जिल्हा परिषद, कोल्हापूर विधीज्ञ पॅनेलवर विधीज्ञ नियुक्तीसाठी अर्ज मागणी जाहिरात सन 2019-20
Kolhapur Zilla Parishad
यशवंत पंचायत राज अभियान सन 2018-19 अंतर्गत जिल्हा परिषदेने विविध विभागाकडील योजनांची स्वयं मुल्यमापनाद्वारे आर्थिक व भौतिक साध्याच्या आधारे विहीत नमुन्यामध्ये प्रस्ताव मा. विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केलेला होता. सादर केलेल्या प्रस्तावांच्या गुणांकनानुसार कोल्हापूर जिल्हा परिषद ही पुणे विभागामध्ये पाच जिल्हयामध्ये प्रथम क्रमांकावर आलेने मा.विभागीय आयुक्त यांनी नियुक्त केलेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विक्रांत बग़ाडे यांचे समितीमार्फत जिल्हा परिषद कोल्हापूर ची तपासणी दि.12/06/2019 रोजी केली होती. सदर समितीने केलेल्या तपासणी व पडताळणीमध्ये विभागस्तरावर कोल्हापूर जिल्हयाने प्रथम क्रमांक पटकविला आहे. यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष मा. सौ शौमिका महाडिक व मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री अमन मित्तल यांचे मार्गदर्शनाखाली तसेच जि.प.उपाध्यक्ष मा.सर्जेराव पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ रवि शिवदास, प्रकल्प् संचालक मा.अजयकुमार माने, उप मुख्य कार्यकारी अधिकारी(सा.प्र.) मा.रविकांत आडसुळ सर्व विषय समिती मा.सभापती, सर्व जिल्हा परिषद सदस्य, सर्व जिल्हा परिषद खातेप्रमुख व अधिकारी- कर्मचारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेने हे यश संपादन केलेले आहे. यानंतर जिल्हा परिषदेची राज्यस्तरीय मुल्यांकनासाठी विभागामधुन निवड झालेने लवकरच राज्य स्तरीय समिती पडताळणीसाठी येणार आहे.
तसेच पंचायत समितीने स्वयं मुल्यमापनाद्वारे आर्थिक व भौतिक साध्याच्या आधारे विहीत नमुन्यामध्ये प्रस्ताव मा.विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केलेला होता. त्यानुसार विभागीय स्तरावरील निवड समिती मार्फत पंचायत समिती गडहिंग्लजची तपासणी दि.11/06/2019 रोजी केली होती. सदर समितीने केलेल्या तपासणी व पडताळणीमध्ये विभागस्तरावर पंचायत समिती गडहिंग्लजने द्वितीय क्रमांक पटकविला आहे. यासाठी पंचायत समिती सभापती व गट विकास अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पंचायत समितीने हे यश संपादन केलेल आहे.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र)
जिल्हा परिषद कोल्हापूर
लोक संख्या दिना निमित्त प्रभात फेरीचे आयोजन.
11 जुलै 2019 जागतिक लोकसंख्या दिना निमित्त् जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषद मार्फत “प्रभातफेरी” चे आयोजन करण्यात आले होते. प्रभात फेरीचे उदघाटन जिल्हा परिषदे चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री रविकांत अडसूळ यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले. “कुटुंब नियोजन करुन स्विकारा जबाबदारी, आई व बाळाच्या संपूर्ण आरोग्याची ही तयारी“. या प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत श्री भालेराव, जिल्हा माता बाल संगोपन अधिकरी डॉ. फारुख देसाई, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने व आरोग्य विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तसेच मेन राजाराम हायस्कुलचे विदयार्थी, शिक्षकउपस्थित होते. तसेच सी.पी.आर. येथील नर्सिंग कॉलेज मधील विघ्यार्थीनी उपस्थित होत्या. आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र , शेंडा पार्क येथील प्रक्षिणार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ. योगेश साळे यांनी सांगितले कि, अर्माद लोकसंख्या वाढीमुळे बेरोजगारी, आपु-या आरोग्य सेवा, अन्न् धान्य् तुटवडा, महागाई, स्थलांतर, पर्यावरण समस्या निर्माण झाल्या आहेत. 11 जुलै ते 24 जुलै लोकसंख्या स्थिरता पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या मध्ये तालुकास्तरावर मेळाव्याचे आयोजन, कु.क. शस्त्रक्रिया शिबीर, तांबी बसविणे तसेच तात्पुरत्या व कायमच्या कु.क. नियोजनच्या पध्दती माहिती व जनजागृती या पंधवडयात करण्यात येणार आहे. तसेच “कुटुंब नियोजन करुन स्विकारा जबाबदारी, आई व बाळाच्या संपूर्ण आरोग्याची ही तयारी“” या घोष वाक्याची या वर्षी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. डॉ देसाई उपस्थिताचे आभार मानून प्रभात फेरीची सांगता करण्यात आली.
—————————————————————————-
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये (वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देणेसाठी जागा राखून ठेवण्याची रीत) नियम 2012 प्रमाणे अल्पसंख्यांक शाळा वगळता, राज्यातील सर्व विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यता तत्त्वावरील प्राथमिक शाळांमध्ये पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 % पर्यंतच्या जागा नजीकच्या परिसरातील वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. या अंतर्गत सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामधील 25 % आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या https:// student.maharashtra.gov.in या वेबसाईटवरील RTE Portal या लिंकवर ऑनलाईन पध्दतीने राबविणेत येत आहे.
सदर प्रक्रियेअंतर्गत प्रवेशाच्या दोन फे-या पूर्ण झालेल्या आहेत. आता प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे कार्यालयाकडून राज्य स्तरावर दि. 10/07/2019 इ. रोजी तिसरी लॉटरी काढणेत आलेली आहे. तसेच NIC सेंटर, पुणे यांचेकडून तिस-या प्रवेश फेरीसाठी विद्यार्थी निवड यादी RTE पोर्टलवर अपलोड करणेत आलेली आहे. संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाईलवर शाळेच्या नावासह SMS पाठविणेत येणार आहेत. मात्र पालकांनी मेसेजवर अवलंबून न राहता RTE पोर्टलवरील SELECTED व NOT SELECTED या टॅबवर जाऊन अथवा Application Wise Details मध्ये आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरीची खात्री करावी. ज्यांची निवड झालेली आहे, त्यांनी पोर्टलवर जाऊन आपला भरलेला फॉर्म USER ID व पासवर्ड टाकून ओपन करावा. त्यामध्ये ADMID CARD या TAB वर क्लिक करून त्याची प्रिंट काढावी. पालकांनी सदरची प्रिंट व प्रवेशासंबंधीची सर्व कागदपत्रे घेऊन शहरी भागासाठी महानगरपालिका व ग्रामीण भागासाठी संबंधित तालुक्याच्या पंचायत समितीतील शिक्षण विभागात जावयाचे आहे. तेथील शाळा पडताळणी समितीकडे आपले ADMIT CARD व प्रवेशासंबंधीची सर्व मूळ कागदपत्रे सादर करून तपासून प्रमाणित करून घ्यावयाची आहेत. विद्यार्थी प्रवेशासाठी नियमानुसार पात्र असलेबाबत गटशिक्षणाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे पत्रासह पालकांनी संबंधित शाळेत जाऊन पाल्याचा प्रवेश निश्चित करावयाचा आहे. पालकांनी शाळा पडताळणी समितीकडून कागदपत्रे न तपासता परस्पर शाळेत गेलेस पाल्यास प्रवेश दिला जाणार नाही. शाळांनीही पडताळणी समितीने शिफारस केलेखेरीज कोणत्याही विद्यार्थ्यास RTE च्या 25 % कोटयातून प्रवेश द्यावयाचा नाही. पडताळणी समितीने अपात्र ठरविलेल्या बालकांची निवड रद्द करणेत येईल.
तिस-या फेरीतील विद्यार्थी प्रवेशाचा कालावधी हा दि. 11/07/2019 ते दि. 18/07/2019 असा निश्चित करणेत आलेला आहे. सदर कालावधीत संबंधित पालकांनी शाळांमध्ये प्रवेश निश्चित न केल्यास त्यांना पुन्हा संधी दिली जाणार नाही. त्यामुळे पालकांनी शाळा प्रवेशाच्या बाबतीत दक्ष राहून विहीत मुदतीत शाळा पडताळणी समितीकडून कागदपत्रे तपासून शाळेमध्ये प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केलेले आहे.
(श्रीम. आशा उबाळे)
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जिल्हा परिषद, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हयामध्ये कळंबा ता.करवीर येथे दिनांक 15.06.19 पासून डेंग्यु सर्वेक्षण मोहिम सुरु असुन एकुण संशयित 25 रुग्णांपैकी 15 रुग्ण डेंग्यु पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आरोग्य विभागामार्फत एकुण 16 पथके कार्यरत असुन पथकामार्फत 10 दिवस सर्वैक्षण मोहिम आजअखेर राबविण्यात येत आहे. त्यामध्ये धुरफरावणी, जळके आईल व गटारी वाहती करणेत आली आहे. 7 ठिकाणी गप्पी मासे सोडले आहे. डेग्युच्या डासांच्या अळया, अळया असलेलल्या पाणीसाठे नष्ठ केले असून येथील अनेक पाणीसाठयांमध्ये टेमिफॉस टाकण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायत मार्फत व्हंेट पाईपच्या जाळया 1500 बनविणेसाठी देण्यात आलेल्या आहेत.
डासाचा प्रकार | जीवानचक्र कालावधी | आयुष्य मर्यादा | जीवनशैली |
एडिस इजिप्ती | 7 ते 10 दिवस | दोन आठवडे
एक महिना |
हा डास दिवसा चावतो. स्वच्छ पाण्यामध्ये अंडी घालतात. प्लॅस्टीक कंटेनर, प्लॅस्टीक ड्रम्स, मातीचे रांजण, माट, रिकाम्या टायर, पाण्याच्या टाक्या, |
लक्षणे | |||
डेग्यु | एडिस इजिप्ती | 5 ते 6 दिवस | § तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, डोळयाच्या खोबणीमध्ये वेदना, हाड मोडल्यानंतर होणाऱ्या वेदणेप्रमाणे अंगभर तीव्र वेदना
§ डेग्यु रक्तत्राव ताप – वरील लक्षणासह रक्तातील प्लेटलेट कमी झालेने शरीरात अंतर्गत रक्तत्राव होतो. उदा. नाकातुन रक्तत्राव, रक्ताची उलटी होणे, हिरडयामधून रक्तत्राव या प्रकारामध्ये मृत्युचे प्रमाण पहिल्या प्रकारापेक्षा जास्त असते. § डेग्यु शॉक सिंड्रोम – वरील दोही प्रकारातील सर्व लक्षणे तसेच तरुणाच्या शरीरातील रक्त व पाणी कमी झाल्यने रुग्ण बेशुध्द होतो रुग्णाचा रक्तदाब कमी होतो. नाडीचे ठोके अतिजलद होतात. रुग्णाची त्वचा कोरडी व थंड पडते या प्रकारामध्ये वरील दोन्ही प्रकारापेक्षा मृत्युचे प्रमाण जास्त असते. |
जिल्हयामध्ये माहे जानेवारी 2019 ते आजअखेर ग्रामीण भागामध्ये 149 डेंग्यु रुग्ण आढळून आलेले आहेत. डेग्युची साथ होवून नये म्हणून प्रत्येक गावोगावी त्यामध्ये धुरफरावणी, पाणी साचलेल्या ठिकाणी जळके आईलचा वापर करुन व गटारी वाहती करणेत यावीत. विविध ठिकाणी गप्पी मासे सोडणेत यावीत व गप्पीमासे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या ठिकाणी मोफत उपलब्ध आहेत. डेग्युच्या डासांच्या अळया, अळया असलेलल्या पाणीसाठे नष्ठ करणेबाबत आरोग्य कर्मचारी यांचे मार्फत योग्यती कार्यवाही करणेत यावी.
जिल्हयामध्ये खाजगी रुग्णालयामध्ये दाखल होवून डेंग्यु रोग निदान झालेस संबधित रुग्णांचे रक्तनमुने पूर्नपडताळणी केलेनंतरच डेंग्यु रुग्ण घोषित करणेत यावा. यासाठी रक्ताची पूर्नपडताळणी करुन उपचार करणेत येत आहेत. अशा सुचना मा.मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिले आहेत.
मा.अध्यक्षा सौ. शोमिका महाडिक यांनी सर्व ग्रामपंचायतीला डेंग्यु जनजार्गती करणेबाबत पोस्टर, बॅनर, हस्त पत्रीका तसेच धुर फवारणी बाबत पट्रोल डिझेल मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे बाबत अवाहन करणेत आलेले आहे.
डॉ.योगेश साळे
जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, कोल्हापूर |
श्री.सर्जेराव पाटील
मा.सभापती बांधकाम व आरोग्य समिती जिल्हा परिषद, कोल्हापूर |
श्री. अमन मित्तल
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, कोल्हापूर |
सौ.शौमिका महाडिक
अध्यक्षा जिल्हा परिषद, कोल्हापूर |
आषाढी यात्रेसाठी अवघा महाराष्ट्र, कर्नाटक, आंधप्रदेश या राज्यातील लाखो वैष्ण्व, वारकरी श्री पांडुररंगाच्या भेटी अंतुर झालेला असतो. सर्व राज्यातून पंढरपूरला जाणेसाठी पायी दिंडीचे आयोजन करण्यात आलेले असते. दिंडी मध्ये जेष्ठ नागरिक, महिला, पुरुष मोठया प्रमाणात असतात. सर्व वारकरी मोठया श्रध्देने पायी चालत जात असतात. सलग 15-20 दिवस चालत जावे लागत असल्यामुळे पायाला गोळे येणे, जांघेत गाठ येणे, पाय दुखणे, ताप, साथ प्रतिबंधक सेवा, पोट विकार पाणी शुध्दीकरण तसेच अत्यावश्यक सेवा, संदर्भ सेवा आवश्यक असते. गेल्या अनेक वर्षापासून आषढी, माघ वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यासांठी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर मार्फत आरोग्य पथक पाठविण्यात येत आहे. सदर वैद्यकीय मदत पथकांचे शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा श्री अमन मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी मा. डॉ. योगेश साळे यांचे शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुख देसाई , श्री एम एम पाटील. मार्केट यार्ड येथील विठ्रठल मंदिर प्रमुख श्री. वारके आण्णा, येवती येथील दिंडी प्रमुख ह भ प बी. डी. पाटील, रंगा वायदंडे श्री घुले, उपस्थित होते. दोन वै्द्यकीय मदत स्थापन करण्यात आले असून डॉ विवेक जोशी, वैद्यकीय अधिकारी पथक प्रमुख असून हे पथक कोल्हापूर नृसिंहवाडी, जयसिंगपूर, मिरज मार्गे पंढरपूर ला जाणार आहे. तर डॉ अरुण गवळी , वैद्यकीय अधिकारी यांचे पथक कोल्हापूर ते मिरज, लोणंद, नातेपुते, माळशिरस, वेळापूर मार्गे पंढरपूर येथे जाणार आहे. पथकामध्ये आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, औषध निर्माण अधिकारी, वाहन चालक इ. कर्मचारी असतील. मागील वर्षी वैद्यकीय मदत पथकामार्फत 6000 रुग्णांना उपचार करण्यात आले होते.
या प्रसंगी बोलतांना मा. अमन मित्तल यांनी सर्व देश व राज्यातील जनतेला सर्वांना सुख, समृध्दी , समाधान ,आरोग्य मिळावे असे पांडुरंग चरणी साकडे घातले. यात्रा कालावधीमध्ये पायी वारी करण्याचा मनोदय व्यक्त केला. असून यात्रेसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. अभार प्रसंगी डॉ साळे बोलतांना म्हणाले की, जि. प. अध्यक्ष्या मा. सौ शौमिका महाडिक, आरोग्य सभापती मा. श्री. सर्जेराव पाटील पेरीडकर, मा. श्री. अमन मित्तल यांच्या संकल्पनेतून हे पथक काम करीत असून सर्वाना शुभेच्छा दिल्या.
जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा परिषद कोल्हापूर
राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी , 0 ते 1 वर्ष लसीकरणाचे प्रमाण वाढवून पूर्ण संरक्षित बालकांचे प्रमाण 90 टक्के पेक्षा जास्त करण्याचे दिनांक 24 जून 2019 रोजी जिल्हाधिकारी मा. दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा समन्वय समिती ठरविण्यात आले आहे. सदर सभेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ योगेश साळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) मा श्री भालेराव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.क.) मा श्री रसाळ, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाहय संपर्क) सी.पी.आर. डॉ हर्षला वेदक, शासकीय वैद्यकीय महाविद्यलयातील बाल रोग तज्ञ डॉ सरवदे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ फारुख देसाई , वैद्यकीय अधिकारी म.न.पा. कोल्हापूर डॉ अमोल माने, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ स्मिता खंदारे, तसेच शिक्षण विभाग, प्राथमिक व माध्यमिक चे अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाची सभेमध्ये माहिती देतांना डॉ देसाई म्हणाले की, कोल्हापूर जिल्हयाचे बालकाचे लसीकरणाचे उदिदष्ट 62 हजार , गरोदर माता उदिदष्ट 68 हजार असून सर्व माता व बालक यांचे लसीकरण करण्यासाठी जिल्हयामध्ये एकुण 22 हजार लसीकरण सत्र आयोजित करण्यात येतात. गुणवत्तापूर्ण लसीची साठवणूक व वितरण करण्यासठी जिल्हयात 109 कोल्ड चेन पॉईट आहेत. लसीकरणाव्दारे नऊ धोकादायक आजारापासून संरक्षण मिळत आहे. सार्वत्रीक लसीकरण कार्यक्रमामुळे सन 2014 साली भारत पोलिओ मुक्त झाला, सन 2015 साली माता व नवजात बालकातील धर्नुवात दूरीकरण करण्यात यश मिळाले आहे. कार्यक्रमाचा वेळोवेळी आढावा घेवून सन 2011 साली पाच लस एकत्र करुन पेन्टाव्हॅलन्ट लस, सन 2015 इनॲक्टीवेटेड पोलिओ, साली सन 2016 रोटाव्हायरस, सन 2017 साली गोवर रुबेला आणि निमोकोकल कॉन्जुगेट लस या लसीचा समावेश करुन बाल मृत्यू कमी यश मिळावले आहे. गरोदर माता व 10, 16 वर्ष मुलांना धर्नुवात लसी ऐवजी धर्नुवात व घटसर्प या दोन लसी (Td)देण्यात येत आहेत
वय | सुधारित राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रक | विभाग | पुर्ण संरक्षित बालकांचे लसीकरण 2018-19 | |||
उदिदष्ट | साध्य | टक्के | ||||
जन्मत: | BCG, OPV-0, Hepatitis B birth dose | जि.प. | 45145 | 40142 | 89 | |
6 आठवडे | OPV-1, Pentavalent-1, fIPV-1, Rota-1 and PCV-1 | म.न.पा. | 8091 | 7453 | 92 | |
10 आठवडे | OPV-2, Pentavalent-2 & Rota-2 | न.पा. | 9223 | 7364 | 80 | |
14 आठवडे | OPV-3, Pentavalent-3, fIPV-2, Rota-3 and PCV-2 | खाजगी | 2135 | |||
9-12 महिने | MR-1, JE1 * , DPT Booster, PCV-Booster | एकुण | 62169 | 57094 | 91 | |
16-24 महिेने | MR-2, JE2 * , DPT Booster1, PCV-Booster | मातेला व पालकांना 4 महत्वाचे संदेश
1. कोणती लसी दिली व कोणत्या आजारापासून संरक्षण. 2. पुढील डोसची तारीख , वार व ठिकाण सांगा 3. लसीकरणनंतरच्या किरकोळ प्रतिक्रिया यांची माहिती. 4. लसीकरण कार्ड संभाळून ठेवणे व घेवून येणे |
||||
5-6 वर्ष | DPT Booster2 | |||||
10 वर्ष | Td | |||||
16 वर्ष | Td | |||||
गरोदर माता | Td 1,2 or Td Booster |
जिल्हयातील 1 वर्षाच्या आतिल बालकांनासर्व प्रकारच्या लसी वेळेत देवून पूर्ण संरक्षीत बालकांचे लसीकरणाचे प्रमाण सुधारणा होण्यासाठी Immunization Coverage Improvement Plane (i-CIP) नुसार आढावा पध्दतीचे सक्षमीकरण अंतर्गत दर महा वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांची लसीकरण संबधी प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले असून मासिक तसेच त्रैमासिक सभेमध्ये लसीकरण कामाचा आढावा घेण्यात येणार आहे. सर्व जिल्हास्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक यांना लसीकरण सत्राचे पर्यवेक्षणसाठी राज्यस्तरावरुत सुधारीत पर्यवेक्षण सुची करण्यात आली आहे. नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत ट्रॅकींग बँग तयार करणे, चार संदेश असणारे पोस्टर्स तयार करणे इ कार्यक्रम घेण्यात येणार आहे. ग्रामस्तरावर आरोगय सेविका, अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका (AAA- ANM, AWS, ASHA) यांनी लसीकरण सत्राच्या ठिकाणी उपस्थित राहुन कार्यक्षेत्रातील मुलांचे वेळेत 100 टक्के लसीकरण होण्यासाठी समन्वयाने काम करण्याच्या सूचना या सभेमध्ये मा. जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. वरील वेळापत्रकानुसार पालकांनी आपल्या 1 वर्षाच्या आतील बालकांचे वेळेत व मोफत लसी नजीकच्या शासकीय आरोग्य संस्थेत जावून दयावेत असे अहवान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ योगेश साळे यांनी केले. आभार डॉ देसाई यांनी मानले.
जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा परिषद कोल्हापूर
केंद्र शासनाच्या पेयजल स्वच्छता मंत्रालयाकडून दिनांक ०१ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीमध्ये ‘ स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धा ’ आयोजित करणेत आली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्याने देशात द्वितीय व महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या निकालानुसार देशामध्ये प्रथम क्रमांक गिरिधीह (झारखंड),द्वितीय क्रमांक कोल्हापूर (महाराष्ट्र), तर तृतीय क्रमांक पेडापल्ली (तेलंगणा) असे क्रमांक प्राप्त झाले आहेत.ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाने आपले शौचालय स्वच्छ, सुंदर दिसावे व शौचालयाप्रती अभिमानास्पद स्वामित्व भावना वाटावी आणि स्वच्छता सुविधा स्प्ष्टपणे नजरेत याव्यात या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
पाणी व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत या स्पर्धेला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी सर्व अधिकारी कर्मचारी यांचा पुढाकार व स्थानिक संस्था, सर्व शाळा, ग्रामस्थ, विध्यार्थी यांचा सहभाग घेऊन “ स्वच्छ सुंदर शौचालय “ स्पर्धेमध्ये उल्लेखनीय काम होणे आवश्यक होते. वैयक्तिक तसेच शाळा अंगणवाडी व ग्रामपंचायत क्षेत्रातील सार्वजनिक शौचालय रंगविण्याची व्यापक मोहीमेमध्ये सर्व स्तरावरील लोक सहभाग व शासकीय यंत्रणांचे योगदान मिळावे यासाठी दिनांक २८ जानेवारी २०१९ हा दिवस १ दिवस शौचालयासाठी म्हणून घोषित करणेत आला होता. या मध्ये लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, व ग्रामस्थ यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला होता. या स्पर्धेअंतर्गत जिल्हयात एकूण ४,३१,५८४ इतकी वैयक्तीत शौचालय रंगविण्यात आली. तसेच ८,४१९ इतकी सार्वजनिक शौचालय, शाळा व अंगणवाडी शौचालय रंगविण्यात आली.या स्पर्धेदरम्यान मा. सौ. शौमिक महाडिक, अध्यक्ष, जि. प. कोल्हापूर, मा. श्री. अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. कोल्हापूर यांनी गावांमधे स्वतः शौचालय रंगकाम करून लोकांना शौचालय रंगविणेसाठी प्रोत्साहन दिले. जिल्हा परिषदेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
मा. जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्य, सर्व विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनामुळे तसेच सर्व गटविकास अधिकारी आणि त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांनी घेतलेले कष्ट आणि केलेले नियोजनबद्ध काम या मुळे हे यश मिळविता आले आहे.दिनांक २४.०६.२०१९ रोजी विज्ञान भवन दिल्ली येथे ‘स्वच्छ महोत्सवाचे’ आयोजन करणेत आले असून या महोत्सवामध्ये स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेचे बक्षीस वितरण देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचे हस्ते करण्यात येणार आहे. या बक्षीस वितरण समारंभासाठी मा. सौ. शौमिक महाडिक, अध्यक्ष, जि. प. कोल्हापूर, मा. श्री. अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. कोल्हापूर, श्रीम. प्रियदर्शिनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा.व स्व.), श्री. विजय पाटील, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (पा.व स्व.), सौ. सुवर्णा कारंडे, सरपंच, सावर्डे दु., ता. करवीर, सौ. सुनीता पाटील, सरपंच, पेंढाखळे ,ता. शाहूवाडी, श्री. सिद्दाप्पा करगार, स्वच्छागृही, ता. गडहिंग्लज, श्री. रोहित भंडारी, स्वच्छागृही, ता. राधानगरी हे उपस्थित राहणार आहेत.
(प्रियदर्शिनी चं. मोरे )
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा. व स्व.)
जिल्हा परिषद कोल्हापूर
जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक तपासणी करणेसाठी अभियान राबविणेत आले असून त्यासाठी जिओफेन्सिंग मोबाईल अँप द्वारे पाण्याचे नमुने घेणेत आले आहेत.
पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमा अंतर्गत जिओ फेन्सिंग मोबाईल अँप द्वारे पाण्याचे नमुने गोळा करणेचे काम १ मार्च ते १५ जून या कालावधीत करणेचे शासनाचे आदेश होते त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यात जिओफेन्सिंग मोबाईल अँप चा वापर करून पिण्याच्या पाण्याचे एकूण स्त्रोत ३६४७ पैकी ३६३८ गोळा करणेत आले आहेत. २ वर्षांपूर्वी सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे १००% टॅगिंग करणेत आले आहे. टॅगिंग केलेल्या स्त्रोतांना प्रत्यक्ष भेट दिली असून त्यापैकी पाण्याची उपलब्धता असणा-या २५८० स्त्रोतांचे नमुने तपासनेसाठी प्रयोगशाळेत पाठविणेत आलेले आहेत. उर्वरित १२७७ स्रोतांपैकी काही स्रोत विविध कारणांमुळे बंद , कायमस्वरूपी बंद, वापरात नसलेले, कोरडे, आढळून आलेले आहे. सर्वेक्षणातून घेतलेल्या सर्व पाणी नमुन्याची तपासणी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या जिल्हा प्रयोग शाळा, कोल्हापूर व उपविभागीय प्रयोगशाळा शिरोळ, कोडोली, सोळांकूर,गडहिंग्लज या प्रयोगशाळेत करणेत येत आहेत.
या अभियानात जिल्हा स्तरावरून मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचे मार्गदर्शनाखाली पाणी व स्वच्छता विभागाने तालुका व ग्रामपंचायत स्तरापर्यंत केलेल्या नियोजनामुळे हे काम शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत पूर्ण झाले. सदर कामास तालुका स्तरावरून गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पाणी गुणवत्ता सल्लागार यांनी व ग्रामपंचायत स्तरावर आरोग्य सेवक व जलसुरक्षक यांनी प्रत्यक्ष काम पहिले. तसेच जिल्हा स्तरावर पाणी व स्वच्छता विभागातील सर्व जिल्हा तज्ञांनी आपापले तालूक्यात समन्वय ठेवून हे काम पूर्ण केले आहे.
सार्वजनिक पिण्याच्या स्त्रोतांचे सॅटेलाईट द्वारे टॅग करणेसाठी शासनाने नागपूर येथील MRSAC या संस्थेला जबाबदारी दिली होती जिओफेन्सिंग हे एक मोबाईल अँप असून हे अँप सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे नमुने गोळा करणेसाठी वापरतात. स्रोतांच्या १० मिटर परिघात गेल्यावर अँप सुरु करून त्याद्वारे स्रोत जिओ टॅग करणेत येऊन फोटो घेऊन नमुना घेणेत येतो. याद्वारे जिल्ह्यात किती पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी झाली, किती पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत रासयनिक तपासणीसाठी शिल्लक राहिले याची माहिती मिळते. तसेच सदरचे उद्दिष्ट गेल्या २ वर्षात प्रथमच १०० % पूर्ण झाले आहे असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व) श्रीम. प्रियदर्शिनी मोरे यांनी सांगितले आहे.