admin
जि.प. अधिकारी कर्मचारी यांची तज्ञांमार्फत आरोग्य तपासणी
नाविन्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत जि.प. कोल्हापूर च्या अध्यक्षा मा. सौ. शौमिका अमल महाडिक यांच्या संकपल्पनेतून आणि मा. डॉ कुणाल खेमनार, यांच्या मागदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांची तज्ञांमार्फत तपासणी करण्यात आली. सदरचे तपासणी शिबीरांचे आयोजन जिल्हा परिषद कोल्हापूर व अथायु मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते. या शिबीरांचे उद्घाटन स्व. वसंतराव नाईक समिती सभागृह जि.प. कोल्हापूर येथे धनवंतरी मूर्तीच्या पूजेने करण्यात आले. या प्रसंगी मा. इंद्रजित देशमुख. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., प्रसिध्द हदयरोग तज्ञ डॉ श्रीकांत कोले, डॉ. हरिष जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.ग्रा.वि. यं, श्री. भालेराव , उपमुख्य कार्यकारी अधिकारी , ग्रामपंचायत , डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ सुहास कोरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच अथायु मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटलेचे तज्ञ डॉक्टर डॉ अंगराज सावंत, अस्थिरोग तज्ञ, डॉ. अमित पोरवाल, एम.डी. मेडिसीन, श्री. अकिल शेटटी, मुख्य प्रशासन अधिकारी व स्टाफ उपस्थित होता.
प्रस्ताविकांत बोलतांना डॉ उषादेवी कुंभार म्हणाल्या की, आरोग्य विभागाच्या अथक प्रयत्नातून शिबीर आयोजन झाले आहे. संसर्गजन्य रोगाचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु असांसर्गीक रोगाचे प्रमाण वाढत आहे. जसे हदय रोग, मधुमेह, कॅन्सर , मानसिक आजार इ. असे म्हणाल्या. सर्व अधिकारी कर्मचारी यांनी व्यसनांपासून दूर रहावे असे या प्रसंगी बोलतांना डॉ. हरिष जगताप यांनी भावना व्यक्त केली.
आपल्या मागदर्शनपर व्याख्यानात बोलतांना प्रसिध्द हदयरोग तज्ञ डॉ. श्रीकांत कोले म्हणाले की, हदयरोग , उच्च रक्त दाब, मधुमेह का होतो याचे अदयाप निदान झाले नाही. हदयरोग, अस्थिरोग, इतर असंसर्गजन्य आजारावर अधुनिक तंत्रज्ञानाने उपचार माफक दरामध्ये अथायु मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल मध्ये उपलब्ध आहेत. हे रोग होवू नये या साठी प्रत्येकांनी व्यसनापासून दूर राहणे, तणांवमुक्त जीवनशैली अंगीकरणे तसेच नियमित व्यायाम आवश्यक असे अध्यक्षीय भाषणांत बोलतांना मा. इंद्रजित देशमुख नमुद केले.
शिबीरामध्ये एकुण 300 अधिकारी, कर्मचारी यांनी तपासणी करण्यात आली. यामध्ये हिमोग्लोबीन तपासणी -300 रक्तातील साखरेचे प्रमाण – 300 इसीजी- 170 यापैकी संदर्भ सेवा एकुण 90 रुग्णांना देण्यात आली असून मध्ये 2 डी इको, मधुमेह 46, टीएमटी-02, एक्स रे 05, प्रयोगशाळा तपासणी 37, सोनोग्राफी03 रुग्ण आहेत. शिबीर यशस्वी करणे साठी डॉ सुहास कोरे, डॉ स्मिता खंदारे, श्री. पाटील, श्री भंडारी यांनी परिश्रम घेतले तर अथायु हॉस्पीटलच्या वतीने श्री. अनिरुध्द सुतार, श्री प्रकाश पाटील, सुरेखा जाधव, दिपाली जगताप यांनी परिश्रम घेतले
जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा परिषद, कोल्हापूर
बोगस डॉक्टरवर धडक कारवाई
आज दिनांक 7 जून 2018 हालोंडी ता. हांतकणगले येथे बोगस डॉक्टर श्री. भरत जिनगोंडा पाटील वय 45 वर्षे यांचे वर महाराष्ट्र वैदयकिय व्यवसाय अधिनियम 1961 च्या कलम 32 (2) व 33-अ या कलमाखाली पुलाची शिरोली येथील पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्ह यात बोगस डॉक्टरांनी तात्काळ अवैद्यरित्या खाजगी वैद्यकिय व्यवसाय बंद करावा अन्यथा गंभीर दखल घेवून गुन्हे दाखल करण्यात येईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कुणाल खेमणार यांनी नमुद केले.
तालुकास्तरीय बोगस डॉक्टर शोध समिती हांतकणगले कडे बोगस डॉक्टर श्री भरत जिनगोंडा पाटील ही व्यक्त्ति हालोंडी या ठिकाणी अवैद्यरित्या कोणतीही वैद्यकीय पदवी नसतांना जनतेमध्ये हमखास मुलगा होण्याची खात्री देवून औषधे देत होता. तसेच अपत्यहीन जोडप्यांना अपत्य होण्यासाठी औषध उपचार करीत असल्याची तक्रार महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती ने केली होती . सदर तक्रारीचे गंभीर दखल घेवून बोगस डॉक्टर वर त्वरीत कारवाई करणेच्या सूचना मा. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कुणाल खेमणार यांनी सूचना दिल्या. त्यानुसार डॉ उषादेवी कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली तालुकास्तरी बोगस डॉक्टर शोध समिती हांतकणंगले व पोलीस स्टेशन पु. शिरोली मार्फत डमी रुण्ग पाठवून सापळा रचून रंगेहांत पकडण्यात आले. पकडण्यात आलेल्या बोगस डॉक्टर कडे बोगस नॅचरोपॅथीचे प्रमाणपत्र तसेच कामोउत्तेजक, शक्तीवर्धक आयुवेर्दिक औषधांचा अवैद्यरित्या मोठा साठा सापडला, त्याचप्रमाणे कामोउत्तेजक पोस्टर्सही सापडले, मुलागाच होणार अन्यथा पैसे परत अशा अशयाचा डिजीटल बोर्ड जोगोजागी लावण्यात आले होते.
सदर कारवाई मध्ये डॉ सुहास कोरे, तालुका आरोग्य अधिकारी, पं.स. हांतकणगंले, श्री परशुराम कांबळे, सहाय्यक पोलिस निरीक्षण, डॉ सोनवणे डी.एस. जिल्हा आयुष अधिकारी, डॉ जेसिका ॲन्ड्रयुज वै.अ. पु. शिरोली, संगीता जगताप, महिला पोलिस , तसेच अंधश्रध्दा निर्मुलन समिती, डॉ उषादेवी कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. देसाई एफ.ए. जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी सहभागी होते.
RTE २५ % विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया 2018-19 अंतर्गत ऑनलाईन अर्ज करणेस मुदतवाढ
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये (वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देणेसाठी जागा राखून ठेवण्याची रीत) नियम 2012 प्रमाणे अल्पसंख्यांक शाळा वगळता, राज्यातील सर्व विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यता तत्त्वावरील प्राथमिक शाळांना सन 2012-13 या शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 % पर्यंतच्या जागा नजीकच्या परिसरातील वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. त्यानुसार सन 2018-19 या शैक्षणिक वर्षामधील 25% आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या student.maharashtra.gov.in या लिंकवरील RTE Portal वर ऑनलाईन चालू झालेली आहे व विद्यार्थी प्रवेशाच्या दोन फे-या पूर्ण झालेल्या आहेत.
शासनाने दि. 17/05/2018 इ. रोजीसुधारित शासन निर्णय जारी करून आरटीई अंतर्गत २५ % आरक्षित जागांसाठीच्या प्रवेशपात्र सामाजिक वंचित घटकांमध्ये अनु.जाती, अनु.जमाती व दिव्यांग बालकांव्यतिरिक्त वि.आ.(अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड), इतर मागास वर्ग (OBC), विशेष मागास प्रवर्ग (SBC), तसेच एच.आय.व्ही. बाधित / एच.आय.व्ही. प्रभावित बालकांचाही समावेश केलेला आहे. सदर शासन निर्णयास अनुसरून दि. 29/05/2018 ते दि. 07/06/2018 या कालावधीत इच्छुक पालकांकडून विद्यार्थी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारणेत आले. या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 179 ऑनलाईन अर्ज प्राप्तझाले आहेत.
पालकांकडून ऑनलाईन अर्ज स्विकारणेची अंतिम मुदत दि. 07/06/2018 होती. मात्र पालकांच्या आग्रहास्तव ऑनलाईन अर्ज करणेची अंतिम मुदत दि. 12/06/2018 इ. रोजीपर्यंत वाढविणेत येत आहे. तरी दिलेल्या मुदतीत इच्छुक पालकांनी वर नमूद केलेल्या लिंकवर ऑनलाईन अर्ज करावेत असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.
(श्री.सुभाषरा.चौगुले)
शिक्षणाधिकारी(प्राथमिक)
जिल्हापरिषदकोल्हापूर
दिनांक 31/05/2018 इ.रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती व जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमीत्य शपथ
दिनांक 31/05/2018 इ.रोजी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती व जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्य तंबाखू विरोधी शपथ सकाळी 11.00 वाजता घेण्यात आली.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन मा.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांचे उपस्थितीत श्री.उदय कुलकर्णी,अधीक्षक ग्रामपंचायत विभाग व श्रीम. हेमांगी जाधव, विस्तार अधिकारी (कृषि) जिल्हा परिषद,कोल्हापूर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी जागतिक तंबाखू विरोध दिनानिमित्य उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी शपथ घेतली. यावेळी प्रकल्प संचालक मा.डॉ.हरिष जगताप, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. संजय राजमाने, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. राहुल कदम, समाजकल्याण अधिकारी श्री.चंद्रकांत सूर्यवंशी, महिला व बाल विकास अधिकारी श्री.सोमनाथ रसाळ, पशुसंवर्धन अधिकारी श्री.एस.एच.शिंदे, कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पु.) श्री.एस.एस.शिंदे व सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग भाऊसाहेब फुंडकर यांचे निधन झालेने जिल्हा परिषेदेमार्फत त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आले.
या वेळी. श्री.बी.पी.माळवे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची माहिती व सुत्र संचलन केले. यावेळी मोठया संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कृपया वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिध्द करणेकामी कार्यवाही करणेत यावी. ही विनंती.
सही/-
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)
जिल्हा परिषद, कोल्हापूर
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर अतिसार नियंत्रण पंधरवडा 28 मे ते 9 जून 2018
अर्भक मृत्युदर व बालमृत्युदर कमी करणे हे राष्ट़ीय आरोग्य अभियानाचे एक महत्वाचे उदिदष्ट आहे. देशात 5 वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्युमागे अतिसार हे प्रमुख कारण असून 10 टक्के बालके अतिसारामुळे दगावतात आणि हया बालमृत्युचे प्रमाण उन्हाळयात व पावसाळयात जास्त असते. या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हयामध्ये अतिसार नियत्रंण पंधरवडा 28 मे ते 9 जून 2018 कार्यक्रम दोन आठवडयामध्ये राबविणेत येणार आहे.
या कार्यक्रमामध्ये जनजागृती, अतिसारामध्ये घ्यावयाची काळजी, ओआरएस व झिंक गोळया यांचा वापर कसा करावयाचा याची प्रात्यक्षिके, ओआरएस झिंक या गोळयांचे घरोघरी वाटप, आरोग्य संस्थांमध्ये ओआरएस व झिंक कोपरा स्थापन करणे व अतिसार झालेल्या कुपोषित बालकांवर उपचार या सर्व गोष्टी या कार्यक्रमांतर्गत येतात.
जिल्हयातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, नगरपालिक/महानगरपालिकांचे रुग्णालय, हेल्थ पोस्ट इत्यादी स्तरावर अतिसार नियंत्रण राबविण्यात येत आहे.
या करीता जिल्हा कार्यबल गट समितीची सभा मा. नंदकुमार काटकर, प्र.जिल्हाधिकारी कोल्हापूर व मा.संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली दि.24/05/2018 रोजी मा.जिल्हाधिकारी यांचे दालनात संपन्न झाली. सा सभेसाठी , डॉ. एल.एस. पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. फारुख देसाई, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी, डॉ. सुहास कोरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, हे उपस्थित होते. या सभेमध्ये खालील प्रममाण े माहिती सादर करणेत आली.
- अतिसार नियंत्रण पधरवडयातील घटक
- 5 वर्षाखालील बालकांना आशा स्वयंसेविका मार्फत घरभेटी देवून ओआरएस पाकिटांचे वाटप करणे तसेच प्रात्यक्षिके दाखविणे व आरोग्य शिक्षण देणे
- आरोग्य संस्था स्तरावर ओआरएस व झिंक कोपरा कॉर्नर प्रस्थापित करणे
- 2944 शासकीय व निमशासकीय शाळा तसेच 4397 अंगणवाडी मध्ये हात स्वच्छ धुण्याबाबतचे प्रात्यक्षिक आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविकांमार्फत दाखविणे येणार आहे.
- ग्राम आरोग्य पोषण दिनी पोषण आहारासंबधी प्रात्यक्षिके व समुपदेशन करणे.
- अतिसाराची बालके शोधुन उपचार देणे, तीव्र अतिसार असलेल्या बालकांना संदर्भित करणे.
- पंधरवडयामध्ये अतिसारामुळे मृत्यू झालेल्या बालकांना सदंर्भित करणे
- पंधरवडयामध्ये अतिसारामुळे मृत्यू झालेल्या बालकांचा वरिष्ठ कार्यालयांना सादर करणे.
- ओआरएस आणि झिंकचे फायदे
- यामुळे जुलाब कमी होतात.
- याने जुलाब/अतिसार लवकर बरा होतो.
- पुढील 3 महिन्यापर्यंत अतिसार व न्युमोनिया होण्यापासून बचाव होतो.
- जागतिक आरोग्य संघटना व भारत सरकारने प्रमाणित केलेले आहे.
- अतिसार व्यवस्थापन व उपचाराबाबतचे महत्वाचे संदेश
- अतिसार झाल्याबरोबर उदा. एका दिवसामध्ये 3 पेक्षा जास्तवेळा जुलाब होणे. लगेच ओआरएसचे द्रावण आणि इतर द्रव पदार्थ दया. आणि अतिसार थांबेपर्यंत देत रहा.
- अतिसार झालेल्या बालकाला 14 दिवसापर्यंत झिंक गोळी दया. अतिसार होणे थांबले तरी गोळी देत रहा.
- अतिसारामध्ये ओआरएस झिंक देणे हे अतिसारावरील उपचाराची योग्य पध्दती असुन अतिसार लवकर बरा होण्यास फायदेशीर आहे.
- बाळाची विष्ठा लवकर आणि सुरक्षित प्रकारे नष्ट करावी.
- अतिसारादरम्यान जे बाळ स्तनपान घेत असेल त्याला स्तनपान सुरु ठेवा
- आजारादरम्यान व नंतरही जास्तीत जास्त स्तनपान दया.
- स्वयंपाक करण्यापुर्वी बालकाला जेवण भरवण्यापुर्वी तसेच बालकाची शी स्वच्छ केल्यानंतर आणि बालकाला साफ केल्यानंतर मातेने हात साबनाने धुवून स्वच्छ करावे.
- खालीलपैकी कोणतेही लक्षण आढळल्यास बालकाला आरोग्य कर्मचाऱ्याकडे किंवा संस्थेमध्ये घेवून जावे
- बालक अधिक आजारी होत असेल
- स्तनपान करु शकत नसेल
- ताप येत असल्यास
कोल्हापूर जिल्हयामध्ये 0 ते 5 वर्ष वयोगटातील एकुण 220780 इतकी बालके आहेत. अतिसाराच्या सल्यासाठी वैदयकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य कंेद्र, आशा स्वयंसेविका तसेच ए.एन.एम.शी संपर्क साधावा असे आवाहन मा. नंदकुमार काटकर, प्र.जिल्हाधिकारी कोल्हापूर व मा.संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी, कोल्हापूर व जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी केले आहे. सभेचे प्रस्ताविक डॉ. फारुख देसाई, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी यांनी केले. अभार डॉ. सुहास कोरे, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले.
जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा परिषद कोल्हापूर
22 मे,2018 रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस साजरा करणे.
मा.अध्यक्ष राष्ट्रीय जैव विविधता प्राधिकरण,भारत सरकार यांचेकडून प्राप्त झालेल्या सुचनेनुसार दि.22/05/2017 “आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस” जिल्हा पातळीवर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साजरा करणेत आला.त्यावेळी प्रथमत: मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करणेत आले.त्यानंतर जैवविविधतेबाबतचा ध्वनीमुद्रंाकित पोवाडा सभागृहामध्ये सर्वांना एकविणेत आला.तसेच निसर्गातील दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन करणेच्या दृष्टीने जैवविविधता शपथ सभागृहामध्ये सर्वांच्या कडून घेणेत आली.
मा.श्री. प्रभुनाथ शुक्ल भा.व.से उपवनसंरक्षक वन विभाग कोल्हापूर यांनी कोल्हापूर जिल्हयातील चांदोली अभयारण्य,राधानगरी तालुक्यातील दाजीपूर,तसेच तिलारी हया विभागामध्ये जैवविविधता संवर्धन कसे करता येईल याबाबत माहिती दिली. कोल्हापूर जिल्हयामध्ये फॉरेस्ट एरिया मोठया प्रमाणात असल्याचे जैवविविधतेचे संवर्धन मोठया प्रमाणात होऊ शकते असे सांगितले.
मा. डॉ.मानसिंग राज निंबाळकर सहा.प्राध्यापक, शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर यांनी जैवविविधता म्हणजे काय? ही संकल्पना आपल्या वक्त्व्यातून स्पष्ट केली. जैवविविधतेच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर 18 हॉटस्पॉट ओळखले जातात.त्यापैकी 2 हॉटस्पॉट भारतात आहेत.1. पश्चिम घाट 2.ईशान्य कडील भाग या दोन्ही भागातील जैवविधितेचे जतन करणे महत्त्वाचे आहे.त्यासाठी जैवविविधतेचा शाश्वत वापर करणे आवश्यक आहे. बायो डायव्हरसिटी अंतर्गत निसर्गातील सर्व घटकांचा योग्य तो समतोल राहणे व तो टिकविणेसाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणेआवश्यक असलेचे नमुद केले.
मा. श्री. ए. डी. जाधव,सदस्य, महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडळ व फॅकल्टी डिपार्टमेंट ऑफ झूलॉजी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी जैवविविधता मंडळ व अनुषंगिक बाबींबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. जैवविविधतेच्या अनुषंगाने स्थानिक पातळीवरुन निसर्गातील सर्व घटकांच्या नोंदी व त्यंाचे संवर्धन करणे आवश्यक असलेने सदरचा कायदा केंद्र शासनाकडून करणेत आला असून त्याची कार्यवाही ग्राम पंचायत स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य व जबाबदारी आहे.त्यानुसार निसर्गातील प्रत्येक घटक अत्यंत महत्वाचा असून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त असलेने त्या सर्व घटकांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. ज्या दुर्मिळ जाती-प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्या संवर्धन केल्या तरच निसर्गाचा समतोल राहणार आहे. याबाबतीत आपल्या सर्वांचा सहभाग अत्यंत आवश्यक असलेबाबत नमुद केले. ग्राम स्तरावर जैव विविधतेच्या नोंदी करणेसाठी आवश्यक ती कार्यवाही करणेचे आवाहन केले. ग्राम स्तरावरील जैव विविधतेच्या नोंदी बाबत गोपनीयता ठेवणे आवश्यक असलेचे नमुद केले.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी मान्यवरांचे स्वागत करून जैव विविधता संकल्पना अत्यंत मोजक्या व अचूक शब्दांमध्ये मांडणी करून सर्वांना माहिती दिली. पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरुन या बाबत नागपूर मंडळाकडील मार्गदर्शक सुचनेप्रमाणे पुढील आवश्यक ती कार्यवाही करणेत यावी असे सांगितले.
सदर जैविक विविधता व्यवस्थापन समितीच्या सभेचे आयोजन ग्राम पंचायत विभागकडून करणेत आले. सदरच्या सभेचे प्रस्तावना व थोडक्यात माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत) यांनी दिली. सदर बैठकीस मान्यवर जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेडील विविध विभागांचे खातेप्रमुख, इतर संबंधित विभागाचे निमंत्रक, सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत) यांनी आपले मनोगत व आभार प्रदर्शन मानून मान्यवरांच्या परवानगीने सभा संपलेचे सांगितले.
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं)
जिल्हा परिषद कोल्हापूर