सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा COTPA-2003 (New)
admin
गोवर रुबेला लसीकरण मोहिमेत जिल्हा अग्रेसर
गोवर रुबेला लसीकरण मोहिम कोल्हापूर जिल्हयामध्ये 27 नोव्हेंबर 18 पासून मोठया उत्साहत सुरुवात झाली आहे. या मोहिमेमध्ये सर्व लोकप्रतिनिधिनी सहभागी झाले असून जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय आशा विविध ठिकाणी शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित होते. या मोहिमेमध्ये 9 महिने ते 15 वयोगटातील एकुण 767340 इतके लाभार्थी निश्चित झाले असून मोहिम सुरु झालेपासून केवळ 09 दिवसामध्ये 378437 इतक्या मुला-मुलीना लसीकरण करण्यात आले असून हे काम एकुण उदिदष्टाच्या 49 टक्के झाले आहे. लस दिलेल्या 378437 लाभार्थ्या पैकी केवळ 03 मुलांना लसीकरणा नंतर किरकोळ स्वरुपाच्या गुंतागुंत आढळली आहे. गुंतागुंतीचे प्रमाण हे 0.0007 टक्के इतके अत्यल्प आहे.
गुंतागुंतीचे प्रमाण अत्यल्प असले तरी गुंतागुंत झालेल्या लाभार्थीला तत्काळ उपचार, संदर्भ सेवा तज्ञ मार्फत उपलब्ध करुन देण्यात आल्या असून नागरिकांनी न घाबरता आपल्या मुला-मुलीनां लसीकरण करुन घ्यावे व आपल्या पाल्यांना गोवर, रुबेला सारख्या जीव घेण्या आजारापासून संरक्षीत करावे. गोवर रुबेलाची लस अत्यंत सुरक्षीत व परिणामकारक आहे. ही लस महाराष्ट्रमध्ये पुणे येथे उत्पादित होत असून जगभरातील 70 देश हया लसीचा वापर करीत आहेत. राज्यात पहिल्यांदाच मोठया प्रमाणात इंनजेक्टेबल मोहिम होत आहे. लसीकरण प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हयातील सर्व प्रकारच्या शाळा, अंगणवाडी व आरोग्य संस्था आशा विविध ठिकाणी 8500 सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सत्राच्या ठिकाणी सर्व साधन सामुग्रीनी सुसज्ज, प्रशिक्षीत लसीकरण पथक, अत्यावश्यक औषधसाठासह तज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपलब्ध ठेवण्यात आला आहे. प्रत्येक बालकांच्या सुरक्षतेसाठी नवीन सुई (auto disposable synringe) चा वापर करण्यात येत आहे. लसीकरणानंतर मुलांना अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवण्यात येत असून कोणत्याही प्रकारची गुंतागुंत होणार नाही यांची दक्षता घेण्यात येत आहे. गोवर रुबेला आजाराचे उच्चाटन होणेसाठी सर्व पालकांनी 100 टक्के सहभाग घेवून मोहिम यशस्वी करावी व एक सशक्त भारत देश घडवण्याचे योगदान दयावे.
या मोहिमेध्ये सर्व लोकप्रतिनिधी, रोटरी क्लब, लायन्स क्लब, स्वयंसेवी संस्था, वैद्यकीय संघटना आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, आशा, शिक्षण विभाग, महिला बाल कल्याण विभाग, ग्रामपंचायत विभाग , जिल्हा माहिती कार्यालय, प्रिन्ट मेडिया, इलेक्टॉनीक मेडिया यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. यापुढे मोहिम पूर्ण होई पर्यत असेच सहकार्य मिळावे असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने अहवान करण्यात येत आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद कोल्हापूर
दिनांक 06/12/2018 इ. रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा केलेबाबत.
दिनांक 06 डिसेंबर 2018 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना जिल्हा परिषद, कोल्हापूर च्या वतीने सकाळी ठिक 11-00 वाजता आदरांजली वाहणेत आली. त्या प्रसंगी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व मा. शिक्षण व अर्थ समिती सभापती श्री. अंबरिषसिंह घाटगे यांच्या हस्ते फोटो पूजन करणेत आले.
यावेळी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी देश,समाज, विद्यार्थी यांच्या हितासाठी आंबेडकरांचे योगदान,या विषयी माहिती दिली. मा. उपाध्यक्ष श्री. सर्जेराव पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) रविकांत आडसुळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) राजेंद्र भालेराव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.क.) सोमनाथ रसाळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. संजय राजमाने, शिक्षणाधिकारी (प्राथ.) आशा उबाळे, शिक्षणाधिकारी (माध्य.) किरण लोहार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व प्रभारी समाज कल्याण अधिकारी डॉ संजय शिंदे, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्यासह सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.
श्री. बी.पी.माळवे सहाय्यक शिक्षक यांनी सुत्रसंचलन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती दिली. यावेळी मोठया संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कृपया वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिध्द करणेकामी कार्यवाही करणेत यावी, ही विनंती.
सही/-
(रविकांत आडसुळ)
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)
जिल्हा परिषद, कोल्हापूर
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि शाश्वत स्वच्छतेसाठी डिजीटल व्हॅन द्वारे जिल्ह्यात जनजागृती
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद कोल्हापूर
किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमास सुरूवात
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत तालुकास्तरीय प्रशिक्षणास दि. 26.11.2018 रोजी पासून सुरूवात झाली आहे. वैयक्तिक स्वच्छतेमधील अतिशय महत्वाचा मानला जाणार विषय हा शालेय मुलींपर्यंत पोहचविणे तसेच या विषयाबाबत शास्त्रशुध्द माहिती मुलींना मिळावी. त्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी मासिक पाळी व्यवस्थापन हा कार्यक्रम राबविला जात आहे.
दि. 26.11.2018 रोजी पंचायत समिती भुदरगड, चंदगड, करवीर, राधानगरी, हातकणंगले, आजरा, गगनबावडा, गडहिंग्लज या तालुक्यांमध्ये या प्रशिक्षणास सुरवात झाली आहे. तालुकास्तरीय पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. जिल्हा स्तरावरून तालुकानिहाय प्रशिक्षण वेळापत्रक देण्यात आले आहे. यानुसार तालुकास्तरावर एकूण 2534 सहाय्यक प्रविण प्रशिक्षक हे प्रशिक्षण घेणार आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत यापूर्वी जिल्हास्तरावर प्रविण प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये प्रशिक्षण घेतलेल्या प्रविण प्रशिक्षकांमार्फत तालुकास्तरीय सहाय्यक प्रविण प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे. तालुकास्तरीय प्रशिक्षक हे प्रत्यक्ष शाळांमध्ये 6 सत्रांमध्ये मुलींना प्रशिक्षण देतील असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.
प्रशिक्षणादरम्यान मासिक पाळीबाबत माहिती पुस्तिका, हॅन्डबुक आणि लॅमिनेटेड चार्ट असे प्रशिक्षण साहित्य वाटप करण्यात आले. या प्रशिक्षणाचे आयोजन पाणी व स्वच्छता विभागामार्फत करण्यात आले आहे.
(प्रियदर्शिनी चं.मोरे)
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (पा. व स्व.)

दिनांक 26/11/2018 इ. संविधान दिन साजरा केलेबाबत.
26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे दि. 26/11/2018 रोजी सकाळी ठिक 11-00 वाजता साजरा करणेत आला. त्या प्रसंगी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल हे अध्यक्षतेस्थानी होते. यावेळी मा. शिक्षण व अर्थ समिती सभापती श्री अंबरिषसिंह घाटगे, मा. प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) रविकांत आडसुळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) राजेंद्र भालेराव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.क.) सोमनाथ रसाळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. संजय राजमाने, शिक्षणाधिकारी (प्राथ.) आशा उबाळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ संजय शिंदे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, यांच्यासह सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.
श्री. बी.पी.माळवे सहाय्यक शिक्षक यांनी सुत्रसंचलन व भारतीय संविधाना विषयी माहिती दिली. या प्रसंगी उद्रदेश पत्रिकेचे सामुहिक वाचन करणेत आले. तसेच 26/11 च्या मुंबईवरील अतिरेकी हल्यात शहिद झालेल्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहणेत आली. यावेळी मोठया संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सही/-
(रविकांत आडसुळ)
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)
जिल्हा परिषद, कोल्हापूर