कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत " वाचाल तर वाचाल " या व्याख्यानमालेचे आयोजन

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचनालयाच्यावतीने अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये वाचन संस्कृतीचा विकास व्हावा यासाठी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम व्याख्यानमालेचे आयोजन करणेत येत आहे. या उपक्रमांतर्गंत दरमहा अखेर व्याख्यानाचे आयोजन करणेत येते. दि.31/05/2017 इ. रोजी दुपारी 4.00 वा. राजर्षि शाहू सभागृह, जिल्हा परिषद कोल्हापूर येथे या व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प सुप्रसिद्ध वक्ते व श्वसन विकार तज्ञ डॉ.अनिल मडके यांनी गुंफले. या वेळी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमनार,समाजकल्याण सभापती श्री.विशांत महापूरे,प्रकल्प संचालक डॉ.हरिष जगताप, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.इंद्रजित देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.चंद्रकांत वाघमारे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री.ए.जी.मगदूम यांचेसह जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. स्वागत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री.ए.जी.मगदूम यांनी केले.

सदर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये श्री.संदिप मगदूम यांनी व्याख्यानमालेच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट करून व्याख्याते डॉ.अनिल मडके यांनी केलेले कार्य सांगितले.

डॉ.अनिल मडके यांनी आपल्या ओघवत्या शैलीतील व्याख्यानामध्ये माणसाच्या जीवनातील वाचनाचे महत्व विषद करणेसाठी अनेक उदाहरणे दिली. आयुष्यातील छोटया छोटया गोष्टी निट करण्याचा संस्कार वाचन शिकवते. माणसाच्या जीवनावर ताणतणावाचा विपरीत परिणाम होत असून तो दूर करण्याच्या उपाय वाचन आहे. चांगले पुस्तक हे मधमाश्यांच्या पोळयाप्रमाणे असते,त्यातून गोडवा,जीवन व प्रकाश मिळतो. शरीराला जशी व्यायामाची गरज असते तशी मेंदूला मशागतीची गरज असते,आणि ही मशागत वाचनातून होते. हल्ली माणसाचे बोलणे वाढले आहे परंतु वाचन कमी झाले आहे. जीवन समृध्द करायचे असेल तर वाचन गरजेचे आहे. चांगले पुस्तक हा माणसाचा मित्र आहे. लेखक हा जन्माला यावा लागतो,तो घडविता येत नाही;याउलट वाचक घडावा लागतो. अशा रीतीने डॉ.अनिल मडके यांनी  या आपल्या व्याख्यानाने कर्मचारी व अधिकारी यांना मंत्रमुग्ध केले.

समारोपाच्या मनोगतामध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंद्रजित देशमुख यांनी माणसाच्या आयुष्यात वाचन व लेखन यांना अनन्यसाधारण महत्व असलेने प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी नियमित वाचन करावे असे आवाहन केले. त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत मराठी भाषेचा महिमा सांगताना महाराष्ट्रातील थोर संतांनी समाज प्रबोधनासाठी केलेल्या लेखनाची माहिती दिली.

कोल्हापूर जिल्हा परिषदेचा  हागणदारी मुक्त योजनेत राज्यात प्रथम आल्याबद्दल महराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांचा सत्कार करणेत आला.  सदर व्याख्यानाच्या आयोजनाकामी सहकार्यबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ प्रतिनिधींचा सत्कार करणेत आला.

प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री.ए.जी.मगदूम यांनी आभार मानले.

                                                      शिक्षणाधिकारी (प्राथ.)

                                                      जिल्हा परिषद कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत ” वाचाल तर वाचाल ” या व्याख्यानमालेचे आयोजन

शुध्दीपत्रक

शुध्दीपत्रक

दि.05/05/2017 रोजीच्या प्रसिध्दी पत्रकानुसार कोल्हापूर जिल्हयातील एकूण 27 प्राथमिक शाळा अनधिकृत घोषित करणेत आलेल्या आहेत. तथापि त्यापैकी खालील नमूद शाळा / वर्गांना शासनाची मान्यता मिळाल्याने ते अधिकृत आहेत. तरी त्याप्रमाणे  आपल्या लोकप्रिय दैनिकामधून सदरचे सुधारित वृत्त प्रसिध्द करावी.

शुध्दीपत्रक

अ.क्र. नव्याने मान्यता मिळालेल्या प्राथमिक शाळेचे नांव पत्ता (सन 2017-18) चालू असलेले वर्ग माध्यम तालुका मान्यता मिळालेचा दिनांक
1 राणेज इंग्लिश मेडियम स्कूल कोल्हापूर इ.5 वी

इंग्रजी कोल्हापूर शहर जा.क्र.प्राथ-2/ कोवि/ आरटीई5वी8वी/पर/16-17/11717-21 दि.18/05/2017

2 राणेज इंग्लिश मेडियम स्कूल कोल्हापूर इ.6 वी इ.8 वी इंग्रजी कोल्हापूर शहर जा.क्र.प्राथ-2/ कोवि/ आरटीई5वी8वी/पर/16-17/11722-28 दि.18/05/2017

शिक्षणधिकारी (प्राथमिक),

                                                          जिल्हा परिषद कोल्हापूर.

अनधिकृत चालू असलेल्या प्राथमिक शाळाबाबत

कोल्हापूर जिल्हयामध्ये  शासनाच्या कोणत्याही  परवानगी शिवाय  अनधिकृत चालू असलेल्या 24 प्राथमिक  शाळा आहेत. पालकांनी सदर  शाळामध्ये आपल्या पाल्यास प्रवेश घेऊ नये. यासाठी सदर अनधिकृतपणे सुरु असणाऱ्या शाळांची यादी दि.05/05/2017 रोजी दैनिक वर्तमानपत्रात प्रसिध्द करणेत आलेली आहे.  कोल्हापूर जिल्हयातील खाजगी शिक्षण संस्थेमधील अनधिकृत सुरु असणारे वर्ग तात्काळ बंद करणेबाबत या कार्यालयाकडून दि.04/05/2017 रोजी 24 शाळांच्या अध्यक्ष/ मुख्याध्यापक यांना कारणे दाखवा नोटीस लागू करणेत आलेल्या आहेत. तथापि सदरच्या शाळा अद्यापही सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा 2009 मधील कलम 18(5) नुसार सदर शाळांना शाळा बंद करणेबाबत  व द्रव्य दंड भरणेबाबत नोटीस लागू केलेल्या आहेत. तथापि अद्यापही सदर शाळांनी दंड भरणा केलेचे दिसून येत नाही व सदरचे अनधिकृत वर्गही सुरु आहेत.  याबाबत पुढील कारवाई  होणेबाबत वरिष्ठ कार्यालयास कळविणेत आलेले आहे.

शिक्षणाधिकारी (प्राथमिक),

जिल्हा परिषद, कोल्हापूर

कोल्हापूर सारख्या संपन्न व सुबत्तायुक्त जिल्हयात स्त्रीभ्रुणहत्येमुळे मुलींचे प्रमाण कमी होत असल्यामुळे याचा प्रतिबंध करणेसाठी सर्व विभागांनी एकत्र कार्यवाही करावी – डॉ. कुणाल खेमणार

जिल्हास्तरीय  पी.सी.पी.एन.डी.टी ॲक्ट (स्त्री भ्रुण हत्या विरोधी कायदा) व बोगस डॉक्टर शोध मोहीम कार्यशाळा संपन्न दि. 11 मे 2017

आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर व जिल्हाशल्यचिकित्सक कार्यालय सी पी आर कोल्हापूर यांचे सयुक्त विद्यमान दि. 11 में 2017 रोजी जिल्हास्तरीय  पी सी पी एन डी टी ॲक्ट (स्त्री भ्रुण हत्या विरोधी कायदा) व बोगस डॉक्टर शोध मोहीम कार्यशाळा जिल्हयातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकिय अधिक्षक उपजिल्हा व ग्रामिण रुग्णालय तसेच तालुका आशा समुहसंघटक यांचेसाठी आयोजीत करणेत आली होती. सदर कार्यशाळेचे उद्घाटन मा. श्री. डॉ. कुणाल खेमणार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे हस्ते करणेत आले. सदर कार्यशाळेत  मा. सतिश माने पोलिस उपअधिक्षक मुख्यालय, मा. श्रीमती. मनिषा एस. जवंजाळ पाटील सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, मा. डॉ. एल.एस.पाटील जिल्हाशल्यचिकित्सक व मा.डॉ. प्रकाश पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मा. डॉ. प्रकाश पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले.

  1. कोल्हापूर सारख्या संपन्न व सुबत्तायुक्त जिल्हयात स्त्रीभ्रुणहत्येमुळे मुलींचे प्रमाण कमी होत असल्याबद्दल मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी खेद व्यक्त केला व याचा प्रतिबंध करणेसाठी सर्व विभागानी एकत्र कार्यवाही करणेची अपेक्षा व्यक्त केली. तसेच असे दुष्ट प्रकार सुशिक्षीत समाजात घडणे जिल्हयास भुषणावह नाही असे मनोगत व्यक्त केले. स्त्री भ्रुण हत्या विरोधी कायदा अंमलबजावणीसाठी गावोगावी नेमलेल्या आशा,अंगणवाडीसेविका व आरोग्य सेविका यांनी सक्रिय सहभागी होण्याची आवश्यकता नमुद केली.
  2. पोलिस विभागातर्फे मा. सतिश माने पोलिस उपअधिक्षक मुख्यालय व तपासअधिकारी (API) श्री शरद मेमाने यांनी मार्गदर्शन केले. तसेच FIR दाखल करताना लागणारे आवश्यक कागदपत्र व पुरावे याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.
  3. मा. श्रीमती. मनिषा एस. जवंजाळ पाटील सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांनी औषधासंबधीत संपुर्ण नियमावलीची माहिती दिली.
  4. जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. एल.एस.पाटील यांनी पी.सी.पी.एन.डी.टी कायदा, गर्भपात कायदा व महाराष्ट्र नर्सिंग कायदा याबद्दल मार्गदर्शन केले.
  5. सदर कार्यशाळेला डॉ. राजेंद्र भस्मे दंत वैद्यक परिषद व डॉ. राजकुमार पाटील प्राचार्य होमीओपॅथीक मेडीकल कॉलेज कोल्हापूर यांनी संबधीत वैद्यक परिषदाबद्दल माहिती सांगीतली
  6. सहभागी प्रशिक्षणार्थीपैकी डॉ. उत्तम मदने तालुका आरोग्य अधिकारी हातकणंगले व डॉ. थोरात वैद्यकिय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय कसबा बावडा यांनी मनोगत व्यक्त केले.
  7. सर्व विभाग प्रमुखांनी सध्या चालु असलेली धडक मोहीम अति तिव्रतेने राबवून बोगस डॉक्टर व स्त्री भ्रुण हत्या करणाऱ्या डॉक्टर व सर्व संबधीत घटकावर एकत्रीत व कडक कायदेशीर कार्यवाही करण्याचे ठरविले आहे.
  8. डॉ. विजय नाद्रेकर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आभार व्यक्त केले. सदर कार्यशाळेसाठी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्रीमती डॉ. स्मिता खंडारे, श्रीमती ॲडव्होकेट गौरी पाटील पी.सी.पी.एन.डी.टी कायदे सल्लागार व संजय सावंत एनआरएचएम कर्मचारी यांनी सहकार्य केले.

जिल्हा आरोग्य अधिकारी

आर.टी.ई. अंतर्गत 25 टक्के विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2017-18 – दुसरी फेरी

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये (वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देणेसाठी जागा राखून ठेवण्याची रीत) नियम 2012 प्रमाणे अल्पसंख्यांक शाळा वगळता, राज्यातील सर्व विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यता तत्त्वावरील प्राथमिक शाळांना सन 2012-13 या शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 % पर्यंतच्या जागा नजीकच्या परिसरातील वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. या अंतर्गत सन 2017-18 या शैक्षणिक वर्षामधील 25 % आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या https://student.maharashtra.gov.in या लिंकवरील RTE Portal वरऑनलाईनचालू झालेली आहे.

सदर प्रक्रियेअंतर्गत दि. 30/04/2017 ते दि. 10/05/2017 या कालावधीत पालकांकडून ऑनलाईन अर्ज स्विकारणेची दुसरी फेरी पार पडलेली आहे.या फेरीमध्ये एकूण 341ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानंतर ऑनलाईन प्रणालीद्वारे RTE 25 % विद्यार्थी प्रवेशासाठी सदर 341 विद्यार्थ्यांची यादी RTE च्या लिंकवर अपलोड करणेत आलेली आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश घेणेसाठी शाळेच्या नावासह SMS ऑनलाईन प्रणालीद्वारे परस्पर पाठविणेत आले आहेत. SMS प्राप्त झालेनंतर पालकांनी संबंधित शाळेत मूळ कागदपत्रांसह जाऊन पाल्याचा प्रवेश निश्चित करावयाचा आहे. शाळेत जाऊन ऑनलाईन प्रवेश निश्चित करणेची अंतिम तारीख 21/05/2017 आहे.

दि. 21/05/2017 नंतर सदर प्रवेश फेरीसाठी मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे दिलेल्या मुदतीत पालकांनी संबंधित शाळेत जाऊन पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी  श्री. सुभाष चौगुले यांनी केले आहे.

(श्री.सुभाष रा. चौगुले)

                                                      शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

                                                       जिल्हा परिषद, कोल्हापूर

Test PDF

http://zpkolhapur.gov.in/wp-content/uploads/2017/05/DDUGKY-Mahiti.pdf