स्वच्छता पथकाचा जिल्हा परिषदेकडुन निरोप समारंभ -मा.अध्यक्ष श्री. राहुल पाटील यांच्या हस्ते पथकातील कर्मचा-यांना प्रशस्तीपत्र देवून आभार व्यक्त करणेत आले.

       जिल्हयातील अतिवृष्टी व महापुरामुळे बाधित झालेल्या गावांमध्ये स्वच्छतेचेे काम चांगल्या पध्दतीने पार पाडून बहुमूल्य योगदान दिलेबद्दल पुणे महानगरपालिका स्वच्छता पथकाला मा. श्री. राहुल पाटील , अध्यक्ष, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून आभार व्यक्त करणेत आले. जिल्हयातील पुरग्रस्त गावांमध्ये स्वच्छतेसाठी पुणे येथून जिल्हयामध्ये दाखल झालेले पथकाने  शिये, तालुका करवीर, चंदुर, इंगळी तालुका हातकणंगले, व शिरटी, हासुर, नांदणी, कवठेगुलंद, हेरवाड, खिद्रापूर, अकिवाट, बस्तवाड, तालुका शिरोळ या 11 गावांमध्ये स्वच्छतेचे चांगले काम केले. याबदल मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद, कोल्हापूर व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करणेत आला होता. यावेळी बोलताना ,जिल्हयातील अतिवृष्टी आणि पुरपरिस्थतीनंतर पुरपश्चात करावयाच्या स्वच्छतेसाठी, पुणे महानगर पालिका स्वच्छता पथकाकडुन गाव स्तरावर केलेले काम हे कौतुकास्पद असुन , यामुळे स्वच्छतेच्या कामास गती मिळाली आहे. यापुढे आपणाकडुन असेच  सहकार्य मिळावे असे आवाहन मा. श्री. राहुल पाटील, अध्यक्ष, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी यावेळी केले.
       यावेळी, पुणे महानगर पालिका स्वच्छता पथकाचे आरोग्य निरिक्षक श्री. राजेश रासकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, पुरग्रस्त गावांमध्ये स्वच्छतेचे काम करत असताना, अनेक अडचणी आल्या पण तालुका आणिजिल्हा स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांनी सहकार्य केल्यामुळेच स्वच्छतेचे काम चांगल्या प्रकारे करता आलेचे सांगितले.  याकार्यक्रमाला  श्री. अजयकुमार माने, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. राहूल कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी,  पुणे महानगर पालिका स्वच्छता पथक कर्मचारी व  जिल्हा परिषद कर्मचारी उपस्थित होते.