admin
जिल्हा परिषद स्वनिधी योजना
र्हदयरोग, कॅन्सर व किडणी या रोगांनी पिडीत असलेल्या रुग्णांना जि.प. स्वीय निधीतून आर्थिक मदत.
योजनेचे स्वरुप :- या योजनेअंतर्गत ग्रामिण कार्यक्षेत्रातील लाभार्थीना खालील प्रमाणे आर्थीक मदत मिळते.
अ) र्हदय शस्त्रक्रिया करिता :- र.रु.१०,०००/-
ब) कॅन्सर उपचार करिता :- र.रु.७,०००/-
राष्ट्रीयआरोग्य अभियान
भारत सरकारने समाजातील गरीब, जोखमीच्या व दारीद्रय रेषेखालील लोकांना परिणाम कारक सेवा पुरविणेसाठी तसेच माता मृत्यू, अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करणे व एकुण जनन दर कमी करणे यासाठी सन २००५ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM-National Rural Health Mission) ची स्थापना केली आहे. त्याचा एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्हयामध्ये जिल्हा आरोग्य अभियान ची स्थापना करण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व आरोग्य संबधित इतर कार्यक्रम यांच्या मधील समन्वय तसेच खाजगी वैद्यकीय व्यवसायीक व सेवाभावी संस्था यांचा सहभाग घेऊन आरोग्याचे कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे हे अभियानाचे प्रमुख ध्येय आहे.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम
मानवी जीवनाच्या इतिहासामध्ये ज्या दूर्धर रोगांनी मानवाच्या शारिरिक, आर्थिक स्थितीवर विघातक परिणाम केले आहे त्यामध्ये पोलिओचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. पोलिओ हा आजार विषाणूंमुळे होतो.
राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम (शासकिय योजना)
वेगाने वाढणार्या लोकसंख्या नियंत्रण ठेवणेकरिता राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम आपल्या देशात १९५२ पासून राबविणेत येत आहे.या कार्यक्रम अंतर्गत दोन मुलांमध्ये अंतर ठेवणे करिता पाळणा लांबविण्याच्या तात्पुरत्या पध्दती उदा-तांबी,गर्भनिरोधक गोळया,निरोध,तांतडीच्या गोळया, (इमर्जन्सी पिल्स) इ साधने उपलब्ध असून पाळणा थांबविणेसाठी टाका व बिनटाका या स्त्रीशस्त्रक्रिया व बिनटाका व पारंपारिक पध्दतीच्या पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत.
निवड प्रक्रिया
आरोग्य सेवक भरती २०१५
आरोग्य विभाग २०१४ पात्र उमेदवार यादी