22 मे,2018 रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस साजरा करणे.

मा.अध्यक्ष राष्ट्रीय जैव विविधता प्राधिकरण,भारत सरकार यांचेकडून प्राप्त झालेल्या सुचनेनुसार  दि.22/05/2017 “आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस” जिल्हा पातळीवर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये  साजरा करणेत आला.त्यावेळी  प्रथमत: मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करणेत आले.त्यानंतर जैवविविधतेबाबतचा ध्वनीमुद्रंाकित पोवाडा सभागृहामध्ये सर्वांना एकविणेत आला.तसेच निसर्गातील दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन करणेच्या दृष्टीने जैवविविधता शपथ सभागृहामध्ये सर्वांच्या कडून घेणेत आली.

मा.श्री. प्रभुनाथ शुक्ल भा.व.से उपवनसंरक्षक वन विभाग कोल्हापूर यांनी कोल्हापूर जिल्हयातील चांदोली अभयारण्य,राधानगरी तालुक्यातील दाजीपूर,तसेच तिलारी हया विभागामध्ये जैवविविधता संवर्धन कसे करता येईल याबाबत माहिती दिली. कोल्हापूर जिल्हयामध्ये फॉरेस्ट एरिया मोठया प्रमाणात असल्याचे जैवविविधतेचे संवर्धन मोठया प्रमाणात होऊ शकते असे सांगितले.

मा. डॉ.मानसिंग राज निंबाळकर सहा.प्राध्यापक, शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर यांनी जैवविविधता म्हणजे काय? ही संकल्पना  आपल्या वक्त्व्यातून स्पष्ट केली. जैवविविधतेच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर 18 हॉटस्पॉट ओळखले जातात.त्यापैकी 2 हॉटस्पॉट भारतात आहेत.1. पश्चिम घाट 2.ईशान्य कडील भाग या दोन्ही भागातील जैवविधितेचे जतन करणे महत्त्वाचे आहे.त्यासाठी जैवविविधतेचा शाश्वत वापर करणे आवश्यक आहे. बायो डायव्हरसिटी अंतर्गत निसर्गातील सर्व घटकांचा योग्य तो समतोल राहणे व तो टिकविणेसाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणेआवश्यक असलेचे नमुद केले.

मा. श्री. ए. डी. जाधव,सदस्य, महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडळ व फॅकल्टी डिपार्टमेंट ऑफ झूलॉजी  शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी जैवविविधता मंडळ व अनुषंगिक बाबींबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. जैवविविधतेच्या अनुषंगाने स्थानिक पातळीवरुन निसर्गातील सर्व घटकांच्या नोंदी व त्यंाचे संवर्धन करणे आवश्यक असलेने सदरचा कायदा केंद्र शासनाकडून करणेत आला असून त्याची कार्यवाही ग्राम पंचायत स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य व जबाबदारी आहे.त्यानुसार निसर्गातील प्रत्येक घटक अत्यंत महत्वाचा असून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त असलेने त्या सर्व घटकांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. ज्या दुर्मिळ जाती-प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्या संवर्धन केल्या तरच निसर्गाचा समतोल राहणार आहे. याबाबतीत आपल्या सर्वांचा सहभाग अत्यंत आवश्यक असलेबाबत नमुद केले. ग्राम स्तरावर जैव विविधतेच्या नोंदी करणेसाठी आवश्यक ती कार्यवाही करणेचे आवाहन केले. ग्राम स्तरावरील जैव विविधतेच्या नोंदी बाबत गोपनीयता ठेवणे आवश्यक असलेचे नमुद केले.

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी मान्यवरांचे स्वागत करून जैव विविधता संकल्पना अत्यंत मोजक्या व अचूक शब्दांमध्ये मांडणी करून सर्वांना माहिती दिली. पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरुन या बाबत नागपूर मंडळाकडील मार्गदर्शक सुचनेप्रमाणे पुढील आवश्यक ती कार्यवाही करणेत यावी असे सांगितले.

सदर जैविक विविधता व्यवस्थापन समितीच्या सभेचे आयोजन ग्राम पंचायत विभागकडून करणेत आले. सदरच्या सभेचे प्रस्तावना व थोडक्यात माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत) यांनी दिली. सदर बैठकीस मान्यवर जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेडील विविध विभागांचे खातेप्रमुख, इतर संबंधित विभागाचे निमंत्रक, सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत) यांनी आपले मनोगत व आभार प्रदर्शन मानून मान्यवरांच्या परवानगीने सभा संपलेचे सांगितले.

 

उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं)

                                                                                                         जिल्हा परिषद कोल्हापूर