जिल्हा ग्राम विकास निधी कर्ज

प्रस्थावना :-

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम १३३ नुसार प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा ग्राम विकास निधी गठीत केलेला आहे. मुंबई जिल्हा ग्राम विकास निधी नियम १९६० नुसार प्रत्येक ग्रामपंचायतीने तिच्या मागील वित्तीय वर्षातील उत्पन्नाचे ०.२५ टक्के रक्कम अंशदान म्हणून जिल्हा ग्राम विकास निधीत डिसेबर पूर्वी जमा करणेची तरतूद आहे. ग्रामपंचायतीकडून अंशदान म्हणून प्राप्त झालेल्या निधीतून पंचायतीना अधिनियमातील अनुसूची एक मध्ये निदिष्ट केलेली विकास कामे पार पाडण्यासाठी ग्रामपंचायतीची वि’मान आर्थिकस्थिती व कर्ज परतफेडीची क्षमता विचारात घेवून अंदाजपत्रकीय रक्कमेच्या ७५ टक्के प्रमाणे कर्ज मंजूर करता येते. ग्रामपंचायतींकडून प्राप्त झालेल्या कर्ज प्रस्तावाची छाननी केलेवर कर्ज मंजूरीचे अधिकार स्थायी समितीस आहेत.

प्रस्थावना गट विकास अधिकारी यांचे शिफारस पत्र

कर्ज मागणी प्रस्ताव तपासणी सूची

ग्रामपंचायत विभाग

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १२ तालुके असून त्याअंतर्गत १०३० ग्रामपंचायती आहेत. सदर १०३० ग्रामपंचायतीचे प्रशासन चालविण्याकरिता ग्रामसेवकांची ७१० पदे मंजूर असून ५७६ ग्रामसेवक कार्यरत आहेत. तसेच ग्राम विकास अधिकार्यां ची १९३ पदे मंजूर असून १७१ ग्राम विकास अधिकारी कार्यरत आहेत.रिक्त पदे २२ भरणे आहे. विस्तार अधिकारी (पंचायत) यांची ४२ पदे मंजूर असून ४१ विस्तार अधिकारी (पंचायत) कार्यरत आहेत. रिक्त पदे १ भरणे आहे. ग्रामसेवकाची ७१० पदे मंजूर असून ६९६ ग्रामसेवक कार्यरत आहेत.रिक्त पदे १४ भरणे आहे.ग्रामपंचायत विभागामार्फत राबविणेत येत असलेल्या योजना, निधी वाटपाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

Read more

अर्थ विभाग

जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता, १९६८ नियम ३ नुसार जिल्हा परिषदेचे सर्व आर्थिक व्यवहार व सर्व हिशेब (वार्षिक हिशेब तयार करणे व लेखे आणि आर्थिक दस्तऐवज तयार ठेवणे) संदर्भात कार्यवाही वित्त विभागाकडुन करण्यात येते. जिल्हा परिषदेतील वित्त विभागाचे प्रमुख हे मुख्य लेखा व वित्त अधिकारी असुन ते महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील उपसंचालक दर्जाचे अधिकारी असुन, लेखा आणि अर्थसंकल्पीय अंदाज या बाबी तसेच आर्थिक नियमांच्या अंमलबजावणी संबंधी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषदेचा वित्तीय सल्लागार व प्राथमिक लेखा परिक्षक म्हणून ते काम करतात. त्यांना सहाय्यक म्हणून उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी (वर्ग-१) व दोन लेखा अधिकारी (वर्ग-२) असतात. मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे सल्ल्याशिवाय कोणताही प्राधिकारी आर्थिक व्यवहारास मंजुरी देत नाही.

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम

कुष्ठरोग हा मायको बॅक्टेरिअम लेप्री या जंतुमुळे होणारा अत्यल्प सांसर्गिक आजार आहे.

कुष्ठरोगाची संशयित लक्षणे :-

न खाजणारा, न दुखणारा, बधीर चट्टा/चट्टे
हातापायातील मज्जातंतू जाड व दुखर्‍या होणे.
कोल्हापूर जिल्हयातील सर्व ७२ प्राथमिक आरोग्य केंद्रासह सर्व शासकिय व निमशासकिय दवाखान्यात कुष्ठरोगावरील निदान व उपचाराची विनामुल्य सोय उपलब्ध आहे.
कुष्ठरोगावरील बहुविध औषधोपचार नियमित घेतल्याने ( ६ महिने किंवा एक वर्ष) कुष्ठरोग पुर्णपणे बरा
होतो.

Read more

एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प

एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प (IDSP) विकेंद्रीत स्वरुपात राबवायचा देशांतर्गत कार्यक्रम आहे. साथ उदे्रकाच्या आधी धोक्याची सुचना देणारी चिन्हे / लक्षणे ओळखून वेळीच उपाययोजना करणे हा प्रकल्पाचा उददेश आहे. मिळालेल्या माहितीचा उपयोग रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या संनियंत्रणासाठी करुन आरोग्याची साधने, स्त्रोत जास्त परिणामकारकरित्या वापरता यावेत ही पण यामागची भुमिका आहे.

Read more

राष्ट्रीय साथरोग नियत्रंण कार्यक्रम

साथीचे आजार होवू नयेत म्हणून पूर्व नियोजन महत्वाचे आहे.
जिल्हास्तरीय साथरोग शिघ्र प्रतिसाद पथकामध्ये १.अति. जि.आ.अ. २. साथरोग वै.अ. ३. प्रमुख रसायनशास्त्रज्ञ ४.बालरोग तज्ञ ५. फिजीशियन व ६. जिल्हा हिवताप अधिकारी यांचा समावेश आहे.
जिल्हास्तरीय आपत्कालीन वैद्यकिय मदत पथकामध्ये वै.अ. २ व १० कर्मचारी यांचा समावेश आहे.
जिल्हास्तरावर माहे जून ते ऑक्टोंबर या जोखमीच्या कालावधीत २४ तास नियंत्रण कक्षाची स्थापना करणेत येते.

Read more

नाविन्यपूर्ण योजना

voice sms योजना

योजनेचे स्वरुप :- या योजनेअंतर्गत ग्रामिण कार्यक्षेत्रातील लाभार्थीना खालील प्रमाणे आर्थीक मदत मिळते.
अ) र्‍हदय शस्त्रक्रिया करिता :- र.रु.१०,०००/-
ब) कॅन्सर उपचार करिता :- र.रु.७,०००/-
क) किडणी रोपन करिता :- र.रु.१०,०००/-
सदर योजनेचा लाभ देण्याकरिता जि. प. स्तरावर खालील प्रमाणे र्‍हदयरोग, कॅन्सर, किडणी करिता आर्थिक मदत समिती,जि.प.कोल्हापूर ही समिती गठीत केलेली आहे.

Read more

०१/०१/२०१६ रोजी अंतिम सेवा जेष्ठता यादी

 

कक्ष अधिकारी २०१६ ची अंतिम जेष्ठता यादी

वर्ग -३ अधीक्षक ०१/०१/२०१६ ची अंतिम जेष्ठता यादी

विस्तार अधिकारी सांखिकी वर्ग ३ अंतिम सेवा जेष्ठता यादी

वरिष्ठ सहाय्यक २०१६ ची अंतिम जेष्ठता यादी

Read more