स्वच्छ भारत मिशन अंतर्गत – जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्राम सेवकांचा सत्कार

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हयात उत्कृष्ट काम करणा-या ग्राम सेवकांचा सत्कार

(जिल्हा समन्वय सभेत जिल्हयातील 4 ग्रामसेवकांचा गौरव )

कोल्हापूर : दि. 9/3/2017

 

      जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत आज रोजी समन्वय सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेमध्ये जिल्हयात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत -उत्कृष्ट काम करणा-या ग्राम सेवकांचा मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गौरव केला.

सर्वच विषयांचा आढावा घेण्यासाठी आयोजित या बैठकीमध्ये सर्व खातेप्रमुख आणि गटविकास अधिकारी उपस्थित होते.पाणी व स्वच्छता विभागाचा ही आढावा घेताना जिल्हयातील स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उत्कृष्ट काम करणारे ग्राम सेवक श्री.के.पी.पोवार, ग्राम पंचायत कोलीक, ता.पन्हाळा यांनी शौचालय बांधकामसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजार भोगाव येथील हार्डवेअर दुकानदारास स्वत:  र.रू.50000/- देवून साहित्य खरेदी केले आणि बांधकामासाठी शेजारच्या गावातून 10 गवंडी गोळा करून 100 % शौचालय बांधकाम पूर्ण केले.तसेच ग्राम सेवक श्री.पोपट जगताप,ग्रामपंचायत,पोंंबरे,ता.पन्हाळा यांनी देखील बांधकामासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी र.रू.10000/- हार्डवेअर दुकानदारास स्वत: दिले तर या ग्राम पंचायतीच्या सरपंचांनी साहित्य खरेदीसाठी चेन गहान टाकून लाभार्थ्यांना साहित्य खरेदी करून दिले व गाव 100%हागणदारीमुक्त केले.  दुर्गम भाग असून देखील गावक-यांना शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या ग्राम सेवकांनी केलेल्या कामाचा गौरव या आढावा सभेत करण्यात आला.

ग्राम पंचायत पटट्ण कोडोली,ता.हातकणंगले या ग्राम पंचायतीचे उदद्ीष्ट 1200 पेक्षा जास्त होते.या उदद्ीष्टपूर्तीसाठी हे गाव मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दत्तक घेतले होते. ग्राम सेवक श्री.एस.पी.कांबळे,यांनी नियोजनबध्द काम करून ही ग्राम पंचायत  हागणदारीमुक्त केली.या बदद्ल त्यांचा सत्कार देखील मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केला.

ग्राम पंचायत आगरभागचे ग्राम सेवक श्री.सी.एम.कांबळे ,ता.शिरोळ यांनी   आपली ग्राम पंचायत हागणदारीमुक्त केली शिवाय त्यांनी गावात निर्माण होणा-या सांडपाण्याला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी गावामध्ये नांदेड पॅटर्नचे 350 शोषखडडे् तयार केले आहेत.या कामास सुरूवातील ग्रामस्थांकडून तक्रारी झाल्या ,कामास विरोध झाला पण हे काम त्यांनी यशस्वी केले. यावेळी सर्व ग्रामसेवकांनी मनोगत व्यक्त करून शौचालय उदद्ीष्टपूर्तीसाठी केलेल्या कामाबाबत माहिती सांगितली. मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी   ग्रामसेवकांचा गौरव करून सर्व तालुक्यात याप्रमाणे उदद्ीष्टपूर्ती करणेबाबत सर्व गटविकास अधिकारी यांना सूचना दिल्या.

या आढावा बैठकीसाठी जिल्हयातील हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील सर्वात जास्त उदद्ीष्ट असणा-या 10 ग्राम पंचायतींना देखील आढाव्यासाठी उपस्थित होत्या.(ग्रा.पं.हेर्ले- 222,रेंदाळ-266,रूकडी-301,कबनूर-317,शिरोली-361,हुपरी- 422,ता.हातकणंगले,ग्रा.पं.शिरोळ-315,अब्दुल लाट- 448,दानोळी-223,ता.शिरोळ) या सर्व ग्राम पंचायतींना  माहे,मार्च अखेर गावे हागणदारीमुक्त करण्याबाबत  मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेशित केले आहे.