अनधिकृत चालू असलेल्या प्राथमिक शाळाबाबत

प्रति,

मा.जिल्हा माहिती अधिकारी,

कोल्हापूर.

 

         विषय   विनामूल्य प्रेस नोट प्रसिध्द होणेबाबत.

 

उपरोक्त   विषयांन्वये कळविण्यात येते की सन 2017-18 मध्ये कोल्हापूर जिल्हयातील शासनाच्या कोणत्याही मान्यतेशिवाय चालू असलेल्या अनधिकृत शाळेमध्ये प्रवेश न घेणेबाबत प्रेस नोट व अनधिकृत शाळांची यादी सोबत सादर केली  आहे. तरी आपले स्तरावरुन सर्व लोकप्रिय दैनिकामधून विनामूल्य प्रसिध्द करणेबाबत आदेश व्हावेत  ही विनंती आहे.

सोबत :- शाळांची यादी.                                                  

 

 शिक्षणाधिकारी (प्राथमिक),

                                                                                      जिल्हा परिषद कोल्हापूर.

 

प्रेस नोट

कोल्हापूर जिल्हयामध्ये खालीलप्रमाणे शासनाच्या कोणत्याही  परवानगी शिवाय  अनधिकृत चालू असलेल्या  प्राथमिक शाळा आहेत. पालकांनी खालील शाळामध्ये आपल्या पाल्यास प्रवेश घेऊ नये. तसेच खालील शाळांच्या संस्थापकांनी शाळा तात्काळ बंद करावी अन्यथा सदर शाळेवरती बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील कलम 18(5) तरतूदीनुसार कारवाई  करण्यात येईल.

अ.क्र. अनधिकृतपणे सुरु असलेल्या प्राथमिक शाळेचे नांव पत्ता (सन 2017-18) चालू असलेले वर्ग माध्यम तालुका
1 स्वामी विवेकानंद विद्यालय तळंदगे इयत्ता 1 ली ते इ4 थी सेमी इंग्रजी हातकणंगले
2 सिल्म इंग्लिश मेडियम स्कूल हूपरी इयत्ता 1 ली ते इ4 थी इंग्रजी हातकणंगले
3 यश इंग्लिश मेडियम स्कूल पेठ वडगांव इयत्ता 1 ली ते इ4 थी इंग्रजी हातकणंगले
4 चावराई हायस्कूल चावरे इ.5 वी ते इ.8 वी मराठी हातकणंगले
5 ज्ञानकला इंग्लिश मेडियम स्कूल उंचगा्‌ंव इयत्ता 1 ली ते इ.6वी इंग्रजी करवीर
6 संतुलन पाषाण शाळा हलसवडे इयत्ता 1 ली ते इ.7 वी मराठी करवीर
7 काडसिध्देश्वर इंंग्लिश मेडियम स्कूल कणेरी इयत्ता 1 ली ते इ.6 वी इंग्रजी करवीर
8 विद्याभवा इंग्लिश मेडियम स्कूल उजळाईवाडी इयत्ता 1 ली ते इ.4वी इंग्रजी करवीर
9 सर्वाेदय माध्यमिक विद्यालय म्हाळुंगे खालसा इ.5 वी ते इ.8 वी मराठी चंदगड
10 छत्रपती शाहू माध्यमिक विद्यालय ढेकोळी खुर्द इ.6 वी इ.7वी मराठी चंदगड
11 कलानंदीगड माध्यमिक विद्यालय कालिवडे/ आंबेवाडी इ.8 वी मराठी चंदगड
12 सेंट अँथोनी इंग्लिश मेडियम स्कूल वैतागवाडी इ.6 वी ते इ.7 वी इंग्लिश चंदगड
13 सोनारवाडी मुगळी हायस्कूल मुगळी सोाारवाडी इ.8 वी मराठी चंदगड
14 फाशीवाडा माडवळे हायस्कूल माडवळे इ.8 वी मराठी चंदगड
15 संतुलन पाषाण शाळा नांदणी इ.1 ली ते इ.5 वी मराठी शिरोळ
16 कै.शामराव दाभाडे आश्रमशाळा शाहूवाडी इ.1 ली ते इ.8 वी मराठी शाहूवाडी
17 माध्यमिक विद्यालय पेंडाखळे इ.8 वी मराठी शाहूवाडी
18 बी एन टोणपी विद्यालय हलकर्णी इ.5 वी तेइ.7 वी मराठी गडहिंग्लज
19 क्रिएटिव्ह इंग्लिश मेडियम स्कूल बडयाचीवाडी इ.1ली ते इ.8 वी प्रत्येकी 1 तुकडी इंग्रजी गडहिंग्लज
20 सरदार विठोजी शिंदे इंग्लिश मेडियम स्कूल तळेवाडी इ.5 वी इंग्रजी गडहिंग्लज
21 बलभीम विद्यालय कसबा बावडा इ.8 वी चा वर्ग मराठी कोल्हापूर शहर
22 माईसाहेब बावडेकर अकॅडमी (प्राथमिक) ताराबाई पार्क कोल्हापूर इ.8 वी इंग्रजी कोल्हापूर शहर
23 दत्ताबाळ प्राथमिक विद्यामंदीर कसबा बावडा इ.8 वी मराठी कोल्हापूर शहर
24 राणेज इंग्लिश मेडियम स्कूल कोल्हापूर इ.5 वी ते 7 वी इंग्रजी कोल्हापूर शहर
25 प्रिन्स शिवाजी इंग्लिश मेडियम स्कूल, कोल्हापूर इ.5 वी ते 7 वी इंग्रजी कोल्हापूर शहर
26 कोल्हापूर इंग्लिश मेडियम स्कूल, खरी कान्ॅर्ार कोल्हापूर इ.8 वी इंग्रजी कोल्हापूर शहर
27 ज्ञानहो इंग्लिश मेडियम स्कूल नाना पाटील नगर कोल्हापूर इ.1 ली ते इ.4थी इंग्रजी कोल्हापूर शहर

कोल्हापूर जिल्हयाचा देश पातळीवर सन्मान !!

केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाचे सचिव श्री. अनिल स्वरूप (भाप्रसे) हे प्राथमिक शिक्षण स्तरावरील विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी दिनांक 06 व 07 मार्च 2017 रोजी कोल्हापूर जिल्हयामध्ये दोन दिवसीय विशेष दौ-यानिमित्त आले होते. यावेळी त्यांनी गडहिंग्लज तालुक्यातील वि. मं. ऐनापूर व वि. मं. करंबळी, करवीर तालुक्यातील विकास वि. मं. सरनोबतवाडी आणि हातकणंगले तालुक्यातील कन्या वि. मं. किणी या शाळांना भेटी देऊन प्राथमिक शिक्षणातील विविध उपक्रमांची पाहणी केली.

कोल्हापूर जिल्हयातील प्राथमिक शाळांना मिळालेले ISO मानांकन, ज्ञानरचनावाद, ABL व ई-लर्निंग असे उपक्रम तसेच इयत्ता 1ली पासून संगणक हाताळणारे विदयार्थी, अध्ययनात टॅबचा वापर, विदयार्थ्याचे संुदर हस्ताक्षर, 100% विदयार्थी उपस्थितीचा ध्वज, शिक्षकांचा अध्यापनात लॅपटॉपचा वापर, वाचन कटटा, तरंग वाचनालय, भरीव शैक्षणिक उठाव असे उपक्रम पाहून ते भारावून गेले होते. कोल्हापूर जिल्हयामध्ये राबविलेले प्रभावी उपक्रम संपूर्ण देशभरात पोहचण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडील यशस्वी उपक्रमांचे देश पातळीवर सादरीकरण करण्याची संधी त्यांचेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार उपलब्ध करुन देण्यात आली. याबाबत भारत सरकारच्या लाल बहाद्दूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी, मसूरीचे पत्र जिल्हा परिषदेस प्राप्त झाले होते.

त्यानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील यशस्वी उपक्रमांचे सादरीकरण नुकतेच लाल बहाद्दूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी, मसूरी (उत्तराखंड) येथे सादर केले. यामध्ये ज्ञानरचनावादी शाळा, कृतीयुक्त अध्ययन पध्दती, डिजीटल शाळा, गुढीपाडवा-शाळा प्रवेश वाढवा कार्यक्रम, राजर्षि शाहू निवासी क्रीडा प्रशाला, हॅन्डवॉश स्टेशन, शाळा सिध्दी, लोकसहभाग अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांसह जिल्हयातील निवडक शाळांच्या सादरीकरणाचा समावेश होता. या सादरीकरणानंतर केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांचे विशेष अभिनंदन करुन कोल्हापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या उपक्रमांचे कौतुक केले.

                                                                                                                                                                                                                                 शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

                                                                                                                                                                                                                                 जिल्हा परिषद कोल्हापूर

ग्रामपंचायत शिवणगे ता.चंदगड ग्रामसेवक यांचा सत्कार

आज दिनांक 25/04/2017 रोजी स्मार्ट ग्राम योजन अंतर्गत जि.प.कोल्हापूर कडील जिल्हास्तरीय समिती मार्फत ग्रा.प.शिवनगे ता.चंदगड ची तपासणी करण्यांत आली.त्यावेळी मा.इंद्रजित देशमुख अति.मुख्य कार्यकारी अधिकारी, मा.एम.एस.घुले उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप), डॉ.प्रकाश पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी, मा.चंद्रकांत सुर्यवंशी जिल्हा कृषी विकास अधिकारी ,मा.प्रकाश बरगे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी, श्री.शिंदे उपकार्यकारी अभियंता (बांध) मा.कलाप्पा भोगन जि.प.सदस्य ,श्री.मुगेरी साहेब, मा.गोपाळराव पाटील  तपासणीचेवेळी उपस्थित होते.

ग्राम पंचायती कडील कामकाज पाहून कामाचे व ग्रामसेवकाच्या कार्यशैलीचे कौतुक करुन श्री.जी.एल.पाटील ग्रामसेवक यांचा मा.इंद्रजित देशमुख अति, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सत्कार केला व समितीने अभिनंदन करुन समाधान ü व्यक्त केले.

ग्रामपंचायत शिवनगे स्थापने पासून (1956) आजतागायत बिनविरोध असले बाबत समाधान व्यक्त करुन शासना मार्फत वैशिष्ठयपूर्ण कामा बाबत पुरस्कार देणे करिता शिफारस करत असलेचे आपले मत व्यक्त केले यावेळी गावातील सरपंच ,उपसरपंच सदस्य सर्व संस्थाचे पदाधिकारी व पं.स.चे सर्व खाते प्रमुख  व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व शिक्षा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व शिक्षा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी

प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी केंद्र शासन व राज्य शासनामार्फत संयुक्तरित्या सर्व शिक्षा अभियान ही महत्वकांक्षी योजना राबविणेत येते. या योजनेंतर्गत इयत्ता 1 ली ते 8 वीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शाळाबाह्य मुलांना विशेष प्रशिक्षण व नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत व्दिभाषिक पुस्तके, संगणक शिक्षण अंतर्गत डिजीटल वर्ग, दिव्यांग मुलांना साहित्य साधने, मुलींच्या शिक्षणाच्या योजना, शिक्षक प्रशिक्षण असे अनेक उपक्रम राबविणेत येतात. सदर उपक्रमांची कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रभावी अंमलबजावणी सुरु असलेबद्दल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे कार्यक्रम अधिकारी श्री.प्रमोद पाटील यांनी समाधान व्यक्त केले.

सर्व शिक्षा अभियान ही केंद्र पुरस्कृत योजना सन 2001 पासून राज्यात सुरु आहे. राज्यस्तरावरुन महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई या कार्यालयामार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यांना आवश्यक निधी पुरवठा तसेच उपक्रम अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले जाते. सन 2016-17 या वर्षामध्ये उपरोक्त सर्व उपक्रमांसोबतच नाविन्यपूर्ण उपक्रम व विशेष प्रशिक्षणांतर्गत जिल्ह्यातील 730 शाळांना व्दिभाषिक पुस्तक खरेदीसाठी तर 58 उच्च प्राथमिक शाळांना डिजीटल वर्ग निर्मितीकरिता अनुदान देणेत आले होते. या उपक्रमांच्या अंमलबजावणीची माहिती घेणेसाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडील कार्यक्रम अधिकारी श्री.प्रमोद पाटील कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी दि.24/04/2017 रोजी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, लेखा सहाय्यक यांनी बैठक घेवून जिल्ह्यामध्ये राबविणेत आलेल्या उपक्रमांबाबत माहिती जाणून घेतली. तसेच दि.25/04/2017 रोजी जिल्ह्यातील विविध शाळांना भेटी देवून उपक्रमांची प्रत्यक्ष पहाणी केली. यावेळी त्यांनी केंद्रशाळा गडमुडशिंगी, संजीवन वि.मं. चंदूर, सहारानगर वि.मं. रुई, वि.मं. मौजे सांगाव, म.न.पा. टेंबलाईवाडी विद्यालय, बालभारती कार्यालय या ठिकाणी भेटी दिल्या. सदर भेटीदरम्यान विद्यार्थी वाचन विकासासाठी व्दिभाषिक पुस्तक खरेदी, डिजीटल वर्ग निर्मिती, वीटभट्टीवरील मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंमलबजावणी, मोफत पाठ्यपुस्तके आदी उपक्रमांबाबत आढावा घेवून मार्गदर्शन केले. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमनार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री.सुभाष चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षा अभियान अंतर्गत विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी होत असलेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी उपशिक्षणाधिकारी श्री.बी.एम.कासार, लेखाधिकारी श्री.डी.डी.कुंभार, प्रोग्रामर श्री. जी.बी. पुरेकर, जिल्हा समन्वयक श्रीम.आम्रपाली देवेकर, श्री.बी.बी.पाटील, श्री.मारुती जाधव, श्री.एस.एच.ढवळे, श्री.एस.बी.कदम, श्री.अमोल पाटील, श्री.आर.एम. धनवडे, आदी उपस्थित होते.

 

  आर.टी.ई. अंतर्गत 25 टक्के विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2017-18 – दुसरी फेरी

 

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये (वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देणेसाठी जागा राखून ठेवण्याची रीत) नियम 2012 प्रमाणे अल्पसंख्यांक शाळा वगळता, राज्यातील सर्व विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यता तत्त्वावरील प्राथमिक शाळांना सन 2012-13 या शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 % पर्यंतच्या जागा नजीकच्या परिसरातील वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. या अंतर्गत सन 2017-18 या शैक्षणिक वर्षामधील 25 % आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या https://student.maharashtra.gov.in या लिंकवरील RTE Portal वर ऑनलाईन चालू झालेली आहे.

सदर प्रक्रियेअंतर्गत पालकांकडून ऑनलाईन अर्ज स्विकारणेची पहिली फेरी पार पडलेली आहे. मात्र पहिल्या फेरीअंती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांमधील RTE अंतर्गत विद्यार्थी प्रवेशाच्या 25 % जागा शिल्लक राहत असलेने दि. 30/04/2017 ते दि. 10/05/2017 या कालावधीत पालकांकडून ऑनलाईन अर्ज स्विकारणेची दुसरी फेरी राबविणेत येणार आहे. तरी सदर कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील इच्छुक पालकांनी तात्काळ ऑनलाईन अर्ज करावेत.

आरटीई अंतर्गत 25 % आरक्षण मधून प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांच्या पालकांना खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे.

 

अ.क्र. कागदपत्राचा प्रकार वैध कागदपत्रांची सूची
1 जन्माचे प्रमाणपत्र ग्रामपंचायत/ न.प./ म.न.पा. यांचा दाखला/ रूग्णालयातील ANM रजिस्टर मधील दाखला/ अंगणवाडी/ बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला/ आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन
2 वास्तव्याचा पुरावा आधार कार्ड / पासपोर्ट / निवडणूक ओळखपत्र / वीज बिल / टेलिफोन बिल / घरपट्टी / वाहन चालविण्याचा परवाना यापैकी कोणतेही एक. भाडे तत्त्वावर राहणा-या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाकडील नोंदणीकृत भाडेकरारनाम्याची प्रत आवश्यक.
3 सामाजिक वंचित घटक (SC व ST) यांचेसाठी पालकांचे जातीचे प्रमाणपत्र तहसिलदार / उपजिल्हाधिकारी / उपविभागीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र (परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.)
4 आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या पालकांचा उत्पन्नाचा दाखला (रू. 1 लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा) तहसिलदार / नायब तहसिलदार दर्जापेक्षा कमी नसलेल्या महसुल अधिका-यांचे प्रमाणपत्र आर्थिक वर्ष 2015-16 (मार्च 2016 अखेरचे     रू. 1 लाखापेक्षा कमी असलेले)
5 दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अपंगत्व प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकित्सक / वैद्यकीय अधिक्षक, अधिसुचित जिल्हा शासकीय रूग्णालय यांचे 40 % पेक्षा जास्त अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र
6 बालकाचे छायाचित्र अर्ज करणा-या बालकाचे अलिकडीच्या काळातील पासपोर्ट साईज रंगीत छायाचित्र

 

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये मदत केंद्रे स्थापन करणेत आलेली आहेत. तरी ऑनलाईन अर्ज करतेवेळी पालकांना कोणतीही समस्या आल्यास खालील मदत केंद्रांशी संपर्क साधावा किंवा मदत केंद्रावरून ऑनलाईन अर्ज करावेत. त्याचप्रमाणे पालक महा-ई सेवा केंद्रातून तसेच ग्रामपंचायत स्तरावरील संग्राम कक्षातून ऑनलाईन अर्ज करू शकतात.

 

अ.
क्र.
तालुका मदत केंद्राचे नाव पत्ता संपर्काकरीता व्यक्तीचे नाव हुद्दा दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक ई-मेल आयडी
1 आजरा पार्वती शंकर शाळा – मु.पो. उत्तूर, ता. आजरा, जि. कोल्हापूर श्री. चव्हाण, शाळा कर्मचारी 7709720368 brcajara@yahoo.in
2 भुदरगड बी.आर.सी., शिक्षण विभाग, पंचायत समिती, गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर श्री. नीरज ढेरे, डाटा एन्ट्री ऑपरेटर 9970151830 neerajdhere09@rediffmail.com
3 चंदगड बी.आर.सी., शिक्षण विभाग, पंचायत समिती, चंदगड, जि. कोल्हापूर श्री. प्रसाद पाटील, कनिष्ठ सहाय्यक 8308485960 ssachandgad12@gmail.com
4 गडहिंग्लज नेट पॉईंट – बसवेश्वर काँम्प्लेक्स, संकेश्वर रोड, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर श्री. तौफीक जी. नदाफ, संस्था चालक 9075857569, 9923062257 netpoint666@gmail.com
5 गडहिंग्लज प्रोग्रेसिव्ह स्कूल – आजरा रोड, नेसरी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर श्री. यशवंत एस. सुरंगे, मुख्याध्यापक 9226470233, 9404978567 yashwant.surange@gmail.com
6 गगनबावडा दत्ताजीराव मोहिते-पाटील हायस्कूल – मु.पो. तिसंगी, ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर श्री. पी. के. गुरव, हायस्कूल कर्मचारी 9404480797 beogaganbawada@gmail.com
7 हातकणंगले बी.आर.सी., शिक्षण विभाग, पंचायत समिती,हातकणंगले, जि. कोल्हापूर श्री. विष्णू गोंधळी, डाटा एन्ट्री ऑपरेटर 9767972338, 9175503066 beohatkanangale@rediffmail.com
8 हातकणंगले शिक्षण मंडळ, नगरपालिका, इचलकरंजी, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर श्री. काळगे, प्रशासन अधिकारी 9860263773 npaoichlkaranji@gmail.com
9 कागल बी.आर.सी., शिक्षण विभाग, पंचायत समिती, कागल,

जि. कोल्हापूर

श्री. डॅनी डिसोझा, डाटा एन्ट्री ऑपरेटर 9765899298 deossakagal@gmail.com
10 करवीर आंबुबाई पाटील स्कूल – मु.पो. गोकुळ शिरगांव, ता. करवीर, जि. कोल्हापूर श्री. के. डी. पाटील, मुख्याध्यापक 9326617509 karveerbeo@gmail.com
11 करवीर पॅरामाऊंट स्कूल – मु.पो. कोपार्डे, ता. करवीर, जि. कोल्हापूर श्री. देसाई, शाळा कर्मचारी 9420583690 karveerbeo@gmail.com
12 करवीर सर्वानंद स्कूल – मु.पो. गांधीनगर, ता. करवीर, जि. कोल्हापूर श्री. स्वामी, शाळा कर्मचारी 9420583690 karveerbeo@gmail.com
13 करवीर दूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूल – मु.पो. इस्पुर्ली, ता. करवीर,जि. कोल्हापूर सौ. राऊत, शाळा कर्मचारी 9372476529 karveerbeo@gmail.com
14 पन्हाळा बी.आर.सी., शिक्षण विभाग, पंचायत समिती, पन्हाळा, जि. कोल्हापूर श्री. राहुल रेडेकर, डाटा एन्ट्री ऑपरेटर 9922355959 brcpanhala@yahoo.in
15 पन्हाळा प्रोसॉफ्ट काँप्युटर – कॉलेज रोड, वारणानगर, ता. पन्हाळा,जि. कोल्हापूर श्री. श्रीकांत जाधव, केंद्रप्रमुख 9421174864 brcpanhala@yahoo.in
16 पन्हाळा फिनीक्स – मु.पो. कळे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर श्री. भगवान चौगुले, केंद्रप्रमुख 9970047900 brcpanhala@yahoo.in
17 राधानगरी शाहू इंग्लिश स्कूल – मु.पो. राधानगरी, जि. कोल्हापूर श्री. मांगोरे, शाळा कर्मचारी 9096918894 beoradhanagari@gmail.com
18 शाहूवाडी बी.आर.सी., शिक्षण विभाग, पंचायत समिती, शाहूवाडी, जि. कोल्हापूर श्रीम. सारिका सुर्यवंशी, डाटा एन्ट्री ऑपरेटर 9405160976 shahuwadi.education@gmail.com
19 शिरोळ बी.आर.सी., शिक्षण विभाग, पंचायत समिती, शिरोळ, जि. कोल्हापूर श्रीम. संगीता कांबळे, डाटा एन्ट्री ऑपरेटर 9623637557 beoshirol@gmail.com
20 शिरोळ झेले हायस्कूल – जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर श्री. कदम सर, शिक्षक 02322-225263, 9623637557 beoshirol@gmail.com
21 शिरोळ गुरूकुल स्कूल – मु.पो. अब्दुललाट, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर श्री. गणेश नायकुडे, शाळा कर्मचारी 9923226666 beoshirol@gmail.com
22 म.न.पा. कोल्हापूर भारती स्कूल – कदमवाडी, कोल्हापूर श्रीम. आस्मा गोलंदाज, सी.आर.सी. प्रमुख 7840990380 schoolboardkmc@gmail.com, nachiketsarnaik@rediffmail.com
23 म.न.पा. कोल्हापूर प्राथमिक शिक्षण मंडळ (महानगरपालिका), शिवाजी मार्केट बिल्डींग, शिवाजी चौक, कोल्हापूर श्री. नचिकेत सरनाईक, MIS को-ऑर्डीनेटर 0231-2543283, 8149279797 nachiketsarnaik@rediffmail.com, schoolboardkmc@gmail.com
24 म.न.पा. कोल्हापूर ओरीएंटल स्कूल – टाकाळा, राजारामपुरी, कोल्हापूर श्री. एच. आर. पाटील, सी.आर.सी. प्रमुख 9822418971 schoolboardkmc@gmail.com, nachiketsarnaik@rediffmail.com
25 म.न.पा. कोल्हापूर पी. शिवाजी स्कूल – शिवाजी पेठ, कोल्हापूर श्री. सातपुते, सी.आर.सी. प्रमुख 9921810836 schoolboardkmc@gmail.com, nachiketsarnaik@rediffmail.com
26 म.न.पा. कोल्हापूर पोदार स्कूल – साने गुरूजी वसाहत नजीक, कोल्हापूर श्री. एस. कोकीतकर, सी.आर.सी. प्रमुख 9226258282 schoolboardkmc@gmail.com, nachiketsarnaik@rediffmail.com

 

 

 

(श्री. एस. आर. चौगुले)

                                                                      शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

                                                                        जिल्हा परिषद कोल्हापूर

 

 

 

 

 

आर.टी.ई. अंतर्गत 25 टक्के विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया – सन 2017-18

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये (वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देणेसाठी जागा राखून ठेवण्याची रीत) नियम 2012 प्रमाणे अल्पसंख्यांक शाळा वगळता, राज्यातील सर्व विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यता तत्त्वावरील प्राथमिक शाळांना सन 2012-13 या शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 % पर्यंतच्या जागा नजीकच्या परिसरातील वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. त्यानुसार सन 2017-18 या शैक्षणिक वर्षामधील 25% आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या student.maharashtra.gov.in या लिंकवरील RTE Portal वर ऑनलाईन चालू झालेली आहे.

सदर प्रक्रियेअंतर्गत दि. 02/03/2017 अखेर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 1330 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. सदर विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी दि. 08/03/2017 ते दि. 25/03/2017 या कालावधीत विद्यार्थी प्रवेशाची पहिली फेरी राबविणेत आली. पहिल्या फेरीअखेर एकूण 524 विद्यार्थ्यांनी RTE च्या 25% कोट्यातून शाळेत प्रवेश घेतलेला आहे. त्यानंतर दि. 29/03/2017 ते दि. 13/04/2017 या कालावधीत विद्यार्थी प्रवेशाची दुसरी फेरी राबविणेत आली. दुस-या फेरीमध्ये एकूण 24 विद्यार्थ्यांनी RTE च्या 25% कोट्यातून शाळेत प्रवेश घेतलेला आहे. विद्यार्थी प्रवेशाची तिसरी फेरी दि. 15/04/2017 ते दि. 20/04/2017 अखेर राबविणेत आली. या फेरीमध्ये एकूण 11 विद्यार्थ्यांनी RTE च्या 25% कोट्यातून शाळेत प्रवेश घेतलेला आहे.

आजअखेर RTE च्या 25% विद्यार्थी प्रवेशाच्या 3 फे-यांमध्ये मिळून एकूण 559 विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतलेला आहे. सदर प्रवेश प्रक्रिया अद्याप चालू असून शासनाच्या सुचनांनुसार ऑनलाईन विद्यार्थी प्रवेशाच्या फे-या घेण्यात येत आहेत.

जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या सर्व योजनांची प्रभावीपणे अम्मलबजावणी करणेत येणार –  डॉ.कुणाल खेमनार

जिल्हयातील ग्रामीण जनतेचा आरोग्याचा स्तर सुधारणे करिता व आरोग्य विभागाच्या योजनांचा जास्तीत जास्त ग्रामीण भागातील जनतेला लाभ होणेसाठी करावयाच्या उपाय योजना याबाबत आढावा व नियोजन बैठक दि.18/04/2017 रोजी  मा.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांचे अध्यक्षतेखाली घेणेत येवून पुढील प्रमाणे कार्यवाही करणेचे आदेश दिले.  सदर आढावा व नियोजन बैठकीस मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश पाटील, मा.जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.एल.एस.पाटील, मा.प्राचार्य, राज्य व आरोग्य कु.क.प्रशिक्षण केंद्र डॉ.सी.जे.शिंदे कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ.परितेकर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.फारुक देसाई, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्रीमती खंदारे, तालुका स्तरावरुन सर्व वैद्यकिय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी हे उपस्थित होते.

  • प्रसव पूर्व गर्भलिंग निदान चाचणी बाबत ग्रामीण भागामध्ये विविध माध्यमांचा वापर करुन चांगल्या प्रकारे जनजागृती करणेत यावी. तसेच जनतेच्या माहिती करिता C.P.N.D.T. helpline Number  18002334475  सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध करुन देवून त्याची जास्तीत जास्त प्रसिध्दी देण्यात यावी.  
  • C.P.N.D.T.अंतर्गत कार्यक्रमाचा आढावा घेवून जिल्हयातील बोगस डॉक्टर बाबत सखोल चौकशी करुन धडक मोहिमे अंतर्गत तालुका आरोग्य अधिकारी यांनी बोगस डॉक्टरांचेवर तात्काळ F.R.I.दाखल करणे बाबत सक्त सुचना दिल्या या कामामध्ये हयगय झालेस संबधितांवर जबाबदारी निश्चित करणेत येईल.
  • कोल्हापूर जिल्हयामध्ये होणा-या B.S.K. अंतर्गत जिल्हा स्तरावर शस्त्रक्रिया करणेसाठी कोल्हापूर मेडीकल कॉलेजचे बाल शल्य चिकीत्सक डॉ.हिरुगडे, यांंनी मोलाचे सहकार्य केल्या बद्दल जिल्हा स्तरीय समिती तर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
  • आशा योजने अंतर्गत आशांचे रिकत पदा बाबत आढावा घेवून 1 मे च्या ग्राम सभेमध्ये सर्व रिक्त पदे भरणेसाठी संबधित पदाधिकारी व अधिकारी यांचेशी पत्रव्यवहार करुन आशांची पदे भरुन घेणेच्या सुचना देणेत आल्या
  • ग्राम स्तरावरील ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा स्वच्छता समिती अंतर्गत दि.24 एप्रिल ते 1 मे या कालावधीत आरोग्य ग्राम सभा आयोजित करुन आरोग्याच्या विविध योजना तसेच स्वाईन प्ल्यू उष्माघात बाबत, तसेच ग्राम स्तरावरील आरोग्य विषयक विविध कामांचा आढावा नियोजन करणेत यावे.
  • जननी शिशू सुरक्षा योजने अंतर्गत आरोग्य संस्थेच्या ठिकाणची Ambulance (102) सुस्थितीमध्ये ठेवून गरोदर मातांना प्रसुतिसाठी एक वर्षा खालील बालकाना घरातून दवाखान्या पर्यत दवाखान्यातून घरा पर्यतच्या सर्व सेवा मोफत उपलब्ध करुन द्याव्यात. 102   108 ॲम्ब्यूलन्सचा वापर व्यापक जनजागृती करुन वाढवावा. जननी शिशू सुरक्षा योजना अंतर्गत गरोदर माताना जो मोफत आहार दिला जातो त्याची  गुणवत्ता पडताळणी करणेत यावी.
  • राष्ट्ीय आरोग्य अभियान अंतर्गत सुरु असलेल्या बांधकामा बाबत विचारपूस करुन उर्वरीत बांधकाम व त्यासाठी लागणारे टेंडर्स लवकरात लवकर पूर्ण करुन पावसाळ्या पूर्वी बांधकाम पूर्ण करणेत यावे.
  • क्वॉलीटी ॲश्यूरन्स (जिल्हा गुणवत्ता आश्वासन समिती) अंतर्गत निवड केलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा राज्यस्तरावर पाठपुरावा करुन राष्ट्ीय पातळवर मानांकन प्राप्त करणेसाठी प्रयत्न करणेत यावेत.
  • नियमीत लसीकरणा बाबत आढावा घेवून झालेल्या कामाची पडताळणी करणेसाठी क्लस्टर सर्वे करणेत यावा.
  • बाल मृत्यूचे कारण प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत निश्चीत करणे बाबत सुचना देणेत आल्या.

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 प्रशिक्षण

जिल्हा परिषद, कोल्हापूर

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 प्रशिक्षण

यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी, (यशदा) पुणे  व सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद  कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने डॉ. कुणाल खेमनार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली पंचायत समिती स्तरावरील अपिलीय अधिकारी, जन माहिती अधिकारी व सहाय्यक जन माहिती अधिकारी यांचे प्रशिक्षण दिनांक 19/04/2017 ते 20/04/2017 अखेर प्रशिक्षण स्व.वसंतराव नाईक समिती सभागृह जिल्हा परिषद कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले असून सदर प्रशिक्षणाचे उद्घाटन श्री. इंद्रजित देशमुख, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हस्ते करण्यात आले सदर प्रसंगी माहितीचा अधिकार प्रशिक्षण हे फक्त प्रशिक्षणाच्या दृष्टीकोनातून न पाहता प्रशिक्षणातून मिळणारे ज्ञान आत्मसात करुन त्याचा उपयोग सामान्य जनतेस वेळेत माहिती देणेस करावा या प्रसंगी यशदा मार्फत आलेल्या व्याख्यात्यांनी जिल्हा परिषद कोल्हापूर चे संकेतस्थळावर माहितीचा अधिकार नियम 3 व 4 नूसार दयावी लागणारी माहिती इतर कार्यालयाचे मानाने अद्यावत असलेचे नमुद करुन अभिनंदनास पात्र असलेचे उद्गार काढले.

सदर उद्घाटन प्रसंगी श्री. चंद्रकांत वाघमारे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.), श्री. संजय अवघडे, कक्ष अधिकारी हे उपस्थित होते श्री. दतात्रय केळकर, अधीक्षक यांनी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले.