कळंबा तर्फ ठाणे, ता करवीर येथे जयंती नदीपत्रात कळंबा तलाव परिसरात नमामी पंचगंगे उपक्रमा अंतर्गत श्रमदानाद्वारे स्वच्छता करण्यात आली.
या श्रमदानामध्ये मा श्री अमल महाडिक, विधानसभा सदस्य, मा श्री अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि प कोल्हापूर, प्रियदर्शिनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सचिन घाडगे, गटविकास अधिकारी, मंगेश शिंदे, सहा. आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका, श्री प्रकाश टोणपे, सागर भोगम,सरपंच, कळंबा, संग्राम पाटील, सरपंच, पचगाव, जि प ,पं स, महागरपालिका कर्मचारी यांनी योगदान देऊन 30 टन कचरा संकलित करणेत आला.
admin
नमामि पंचगंगे ” अंतर्गत प्रयाग चिखलीच्या घाटावर महाश्रमदान स्वच्छतेसाठी २६३ जणांनी केले श्रमदान
गेल्या वर्षभरामध्ये पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी अनेक व्यक्ती, संस्था आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. तसेच जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत देखील दि. २४ जून २०१८ पासून नमामि पंचगंगे हा उपक्रम हाती घेतला. दिनांक २४ मे २०१८ ते ११जून २०१८ या कालावधीत पहिल्या टप्प्यात नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये दोन गावामध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आले. तसेच पर्यावरण पूरक गणेश उत्सव उपक्रमाद्वारे नदी प्रदूषण थांबविण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविण्यात आला. नदी प्रदूषणास कारणीभूत ठरणा-या नदी काठच्या गावांना या वर्षभरात घ्यावयाचे जनजागृती उपक्रम आणि श्रमदानाचे उपक्रम देण्यात आले होते. त्याप्रमाणे या गावामध्ये श्रमदानातून बंधारे घालणे, कर्दळ लागवड करणे, श्रमदानातून स्वच्छता करणे तसेच चित्ररथ आणि पथनाट्य च्या माध्यमातून जनजागृती करणे असे उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांना सर्वच गावामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला.
याच पद्धतीने प्रदूषण मुक्तीच्या पुढच्या टप्प्यातील उपक्रमांचा शुभारंभ हा आज प्रयाग चिखली येथील पंचगंगा नदीच्या घाटाची स्वच्छता करून करण्यात आला आहे.
या महाश्रमदानासाठी मा. शौमिका महाडिक, अध्यक्ष, जिल्हा परिषद कोल्हापूर, मा. श्री. मल्लिनाथ कलशेट्टी, आयुक्त, कोल्हापूर महानगर पालिका, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल,जि. प. कोल्हापूर, मा. आर.पी. शिवदास, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.कोल्हापूर, मा. अजयकुमार माने, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कोल्हापूर, मा. संजय राजमाने, मुख्य लेखा व वित्त अधिकारी,जि. प. कोल्हापूर,मा. राजेंद्र सूर्यवंशी, सभापती, पंचायत समिती करवीर, मा. सौ. प्रियांका पाटील, सदस्या, जि. प. कोल्हापूर, मा. श्री.रवीकांत अडसूळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि), मा. श्री राजेंद्र भालेराव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप), श्रीम.प्रियदर्शिनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा. व स्व.), मा. सोमनाथ रसाळ, महिला व बालकल्याण विकास अधिकारी, जि. प. कोल्हापूर, मा. डॉ. एस. एस. शिंदे, समाजकल्याण अधिकारी, मा. श्री. चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा कृषी अधिकारी, मा. डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर तसेच मा. मोहन पाटील, सदस्य, पंचायत समिती करवीर, मा. सचिन घाडगे, गटविकास अधिकारी पंचायत समिती करवीर, श्री. उदय गायकवाड, मा. उमा पाटील, सरपंच, प्रयाग चिखली, मा. सौ. अपर्णा पाटील, सरपंच, वरणगे, तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी व जिल्हा परिषद कर्मचारी आदी उपस्थित होते.
या श्रमदानातून पंचगंगा नदी घाट परिसर आणि नदी पात्रातून सुमारे ४ टन कचरा संकलित करण्यात आला. कचऱ्यामध्ये प्लास्टिकच्या वस्तू, जुने कपडे, पत्रावळ्या, तुटलेल्या काचा, फ्रेम, बूट- चप्पल, काचेच्या बाटल्या इ. वस्तू कचरा स्वरूपात जमा करण्यात आल्या.
या श्रमदानासाठी जिल्हा परिषद कोल्हापूर तसेच पंचायत समिती करवीर आणि पन्हाळा येथील कर्मचारी, ग्रामस्थ, तसेच तरुण मंडळे यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. यामध्ये २६३ जणांनी स्वच्छतेसाठी श्रमदान केले.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष
दि. १७ जून २०१९ रोजी प्राथमिक शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचेआयोजन
बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत प्राथमिक शिक्षणाचा हक्क प्रदान झालेला आहे. या अनुषंगाने ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांची १००% पटनोंदणी होणेकरिता जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्येशाळेच्या प्रथमदिवशी ‘शाळा प्रवेशेात्सव कार्यक्रम’ राबविणेत येत आहे. या कार्यक्रमांतर्गत शाळेच्या प्रथम दिनी म्हणजेच १७ जून २०१९ इ. रोजी शाळेमध्ये नव्याने प्रवेशित होणाऱ्या बालकांचे स्वागत करणेत येणार आहे. तसेच मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण, शालेय पोषण आहारामध्ये गोड पदार्थाचे वाटप असे उपक्रम राबविणेत येणार आहेत. शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम यशस्वी होणेसाठी शाळापूर्व तयारी, शाळांची जाहिरात पत्रके, शाळा व्यवस्थापन समिती नियोजन बैठक, पटनोंदणी प्रभात फेरी अशा उपक्रमांचे आयोजन करणेत येत आहे. १००% पटनोंदणी, नियमित उपस्थिती तसेच गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, माध्यान्ह भोजन योजना अशा विद्यार्थी हिताच्या विविध योजना प्राथमिक शाळांमध्ये राबविणेत येत आहेत.
शासकीय तसेच स्वनिधीमधील विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळालोकाभिमुख होणेस मदत झालेली आहे.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सर्वतोपरी योगदान देत असून त्याला समाजाचीही साथ मिळण्याची गरज आहे.जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रथम दिनानिमित्त पदाधिकारी, अधिकारी यांच्या शाळा भेटींचे नियोजन करण्यात आले आहे.
शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती-जिल्हा परिषदसदस्य, आमदार, खासदार इ. लोकप्रतिनिधींसह शासकीय अधिकारी यांनी सक्रीय सहभागी होणेचेतसेच पालकांनी ६ ते १४ वयोगटातील सर्व दाखलपात्र बालकांची पटनोंदणी जिल्हा परिषदेच्या शाळेत करणेचेआवाहनजिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अमन मित्तल, शिक्षण समिती सभापती श्री.अंबरिषसिंह घाटगे व प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ.आशा उबाळे यांनी केले आहे.
शिक्षणाधिकारी(प्राथ.)
जिल्हापरिषदकोल्हापूर
आर.टी.ई. 25 टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया 2019-20 अंतर्गत दुस-या प्रवेश फेरीस सुरूवात
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये (वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देणेसाठी जागा राखून ठेवण्याची रीत) नियम 2012 प्रमाणे अल्पसंख्यांक शाळा वगळता, राज्यातील सर्व विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यता तत्त्वावरील प्राथमिक शाळांमध्ये पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 % पर्यंतच्या जागा नजीकच्या परिसरातील वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. या अंतर्गत सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामधील 25 % आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या https:// student.maharashtra.gov.in या वेबसाईटवरील RTE Portal या लिंकवर ऑनलाईन पध्दतीने राबविणेत येत आहे.
सदर प्रक्रियेअंतर्गत पहिली प्रवेश फेरी पार पडलेली आहे. आता प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे कार्यालयाकडून राज्य स्तरावर दि. 15/06/2019 इ. रोजी दुसरी लॉटरी काढणेत आलेली आहे. दि. 17/06/2019 इ. रोजी NIC सेंटर, पुणे यांचेकडून दुस-या प्रवेश फेरीसाठी विद्यार्थी निवड यादी RTE पोर्टलवर अपलोड करणेत येणार आहे. तसेच संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाईलवर शाळेच्या नावासह SMS पाठविणेत येणार आहेत. मात्र पालकांनी मेसेजवर अवलंबून न राहता RTE पोर्टलवरील Application Wise Details अथवा SELECTED व NOT SELECTED या टॅबवर जाऊन आपला फॉर्म नंबर लिहून लॉटरीची खात्री करावी. ज्यांचे नाव NOT SELECTED मध्ये असेल अशा अर्जांसाठी प्रवेशाची पुढील फेरी काढण्यात येईल. ज्यांची निवड झालेली आहे, त्यांनी पोर्टलवर जाऊन आपला भरलेला फॉर्म USER ID व पासवर्ड टाकून ओपन करावा. त्यामध्ये ADMID CARD या TAB वर क्लिक करून त्याची प्रिंट काढावी. पालकांनी सदरची प्रिंट व प्रवेशासंबंधीची सर्व कागदपत्रे घेऊन शहरी भागासाठी महानगरपालिका व ग्रामीण भागासाठी संबंधित तालुक्याच्या पंचायत समितीतील शिक्षण विभागात जावयाचे आहे. तेथील शाळा पडताळणी समितीकडे आपले ADMIT CARD व प्रवेशासंबंधीची सर्व मूळ कागदपत्रे सादर करून तपासून प्रमाणित करून घ्यावयाची आहेत. विद्यार्थी प्रवेशासाठी नियमानुसार पात्र असलेबाबत गटशिक्षणाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे पत्रासह पालकांनी संबंधित शाळेत जाऊन पाल्याचा प्रवेश निश्चित करावयाचा आहे. पालकांनी शाळा पडताळणी समितीकडून कागदपत्रे न तपासता परस्पर शाळेत गेलेस पाल्यास प्रवेश दिला जाणार नाही. शाळांनीही पडताळणी समितीने शिफारस केलेखेरीज कोणत्याही विद्यार्थ्यास RTE च्या 25 % कोटयातून प्रवेश द्यावयाचा नाही. पडताळणी समितीने अपात्र ठरविलेल्या बालकांची निवड रद्द करणेत येईल.
दुस-या फेरीतील विद्यार्थी प्रवेशाचा कालावधी RTE पोर्टलवर नमूद करणेत येणार आहे. सदर कालावधीत संबंधित पालकांनी शाळांमध्ये प्रवेश निश्चित न केल्यास त्यांना पुढील फेरीमध्ये पुन्हा संधी दिली जाणार नाही. त्यामुळे पालकांनी शाळा प्रवेशाच्या बाबतीत दक्ष राहून विहीत मुदतीत शाळा पडताळणी समितीकडून कागदपत्रे तपासून शाळेमध्ये प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केलेले आहे.
(श्रीम. आशा उबाळे)
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जिल्हा परिषद, कोल्हापूर
वॉल पेंटिंगमधून पर्यावरणाचा जागरजिल्हा परिषदेमार्फत पर्यावरणपूरक उपक्रमांचा शुभारंभ
जागतिक पर्यावरण दिन ५ जून २०१९ च्या औचित्याने पाणी व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत जिल्हा परिषद मुख्यालयाच्या मागील भिंतीवर पर्यावरणपूरक आणि स्वच्छता संदेशांचे वॉल पेंटिंग करून पर्यावरण पूरक उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.या शुभारंभ कार्यक्रमासाठी मा. डॉ. श्री आर. पी. शिवदास, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर, मा. श्री. संजय राजमाने, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर, मा. श्रीम. प्रियदर्शिनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व ),जिल्हा परिषद कोल्हापूर, मा. श्री. चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर, मा. श्री. राहुल कदम,उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर, तसेच मा. प्रा. श्री. संदीप दीघे, प्राचार्य, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हौसिंग कॉलेज ऑफ आर्किटेक्चर , मा. श्रीम. वंदना पुसाळकर, आकांशा नरोडे, रोहिणी कलंबे उपस्थित होते.
या वेळी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हौसिंग कॉलेज ऑफ आर्किटेक्चर या कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून भित्तिचित्रे काढण्यात आली. या वेळी रंगकाम करणाऱ्या विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या रंगकामामध्ये पर्यावरण पूरक आणि स्वच्छता संदेश देण्यात आले आहेत. प्रामुख्याने पाण्याचा योग्य वापर, सांडपाणी व्यवस्थापन, तसेच प्लास्टिकचे दुष्परिणाम आणि स्वछता संदेश यासारख्या पर्यावरणाशी निगडित समस्यांवर आधारित वॉल पेंटिंग करण्यात आले.
या नंतर जिल्हा परिषद मुख्यालयातील रोप वाटिकेच्या आवारात बसविण्यात आलेल्या गांडूळ खत प्रकल्पाचेही यावेळी उदघाटन मान्यवरांचे हस्ते करणेत आले. तसेच जिल्हा परिषद मुख्यालयाच्या मागील बाजूस वृक्षारोपणही करणेत आले. या उपक्रमामध्ये वसुंधरा ग्रुपच्या स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला. या उपक्रमाचे नियोजन मा. शौमिका महाडिक, अध्यक्ष, जि. प. कोल्हापूर आणि मा. अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली पाणी व स्वच्छता विभागामार्फत करण्यात आला.
(प्रियदर्शिनी चं. मोरे)
उपमुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद कोल्हापूर
जिल्हा परिषद मार्फत जागतिक पर्यावरण दिन(दि. ५ ते १७ जून कालावधी मध्ये ग्राम पंचायत स्तरावर विविध पर्यावरण पूरक उपक्रमांचे आयोजन )
पर्यावरण संवर्धन हि सजीव सृष्टीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अत्यावश्यक गरजेची बाब आहे. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून जागतिक पर्यावरण दिन ५ जून चे औचित्याने दि. ५ जून ते १७ जून २०१९ या कालावधीमध्ये जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ हा दि. ५ जून,२०१९ रोजी २०१९ रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीची मागील बाजूस सकाळी ११. ०० वा . महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहभागाद्वारे जनजागृती विषयक वोल पेंटिंग द्वारे करण्यात येणार आहे. या पेंटिंग च्या माध्यमातून पर्यावरण पूरक संदेश दिले जाणार आहेत या शुभारंभ कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे सन्माननीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दि. ५ जूनच्या शुभारंभ कार्यक्रमानंतर दि. ६ जून ते ११ जून’२०१९ या कालावधीमध्ये पंचगंगा व तिच्या उपनद्या काठावरील गावांना भेटी देऊन गावातील सांडपाणी नदीत मिसळते किंवा नाही याची पाहणी करून सांडपाणी मिसळत असल्यास त्यावर उपाय योजना आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच याच दिवशी ग्राम पंचायत स्तरावरील १००% नळधारक कुटुंबाकडून नळांना तोट्या बसवून घेण्याची कार्यवाही केली जाणार आहे. दि. १७ जून,२०१९ रोजी ग्राम पंचायत स्तरावर आणि शाळांमध्ये प्लास्टिक संकलन मोहीम राबवली जाणार आहे. तसेच ज्या नळधारकांनी नळांना तोट्या बसविलेल्या नाहीत अशा नळ धारकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे . या अंतर्गत रु. ५००० इतका दंड आकारला जाईल.
या उपक्रमाबाबत सर्व गट विकास अधिकारी याना कळविणेत आले आहे. तसेच उपक्रमाच्या सनियंत्रणासाठी संपर्क अधिकारी म्हणून जिल्हा स्तरावरील सर्व खातेप्रमुखाना तालुके नेमून देण्यात आले आहेत. तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील सर्व पदाधिकारी व सदस्य या उपक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. ग्राम पंचायत स्तरावर हे पर्यावरण पूरक उपक्रम यशस्वी व्हावेत यासाठी ग्राम पंचायत स्तरावरील पदाधिकारी, ग्रामस्थ, सेवा संस्था , तरुण मंडळे, महिला बचत गट आणि स्वयंसेवक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन मा. सौ. शोमिका महाडीक , अध्यक्ष , जी. प. कोल्हापूर आणि मा. श्री. अमन मित्तल , मुख्य कार्यकारी अधिकारी , जि .प. कोल्हापूर यांनी केले आहे.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष
जिल्हा परिषद , कोल्हापूर
दिव्यांग उन्नती अभियान अंतर्गत दिव्यांग व्यक्तीना साहित्य वाटप तपासणी
आज दि.12/05/2019 रोजी मा.दत्ताजीराव मोहिते पाटील माध्यमिक विदयलाय व कनिष्ठ महाविद्यालय, तिसंगी ता. गगनबावडा येथे जि. प.कोल्हापूर मार्फत राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग उन्नती अभियान अंतर्गत टप्पा क्र.3 साहित्य वाटप तपासणी शिबिरास मा. सभापती व उपसभापती पं. स. गगनबावडा, मा.श्री भगवान पाटील, जि. प.सदस्य, समाजकल्याण अधिकारी, जि. प. कोल्हापूर, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि. प.कोल्हापूर, गटविकास अधिकारी पं. स. गगनबावडा व अधिकारी/कर्मचारी वर्ग उपस्थित होते. आजची नोंदणी 290 झाली आहे.