राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गौतम बुध्द यांची जयंती साजरी                                    

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गौतम बुध्द यांची जयंती  जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे दि. 30/04/2018 रोजी सकाळी 11 वाजता साजरी करणेत आली. त्या प्रसंगी  श्री.दत्तात्रय केळकर,अधीक्षक (सामान्य प्रशासन) व श्री. सुनिल यादव,वरिष्ठ सहाय्यक (प्राथमिक शिक्षण विभाग)  यांचे हस्ते फोटो पूजन करणेत आले. यावेळी श्री.संजय अवघडे,कक्ष अधिकारी, संतोष भोसले,अधीक्षक, संजय सोनवणे,आरोग्य सेवक, विजय टिपुगडे, जुबेर मोमीन,अमित कांबळे, वरिष्ठ सहाय्यक, मधुकर अंधारे कनिष्ठ सहाय्यक, रविंद्र बनकर,परिचर इत्यादी कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व भगवान गौतम बुध्द यांचे जीवनपटाबाबत संपूर्ण माहिती श्री. बी.पी. माळवे यांनी सांगितली.

 

 

सही/-

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)

जिल्हा परिषद, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळा मध्ये वर्षभरात इंग्रजी व खासगी शाळांमधून १६८८ विद्यार्थीची वापसी

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळा मध्ये वर्षभरात इंग्रजी व खासगी शाळांमधून १६८८ विद्यार्थीची  वापसी 

अति विशेष मिशन इंद्रधन्‌ुष्य मोहिम

केंद्रशासनाने  ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत माहे एप्रिल 2018 मध्ये राज्यातील 23 जिल्हयातील 192 गांवात    अति विशेष मिशन इंद्रधन्‌ुष्य मोहिम  कार्यक्रम हाती घेतला आहे. या मोहिमे अंतर्गत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचा शोध घेवून त्यांना लसीकरण करावयाचे आहे. कारण अर्धवट किंवा लसीकरण    झालेली बालके ही लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात. बाल मृत्यू कमी करण्यासाठी लसीकरण हे प्रभावी साधन आहे. कोल्हापूर जिल्हयामध्ये  ही मोहिमेसाठी तिळवणी ता. हांतकणगले या गांवाची निवड करण्यात आलेली आहे.  मा. सौ. शौमिका महाडिक, अध्यक्षा, जिल्हा परिषद कोल्हापूर मा. डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. कोल्हापूर यांच्या मागदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार यांनी सांगितले.

दिनांक 11/4/2018 इ रोजी  ग्रामपंचायत तिळवणी येथे  निवासी उपजिल्हाधिकारी  मा श्री संजय शिंदे  यांचे अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेणेत आली या सभेमध्ये जिल्हा स्तरावरील  तालुक्‌ा स्तरावरील  स्थानिक अधिकारी व नागरीक ग्रामपंचायत सदस्य सर्व उपस्थित  होते तसेच पंचायत समिती हातकणंगलेच्या सभापती मा सौ रेश्मा संनदी , तसेच सरपंच सौ चव्हाण मॅडम व जिल्हा परिषद कोल्हाूपर कडील उपमुख्यकार्यकारी अधिकारी  मा सुषमा देसाई  पाणी पुरवठा व स्वच्छता  तसेच जिल्हा परिषद कोल्हापूर आरोग्य विभागाकडील प्र.जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी  मा डॉ श्री फारुक देसाई साो  मा डॉ सुहास कोरे, प्र.अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी  व डॉ एम ए नकाते मॅडम  व प्राथमिक आरोग्य सांजणी कडील सर्व कर्मचारी व तिळवणी गांवातील कार्यरत आशा व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या .

सदर सभेमध्ये मा डॉ फारुक देसाई यांनी  अति विशेष मिशन इंद्रधन्‌ुंष्य मोहिम  विषयी माहिती दिली. दिनांक 11/4/2018  ते 30/4/2018 अखेर  प्राथमिक आरोग्य केद्र साजणी  च्या अंतर्गत येणा-या  तिळवणी गावामध्ये  राबविणेचे ठरले आहे असे सांगितले,  अति विशेष विशेष मिशन इंद्रधन्‌ुंष्य अभियान करणेत येणा-या नियोजन  व कृती विषयी सविस्तर माहिती दिली व ग्रामस्थानां सहकार्य करणेचे आवाहन केले.  दिनांक 11.4.2018 इ रोजी  गावामध्ये दंवडी देवून अति विशेष विशेष मिशन इंद्रधन्‌ुंष्य अभियान विषयी जनजागृती केली आहे  तसेच अति विशेष विशेष मिशन इंद्रधन्‌ुंष्य अभियान अंतर्गत दिनांक 12.4.2018 व दिनांक 13.4.2018 इ रोजी सदर गावामध्ये  5 आरोग्य पर्यवेक्षकाच्या निंयत्रंणा खाली आशा अंगणवाडी सेविका व आरोग्य  सेविका यांची टिम करून  गरोदर माता व 0 ते 2 वर्षे वयोगटातील बालकांची घर टु घर सर्व्हे करणे,   प्रत्येक घरांना   मिशन इंद्रधन्‌ुंष्यचे स्टिकर चिकटविण्यात आले आहे.   गावातील ज्या लाभार्थाना  लस मिळालेली नाही असे 03 लाभार्थी सर्व्हेक्षणामध्ये मिळाली आहेत. तसेच या मोहिमेत नियमित लसीकरण  लाभार्थी संख्या 17 असून एकुण 20 लाभार्थ्यांची अदयावत यादी करणेत आली.  दिनांक 18 .4.2018  ते  19.4.2018 या दोन दिवशी  गावामध्ये अति विशेष विशेष मिशन इंद्रधन्‌ुंष्य अभियानांची  मायकिंग व प्रसिध्दी करणेत आली  तसेच लाभार्थाना स्लिपाचेही वाटप करणेत आले आहे.  सर्व 20 लाभार्थाना मा  पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील  यांचे हस्ते मा मुख्यकार्यकारी अधिकारी  कुणाल खेमणार मा. संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी, मा सौ पाटील  जि सदस्या मा सौ रेश्मा संनदी, सभापती, पं.स. हांतकणगंले  यांचे उपस्थितीत दिनांक 20.4.18 रोजी लसीकरणही करणेत आले.  सदर दिवशी सर्व मुलांचे लसीकरण झाले आहे. सदर अभियांनाचे मुल्यमापन देश पातळीवर राज्य पातळीवर होणार आहे

मा.श्री. अजित भोसले, एअर मार्शल (निवृत्त), सदस्य युपीएसी न्यू दिल्ली यांची राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशालेस भेट.

जिल्हा परिषद, कोल्हापूर अंतर्गत एक नाविन्यपूर्ण योजना म्हणून जून 2014 पासून  चालविल्या जाणा-या  राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला, शिंगणापूर या प्रशालेस मा. श्री. अजित भोसले, एअर मार्शल (निवृत्त), तथा सदस्य युपीएसी, न्यू दिल्ली यांनी आज दिनांक 20/04/2018  रोजी सदिच्छा भेट देऊन क्रीडा प्रशालेच्या कामकाजाचा आढावा घेतला. प्रथम क्रीडाप्रशालेचे प्रशासन अधिकारी व मुख्याध्यापक यांनी  मा. श्री. अजित भोसले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  त्यांनतर क्रीडा प्रशालेचा हेतू, प्रशालेचे स्वरुप, प्रशालेमार्फत राबविले जाणारे विविध उपक्रम, विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणा-या सोई सुविधा तसेच खेळाडूंनी  राज्य व राष्ट्रीय स्थरावर केलेल्या कामगिरीचा आढावा याची सविस्तर माहिती  पीपीटी  व डॉक्यूमेंट्री व्दारे  सादर करणेत आली.

त्यानंतर मा. श्री. अजित भोसले यांनी क्रीडाप्रशालेतील आवारातील क्रिडांगण, वस्तीगृह, व्यायामशाळा, भोजनगृह, आभ्यासिका या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. जि.प. मार्फत सुरू केलेल्या हा अभिनव उपक्राम पाहून ते प्रभावित झाले. त्यानंतर क्रीडा प्रशालेकडील प्रशासन अधिकारी, मुख्याध्यापक, क्रीडा प्रशिक्षक  यांना मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेने राबविलेल्या या उपक्रमाबाबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, पदाधिकारी, मु.ले.व वि.अ., शिक्षणाधिकारी  यांचे  कौतूक करुन शाळेची प्रगती अतिशय चांगली असून राबविलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमास शुभेच्छा दिल्या.