साथीचे आजार होवू नयेत म्हणून पूर्व नियोजन महत्वाचे आहे.
जिल्हास्तरीय साथरोग शिघ्र प्रतिसाद पथकामध्ये १.अति. जि.आ.अ. २. साथरोग वै.अ. ३. प्रमुख रसायनशास्त्रज्ञ ४.बालरोग तज्ञ ५. फिजीशियन व ६. जिल्हा हिवताप अधिकारी यांचा समावेश आहे.
जिल्हास्तरीय आपत्कालीन वैद्यकिय मदत पथकामध्ये वै.अ. २ व १० कर्मचारी यांचा समावेश आहे.
जिल्हास्तरावर माहे जून ते ऑक्टोंबर या जोखमीच्या कालावधीत २४ तास नियंत्रण कक्षाची स्थापना करणेत येते.
तसेच संपर्क तुटलेल्या गावांसाठी विशेष उपाययोजना, स्थलांतरीत कँपमध्ये वैद्यकिय सुविधा, क्षेत्रिय प्रयोगशाळांची स्थापना, खाजगी वैद्यकिय व्यावसायिकांचा सहभाग, पुरेसा औषध साठा, अतिरिक्त औषध साठा, आरोग्य शिक्षण, परिसर स्वच्छता इ. बाबत नियोजन करण्यात येते.
जिल्हास्तरावर, प्रा.आ.केंद्ग स्तरावर व उपकेंद्ग स्तरावर पुरेसा औषध साठा उपलब्ध ठेवण्यात आलेला आहे.
तसेच ग्रामपंचायत मार्फत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोताचे टी.सी.एल. पावडर वापरुन शुध्दीकरण करणे बाबतची कार्यवाही आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली करण्यात येत आहे.
जेथे सार्वजनिक पाणीपुरवठा स्त्रोत बंद आहे अशा ठिकाणी मेडिक्लोर द्गावण/ क्लोरॅान टेबलेटस याचा वापर शुध्दीकरणासाठी करण्यात येत आहे.
स्थानिक वर्तमानपत्रामधून जनतेला खालीलप्रमाणे आवाहन करण्यात आलेले आहे.
१) पाणी उकळून गार करुन पिण्यासाठी वापरावे.
२) शुध्दीकरण केलेलेच पाणी पिण्यासाठी वापरावे.
३) कामासाठी शेतामध्ये जाताना घरातील शुध्दीकरण केलेलेच पाणी घेऊन जावे व पिण्यासाठी त्याच पाण्याचा वापर करावा.
४) शुध्दीकरणसाठी आवश्यक मेडिक्लोर / क्लोरिनच्या गोळया नजीकच्या प्रा.आ.केंद्गात / आरोग्य कर्मचारी यांच्याकडे उपलब्ध आहेत.
५) जलजन्य आजाराच्या रुग्णानी त्वरीत जवळच्या प्रा.आ.केंद्गाशी / आरोग्य कर्मचा-याशी संपर्क साधावा.