कोल्हापूर जिल्हयातील ग्रामपंचायत स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जैव विविधता व्यवस्थापन समिती अंतर्गत लोक जैव विविधता नोंदवही तया करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्या अनुषंगाने जिल्हा तांत्रिक सहाय्य गटाची स्थापना करण्यासाठी दि. 10 /12/2019 रोजी दुपार 4.00वाजता जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृह, जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे पर्यावरण प्रेमीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हामधून कृषीशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आर्युवेदाचार्य, पशुवैद्यशास्त्र, वन, वन्यजीव, पर्यावरण व जैव विविधता संबंधित तज्ञ व इच्छूक व्यक्तींनी आपल्या बायोडाटासह उपस्थित रहावे. ग्रामपंचायत स्तरावरील लोक जैव विविधता नोंदवही तयार करण्याकरीता जिल्हातील ज्या स्वयंसेवा संस्थाकडे तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध आहे, अशा इच्छुक स्वयंसेवी संस्थांनी आजवर केलेल्या कामाचे सादरीकरण करण्यासाठी उपस्थित रहावे. यासाठी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत),जिल्हा परिषद कोल्हापूर उपवनसंरक्षक (प्रा),कोल्हापूर वनविभाग कोल्हापूर यांचे कार्यालय, वनवर्धन प्रधान डाकघर कार्यालयासमोर, ताराबाई पार्क,कोल्हापूर, यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अमन मित्तल (भा.प्र.से.) यांनी केले आहे.
(प्रियदर्शिनी मोरे)
उपमुख्यकार्यकारीअधिकारी (ग्रा.पं.)
जिल्हा परिषद कोल्हापूर