1 जानेवारीपासून जिल्हयात ‘स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेला’ सुरूवात
(शौचालयाची सुंदर रंगरंगोटी केल्यास राष्ट्रीय स्तरावर पुरस्काराने सन्मानित)
कोल्हापूर : दि.31/12/2018
केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाकडून दि.1 ते 31 जानेवारी 2019 या कालावधीमध्ये ‘स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धा’ आयोजित केली आहे. या स्पर्धेचा हेतू ग्रामीण भागतील प्रत्येक कुटुंबाने आपले शौचालय स्वच्छ, सुंदर दिसावे व शौचालय प्रती अभिमानास्पद स्वामित्व भावना वाटावी आणि स्वच्छता सुविधा स्पष्टपणे नजरेत याव्यात हा आहे. या उपक्रमासाठी कुटुंब प्रमुखाने स्वनिधीतून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रंगरंगोटी करावयाची आहे.
या स्पर्धेअंतर्गत सहभागी प्रत्येक कुटुंबाने त्यांचे वैयक्तिक शौचालय नव्याने रंग देवून स्थानिक कलांच्या व्दारे त्यावर स्वच्छतेच्या संदेशांची निर्मिती करावी.स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) चा लोगो सुध्दा यावर रंगवू शकतील.
स्पर्धेची औपचारिक सुरूवात ü दि. 1 जानेवारी,2019 रोजी करणेत येणार आहे. अभियान कालावधीत एकूण शौचालय संख्येच्या प्रमाणात रंगवलेल्या संख्येच्या टक्केवारिप्रमाणे राज्यातील तीन उत्कृष्ट जिल्हे निवडले जातील. या प्रमाणे जिल्हयातील 5 ग्राम पंचायती अशा निवडल्या जाणार आहेत ज्यांनी कल्पकतेने शौचालय रंगविलेले असेल. त्या पाच ग्राम पंचायतीमधील छायाचित्र राज्यस्तरावर पाठविले जाणार आहे.
राज्यस्तरावर प्राप्त झालेल्या फोटो व माहितीच्या आधारे राष्ट्रीय स्तरासाठी राज्यस्तरावरून नामनिर्देशन करण्यात येईल. जिल्हयाकडून रंगविलेल्या शौचालयांची गावनिहाय तालुकानिहाय छायाचित्रांसह माहिती 25 जानेवारी 2019 पर्यंतच पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेकडे पाठविली जाणार आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदे मार्फत, सदर स्पर्धेत जास्तीत जास्त कुटुंबांनी व ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविणेसाठी प्रत्येक तालुका स्तरावर “स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धात” प्रथम,व्दितीय व तृतीय क्रमांक उत्कृष्ट शौचालयासाठी निवडले जाणार आहेत, व शौचालय संख्येच्या प्रमाणात एक उत्कृष्ट ग्राम पंचायत निवडली जाणार आहे. तसेच जिल्हा स्तरावर या स्पर्ध अंतर्गत उत्कृष्ठ शौचालयासाठी प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक निवडले जाणार असुन, शौचालय संख्येच्या प्रमाणात शौचालय रंगविलेल्या पाच ग्रामपंचायती व उत्कृष्ठ तालुक्याची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या उत्कृष्ठ शौचालय कुटुंबांना, ग्रामपंचायतींना व तालुक्यांना प्रमाणपत्र देवुन सन्मानित करणेत येणार आहे. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील सर्व ग्राम पंचायतींनी सहभागी होणेबाबत मा.सौ. शौमिका महाडीक, अध्यक्ष, जि. प. कोल्हापूर व मा. अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. कोल्हापूर यांनी आवाहन केले आहे.
(प्रियदर्शिनी चं.मोरे)
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (पा. व स्व.)
जिल्हा परिषद, कोल्हापूर