रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, कोल्हापूर यांच्यामध्ये होणा-या शिक्षक प्रशिक्षण कराराचे हस्तांतरण

 जिल्हा परिषद कोल्हापूर ,रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, कोल्हापूर यांच्यामध्ये होणा-या शिक्षक प्रशिक्षण कराराचे हस्तांतरण आज दिनांक 15/09/2017 इ. रोजी शाहू सभागृह, जिल्हा परिषद कोल्हापूर येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाले. जिल्ह्यातील किमान 10 हजार शिक्षकांना टेक्नोसेव्ही प्रशिक्षण व ज्ञानरचनावादी साहित्यनिर्मिती तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात ऊल्लेखनीय कामगिरी करणा-या शिक्षकांचा रोटरी व इनरव्हील तर्फे *नेशन बिल्डर पुरस्कार* देऊन गौरव करण्यात आला.

सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धनंजय महाडीक व अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शौमिका महाडीक, रोटरी प्रांतपाल श्री. आनंद कुलकर्णी, जिल्हा परिषद सीईओ डॉ. श्री. कुणाल खेमनार, शिक्षण समिती सभापती श्री. अंबरीषसिंह घाटगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. इंद्रजित देशमुख, शिक्षण उपसंचालक श्री. मकरंद गोंधळी, प्राचार्य DIECPD     श्री. आय. ई. शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. सुभाष चौगुले, माध्यमिक शिक्षणाधिकारी      श्री. किरण लोहार, श्री. प्रसन्न देशिंगकर तसेच रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, रोटरी क्लब ऑफ करवीर, इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज आणि इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज चे सर्व पदाधिकारी, रोटरीचे सर्व सहाय्यक प्रांतपाल, शिक्षक वर्ग तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या भाषणात खासदार श्री. धनंजय महाडीक, सौ. शौमिका महाडीक, सीईओ डॉ. श्री. कुणाल खेमनार, प्रांतपाल श्री. आनंद कुलकर्णी, श्री. अंबरीषसिंह घाटगे यांनी रोटरीच्या उपक्रमाचे कौतुक करून भविष्यात असेच मौलीक उपक्रम जिल्हा परिषदेच्या सोबत करून समाजाला प्रेरित करावे असे नमूद केले. प्रास्ताविक श्री. प्रसन्न देशिंगकर यांनी सादर केले. आभार श्रीमती रितू वायचळ यांनी मानले.

 

                                                                                             श्री. सुभाष चौगुले

                                                                                      शिक्षणाधिकारी (प्राथमिक),

                                                                                      जिल्हा परिषद, कोल्हापूर