स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना हा दारिद्रय निर्मुलनाचा कार्यक्रम दि.०१/०४/१९९९ पासून सूरू करण्यात आला. दारिद्रय रेषेखालील कुटुंबांसाठी कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करणे, त्यांचा आर्थिक स्तर उंचावणे या बरोबरच समाजाविषयी त्यांच्यामध्ये जाणीव निर्माण करणे या उद्देशाने पूर्वी सुरू असलेल्या व्यक्तीगत लाभाच्या योजना एकत्रित करून बचत गटाचे माध्यमातून ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबांसाठी सदरची योजना अंमलात आली.प्रशिक्षण, पतपुरवठा, तंत्रशास्त्र , मूलभूत सुविधा आणि पणन व्यवस्था इ. सारख्या स्वयंरोजगारासाठी आवश्यक असणा-या सर्व बाबी अंतर्भूत या कार्यक्रमांतर्गत करण्यात आल्या आहेत.
योजनेचा उद्देश :-
ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना ( या योजनेंतर्गत लाभार्थीला स्वंरोजगारी म्हणून संबोधण्यात येते ) त्यांचेकडे असलेल्या अंगभूत कौशल्ये आणि क्षमता यांचा वापर करून लहान लहान उद्योगधंदे सुरू करण्यासाठी त्यांना बँकेमार्फत अर्थसहाय्य आणि या योजनेंतर्गत अनूदान उपलब्ध करून देवून त्यांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन मिळवून देवून त्यांना दारिद्रय रेषेच्या वर आणणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. स्वयंसहाय्यता बचत गट ही या योजनेची मुख्य संकल्पना आहे. दारिद्रय रेषेखालील किमान १० ते २० स्वरोजगारींनी एकत्र येवून बचत गटांची स्थापना करावयाची आहे. अशा प्रकारे स्थापन झालेल्या बचत गटांतील सदस्यांना व्यवसायाची निवड करणे, व्यवसायासंबंधीचे प्रशिक्षण व मार्गदर्शन देणे आणि प्रकल्पासाठी कर्ज आणि अनूदान उपलब्ध करून देवून त्यांचेसाठी अतिरिक्त व कायमस्वरूपी मिळकतीचा मार्ग निर्माण करून देणे, हे या योजनेचे मुख्य येय आहे. बचत गटांचे प्रकल्प व्यवसायांसाठी आवश्यक असणार्याे मूलभूत सुविधा पुरविणे, मागचे व पुढचे दुवे प्रस्थापित करणे ( बॅकवर्ड / फॉरवर्ड लिंकेजस ) या बाबीदेखील यामध्ये अंतर्भूत आहेत. त्याशिवाय बचत गटातील सदस्यांमध्ये बचतीची सवय बाणावी आणि अशा बचतीच्या रक्कमेतूनच सदस्यांच्या कौटुंबिक स्वरूपाच्या आर्थिक गरजा भागवणेसाठी वेळोवेळी आर्थिक मदत उपलब्ध व्हावी, ही या योजनेचा दुय्यम हेतू आहे.
स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेंतर्गत पुरेशा प्रमाणात पतपुरवठा हा महत्वाचा घटक आहे आणि शासकीय अनूदान हा दूय्यम आणि आधारभूत घटक आहे. त्यामूळे बँकांचा जास्तीत जास्त सहभाग हा या योजनेचा मुख्य पाया आहे.
योजनेची ठळक वैशिष्टये :-
केंद्र व राज्य शासनाकडून ७५:२५ या प्रमाणात उपलब्ध होणारा निधी पूढीलप्रमाणे विनियोगात आणावयाचा आहे.
अ) प्रकल्प व्यवसायासाठी बचत गटांना अनूदान – ६० टक्के,
ब) मूलभूत सुविधा निर्माण करणे – .. २० टक्के,
क) प्रशिक्षण कार्यक्रम – .. .. .. १० टक्के,
ड) स्वयंसहायता बचत गटांना खेळते भांडवल पुरवणे – १० टक्के.
निधीच्या विनियोगाबाबतचे प्राधान्यक्रम अशा पदतीने निश्चित करण्यात यावेत जेणेकरून स्वयंसहायता बचत गट तसेच व्यक्तीगत स्वरोजगारींचे प्रकल्प व्यवसायासाठी आवश्यक असणारी मत्ता निमीर्तीसाठी पूरेशा प्रमाणात निधी उपलब्ध राहिल. त्यासाठी मूलभूत सुविधांसाठी २० टक्के ही खर्चाची अंतीम मर्यादा आहे. तसेच उपलब्ध होणार्या निधीपैकी रू.५.०० लाखापर्यंतचा निधी पणन व्यवस्थापन, बाजारपेठ निमीर्ती, उत्पादित वस्तुंचा दर्जा सूधारणा इ. सारख्या बाबीवर करावयाचा आहे.
व्यक्तीगत स्वरोजगारीऐवजी बचत गटांमार्फतच आथिर्क मदत देण्यास या योजनेंतर्गत प्राधान्य आहे. स्वरोजगारींचे अनुदानासाठी उपलब्ध निधीपैकी ७५ टक्के निधी हा बचत गटांवर त्यांनी निवडलेल्या की अॅरक्टिव्हिटिज करताच ( प्रकल्प व्यवसाय ) खर्च करणेचा आहे. तथापी व्यक्तीगत स्वरोजगारींना नफ्याची हमी असलेल्या अन्य कोणत्याही व्यवसायासाठी ( निवडलेल्या की अॅतक्टिव्हिटिजशिवाय ) आणि तेही केवळ अपवादात्मक बाबींसाठीच ( उदा. अनु.जाती/ जमातीचे किंवा अपंग लाभार्थी ) लाभ देता येईल. परंतू त्यासाठी जास्तीत जास्त २५ टक्के इतकीच मर्यादा असेल आणि ही मर्यादा म्हणजे प्रमाणक नव्हे.
महिलांना प्राधान्य द्यावयाचे असल्याने प्रत्येक तालुक्यातून स्थापन करावयाच्या बचत गटांपैकी ५० टक्के निव्वळ महिला बचत गट असावेत.
सम विचारी आणि समान सामाजिकव आर्थिक स्तर असणार्या , शिवाय समान निकड असणार्याि अशा किमान १० ते 20 महिलांनी एकत्रित येवून बचत गटाची स्थापना करणे.
बचत गटास आवश्यक ते सर्व प्रकारचे प्रशिक्षण देणे.
बचत गटांकडे असलेल्या बचतीच्या रक्कमेतून सदस्यांचा प्रासंगिक अडीअडचणीसाठी अल्प व्याज दराने कर्ज उपलब्धकरून देणे,
स्वयंसहायता महिला बचत गट स्थापनेपासून ६ महिन्याच्या कालावाधी नंतर पहिली प्रतवारी झाल्यावर खेळत्या भांडवलाच्या रूपात आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे,
बचत गट कार्यक्षमपणे सुरू राहिल्यानंतर पुढे प्रकल्प व्यवसायांसाठी बँके कडून अर्थसहाय आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून अनूदान उपलब्ध करून देणे,
बचत गटांतील महिलांनी अन्य महत्वाच्या सामाजिक प्रश्नांच्या – आरोग्य, सामाजिकस्वास्थ, शिक्षण, बालसंगोपन इ. सोडवणुकी साठी सहभागी व्हावे, यासाठी त्यांचे प्रबोधन करणे व जाणीव जागृतीचा कार्यक्रम राबविणे.
स्वयंसहायता महिला बचत गटातील महिला सदस्यांना जुजबी विमा हप्त्यामध्ये अपघाती विमा संरक्षण देणे.
राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियान (एन.आर.एल.एम) मार्गदर्शक सु्चना १
राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियान (एन.आर.एल.एम) मार्गदर्शक सु्चना २
राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियान (एन.आर.एल.एम) मार्गदर्शक सु्चना ३
स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना आराखडा २०१२-१३
मुलभुत सुविधा अपुर्ण कामांची माहिती