जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा व सर्व पदाधिकांऱ्यांच्या कडून शिंगणापूर  निवासी क्रीडा प्रशालेचे कौतूक

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सर्व पदाधिकांऱ्यांच्या कडून शिंगणापूर  निवासी क्रीडा प्रशालेचे कौतूक

राजर्षि शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला येथे उच्चस्तरीय समिती सभा दिनांक 17/04/2017 रोजी संपन्न झाली. जिल्हा परिषदे मार्फत शिंगणापूर येथे निवासी क्रीडा प्रशाला जून 2014 पासून सुरु  झाली. हा जिल्हा परिषदेचा एक नाविण्यपूर्ण उपक्रम असून गेल्या तीन वर्षामध्ये निवासी क्रीडा प्रशालेतील खेळाडूंनी वेगवेगल्या खेळ प्रकारामध्ये राष्ट्रीय स्तरापर्यंत पदके मिळवून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा व सर्व पदाधिकारी यांनी  शिंगणापूर निवासी क्रीडा प्रशालेचे कौतूक केले.

जिल्हा परिषद कोल्हापूरच्या नवनियुक्त अध्यक्षा, उपाध्यक्ष व सभापती यांनी क्रीडा शाळेचा हेतू, प्रशालेचे स्वरुप, प्रशालेमार्फत राबविले जाणारे विविध उपक्रम यांची माहिती व्हावी व विद्यार्थ्यांना कोणत्या सोयी सुविधा पुरविल्या जातात, शाळेची प्रगती काय आहे हे जाणून घेणेसाठी शिंगणापूरच्या राजर्षि शाहू छत्रपती विद्यानिकेतन मध्ये सोमवार दिनांक 17/04/2017 रोजी उच्चस्तरीय धोरण समिती सभा संपन्न झाली.  या सभेमध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. श्री. कुणाल खेमणार,  उपाध्यक्ष श्री. सर्जेराव पाटील, शिक्षण व अर्थ समिती सभापती श्री. अंबरिषसिंह  घाटगे,  मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. बाळासाहेब पाटील, कार्यकारी अभियंती श्री. तुषार  बुरुड, शिक्षणाधिकारी (प्राथ)  श्री. सुभाष चौगुले, शिक्षणाधिकारी (माध्य) श्री. टी. एल. मोळे उपस्थित होते.

यावेळी प्रशालेच्या वतीने उपस्थित सर्व पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला. प्रशालेमध्ये मुलींसाठी नविन बांधणेत आलेले स्वच्छतागृह व वॉचमन केबिनचे उद्घाटन मा. अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांच्या हस्ते करणेत आले. सर्व पदाधिकारी व अधिकारी यांनी परिसराची  पाहणी  करुन वृक्ष लागवड व्हावी व ऑक्सीजन पार्क व्हावा अशा सूचना केल्या. सभेमध्ये शिक्षणाधिकारी (प्राथ) श्री. सुभाष चौगुले यांनी पी.पी.टी व्दारे शाळेविषयी पुर्वीचा इतिहास, निवासी क्रीडा प्रशाला सुरु करणेचा उद्देश, मागील तीन वर्षाचा प्रगतीचा आढावा तसेच प्रस्तावित कामे  या विषयाचे सादरी करण केले. प्रशासन अधिकारी श्री दिपक कुंभार  यांनी  अर्थिक वर्ष 2016-17  चा अर्थिक अहवाल सादर केला. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्री कुणाल खेमणार  यांनी  प्रस्तावित कामासंदर्भात उदा. मैदान सपाटीकरण, शुध्द पिण्याचे पाण्याची सोय, सोलर हिटर, वसतीगृहातील अभ्यासिका, खेळाडूंना लागणा-या सर्व साहित्याची तसेच अद्यावत व्यायामशाळा याबद्दल सविस्तर माहिती दिली.

अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांनी परिसराचे सपाटीकरणकरुन वृक्ष लागवड करावी,  विदयार्थ्याची नियमितपणे आरोग्य तपासणी करावी, विद्यार्थ्यांना प्रेरणा देणेसाठी गुणवत्ता प्राप्त खेळाडूंची व्याख्याने आयोजित करावीत  अशा सूचना केल्या. तसेच अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांनी प्रशालेस कोणाताही निधी कमी पडू देणार नाही असे सांगितले.

जिल्हा परिषदेने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी कौतूक करुन शाळेची प्रगती अतिशय चांगली असून राबविलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

जिल्ह्यातील 100% शाळा डिजिटल होणार

* जिल्ह्यातील 100% शाळा डिजिटल होणार *

मंगळवार दि. 18/04/2017 रोजी डॉ.बापूजी साळुंखे स्मृती भवन स्वामी विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे डिजिटल शाळा प्रेरणा कार्यशाळेचे आयोजन दोन सत्रामध्ये करणेत आले होते, यामध्ये 1410 जणांची सहभाग घेतला. कार्यशाळेस श्री.हर्षल विभांडीक, मॅनेजिंग डायरेक्टर, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, न्यूयॉर्क यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी धुळे जिल्हा 100% डिजिटल करताना आलेले अनुभव व राबविलेले उपक्रम याची माहिती सर्वांना दिली. ग्रामसेवक, ग्रामपंचायत व शिक्षक यांनी ठरविल्यास 100% शाळा डिजिटल होवू शकतात असे सांगितले.

मा.सभापती शिक्षण व अर्थ समिती श्री.अंबरिषसिंह घाटगे म्हणाले की, कोल्हापूर जिल्हा नेहमीच चांगल्या गोष्टींचा स्विकार करत असतो तेंव्हा मे 2017 अखेर कोल्हापूर जिल्हा 100% डिजिटल होईल.मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कुणाल खेमनार यांनी शिक्षकांनी अँड्रॉइड मोबाईल, टि.व्ही. यांचा वापर अध्यापनात करावा, बदलत्या काळानुसार प्राथमिक शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे व शाळा तंत्रज्ञानयुक्त बनविणेसाठी समाज, ग्रामपंचायत यांच्या सहभागाची गरज आहे हे स्पष्ट केले. गावातील शाळेतील 100% वर्ग डिजिटल करणाऱ्या ग्रामपंचायतींचा सत्कार जिल्हा परिषदेमार्फत करु असे आवाहन त्यांनी केले.शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री.सुभाष चौगुले म्हणाले, “जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद स्वनिधी व लोकसहभागामधून मोठ्या प्रमाणात शाळा डिजिटल झाल्या आहेत. उर्वरित शाळाही लवकरच डिजिटल होतील. शिक्षकांनी तंत्रज्ञान अवगत करुन त्या माध्यमातून बालकास सक्षम बनविले पाहिजे.

सदर कार्यशाळेस उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.चंद्रकांत वाघमारे, सर्व गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी शिक्षण, केंद्रप्रमुख, ग्रामसेवक व मुख्याध्यापक उपस्थित होते.सदर कार्यशाळा संपन्न करणेसाठी उपशिक्षणाधिकारी श्री.ए.जी.मगदूम, अधिक्षक (रा.प.) श्री.नलवडे, विस्तार अधिकारी शिक्षण श्री.दिपक कामत, श्री.जे.टी.पाटील, सहा. कार्यक्रम अधिकारी श्री.एस.बी.कदम व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला अंतर्गत क्रीडा प्रशिक्षक भरती सन 2016-2017

 शिक्षण विभाग ( प्राथमिक ), जिल्हा परिषद, कोल्हापूर.

राजर्षी  शाहू  छत्रपती विद्यानिकेतन निवासी क्रीडा प्रशाला अंतर्गत

क्रीडा प्रशिक्षक भरती सन 2016-2017

जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे मार्फत राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रिडा प्रशाला, शिंगणापूर, ( चंबुखडी ), ता- करवीर , जिल्हा कोल्हापूर येथे चालू करण्यात आलेली असून त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरुपातील कंत्राटी कब्बडी क्रीडा प्रशिक्षक नियुक्त करणेचे आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत लेखी अर्ज करावेत.

भरतीबाबतची सविस्तर माहिती व जाहिरात www.zpkolhapur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सही/-                                   सही/-                            सही/-

शिक्षणाधिकारी (प्राथमिक)      उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र)    मुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद,कोल्हापूर.          जिल्हा परिषद कोल्हापूर.               जिल्हा परिषद,कोल्हापूर.

( जाहिरात क्रमांक -2 )

राजश्री शाहू छत्रपती विद्यानिकेतन निवासी क्रीडा प्रशाला, ( चंबुखडी), शिंगणापूर, ता- करवीर, जिल्हा कोल्हापूर. कडे कंत्राटी तात्पुरत्यास्वरुपाची निवासी कब्बडी क्रीडा प्रशिक्षक भरती जाहिरात सन 2016-2017

जिल्हा परिषद, कोल्हापूर संचलित राजश्री शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला, (चंबुखडी), शिंगणापूर, ता- करवीर जिल्हा कोल्हापूर येथे निवासी कब्बडी क्रीडा प्रशिक्षक नियुक्ती करण्यात येणार आहे. सदरची नियुक्ती हि पुर्णत: कंत्राटी मानधन तत्वावरील निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाची नियुक्ती असणार आहे. त्यासाठी मासिक एकत्रित मानधन कार्यकारीणी समिती सभेमध्ये निश्चीत करण्यात येईल.

जाहिरात दिलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता पुर्ण करीत असलेल्या अनुभवी उमेदवारांनी सोबत दिलेल्या नमुन्यात अर्ज करावेत. सदरचा अर्ज दिलेल्या विहीत नमुन्यात टंकलिखीत करुन दि.14.04.2017 ते दि. 21.04.2017 अखेर सकाळी 10.30 ते सायंकाळी 4.00 पर्यंत या वेळेत कार्यालयीन दिवशी समक्ष अथवा पोष्टाने मा. शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे स्विकारले जातील. दि.21/04/2017 या तारखेनंतर येणा-या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. सदरची जाहिरात जिल्हा परिषद, कोल्हापूर च्या www.zpkolhapur.gov.in या संकेतस्थळार उपलब्ध आहे.

कब्बडी क्रीडा प्रशिक्षक भरती बाबतची घटना व नियमावलीप्रमाणे अटी व नियमावली थेाडक्यात माहिती खालीलप्रमाणे आहे.

  • क्रीडा प्रशिक्षक कब्बडी खेळातील तज्ञ, अनुभवी व ज्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिउत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. उमेदवार हा कब्बडी या खेळामध्ये I.S.पदविका प्राप्त/ पदविका धारण करणारे उमेदवारांनी अर्ज करावेत. तसेच BPEd पदवीकाधारण करणारे उमेदवारांनीदेखील अर्ज करु शकतात. पण नियुक्तीसाठी कोणत्याही प्रकारे दबाव आणता येणार नाही आणि तसे केलेस संबंधित उमेदवारांचा अर्ज बाद ठरवून कायमस्वरुपी निकाली काढणेत येईल. तसेच आतंरराष्ट्रीय खेळाडूना प्राधान्य देणेत येईल. सदर कामाचा तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक असून बंधनकारक आहे.
  • कब्बडी क्रीडा प्रशिक्षक पदी NIS पदविकाधारक पात्र उमेदवार उपलब्ध न झालेस BPEd पदवीकाधारक किंवा राज्य राष्ट्रीय खेळाडूंचा विचार केला जाईल. पण नियुक्तीचा अंतिम निर्णय कार्यालयाने आपल्याकडे राखून ठेवला आहे. ü
  • या पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
  • या पदासाठी कार्यालयाने ठरवून दिलेल्या वेळेत तसेच आवश्यकत्यावेळी कार्यालयाचे काम जादा वेळेत पुर्ण करणे बंधनकारक राहील, त्यासाठी कोणत्याही प्रकारचे अतिरीक्त किंवा जादा मानधन आदा केले जाणार नाही.
  • क्रीडा प्रशिक्षकांना विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशालेमध्ये दररोज सकाळी 6 ते 9 आणि सायंकाळी 4 ते 7 या वेळेत तसेच वेळोवेळी आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यासोबत स्पर्धेसाठी आणि सरावासाठी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. क्रिडा प्रशिक्षकांना सुटटीमध्येदेखील काम करणे बंधनकारक राहील.
  • प्रशिक्षकाचे मानधन जि.प.च्या ठेवीवरील प्राप्त होणारे व्याजातून खर्ची टाकणेत येईल.
  • कब्बडी क्रीडा प्रशिक्षक यांची नियुक्ती हि पुर्णत: तात्पुरती आणि कंत्राटी मानधन तत्वावरील असल्यामुळे कोणत्याही उमेदवाराला सेवेत कायम करण्याचा किंवा नियमित सेवेचा कोणताही लाभ अनुज्ञेय असणार नाही आणि कायमस्वरुपी नियुक्ती दिली जाणार नाही याची उमेदवारानी नोंद घ्यावी. तसेच निवड झालेल्या उमेदवारांकडून रु. 100/- स्टॅम्प पेपरवर करारपत्र करुन घेणेत येणार आहे.
  • कब्बडी क्रीडा प्रशिक्षकाचे दि. 28 फेब्रुवारी 2017 रोजी वय किमान 45 वर्षाचे आत असणे आवश्यक आहे.
  • जाहिरातीमधील नमुन्यामध्येच अर्ज करणे बंधनकारक आहे. त्यासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अर्जासोबत झेरॉक्स प्रत सत्य प्रत ( True Copy ) करुन जोडणेचे आहेत, अन्यथा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची छाननी करुन पात्र असणारे उमेदवारांची यादी जि.प.कडील नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात येईल, आणि शक्य झालेस जि.प. कोल्हापूरच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येईल. त्यानंतर लिपीक पदासाठी लेखी परिक्षा आणि मुलाखत याबाबतचा निर्णय अलाहिदा कळविण्यात येईल. तसेच लेखी किंवा तोडी मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारचा भत्ता किंवा प्रवास खर्च कार्यालयाकउून दिली जाणार नाही तो स्वत: उमेदवाराने करणेचा आहे नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी वरील अट क्र. 1 व 2 नुसारच पात्र असणारे अर्ज करावेत अर्धवट किंवा अपुरी कागदपत्रांची अर्ज ग्राहय मानले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • सदरची भरतीबाबत स्थानिक वृत्तपत्रामध्ये जिल्हास्तरावरुन जाहिरात देऊन करणेत येईल.
  • नियुक्त केलेल्या उमेदवाराचा कालावधी पुर्ण झालेनंतर मुदतवाढ देणे किंवा कसे याबाबतचा निर्णय कार्यालयाने राखून ठेवला आहे.
  • अर्ज करावयाची पध्दत :-
  • अर्ज A-4 साईज पेपरवर दिलेल्या नमुन्यातच टंकलिखित केलेला असावा.
  • अर्जावरिल फोटो अलीकडील आणि तो राजपत्रित अधिकारी किंवा विशेष कार्यकारी अधिकारी यांचेकडून साक्षांकित करणे बंधनकारक आहे.
  • अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता, वयाचा पुरावा, अनुभवाचा दाखला, डोमेसाईल प्रमाणपत्र, माजी सैनिकांचे प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, भुकंपग्रस्त प्रमाणपत्र, खेळाडू प्रमाणपत्र, स्वातंत्रसैनिक पाल्य प्रमाणपत्र, अंशकालीन प्रमाणपत्र अनुभव दाखला इत्यादीच्या प्रति साक्षांकित केलेल्या प्रती जोडाव्यात. तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील पदासाठी अर्ज करताना अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र अथवा जात प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहील.
  • प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करण्यात यावा.
  • अर्जाच्या लिफाफयावर ज्या पदासाठी अर्ज केलेला असेल त्या पदाचा, खेळाचा प्रकार उल्लेख करण्यात यावा.

विशेष सुचना :-

  • सदरची नियुक्ती हि कंत्राटी आणि मानधन तत्वावरील फक्त 11 महिन्यासाठी मर्यादित असल्याने नंतर कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही.
  • निवडीबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणल्यास / शिफारसपत्र आणल्यास उमेदवारांस अपात्र ठरविण्यात येईल.
  • प्राप्त अर्जामधून तयार करण्यात आलेली प्रतिक्षा यादी एक वर्षासाठी मर्यादित राहील.
  • अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 21/04/2017 रोजी सायंकाळी 00 वाजेपर्यंत असेल. मुदतीनंतर समक्ष अथवा पोष्टाने आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
  • विहीत नमुन्यात नसलेले अर्ज रद्द समजण्यात येतील.
  • अर्जात पत्रव्यवहाराचा पत्ता जवळच्या खुणेसह ( Land Mark ) नमूद करावा. संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवावा. तसेच स्वत:चा ई मेल आयडी असलेस नमूद करावा.
  • अपुर्ण व चुकीची माहिती भरलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही. तसेच अपात्रतेबाबत कोणत्याही प्रकारे या कार्यालयाकडून पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • अर्जासोबत जोडावयाच्या शैक्षणिक त्याचप्रमाणे व्यावसायिक पात्रतेचे व इतर दाखले यांच्या प्रती सांक्षाकित करुनच अर्जासोबत जोडण्यात याव्यात. झेरॉक्स प्रत सत्य प्रत न केलेस अर्ज अपात्र ठरविण्यात येईल आणि याबाबत कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही.
  • आरक्षणाचा लाभाकरीता त्या त्या प्रवर्गात मोडत असलेल्या उमेदवारांनी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे सक्षम अधिका-यांचे प्रमाणपत्र सादर करावे.
  • उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

सर्व पदाकरीता समान सुचना :-

  • (अ) शासन निर्णय क्र. रिपभ/प्र.क्र.66/2011/ई-10,दि.27जून2011 नुसार ज्या उमेदवाराकडे डोमीसाईल प्रमाणपत्र उपलब्ध नसलेस त्याने त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला असल्यास दाखला सादर करणे आवश्यक आहे. अशा प्रकरणात डोमीसाईल प्रमाणपत्राची अट लागू राहणार नाही.

(ब) सदर उमेदवाराकडे जन्म तारखेचा दाखला उपलब्ध नसल्यास त्या उमेदवाराने शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे बंधनकारक राहील. परंतु सदर शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये जन्म महाराष्ट्र राज्यात झाला असल्याची नोंद आवश्यक आहे.

(क) उपरोक्त बाबी फक्त महाराष्ट्रात राज्यात जन्म झालेल्या उमेदवाराला लागू राहील.

  • सेवा योजन कार्यालय, आदिवासी प्रकल्प अधिकारी, जिल्हा अधिकारी यांचेकडून प्राप्त होणा-या जनगणना, अंशकालीन कर्मचारी, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, जिल्हा सैनिक कल्याण बोर्ड, यांचेकडून शिफारस होणा-या उमेदवारांनी त्यांचे शैक्षणिक पात्रतेनुसार जाहीरातीप्रमाणे अर्ज करणे बंधनकारक आहे.
  • प्रकल्पग्रस्त व भुकंपग्रस्त उमेदवारानी संबंधित जिल्हयातील मा. जिल्हाधिकारी / जिल्हा पुनवर्सन अधिकारी यांचेकडील प्रकल्पगस्त व भुकपंग्रस्त प्रमाणपत्राच्या सत्यप्रती अर्जासोबत जोडणेच्या आहेत. अन्यथा अर्ज अपात्र समजण्यात येईल. तसेच प्रमाणपत्र पडताळणीनंतर नियुक्ती ओदश देणेत येतील.
  • सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय दि. 1 जुलै 2005 नुसार लहान कुटुंब असलेचे प्रमाणपत्र खाली दिलेल्या नमुन्यामध्ये अर्जासोबत स्वतंत्ररित्या आवश्यकत्या कागदपत्रासह सादर करणे आवश्यक राहील.
  • कंत्राटी कब्बडी क्रीडा प्रशिक्षक आणि कंत्राटी लिपीकाचे मानधन हे निवासी प्रशालेकडील कार्यकारीणी समिती सभेमध्ये जे ठरविण्यात येईल ते अदा करणेत येईल.
  • सदरची नियुक्ती पुर्णत: कंत्राटी आणि मानधन तत्वावरील तात्पुरत्या स्वरुपाची असल्यामुळे उमेदवाराचे काम समाधानकारक नसलेस कोणतेही कारण किंवा लेखी सुचना न देता नियुक्ती रद्द करणेत येईल, याबाबत कोणत्याही प्रकारे आणि कोठेही तक्रार करता येणार आहे, आणि कोणतेही राजकिय दबाव आणता येणार नाही.
  • नियुक्तीचे सर्व अधिकारी जिल्हा परिषद, कोल्हापूर ने आपल्याकडे राखून ठेवले आहेत.

शिक्षणाधिकारी (प्राथमिक),

जिल्हा परिषद, कोल्हापूर.

उमेदवाराने अलिकडील काळातील आयडेंटी साईज फोटो लावावा व तो राजपत्रित अधिकारी किंवा विशेष कार्यकारी अधिकारी यांचेकडून साक्षांकित करावा.

शिक्षण विभाग (प्राथमिक ) जिल्हा परिषद, कोल्हापूर

     अर्जाचा नमूना

        कंत्राटी लिपीक कब्बडी क्रीडा प्रशिक्षक पदासाठीचा अर्ज-2017.

प्रति,

सदस्य सचिव, कार्यकारी नियामक समिती, कोल्हापूर.

तथा शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ),

जिल्हा परिषद,कोल्हापूर.

       भरतीचे पदाचे नांव :- कंत्राटी निवासी कब्बडी क्रीडा प्रशिक्षक.

  • उमेदवाराचे संपुर्ण नांव :- आडनांव                स्वत:चे नांव                          वडिलांचे नांव

—————-        —————–        —————–

  • उमेदवाराचे नावात बदल असलेस :- आडनांव      स्वत:चे नांव          वडिलांचे नांव

—————   ——————    —————

  • लग्नानंतर नाव बदलेले असल्यास ( महिला उमेदवारासाठी गॅझेटसह पुरावा जोडावा )

नांव :- —————————————————————————-

  • पत्र व्यवहाराचा पत्ता :———————————————————————
  • जात :- ———————— पोट जात :- —————————
  • आवश्यकत्या ठिकाणी (() अशी खुण करावी.
माजी सैनिक खेळाडू प्रकल्पगस्त भुकंपग्रस्त अपंग अंशकालीन
त्ÖÖ¸üßÖ महिना वर्ष
  • अर्जदाराची जन्म तारीख (अंकामध्ये) (शालांत प्रमाणपत्राप्रमाणे)
वय वर्ष महिना दिवस
  • उमेदवाराचे अर्ज स्विकारणेच्या अंतिम दिनांकास दि. 02.2017 इ. रोजी असलेले वय.
  • महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात काय?(डोमीसाईल प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे).- होय / नाही
  • अर्जदार स्त्रि आहे कि पुरुष ? ( स्त्रि )  / ( पुरुष ) – ( विवाहीत ) / ( अविवाहीत )
  • अर्जदाराची शैक्षणिक अर्हता ( उत्तीर्ण झालेल्या परीक्षेचा तपशिल )
शेक्षणिक पात्रता परीक्षा मंडळाचे नांव उत्तिर्ण होण्याचे वर्ष एकूण गुण टक्केवारी
  • नाव नोंदणी केलेल्या सेवायोजन कार्यालयाचे नांव :- ————— नोंदणी क्रमांक ————— व

दिनांक :-     /     /

वर नमूद केलेला तपशिल माझ्या माहितीप्रमाणे सत्य व अचूक आहे. मी प्रमाणित करतो/करते कि अर्जात नमद केलेली माहिती खोटी अगर चुकीची आढळून आलेस अर्ज अपात्र करणेस, नोकरी मागविण्यास व त्या अनुषंंगाने होणा-या इतर कारवाईस मी पात्र व बांधील राहीन.

ठिकाण :-                                                               सही/-

अर्जदाराचे संपुर्ण नांव:——————————–

दिनांक :-     /      /2017.

———-x—————x——————x—————-x——————x———-

टिप :- जाहिरातीमध्ये पदासाठी विहीत केलेल्या शैक्षणिक अर्हता व अटीनुसार आवश्यकतेनुसार  कागदपत्रांच्या सत्यप्रती, जात प्रमाणपत्र / जात वैधता प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक असणा-या कागदपत्रांच्या सत्यप्रती अर्जासोबत जोडाणे बंधनकारक राहील अन्यथा अर्ज अपात्र ठरविणेत येईल.

 

नमुना खाली दिला आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा ( लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र ) नियम 2005 मधील प्रतिज्ञापत्राचा नमुना -अ

मी श्रीमती / कुमारी ———————————————- श्री ———————————————- यांची पत्नी / मुलगा / मुलगी वय ——वर्ष राहणार ————————————————- याद्वावरे पुढील प्रमाणे असे जाहीर करतो / करते कि,

1)    मी ————————————— या पदासाठी माझ अर्ज दाखल केला आहे.

2)    आज रोजी मला ———– ( संख्या ) इतकी हयात मुले आहेत. त्यापेकी दि. 28 मार्च 2005 तदनंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या ———- आहे ( असल्यास जन्म दिनाक नमुद करावा. )

3)    हयात असलेल्या मुलांची संख्या दोन पेक्षा अधिक असेल तर दि. 28 मार्च 2005 तदनंतर जन्माला आलेल्या मुलामुळे या पदासाठी मी अनर्ह ठरविण्यास पात्र होईन याची मला जाणीव आहे.

ठिकाण :-

दिनांक :-                                उमेदवाराची स्वाक्षरी

उमेदवाराचे संपुर्ण नांव :———————————

  • अंतिम निवड यादीतील उमेदवारांची मुळ कागदपत्रे पडताळणी केलेशिवाय नियुक्ती दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
  • एखादा उमेदवार त्याच्या निवडीसाठी निवड समितीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दबाव आणलेस त्यास निवड प्रक्रियेतून वगळणेत येईल.
  • मुलाखतीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड यादी ही जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे नोटीस बोर्डावर तसेच जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळा zpkolhapur.gov.in वर प्रसिध्द करण्यात येईल.
  • जाहीरातीमधील काही बाबी विषयी शंका असल्यास याबाबत सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, कोल्हापूर यांना कार्यालयीन दिवशी व वेळेत समक्ष भेटावे.
 राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला, (चंबुखडी)  शिंगणापूर, ता- करवीर, जिल्हा- कोल्हापूर. प्रवेशपत्र – 2017.

अहस्तांतरणीय

उमेदवाराचे संपुर्ण नांव :- —————————————————

अर्ज केलेल्या पदाचे नांव :- ————————————————-

 

उमेदवाराची स्वाक्षरी

उमेदवाराने अलिकडील काळातील पासपोर्ट साईज फोटो लावावा व तो राजपत्रित अधिकारी किंवा विशेष कार्यकारी अधिकारी यांचेकडून साक्षांकित करावा.

जिल्हा परिषद कोल्हापूर येथे छत्रपती राजर्षी शाहू सभागृहामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

कोल्हापूर जिल्हा परिषद  मध्ये छत्रपती राजर्षी  शाहू  सभागृहामध्ये डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात  १२६ वी  जयंती दि १४/०४/२०१७ इ. रोजी सकाळी संपन्न करण्यात आली. डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मा जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शोमिका महाडिक जिल्हा परिषद  यांचे हस्ते करण्यात  आली .

त्याप्रसंगी मा . समाज कल्याण सभापती श्री . विशांत महापुरे , मा महिला व बालकल्याण समिती सभापती सौ . शुभांगी शिंदे, मा मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, अति . मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . इंद्रजित देशमुख, प्रमुख वक्ते प्रा . विजय काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी  एम . एस  घुले, श्री सुशील संसारे, समाज कल्याण अधिकारी श्री प्रदीप भोगले व सर्व खाते प्रमुख तसेच कास्ट्राईव्ह  संघटना संघटनेचे अध्यक्ष श्री नामदेव कांबळे, श्री सुधाकर कांबळे व इतर पदाधिकारी व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी संघटनेच्या वतीने व कै. आरती पाटील (सावकार)  हिच्या स्मरणार्थ श्री धनंजय जाधव यांच्या वतीने डॉ ए पी जे अब्दुल कलाम वाचनालयास रक्कम रुपये १०००० किमतीचे पुस्तके प्रदान करण्यात आली

या प्रसंगी प्रा विजय काळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार प्रणाली तसेच आरक्षनाव्यतिरिक्त  न समजलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आजच्या काळातील  जगताना कसे  महत्वाचे आहे हे सांगितले. तसेच प्रत्येक गावातील समाज मंदिराचे सार्वजनिक वाचनालय रूपांतर होणे गरजेचे आहे. यावेळी सौ  शमिका  महाडिक यांनी आपले मनोगत व्यक्त  केले. जयंती कार्यक्रम प्रास्ताविक यांनी समाज कल्याण अधिकारी श्री प्रदीप भोगले केले तर अति . मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . इंद्रजित देशमुख मनोगत व्यक्त  केले.

जिल्हा परिषद येथे सर्व विभागाचा आढावा

जिल्हा परिषद कोल्हापूर येथे सर्व जिल्हा परिषदेतील  विभागाच्या  योजना व प्राप्त  निधी , योजनेचे  निकष योजना कोणासाठी योजना कमिटी मध्ये  कोण सदस्य असतात अशा सर्व विभागीय बाबीचा आढावा  मा  अध्यक्षा मा उपाध्यक्ष  व विषय  समितीचे सभापती याना मुख्य कार्यकारी अधिकारी ,मा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व खाते प्रमुख आपल्या विभागाचा  आढावा  देत आहेत . दि १२०४¬२०१७ रोजी सामान्य प्रशासन विभाग, शिक्षण प्राथमिक , शिक्षण माध्यमिक ,महिला व बाल  कल्याण  या विभागाचा आढावा देण्यात आला . दि १३-०४-२०१७रोजी समाज कल्याण , drda,  ग्रामपंचायत, पशुसंवर्धन या विभागाचा आढावा देणेत आला सदर  आढावा बैठकी मध्ये  मा अध्यक्ष उपाध्यक्ष व विषय समिती सभापती यांनी वेगवेगळ्या सूचना देण्यात आल्या जिल्हा परिषद येथे सर्व विभागाचा आढावा  सर्व विभागाची आपल्या योजनांचे  निकषाप्रमाणे पात्र लाभार्थीची निवड करावी व त्याची अंमलबजावणी करावी अशा सूचना दिल्या . दि १८/०४/२०१७ रोजी उर्वरित विभागाचा  आढावा घेण्यात येणार आहे

जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर. करवीर व गगनबावडा तालुक्यातील अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण

जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर.

करवीर गगनबावडा तालुक्यातील अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण

दि. 15 मार्च, 2017 ते 31 मार्च, 2017

दि.8/02/2017 रोजी जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, कोल्हापूर या केंद्राच्या कामकाजाबाबत बैठक संपन्न झाली.  सदर बैठकित कोल्हापूर जिल्हयातील  करवीर व गगनबावडा या दोन तालुक्यातील अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तिंचे सर्वेक्षण ग्रामीण भागात जिल्हा परिषद, कोल्हापूर  यांच्यामार्फत  व महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त, महानगरपालिका कोल्हापूर यांचेमार्फत दि. 15 मार्च,2017 ते 31 मार्च, 2017 या कालावधीत करण्याचे ठरविले आहे.

सदर अनुषंगाने करवीर व गगनबावडा या तालुक्यातील दिव्यांग कल्याण क्षेत्रात काम      करणा-या दिव्यांग व्यक्तींच्या संघटना, स्वयंसेवी संस्था व दिव्यांग व्यक्ती यांना असे आवाहन करण्यात येते की, त्यांनी सदर सर्वेक्षण यशस्वीपणे पूर्ण व्हावे यासाठी सर्वेक्षण करणा-या यंत्रणेस आवश्यक ते सहकार्य करावे. सदर सर्वेक्षणातुन मिळणा-या माहीतीचा उपयोग अस्थिव्यंग प्रवर्गातील व्यक्तींच्या कल्याणासाठी जिल्हा परिषद व महानगरपालिका यांच्यामार्फत राबविण्यात येणा-या योजना राबविण्यासाठी होणार आहे.या सर्वेक्षणापासून अस्थिव्यंग प्रवर्गातील एकही दिव्यांग व्यक्ती सुटणार नाही या दृष्टीने कार्यवाही करावी असे आवाहन करण्यात येत आहे.

या बाबतीत अधिक माहितीसाठी जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर.यंाचेशी संपर्क साधावा.

फोन.न. 0231-2656445

E-mail-swozpkop@gmail.com

DRDA Programe & Education primary Examination

मा. सौ. संयोगीताराजे छत्रपती प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र वाटप करताना. शेजारी श्री. एस. जी. किणींगे, अग्रणी जिल्हा प्रबंधक, कोल्हापूर, श्री. एच. टी. जगताप, प्रकल्प संचालक, जि.ग्रा,वि.यं., कोल्हापूर आणि श्री. पी. बी. लोहार, संचालक, आरसेटी, कोल्हापूर.

“ग्रामीण भागातील महिलांनी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी स्वयंरोजगाराची कास धरावी व त्यातून आपली, आपल्या कुटुंबाची उन्नती साधावी. दुग्ध व्यवसाय करण्यात प्रामुख्याने महिलांचा खूप मोठा हात आहे. पण तो पारंपारिक पद्धतीने न करता शास्त्रशुद्ध व आधुनिक पद्धतीने केला तर चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकतो. महिलांनी सर्व गोष्टीत पुढाकार घेण्याचे ठरवले तरच महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण ही संकल्पना पूर्णत्वास जाईल. तसेच, व्यवसायासाठी आवश्यक भांडवल योग्य व्यक्तीस योग्य प्रकारे पुरवण्यास बँकासुद्धा तत्पर आहेत ” असे विचार बँक ऑफ इंडियाचे अग्रणी जिल्हा प्रबंधक श्री. एस. जी. किणींगे यांनी व्यक्त केले. बँक ऑफ इंडिया द्वारा पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान (आरसेटी) कोल्हापूर तर्फे आयोजित दुग्धव्यवसाय प्रशिक्षणाच्या सांगता समारोहाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

जि.ग्रा.वि.यं., कोल्हापूर चे प्रकल्प संचालक श्री. एच. टी. जगताप आपल्या मनोगतात म्हणाले, “आजही दुग्धव्यवसाय हा ग्रामीण भागाचा आर्थिक कणा आहे. पण तो व्यावसायिकदृष्ट्या केला पाहिजे. फक्त चूल आणि मूल यातच अडकून न राहता महिलांनी शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या विविध प्रशिक्षणांचा, विविध योजनांचा लाभ घेऊन यशस्वी उदयोजक बनण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठीच महिला बचत गटाची चळवळ जोरात सुरु आहे. मिळालेल्या संधीचा योग्य वापर करून महिलांनी आत्मनिर्भर व स्वावलंबी बनले पाहिजे. परिणामी समाजात आपली प्रतिष्ठा व मानसन्मान वाढेल. ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराभिमुख करण्यासाठी मा. डॉ. कुणाल खेमणार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद/ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कोल्हापूर आणि बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान (आरसेटी) यांचे संयुक्त विद्यमाने विविध व्यावसायिक प्रशिक्षणे आयोजित करत आहे.”

मा. संयोगिताराजे छत्रपती आपल्या मनोगतात म्हणाल्या,” मा. छत्रपती शाहू महाराजांचा वारसा पुढे चालवताना सामन्यातील सामान्य व दुर्गम भागातील लोकांचा विकास हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मा. संभाजी राजे छत्रपती यांनी शाहुवाडी तालुक्यातील येळवण जुगाई हे गाव संसद आदर्श ग्राम योजने अंतर्गत दत्तक घेतले आहे. त्या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अतिशय नियोजन पूर्ण प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून येळवण जुगाई गावातील १४ महिलांना त्यांच्या आवडीनुसार दुग्ध व्यवसाय प्रशिक्षणासाठी स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान (आरसेटी) कोल्हापूर संस्थेकडे पाठवले. आज या प्रशिक्षणाच्या समारोपाच्या निमित्ताने महिलांनी व्यक्त केलेल्या मनोगतातून असे दिसून येते की या ६ दिवसात आरसेटी कोल्हापूरने एक परिपूर्ण प्रशिक्षण दिले आहे ज्यामुळे या महिला भविष्यात यशस्वी उद्योजिका म्हणून पुढे येतील. भविष्यात अशा विविध प्रशिक्षणांचा लाभ येळवण जुगाई गावातील लोकांना व्हावा, ही अपेक्षा व्यक्त करून त्यांनी स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान (आरसेटी)  कोल्हापूर या संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान (आरसेटी) कोल्हापूर चे संचालक श्री. प्रदीप लोहार, श्री. रणदीप भिलवडीकर, गट समन्वयक आणि आरसेटी चे स्टाफ श्री. बाजीराव पाटील, श्री. मदन पाटील, सौ. कल्पना कुलकर्णी उपस्थित होत्या.

DRDA Programe & Education primary Examination

मा. सौ. संयोगीताराजे छत्रपती प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र वाटप करताना. शेजारी श्री. एस. जी. किणींगे, अग्रणी जिल्हा प्रबंधक, कोल्हापूर, श्री. एच. टी. जगताप, प्रकल्प संचालक, जि.ग्रा,वि.यं., कोल्हापूर आणि श्री. पी. बी. लोहार, संचालक, आरसेटी, कोल्हापूर.

“ग्रामीण भागातील महिलांनी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी स्वयंरोजगाराची कास धरावी व त्यातून आपली, आपल्या कुटुंबाची उन्नती साधावी. दुग्ध व्यवसाय करण्यात प्रामुख्याने महिलांचा खूप मोठा हात आहे. पण तो पारंपारिक पद्धतीने न करता शास्त्रशुद्ध व आधुनिक पद्धतीने केला तर चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकतो. महिलांनी सर्व गोष्टीत पुढाकार घेण्याचे ठरवले तरच महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण ही संकल्पना पूर्णत्वास जाईल. तसेच, व्यवसायासाठी आवश्यक भांडवल योग्य व्यक्तीस योग्य प्रकारे पुरवण्यास बँकासुद्धा तत्पर आहेत ” असे विचार बँक ऑफ इंडियाचे अग्रणी जिल्हा प्रबंधक श्री. एस. जी. किणींगे यांनी व्यक्त केले. बँक ऑफ इंडिया द्वारा पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान (आरसेटी) कोल्हापूर तर्फे आयोजित दुग्धव्यवसाय प्रशिक्षणाच्या सांगता समारोहाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

जि.ग्रा.वि.यं., कोल्हापूर चे प्रकल्प संचालक श्री. एच. टी. जगताप आपल्या मनोगतात म्हणाले, “आजही दुग्धव्यवसाय हा ग्रामीण भागाचा आर्थिक कणा आहे. पण तो व्यावसायिकदृष्ट्या केला पाहिजे. फक्त चूल आणि मूल यातच अडकून न राहता महिलांनी शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या विविध प्रशिक्षणांचा, विविध योजनांचा लाभ घेऊन यशस्वी उदयोजक बनण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठीच महिला बचत गटाची चळवळ जोरात सुरु आहे. मिळालेल्या संधीचा योग्य वापर करून महिलांनी आत्मनिर्भर व स्वावलंबी बनले पाहिजे. परिणामी समाजात आपली प्रतिष्ठा व मानसन्मान वाढेल. ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराभिमुख करण्यासाठी मा. डॉ. कुणाल खेमणार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद/ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कोल्हापूर आणि बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान (आरसेटी) यांचे संयुक्त विद्यमाने विविध व्यावसायिक प्रशिक्षणे आयोजित करत आहे.”

मा. संयोगिताराजे छत्रपती आपल्या मनोगतात म्हणाल्या,” मा. छत्रपती शाहू महाराजांचा वारसा पुढे चालवताना सामन्यातील सामान्य व दुर्गम भागातील लोकांचा विकास हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मा. संभाजी राजे छत्रपती यांनी शाहुवाडी तालुक्यातील येळवण जुगाई हे गाव संसद आदर्श ग्राम योजने अंतर्गत दत्तक घेतले आहे. त्या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अतिशय नियोजन पूर्ण प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून येळवण जुगाई गावातील १४ महिलांना त्यांच्या आवडीनुसार दुग्ध व्यवसाय प्रशिक्षणासाठी स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान (आरसेटी) कोल्हापूर संस्थेकडे पाठवले. आज या प्रशिक्षणाच्या समारोपाच्या निमित्ताने महिलांनी व्यक्त केलेल्या मनोगतातून असे दिसून येते की या ६ दिवसात आरसेटी कोल्हापूरने एक परिपूर्ण प्रशिक्षण दिले आहे ज्यामुळे या महिला भविष्यात यशस्वी उद्योजिका म्हणून पुढे येतील. भविष्यात अशा विविध प्रशिक्षणांचा लाभ येळवण जुगाई गावातील लोकांना व्हावा, ही अपेक्षा व्यक्त करून त्यांनी स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान (आरसेटी)  कोल्हापूर या संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान (आरसेटी) कोल्हापूर चे संचालक श्री. प्रदीप लोहार, श्री. रणदीप भिलवडीकर, गट समन्वयक आणि आरसेटी चे स्टाफ श्री. बाजीराव पाटील, श्री. मदन पाटील, सौ. कल्पना कुलकर्णी उपस्थित होत्या.