संपूर्ण देशामध्ये दि.15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर,2017 या कालावधीमध्ये स्वच्छ ही सेवा अभियान राबविले जाणार आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत जिल्हास्तरावर आज रोजी स्वच्छता रथाच्या शुभारंभाच्या माध्यमातून या अभियानास प्रारंभ झाला.स्वच्छता रथाचा शुभारंभ मा.सौ.शौमिका महाडी,अध्यक्षा यांच्या हस्ते संपन्न झाला.या शुभारंभ कार्यक्रमास जि.प.कोल्हापूर मा.डॉ.कुणाल खेमनार,मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.कोल्हापूर,तसेच,मा.श्री.इंद्रजित देशमुख,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.कोल्हापूर, मा.श्रीम.सुषमा देसाई,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा.व स्व.),मा.डॉ.प्रकाश पाटील,जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
दि.14/9/2017 रोजी अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांनी साधारण सभेमध्ये स्वच्छतेची शपथ घेण्यात आली होती.आज स्वच्छतेच्या रथाच्या माध्यमातून स्वच्छता प्रबोधनाच्या कामास प्रारंभ करण्यात आला असून या पंधरवडयामध्ये ग्राम स्तरावर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत,यामध्ये यामध्ये स्वच्छतेसाठी प्रभातफेरी,स्वच्छतेची शपथ ,परिपाठ व हातधुवा दिन असे उपक्रम शालेयस्तरावरती राबविले जाणार आहेत,तर ग्राम पंचायतस्तरावर स्वच्छतारथाच्या माध्यमातून प्रबोधन करणे.स्वच्छता पथक स्थापन करणे,प्लास्टिक पिशव्या न वापरणेबाबत जनजागृती करणे,गवंडी प्रशिक्षणाच्या माध्यमातून शौचालय बांधकाम शुभारंभ करणे,पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची स्वच्छता करणे,परिसर स्वच्छता आणि घनकचरा व सांडपाणाी व्यवस्थापन अंतर्गत ग्राम पंचायतींचा सर्व्हे करणे असे उपक्रम राबविले जाणार आहेत.
या अभियानाच्या यशस्वीतेसाठी सर्व पदाधिकारी,अधिकारी आणि ग्रामस्थ यांना सक्रिय सहभाग घेण्याबाबत मा.सौ.शौमिका महाडीक,अध्यक्षा,जि.प.कोल्हापूर यांनी स्वच्छता रथाच्या शुभारंभावेळी आवाहन केले.
—————————————————————————————————–
उपमुख्य कार्यकारी अधिकारी,(पा.व स्व.)
जिल्हा परिषद, कोल्हापूर