शिक्षण विभाग (प्राथ.) सर्व शिक्षा अभियान
सन 2016-17 मधील मंजूर तरतूद व उपक्रमांची माहिती
सर्व शिक्षा अभियान एकूण तरतूद रू. 5130.66 लाख मंजूर
१)उपक्रमासाठी एकूण र.रू. 4871.50 लाख
२)Spillover रू. 212.11
३)कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयासाठी रू. 47.05 लाख
1) RTE ॲक्ट 2009 कलम 12 (1) (क) अंतर्गत 25% प्रवेशाची प्रतिपूर्ती :-
सन 2016-17 या शैक्षणिक वर्षामध्ये RTE Act 2009 कलम 12 (1) (क) अंतर्गत 25% प्रवेश ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे, त्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती संबंधित शाळेला देणेसाठी एकूण रक्कम रू. 75.42 लाख तरतूद या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यास सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मंजूर झालेली आहे.
2) विशेष प्रशिक्षण (अनिवासी 6 महिन्यांसाठी) :-
सन 2016-17 या शैक्षणिक वर्षामध्ये RTE Act 2009 अन्वये वयानुरुप समकक्ष वर्गामध्ये दाखल होणारे विद्यार्थी हे शाळेमध्ये 30 दिवसांपेक्षा अधिक सतत गैरहजर अगर शाळेमध्ये कधीच दाखल न झालेली मुले ही वयानुरूप समकक्ष वर्गामध्ये संबंधित शाळा दाखल करून घेत असते. अशा मुलांसाठी त्याच शाळेमध्ये अनिवासी स्वरूपात 3 महिन्यांचे विशेष प्रशिक्षण संबंधित शिक्षकामार्फत देणेत येते. या विशेष प्रशिक्षणासाठी प्रति विद्यार्थी रू. 3000/- प्रमाणे एकूण 472 विद्यार्थ्यांसाठी रू. 14.16 लाख मंजूर आहे. माहे ऑगस्ट 2016 मध्ये एकूण 471 विद्यार्थ्यांची रक्कम रू. 14.13 लाख निधी संबंधित शाळा व्यवस्थापन समितींकडे RTGS प्रणालीद्वारे वितरीत केलेली आहे.
3) मोफत पाठ्यपुस्तके :-
शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळेतील इ. 1 ली ते 8 वी (प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा) च्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व स्वाध्यायपुस्तिका वितरण करणेसाठी एकूण 352549 विद्यार्थ्यांसाठी एकूण र.रु. 673.03 लाख तरतूद मंजूर आहे. माहे जून 2016 मध्ये शाळेच्या प्रथम दिनी बालभारती पाठ्यपुस्तक भांडार, शिरोली, कोल्हापूर येथून सर्व पाठ्यपुस्तके उपलब्ध करून घेऊन गट स्तरामार्फत संबंधित शाळांना या कार्यालयाकडून वितरीत करणेत येतात. सदरचा खर्च राज्य स्तरावरून जे.व्ही. द्वारे होत असतो.
4)गणवेश :-
इ. 1 ली ते 8 वी च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामधील सर्व मुली, अनु.जाती / जमाती व दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले अशा लाभार्थी विद्यार्थी यांना प्रति विद्यार्थी र.रू. 400/- 2 गणवेश संचाकरीता तरतूद मंजूर आहे. यामध्ये एकूण 96702 मुली, 15543 अनु.जाती मुले, 684 अनु.जमाती मुले तसेच 8995 दारिद्य्ररेषेखालील पालकांची मुले अशी एकूण विद्यार्थी संख्या 121924 असून एकूण रक्कम रू. 487.70 लाख तरतूद मंजूर आहे. सदरची तरतूद माहे जून 2016 मध्ये शासनाच्या निकषानुसार संबंधित शाळा व्यवस्थापन समितीकडे जिल्हा स्तरावरून RTGS प्रणालीद्वारे वर्ग करणेत आलेली आहे. शाळा व्यवस्थापन समितीमार्फत गणवेश 100% लाभार्थ्यांना गणवेश वितरीत करणेत येतात.
4) शिक्षक वेतन :-
161 नवीन प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत 322 नियमित शिक्षकांसाठी रू. 6.00 लाख याप्रमाणे रक्कम रु. 1932.00 लाख तरतूद मंजूर आहे. सदरची तरतूद राज्य स्तरावरून संबंधित विभागाकडे आदा करणेत येते व खर्चाची JV या कार्यालयाकडे प्राप्त होते.
5)अतिथी निदेशक पथक :-
सन 2016-17 मध्ये नव्याने, 07 ऑक्टोबर 2015 च्या शासन निर्णयानुसार 100 पटापेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये (इ. 6 वी ते 8 वी) मानधन तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात शाळा व्यवस्थापन समिती मार्फत संबंधित शाळांमध्ये कला, कार्यानुभव व शारिरिक शिक्षण या विषयाचे अतिथी निदेशक नियुक्त करणेची आहेत. अशा अतिथी निदेशक पथकांमधील निदेशकांना प्रति निदेशक रू. 5000/- प्रमाणे एकूण 454 निदेशकांसाठी रक्कम रू. 1998.00 लाख तरतूद मंजूर आहे. गटांकडून अहवाल प्राप्त होताच या निदेशकांची तरतूद संबंधित गटामार्फत SMC कडे वर्ग करणेत येत आहे.
6) शिक्षक प्रशिक्षण :-
खालीलप्रमाणे शिक्षक प्रशिक्षणासाठी तरतूद मंजूर असून सर्व प्रशिक्षणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, डाएट, कोल्हापूर मार्फत घेणेत येतात. प्रशिक्षणास शिक्षक / प्रशिक्षक यांना उपस्थित ठेवणेची तसेच निधी वितरणाची कार्यवाही या कार्यालयाकडून करणेत येते.
7) गट साधन केंद्र अनुदान (BRC) :-
खालीलप्रमाणे एकूण र.रू. 161.82 लाख तरतूद BRC करीता मंजूर आहे. यामध्ये खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचनांनुसार खर्च करणेत येतो.
8) समूह साधन केंद्र अनुदान (CRC) :-
एकूण 202 केंद्रांकरीता सादिलसाठी रू. 20.20 लाख व सभा प्रवाससाठी (@ रू. 1000/) प्रमाणे रू. 24.24 लाख अशी एकूण र.रु. 44.44 लाख इतकी तरतूद मंजूर आहे. मार्गदर्शक सुचनांनुसार सदरचा निधी गटामार्फत CRC कडे वितरीत करणेत येतो.
9) नवोपक्रम अंतर्गत उच्च प्राथमिक शाळांसाठी संगणक शिक्षण :-.
नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत 29 उच्च प्राथ. शाळांमध्ये संगणक शिक्षण सुविधा उपलब्धतेसाठी र.रू. 49.91 लाख तरतूद मंजूर आहे. म.प्रा.शि.प., मुंबई कार्यालयाकडून या उपक्रमांतर्गत सुचना प्राप्त होताच खर्च करणेत येत आहे.
10) शिक्षक अनुदान :-
सन 2016-17 मध्ये नव्याने प्राथमिक इ. 1 ली ते 5 वी व उच्च प्राथमिक इ. 6 वी ते 8 वी मधील कार्यरत (खाजगी अनु. व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील) शिक्षकांना प्रति शिक्षक रू. 500/- प्रमाणे अनुदान मंजूर असून यामध्ये शैक्षणिक साधने तयार करणे अपेक्षित आहे. यामध्ये इ. 1 ली ते 2 री 4154 शिक्षकांसाठी रू. 20.77 लाख, इ. 3 री ते 5 वी 3600 शिक्षकांसाठी रू. 18.00 लाख, तसेच इ. 6 वी ते 8 वी 5366 शिक्षकांसाठी रू. 26.83 लाख अशी एकूण 13120 शिक्षकांसाठी रक्कम रू. 65.60 लाख तरतूद मंजूर आहे.
11)शाळा अनुदान :-.
शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळा एकूण 3659 पैकी 2225 प्राथमिक शाळांना रु. 5000/- प्रमाणे तरतूद रु. 111.25 लाख व 1434 उच्च प्राथमिक शाळांना रु. 7000/- प्रमाणे तरतूद र.रु. 100.38 लाख अशा प्रकारे एकूण र.रू. 211.63 लाख इतकी तरतूद मंजूर आहे. या अनुदानातून शाळेसाठी लागणारे शैक्षणिक, क्रीडा, संगीत, विषयी साहित्य, तसेच फनिर्चर खरेदी करणेत येते.
12)शाळा देखभाल दुरूस्ती अनुदान :-
शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांसाठी प्रति शाळा रक्कम रू. 7,500/- याप्रमाणे एकूण 2941 शाळांसाठी तरतूद र.रू. 220.58 लाख मंजूर आहे.
क्रीडा प्रशिक्षणार्थी स्पर्धेसाठी, शिबीरासाठी बाहेर गावी गेल्यानंतर त्यांचा शालेय अभ्यासक्रम सुध्दा इतर वेळेमध्ये पुर्ण करुन घेण्याची व्यवस्था.
13)समावेशित शिक्षण (दिव्यांग बालकांसाठी) :-
विशेष गरजा असणाऱ्या 5584 विद्यार्थ्यांसाठी समावेशित शिक्षण उपक्रम अंमलबजावणीसाठी रक्कम रु. 167.52 लाख मंजूर आहे. यामध्ये दिव्यांग बालकांना साहित्य साधने, शैक्षणिक व वैद्यकीय सहाय्यभूत सेवा, शस्त्रक्रिया, मदतनीस व प्रवास भत्ता इ. सुविधा पुरविण्यात येतात. तसेच विशेष फिरते शिक्षक यांच्या वेतनाची तरतूदीचा समावेश आहे. लार्ज प्रिंट व ब्रेल बुक पुस्तके यांचा लाभ दिला जातो. तसेच विशेष शिक्षकांचे वेतन आदा केले जाते.
14)नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी रू. 50 लाख (पढे भारत बढे भारत) :-
मुलींचे शिक्षण करीता रू. 12.50 लाख, अनु. जाती-जमाती मुले करीता रू. 12.50 लाख, अल्पसंख्यांक मुले करीता रू. 12.50 लाख, तसेच शहरी भागातील वंचित (दुर्लक्षित) मुलांसाठी रू. 12.50 लाख याप्रमाणे एकूण रक्कम रू. 50 लाख तरतूद मंजूर आहे. म.प्रा.शि.प., मुंबई कार्यालयाच्या सुचनेनुसार कार्यवाही करणेत येते.
15)शाळा व्यवस्थापन समिती प्रशिक्षण :-
शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील एकूण 12089 SMC (शाळा व्यवस्थापन समिती) सदस्यांकरीता अनिवासी स्वरूपात 3 दिवसीय प्रशिक्षणासाठी रक्कम रु. 36.27 लाख तरतूद मंजूर आहे. म.प्रा.शि.प., मुंबई कार्यालयाच्या सुचनेनुसार कार्यवाही करणेत येते.
16)बांधकाम :-
1 अतिरिक्त वर्गखोली (Dailiapated Building) करीता रू. 8.37 लाख, ग्रामीण भागातील अतिरिक्त वर्गखोलीकरीता रू. 182.40 लाख, तसेच अतिरिक्त स्वच्छतागृह मुलांसाठी 42 उद्दीष्टाकरीता रू. 77.20 लाख व मुलींसाठी 20 भौतिक उद्दीष्टाकरीता रू. 39.14 लाख, त्याचबरोबर Spillover मध्ये याच कामासाठी मुलांसाठी 04 स्वच्छतागृह करीता रू. 42.00 लाख व मुलींच्या 04 स्वच्छतागृहांसाठी रू. 20.00 लाख अशी तरतूद मंजूर आहे. त्याचबरोबर Spillover मध्ये 1 वर्गखोलीसाठी रू. 6.90 लाख व 2 वर्गखोलीसाठी रू. 13.80 लाख तरतूद मंजूर आहे. विशेष दुरूस्तीसाठी 20 प्राथमिक शाळांसाठी रू. 34.23 लाख याप्रमाणे बांधकाम करीता एकूण तरतूद रू. 362.03 लाख तरतूद मंजूर आहे.
17)व्यवस्थापन :-
व्यवस्थापन या शिर्षांतर्गत व्यवस्थापन (3.5 %) करीता रू. 119.30 लाख, तसेच अध्ययन समृध्दी कार्यक्रम LEP (2%) अंतर्गत इ. 1 ली व 2 री च्या 574 शाळांसाठी रू. 50.94 लाख व इ. 3 री ते 5 वी च्या 606 शाळांसाठी रू. 53.29 लाख मंजूर आहे. त्याचप्रमाणे लोकजागृती उपक्रम (0.5%) करीता रू. 25.18 लाख याप्रमाणे एकूण तरतूद र.रू. 248.71 लाख तरतूद व्यवस्थापन शिर्षामध्ये मंजूर आहे.
18)कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय :-
कोल्हापूर जिल्हयातील गगनबावडा या तालुक्यामध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय इ. 5 वी ते 10 वीच्या शाळाबाह्य मुलींसाठी निवासी स्वरुपात दि.01 जुलै, 2008 पासून सुरू आहे. सदर विद्यालयाच्या खर्चासाठी रु. 47.05 लाख तरतूद मंजूर आहे. यामध्ये कार्यरत कर्मचारी यांचे वेतन, निर्वाह भत्ता, विद्यावेतन, लाईट व पाणी बील जीवनकौशल्य प्रशिक्षण, सादिल किरकोळ दुरुस्ती, पुर्वतयारी वर्ग, माता-पालक संघ याकरिता खर्च करणेत येत आहे. सदर तरतूद शासनाकडून शाळेच्या खात्यावर जमा होते व शाळास्तरावरुन खर्च करणेत येतो.