राज्य पाणी व स्वच्छता मिशन साठी बौध् चिन्ह तयार करणेची स्पर्धा
ZP Kolhapur
आर.टी.ई. 25 टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया 31 ऑगस्टला बंद होणार !!! अद्यापही अनेक शाळांमध्ये प्रवेश शिल्लक
सन 2020-21 या शैक्षणिक वर्षामधील RTE अंतर्गत 25 % विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या https:// student.maharashtra.gov.in या वेबसाईटवरील RTE Portal या लिंकवर ऑनलाईन पध्दतीने राबविणेत येत आहे. मात्र कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा फटका प्रवेश प्रक्रियेलाही बसला आहे. अजूनही अनेक शाळांमध्ये आरटीईचे प्रवेश शिल्लक आहेत. त्यामुळे शाळांनी विहीत कालावधीत प्रवेश प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. येत्या 31 ऑगस्टला सदर प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन लॉक म्हणजेच बंद केली जाणार आहे अशा सुचना प्राथमिक शिक्षण सहसंचालकांनी दिलेल्या आहेत.कोल्हापूर जिल्हयामध्ये RTE अंतर्गत 345 शाळांमधील 3486 जागांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. एकूण 2996 ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले असून NIC सेंटर, पुणे यांचेकडून प्रथम फेरीतील प्रवेशासाठी 2388 विद्यार्थ्यांची निवड करणेत आलेली आहे. मात्र त्यापेकी केवळ 1016 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले असून अद्याप 1372 विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रलंबित आहेत. RTE प्रवेश प्रक्रियेसंदर्भात शिक्षण सहसंचालक श्री. दिनकर टेमकर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली असून त्यामध्ये सदर प्रवेश प्रक्रिया 31 ऑगस्टपर्यंत राबविली जाणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे उर्वरीत मुदतीत शाळांनी RTE प्रवेश प्रक्रिया राबविताना अधिकाधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.प्रलंबित विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणेसाठी शाळांनी पालकांशी संपर्क साधावा व विहीत मुदतीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केलेले आहे. सही/- (श्रीम. आशा उबाळे) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, कोल्हापूर
राज्यातील सर्व नागरिकांना अर्सेनिक अल्बम 30 व संशमनी वटी औषधाचे मोफत वाटप केले जाणार- मा ना. हसन मुश्रीफसो, ग्रामविकास मंत्री,महाराष्ट्र शासन
मा.नाम.हसन मुश्रीफसो, मंत्री, ग्रामविकास, महाराष्ट्र शासन यांनी घेतलेले निर्णयानूसार महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जनतेला रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे अर्सेनिक अल्बम 30 व संशमनी वटी याचे शासन स्तरावरुन मोफत वाटप केले जाणार आहे. याचा कोल्हापूर जिल्ह्यातील शुभारंभ आज दि.. 15 ऑगस्ट 2020 रोजी संपन्न झाला.याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात 25 नागरिकांना मा ना हसन मुश्रीफसो,ग्राम विकास मंत्री व मा ना सतेज पाटीलसो,पालकमंत्री कोल्हापूर यांचे शुभहस्ते औषध वाटप करणेत आले. कोल्हापूर जिल्ह्यातील वय वर्षे 5 ते 55 या वयोगटातील एकूण 23,31,199 नागरिकांना अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक रोगप्रतिकार शक्ती गोळयांचे वाटप व वय वर्ष 55 वयोगटावरील एकूण 4,50,617 नागरिकांना अर्सेनिक अल्बम 30 होमिओपॅथिक व संशमनी वटी आयुर्वेदिक रोगप्रतिकार शक्ती गोळयांचे वाटप येत्या 15 दिवसांमध्ये केले जाणार आहे.ग्राम पंचायत क.सांगाव, ता. कागल, पाचगांव ता.करवीर ,गडमुडशिंगी ता.करवीर, आसुर्ले ता.पन्हाळा, व वठार ता.हातकणंगले या ग्रामपंचायत मधील नागरिकांना प्रातिनिधिक स्वरूपात औषध वाटप करणेत आले.
तसेच सद्या कोरोना प्रार्दुभावामुळे जि.प. सर्वसाधारण सभा व इतर सभा ऑनलाईन पध्दतीने घेतल्या जात आहेत. याकरीता जिल्हा परिषदेचे स्वनिधी मधून जिल्हा परिषद सदस्य 67 व पंचायत समिती सभापती 12 यांचेसाठी एकूण 79 टॅबची खरेदी करणेत आलेली आहे. त्याचे प्रातिनिधीक स्वरुपात मान्यवरांचे हस्ते जिल्हा परिषद,कोल्हापूर कडील 7 जिल्हा परिषद सदस्यांना टॅबचे वाटप करणेत आले.कोविड 19 या पार्श्वभुमीवर जिल्हा परिषद कामकाज ऑनलाईन पध्दतीने करणेसाठी, शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळणे, व्हीडिओ कॉन्फरन्सींगव्दारे विविध सभांमध्ये सहभाग घेणे यासाठी सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती यांचेसाठी टॅब उपलब्ध करुन देणेबाबत खास बाब म्हणून ग्राम विकास विभागाकडून मान्यता मा.नाम.हसन मुश्रीफ, मंत्री, ग्रामविकास, महाराष्ट्र शासन यांनी दिलेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे कामकाज ऑनलाईन घेणेस मदत होणार आहे.मा.ग्राम विकास मंत्री महोदय यांनी जिल्हयामध्ये सर्व गावपातळीवर औषधाचे वाटप लवकरच करणेत येईल. व नागरीकांनी कोविड आजाराचे भय मनामध्ये न बाळगता, तपासण्या करुन आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी. तसेच जिल्हयामध्ये मोठया प्रमाणात तपासणी करणेची मोहिम येणा-या दिवसामध्ये गतीने घेणेची कार्यवाही करणेत येत असलेचे सांगितले. कोल्हापूर शहरामधील बरेच खाजगी रुग्णालय यांचे कडूनही उत्क़ष्ट काम करीत आहेत. जे दवाखाने अद्यापही रुग्णावर उपचार करीत नाहीत. त्यांनी पुढे येऊन त्यांनी त्यांची सेवा समाजासाठी करावी अन्यथा मेसमा लावणेची कार्यवाही प्रशासनाकडून केली जाईल असे मत व्यक्त केले.कोल्हापूर येथील शासकिय विश्रामग़ह मधील राजर्षि शाहू सभाग़हात बोलतांना अध्यक्षीय भाषणामध्ये मा ना सतेज पाटील,गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्री सोा यांनी कोरोना झपाटयाने वाढत आहे,मात्र सर्व जिल्हा परिषद सदस्यांना त्यांचे प्रभागात जावून, मोजक्या कार्यकत्यांना घेऊन कोरोना बाधित रुग्णाना भेटी देवून, व गावं पातळीवर येणा-या अडचणी समजावून घेऊन आम्हास कळवाव्या त्या प्रमाणे उपायोजना करता येईल असे आवाहन केले व वाढती संख्या प्रमाणे मोठया प्रमाणात सुसज्ज बेडस व सर्व तालुक्यामध्ये ॲाक्शीजन ची सोई करणेत आलेल्या आहेत. त्यामुळे शहराकडे बाधित रुग्णांचा येणारा लोढा कमी केलेला आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत श्री अमन मित्तल,मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले तसेच श्री बजरंग पाटील अध्यक्ष व श्री सतीश पाटील,उपाध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास मा.दौलत देसाई, जिल्हाधिकारी, मा.हंबीराव पाटील,सभापती बांधकाम व आरोग्य , मा.प्रविण यादव, सभापती, शिक्षण व अर्थ समिती, सौ.पदमाराणी पाटील, सभापती, महिला व बाल कल्याण, सौ.स्वाती सासणे, सभापती, समाज कल्याण, जि.प.सदस्य, श्री.जयवंत शिंप्पी, श्री.भगवान पाटील, श्री.विनय पाटील, श्री.विजय भोजे, श्री.राहुल पाटील, श्रीम.कोमल मिसाळ, श्री.शंकरराव पाटील, श्री.रविकांत आडसुळ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी(साप्रवि), श्री.योगेश साळी,जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. कडील अन्य अधिकारी, व जि.प.कोल्हापूर कडील कर्मचारी उपस्थित होते. श्री.प्रविण यादव,सभापती शिक्षण व अर्थ समिती यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.