विभागाची उद्दिष्टे व ध्येय :- तांत्रिक कामाचे उद्दिष्ट १००% पूर्ण केले जाते. शेतकर्यांकच्या आजारी जनावरांवर वेळेत औषधोपचार करुन मौल्यवान जनावरांचा जीव वाचविणे, तसेच निरनिराळया रोगांवर प्रतिबंधक लसीकरण करणे, माजावर आलेल्या गायींवर कृत्रिम रेतन करुन संकरीत वासरांची पैदास करणे. विविध पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देणे.
पशुसंवर्धन विभाग
पशुसंवर्धन विभाग
पशुसंवर्धन विभाग
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला व श्री महालक्ष्मीचे पवित्र तिर्थक्षेत्र असलेला व दक्षिण काशी म्हणून ख्यातनाम असलेला तसेच संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री जोतिर्लिंगाचे ऐतिहासिक महत्व प्राप्त असलेला व गडकोट किल्ल्याने वेढलेला सुजलाम सुफलाम असा हा कोल्हापूर जिल्हा कोकण पट्टीच्या पुर्वेकडील सहयाद्रीच्या रांगामध्ये व महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेस वसलेला आहे. या जिल्हयात वेदगंगा, दुधगंगा, हिरण्यकेशी, तुळशी, वारणा, पंचगंगा, कासारी, भोगावती नदया प्रवाहीत असून राधानगरी, तुळशी, काळम्मावाडी, पाटगाव इ. मोठी धरणे बांधलेली असून त्याचा उपयोग प्रामुख्याने शेतीसाठी होत असतो. तसेच तिलारी, राधानगरी येथे विदयुत निर्मितीचा मोठा प्रकल्प कार्यरत आहे.