ZP Kolhapur
बालस्नेही पंचायत पथदर्शी ब्लॉक कोऑर्डिनटोर मुलखात प्रक्रिया
बालस्नेही पंचायत पथदर्शी ब्लॉक कोऑर्डिनटोर मुलखात प्रक्रिया
स्वच्छता पथकाचा जिल्हा परिषदेकडुन निरोप समारंभ -मा.अध्यक्ष श्री. राहुल पाटील यांच्या हस्ते पथकातील कर्मचा-यांना प्रशस्तीपत्र देवून आभार व्यक्त करणेत आले.
जिल्हयातील अतिवृष्टी व महापुरामुळे बाधित झालेल्या गावांमध्ये स्वच्छतेचेे काम चांगल्या पध्दतीने पार पाडून बहुमूल्य योगदान दिलेबद्दल पुणे महानगरपालिका स्वच्छता पथकाला मा. श्री. राहुल पाटील , अध्यक्ष, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून आभार व्यक्त करणेत आले. जिल्हयातील पुरग्रस्त गावांमध्ये स्वच्छतेसाठी पुणे येथून जिल्हयामध्ये दाखल झालेले पथकाने शिये, तालुका करवीर, चंदुर, इंगळी तालुका हातकणंगले, व शिरटी, हासुर, नांदणी, कवठेगुलंद, हेरवाड, खिद्रापूर, अकिवाट, बस्तवाड, तालुका शिरोळ या 11 गावांमध्ये स्वच्छतेचे चांगले काम केले. याबदल मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद, कोल्हापूर व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करणेत आला होता. यावेळी बोलताना ,जिल्हयातील अतिवृष्टी आणि पुरपरिस्थतीनंतर पुरपश्चात करावयाच्या स्वच्छतेसाठी, पुणे महानगर पालिका स्वच्छता पथकाकडुन गाव स्तरावर केलेले काम हे कौतुकास्पद असुन , यामुळे स्वच्छतेच्या कामास गती मिळाली आहे. यापुढे आपणाकडुन असेच सहकार्य मिळावे असे आवाहन मा. श्री. राहुल पाटील, अध्यक्ष, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी यावेळी केले.
यावेळी, पुणे महानगर पालिका स्वच्छता पथकाचे आरोग्य निरिक्षक श्री. राजेश रासकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, पुरग्रस्त गावांमध्ये स्वच्छतेचे काम करत असताना, अनेक अडचणी आल्या पण तालुका आणिजिल्हा स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांनी सहकार्य केल्यामुळेच स्वच्छतेचे काम चांगल्या प्रकारे करता आलेचे सांगितले. याकार्यक्रमाला श्री. अजयकुमार माने, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. राहूल कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, पुणे महानगर पालिका स्वच्छता पथक कर्मचारी व जिल्हा परिषद कर्मचारी उपस्थित होते.
*महापुरानंतर स्वच्छते साठी नृसिंहवाडी येथे जिल्हा परिषदेमार्फत स्वच्छता श्रमदान*
जिल्ह्यातील महापूर ओसरला असून पुर बाधित सर्व गावांमध्ये स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाची कामे सुरु आहेत याच पार्श्वभूमीवर आज ग्राम पंचायत नृसिंहवाडी, ता. शिरोळ येथे मा. श्री. संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता श्रमदान मोहीम राबविण्यात आली. यावेळी त्यांनी स्वतः रस्त्यांवर साचलेला गाळ उपसण्यासाठी श्रमदान केले.
या श्रमदानासाठी जिल्हास्तरावरून मा.श्रीम. प्रियदर्शिनी मोरे, प्रकल्प संचालक , जलजीवन मिशन , जि.प.कोल्हापूर, मा.श्री. अरुण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रा.पं) जि.प.कोल्हापूर, मा.श्री राहूल कदम, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जि .प. कोल्हापूर , तसेच पाणी व स्वच्छता विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
तालुका स्तरावरून मा.श्री. एस. एस. कवितके , गटविकास अधिकारी, शिरोळ व पंचायत समिती स्तरावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ग्राम पंचायत नृसिंहवाडीच्या सरपंच मा. सौ. पार्वती कुंभार, सामाजिक कार्यकर्ते श्री. दादेपाशा पटेल, ग्राम पंचायत सदस्य, ग्राम सेवक तसेच सर्व ग्राम पंचायत कर्मचारी व ग्रामस्थ यांनी श्रमदानातून गाळ काढण्याचे काम केले. या श्रमदानासाठी शेजारील गावातून मजूर घेण्यात आले होते. सकाळी ७ वाजल्यापासून श्रमदानाला सुरुवात झाली होती.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी केलेबाबत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती जिल्हा परिषद , कोल्हापूर येथे शुक्रवार दिनांक 30/4/2021 रोजी सकाळी 11.00 वाजता साजरी करणेत आली . या वेळी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजयकुमार माने यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण् करणेत आला. यावेळी कक्ष अधिकारी श्री. संजय अवघडे , प्रकाश देसाई , हे उपस्थित होते. तसेच सोशल डिस्टनसिंग पाळुन मर्यादीत संख्येने इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
तरी सदरची बातमी आपले लोकप्रिय दैनिकातुन प्रसिध्द करणेत यावी हि विनंती .
सही/-
मनीषा देसाई
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.)
जिल्हा परिषद, कोल्हापूर
गांधीनगर येथील कच-याचे होणार अंतिम व्यवस्थापन
आम. ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत बायो-मायनिंग कामाचा शुभारंभ
गांधीनगर, ता. करवीर येथील डंपींग ग्राऊं ड वरील जमा झालेल्या सुमारे 6000 टन कच-याचे बायो मायनिंगव्दारे व्यवस्थापन केले जाणार आहे. सदर कामाचा शुभारंभ आज मा.आम. ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. तसेच यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. संजयसिंह चव्हाण उपस्थित होते.उद्योजकांची सामाजिक जबाबदारी (सी.एस. आर.) अंतर्गत रिकार्ट इंडीया, दिल्ली व हिंद ॲग्रो अँड केमिकल्स, कोल्हापूर या कंपनीव्दारे कचरा बायो-मायनिंगचे काम केले जाणार आहे. यामधे ओला व सुका कचयाचे वर्गीकरण केले जाणार आहे. यातील सुका कचरा हा सिमेंट फॅक्टरीला दिला जाणार आहे तर ओला कचरा हा स्थानिक शेतकयांना खत निर्मितीसाठी अथवा जमिन भरावाच्या कामासाठी वापरला जाणार आहे. कचरा वर्गीकरण आणि वहन करण्याचे काम कंपनीव्दारेच केले जाणार असून या संपूर्ण कामासाठी अंदाजे रू. 15 लाख इतका खर्च येणार आहे. ग्राम पंचायतीकडून या प्रकल्पासाठी लागणारी वीज पुरवली जाणार आहे. या प्रकल्पामुळे गांधीनगर ग्राम पंचायतीचा वर्षानुवर्षे साठलेल्या कच-याचा प्रश्न सुटणार आहे.
या शुभारंभ कार्यक्रमासाठी प्रकल्प संचालक,(जल जीवन मिशन) प्रियदर्शनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) अरूण जाधव, गट विकास अधिकारी, करवीर जयवंत उगले, विस्तार अधिकारी संदेश भोईटे, सरपंच रितू लालवाणी, ग्रामविकास अधिकारी चंदन चव्हाण, ग्राम पंचायत सदस्य, कंपनीचे प्रतिनिधी श्री. सुरज शिंदे, निरंजन ठमके, कौस्तुभ पाटील तसेच ग्राम पंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रियदर्शिनी चं मोरे
प्रकल्प व्यवस्थापक(ज.जी.मि.)
जिल्हा परिषद, कोल्हापूर