प्राथमिक शिक्षण
प्राथमिक शिक्षण हे व्यक्तिमत्व विकासाचे, समाज परिवर्तनाचे आणि राष्ट्रीय विकासाचे एक प्रमुख आणि प्रभावी साधन आहे ही बाब विचारात घेवून कोल्हापूर जिल्हा परिषदेने केंद्ग शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध शैक्षणिक योजनाबरोबरच जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून सुद्धा विविध शैक्षणिक योजना राबविलेल्या आहेत.
बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकाचा शिक्षणाचा हक्क प्राप्त झाला आहे. शिक्षणापासून वंचित असणा-या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेता यावे, शिक्षणाच्या संख्यात्मक विकासाबरोबरच दर्जामध्ये सुधारणा व्हावी या उद्देशाने प्राथमिक शिक्षण विभाग कार्यरत असून शिक्षणाचे सार्वत्रिकीकरणासाठी प्रयत्नशील आहे.
या विभागाचे कामकाम सर्व शिक्षा अभियान व आस्थापना विभागामार्फत केले जाते.
सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमातंर्गत उपक्रम
जिल्हा परिषदेच्या एकूण प्राथमिक शाळांची संख्या – 2004
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक (1 ली ते 5 वी) शाळांची संख्या – 1132
जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक (1 ली ते 8 वी) शाळांची संख्या – 872
जिल्हा परिषदेच्या एकूण माध्यमिक शाळांची संख्या – 5
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी संख्या – 1,84,641
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक संख्या – 8,813