामध्ये मा.आमदार सुरेश हाळवणकर यांनी संजीवन वि.मं. चंदूर ता.हातकणंगले, मा.आमदार डॉ.सुजित मिणचेकर यांनी वि.मं.मिणचे ता.हातकणंगले, मा.आमदार श्री.उल्हास पाटील यांनी कन्या वि.मं. दत्तनगर ता.शिरोळ, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी कुमार व कन्या वि.मं. गडमुडशिंगी ता.करवीर, मा.उपाध्यक्ष श्री.सर्जेराव पाटील यांनी कुमार वि.मं. कळे ता.पन्हाळा, मा.शिक्षण सभापती श्री.अंबरिष घाटगे यांनी वि.मं. गलगले ता.कागल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.इंद्रजित देशमुख यांनी कन्या वि.मं.वाकरे ता.करवीर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.चंद्रकांत वाघमारे यांनी वि.मं.कोथळी ता.करवीर, मा.शिक्षणाधिकारी श्री.सुभाष चौगुले यांनी कुमार व कन्या वि.मं.कुंभोज ता.हातकणंगले यांचेसह जिल्ह्यातील पदाधिकारी, अधिकारी यांनी विविध शाळांना भेटी देवून विद्यार्थ्यांचे स्वागत, मार्गदर्शन व शिक्षकांना प्रेरणा दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करणेत आले. तसेच शालेय पोषण आहारामध्ये गोड पदार्थ देणेत आला. अशा रितीने जिल्ह्यामध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला.

                                                                                      शिक्षणाधिकारी(प्राथ.)

                                                                                      जिल्हापरिषदकोल्हापूर

अंगणवाडी येथे नवीन मुलाचे शाळेत स्वागत कार्यक्रमाचे आयोजन

एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प कार्यालय  कोल्हापूर    ( ग्रामिण) कडील मुडशिंगी -2 बीट मधिल मौ.वसगडे गावातील एकुण 5 अंगणवाडी मध्ये दि. 15/6/2017 राजी नविन येणा-या मुला, मुलींचे  गुलाबाचे फुल व खाऊ  देवुन स्वागत करणेत आलेे .  त्यांच्या स्वागतासाठी मराठी मालीका तुझ्यात जिव रंगला, मधील अभिनेता श्री. हार्दीक जोशी (राणादा) उपस्थीत होते, तसेच श्रीमती सुरेखा विठ्ठल कदम, पर्यवेक्षिका, प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षीका, अंगणवाडी सेविका व मदतनिस, करवीर पंचायत समिती सदस्य आजी व माजी , ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व पालक वर्ग उपस्थीत होते.